काय वर मागायचा ?
आजचे बरेच (सर्व नव्हे) राजकारणी भ्रष्ट आहेत असा समज आहे, व त्यात काही तथ्य ही असेल. भ्रष्टाचार हा कायद्याने गुन्हा आहेच व नैतिकतेच्या निकषावर पण गुन्हा आहे. पण जर त्या पलीकडे जावून विचार करूया.
एक दिवसाचा राजा
साल २०१४ निवडणूका होणार आहेत ह्या एका दिवशी सर्वसामान्य भारतीय नागरिक राजा होतो त्या एके दिवशी बहुतेक सर्व सरकारी यत्रना आज्ञाधारक सेवकाप्रमाणे वागु लाग्तात नेते मड्ळी त्याच्यावर आश्वास्नाची स्तुतीसुम्ने उध्ळ्तात त्यानतर ४ वषे ३६४ दिवस ह्या राजाची अव्स्था फारच बिकट होते. त्याच्या मताला काडीची किमत राह्त नाही. मतदान करुन नेता निवडूण देण्याचा अधिकार त्याला असतो पण निवडूण दिलेला नेता काम करत नसल्यास त्याला सत्तेवरुन खाली उतरविण्याचा अधिकार मात्र त्याला नसतो तस असत तर एवढ मोठ जनआदोलन ज्या लोकपालासाठी झाले तो कायदा अस्तिवात आला असता.
अतुलनीय
कारकीर्दीचा सर्वमान्य काळ संपला तरी रंगमंचावरून exit न घेण्याची उदाहरणे अनेक आहेत. बाल गंधर्व, अमूलचे वर्घीस कुरियन, दिल्ली मेट्रोचे ई श्रीधरन, सिने व नाट्य भूमी वरचे काही कलावंत, काही एकल खेळाडू, आणी राजकारणी.
विशेषज्ञांच्या भाकितांची ऐशी तैशी!
कुठल्याही दिवसाच्या कुठल्याही वृत्तपत्रावर ओझरती नजर फिरवा, राशीफलांच्या नेहमीच्या रतीबाबरोबरच कुठल्याना कुठल्यातरी विशेषज्ञांच्या भाकितांचा उल्लेख ठळक मथळ्याखाली वाचायला हमखास मिळतोच.
शासकीय नितीमत्ता
नितीमत्ता हा विषय तसा बराच चर्चला गेलेला असला तरी काही अनुभव आले की पुन्हा जाग्रुत होतोच. माझेही आज तसेच झाले.
भारतीय लोकाशाहीचे भविष्य - अध्यक्षीय, संसदीय की आणखी काही?
भारतीय लोकशाही हि जगातली सर्वात मोठी आणि महान लोकशाही आहे असे आपण वारंवार ऐकतो अथवा ऐकवतो. प्रत्यक्षात आज त्या लोकशाहीची अवस्था काय आहे हे प्रत्येक सुजाण नागरिक जाणतो. आपली सध्याची लोकशाही हि संसदीय पद्धतीची आहे जिथे लोकं त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात आणि मग ते प्रतिनिधी त्यांचा नेता निवडून देतात. तो नेता मग पंतप्रधान बनतो आणि आपले मंत्रिमंडळ बनवतो. हे झाले पुस्तकी ज्ञान. प्रत्यक्षात काय होते ते आपण पहातो. प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारण बिघडवत आहेत.
मराठी संकेतस्थळांसाठी यंदाही स्पर्धेचे आयोजन २०१३
राज्य मराठी विकास संस्था व सीडॅक मुंबई या संस्थांच्या सहकार्याने यंदाही मराठी सकेतस्थळाची स्पर्धा २०१३ आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई- राज्य मराठी विकास संस्था व सीडॅक मुंबई या संस्थांच्या सहकार्याने यंदाही मराठी सकेतस्थळाची स्पर्धा २०१३ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सरकारी संकेतस्थळ व इतर संकेतस्थळ अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे.
भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 1
भारतीय द्विपकल्पातील कृष्णा आणि गोदावरी या नद्यांच्या खोर्यांमधील प्रदेशाला दख्खनचे पठार असे सर्वसाधारणपणे संबोधले जाते. गेले काही महिने या दख्खनच्या पठारावर असलेल्या अनेक ठिकाणच्या बौद्ध गुंफांना मी भेटी देतो आहे. या बौद्ध गुंफा साधारणपणे इ.स.पूर्वीच्या तिसर्या किंवा दुसर्या शतकात प्रथम खोदल्या गेल्या आणि इ.स. नंतरच्या सातव्या किंवा काही ठिकाणी आठव्या शतकापर्यंत या गुंफात राबता चालू होता. या भेटींमध्ये माझ्या मनाला एक प्रश्न सतत पडतो आहे की गुंफा खोदून त्यात मठ स्थापन करण्याची ही पद्धत दख्खनमधील बौद्ध धर्मीयांत कधीपासून आणि कोणत्या गुंफेपासून सुरू झाली असेल?
भाषाशास्त्राची ऑलिंपियाड स्पर्धा
नमस्कार मंडळी,
गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांप्रमाणेच भाषाशास्त्र या विषयातही ऑलिंपियाडची स्पर्धा घेतली जाते. २००९ सालापासून भारताने या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली आहे आणि काही पदकेही मिळवली आहेत. यावर्षीपासून या स्पर्धेसाठीचे भारतीय प्रतिनिधी ठरवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी २ फेब्रुवारी २०१३ रोजी होईल. त्यातून मुख्य स्पर्धेसाठी ४ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल .
त्याआधी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे तपशील पुढीलप्रमाणे-
कालावधी: ६ दिवस (२४ ते २९ डिसेंबर, २०१२)
वेळः सकाळी १० ते दुपारी ४