जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

समाज रचनेला अर्थ आहे.

सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,

नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.

धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }

'डार्विन' ची वंशावळ

मानवाच्या उत्क्रांतीविषयी अनेक तर्क-वितर्कांचे फवारे गेली कित्येक वर्ष ' बुद्धीजीवी ' लोक उडवत आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय झालेले आणि बहुतांशी सर्वांनी मान्य केलेले तर्क म्हणजे "डार्विन चे सिद्धांत" !!! डार्विनच्या या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार, " या पृथ्वीवरील जीवजंतू हे नैसगिक बदला नुसार आपापल्या शरीर रचनेत बदल घडवून आणत असतात आणि या पृथ्वीतलावर जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करत असतात". या नियमाला इंग्रजीमध्ये "Natural Selection" असे संबोधण्यात येते.

विद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी

केवळ गणिताचेच नव्हे तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचे सुमारीकरण होत आहे. विद्यार्थीकेंद्रित व्यवस्थेत विद्यार्थ्याची नाराजी पत्करून शिक्षणक्षेत्राशी संबंधित असलेल्यांना जगता येत नाही. विद्यार्थ्यांनी काहीही केले तरी त्यांचे कौतुक करणे गरजेचे ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची शहानिशा करू पाहणारे शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षक इत्यादी प्रमुख घटक कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाहीत. म्हणून सर्व जण safe राहण्यातच धन्यता मानत आहेत. कायद्याचा बडगा केव्हा, कसा कोसळेल याचा नेम नाही.

ईंदु मिल

बाबासाहेबांवर असलेल्या निसिम्म प्रेमापोटी, त्यांच्या स्मरकापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी हा उद्दात्त हेतू ठेवून सरकाराने ईंदु मिलची जागा त्यांच्या स्मरकासाठी दिली अस आपल्यापैकी किती जणांना वाटते.

लेखनविषय: दुवे:

भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 4

(मागील भागावरून पुढे)

18 क्रमांकाच्या गुंफेच्या बाहेरील व्हरांड्याच्या आतील भिंतीवर, काही निराळ्याच पद्धतीची बास रिलिफ भित्तीचित्रे आहेत. या प्रकारची भित्तीचित्रे दख्खन मधील दुसर्‍या कोणत्याच गुंफेमध्ये बघण्यास मिळत नाहीत. या भितीचित्रांतील आकृत्यांच्या अंगावर दाखवलेले कपडे, त्यांची वेशभूषा आणि त्यांच्या जवळ असलेली शस्त्रे हे सर्व अगदी निराळे व मोठे वैशिष्ट्यपूर्ण दिसते आहे.

इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता

दिल्लीमधील अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी 'बलात्कार भारतात होत नाहीत इंडियात होतात' दुवा असे वादग्रस्त विधान करुन प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पाश्चात्य विवाहव्यवस्था व भारतीय विवाहव्यवस्था यांबाबत काहीतरी गोलमोल विधाने करुन आणखी गोंधळ उडवून दिला. कोणत्याही स्वरुपाच्या बाईट्ससाठी टपून बसलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी लगेचच हा मुद्दा उचलून धरला.

अमेरिका आणि भारत

अवलोकन संपादन

कालच एका मित्राशी बोलताना अमेरिका आणि भारत यातील फरक याविषयी चर्चा झाली .अमेरिकस्थ मंडळीची या विषयावर मते ऐकण्यास आनंद होईल .तसेच भारतात राहणार्‍या /इतर देशात राहणार्‍या मंडळींनीही आपली मते मांडवीत.

मुख्यत: खालील मुद्दे हाताळावेत , अशी अपेक्षा आहे...

1. सरकार या संकल्पनेची व्याप्ती व मर्यादा. ...कार्ये आणि लोकांच्या अपेक्षा.

2. विचार-आचार स्वातंत्र्य liberty आणि त्याचे फायदे /तोटे

3. आर्थिक स्वातंत्र्य ,समानता आणि विषमता व त्याचे परिणाम

4. जगाकडे /इतर देशांकडे पाहण्याचा /व्यवहार करण्याचा दृष्टीकोण / विचारसरणी किंवा strategic policy

भारताला युद्ध करावे लागले तर?

मंडळी,

वैदिक गणित ?

वैदिक गणित म्हणजे नेमके काय आहे हे बहुतेकांना माहीत नसते. या वर बाजारात पुस्तके आहेत पण ती आणून वाचण्याच्या फंदात फार कोणी पडत नाही, व वाचले तरी त्यावर विचार तर फारच कमी लोक करतात. त्यातून आपली मानसिकता अशी आहे कि कोणतीही गोष्ट वेद पुराणातून आहे असे म्हंटले कि आपला त्यावर चटकन विश्वास बसतो एवढेच नव्हे तर ते आधुनिक विज्ञाना पेक्षा श्रेष्ठच असणार असा पण आपला समज असतो. या मानसिकते मुळे वैदिक गणित म्हणजे गणिताची काही तरी श्रेष्ठतम पद्धती आहे असा एक भ्रम पसरलेला आहे.

रक्ताभिसरण आणि रक्तदाब

आपल्या रक्तात काय काय असते असे लाक्षणिक अर्थाने बोलले जाते आणि ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले जातांना त्यात काय पाहिले जाते किंवा सापडते हे मी या पूर्वीच्या लेखात लिहिले होते. ही रक्ताची केमिस्ट्री (रसायनशास्त्र) झाली. पदार्थविज्ञान (फिजिक्स) किंवा त्यातल्या द्रवविज्ञान (हैड्रॉलिक्स) या शास्त्रांच्या दृष्टीकोनातून रक्ताचा अभ्यास करतांना त्यात काय दिसते हे या लेखात पाहू.

 
^ वर