अतुलनीय

कारकीर्दीचा सर्वमान्य काळ संपला तरी रंगमंचावरून exit न घेण्याची उदाहरणे अनेक आहेत. बाल गंधर्व, अमूलचे वर्घीस कुरियन, दिल्ली मेट्रोचे ई श्रीधरन, सिने व नाट्य भूमी वरचे काही कलावंत, काही एकल खेळाडू, आणी राजकारणी.

त्याची तुलना बाल गंधर्वांशी केली जाउ शकते का? नाही. बाल गंधर्व त्यांचे "गाणे" संपल्या नंतर पण अनेक वर्षे गाण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते. त्यांच्या चाहत्यांना ते सर्व पहावत नव्हते तरी. पण त्याला कारण होते. पूर्वीच्या अव्यवहारी वागण्यामुळे त्यांना बेसुमार कर्ज झाले होते, आर्थिक अडचणी होत्या, व धनार्जना करता जमेल तसे गात राहणे ही त्यांची मजबूरी होती. त्याला अशी कोणतीही मजबूरी नाही. म्हणून त्याची तुलना बाल गंधर्वांशी होउ शकत नाही.

त्याची तुलना अमूलचे वर्घीस कुरियन यांच्याशी केली जाउ शकते का? नाही. कुरियन पण आपले पद सोडायला तयार नव्हते, व शेवटी त्यांना almost घालवावे लागले. पण त्यांच्या कार्यक्षमतेत कोणतीही घट झाली नव्हती. त्यांच्या निवृत्तीचा प्रश्न केवळ कुणाच्याही कार्य कालाला मर्यादा असावी एवढाच होता. म्हणून त्याची तुलना वर्घीस कुरियन यांच्याशी होउ शकत नाही.

त्याची तुलना दिल्ली मेट्रोचे ई श्रीधरन यांच्याशी केली जाउ शकते का? अजिबात नाही. वयाची पंचाहत्तरी पूर्ण झाली तरी ई श्रीधरन यांच्या कार्यक्षमतेत कोणतीही घट तर झाली नव्हतीच उलट त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मेट्रो अत्यंत उत्तम काम करत होती. पण त्याही पेक्षा मोठा फरक, ई श्रीधरन कधीच आपली जागा पकडून बसले नव्हते. उलट ते तर दर वर्षी सरकारला विनवणी करीत असत की, अहो आता मी थकलो, मला विश्रांती हवी आहे. मला जाउद्या. पण सरकारच त्यांना जाउ देत नव्हते. (कारण त्यांची कार्यक्षमता कमालीची होती). म्हणून त्याची तुलना ई श्रीधरन यांच्याशी होउ शकत नाही.

त्याची तुलना एकाद्या वयस्कर पूर्वीचा हिरो, आता चरित्र अभिनेता, अश्या नटाशी केली जाउ शकते का? नाही. पहिले कारण, नटाने आपल्या क्षमतेला अनुसरून आपला रोल बदलेला असतो. आपण अजून हिरोच अश्या थाटात तो वावरत नसतो. पूर्वीचा हिरो आता दुय्यम भूमीकेत असतो. दुसरे कारण, कोणत्या कलाकारांना घ्यावे हा सिनेमा बनविण्या करता पैसे देणाऱ्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण सिनेमा आपटला तर तो त्याचा वैयक्तिक loss आहे. त्यात देशाची इज्जत वगैरे पणाला लागलेले नसते. म्हणून त्याची तुलना वयस्कर नटाशी होउ शकत नाही.

त्याची तुलना विश्वनाथन आनंद सारख्या खेळाडूशी - जो आता पूर्वी सारखी कामगिरी करू शकत नाहीये - केली जाउ शकते का? नाही. विश्वनाथन आनंद solo performer आहे. तो गेम हरला तर ती त्याची वैयक्तिक हार असते. देशाची हार नसते. म्हणून त्याची तुलना विश्वनाथन आनंदशी होउ शकत नाही.

त्याची तुलना थकत चाललेल्या राजकारण्यांशी केली जाउ शकते का? नाही. राजकारणी जनतेने निवडून दिल्या शिवाय खुर्ची पकडून बसू शकत नाही. म्हणून त्याची तुलना राजकारण्यांशी पण होउ शकत नाही.

त्याची तुलना कोणाशीही होउ शकत नाही. तो अतुलनीय आहे असे त्याचे चाहते जन्मभर म्हणत आले, ते अगदी खरे आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान!

पुढच्या कुठल्यातरी एका म्याचमध्ये कुंथुन-कुंथुन शतक ठोकणार आणि मग निवृत्त होणार असं दिसतय. ती म्याच लवकर येउ दे हेच मागणं.
बाकी त्यानी दोन दशकात जेव्हडं कमावलं तेव्हडच या दोन वर्षात गमावलं. बट अ‍ॅट दी एंड ऑफ द डे, ओन्ली मनी मॅटर्स!

देशासाठी वगैरे कोणी खेळत नाही, जनतेला मुर्ख बनवण्याचा धंदा आहे.

@ चेतन - देशासाठी कोणी ही कुठलाच खेळ खेळत नाही. सर्व जण स्वताच्या स्वार्थासाठी खेळतात.
देशासाठी फक्त सैनिक काम करतात.
जर ह्या खेळाडुंनी एक ही पैसा न घेता ( जाण्या/येण्याचा, राहण्याचा आणि साहित्याचा खर्च वगळता ) जर खेळात भाग घेतला आणि मिळालेल्या पारितोषकाची रक्कम सरकार जमा केली तर च त्यांना देशासाठी खेळतात असे म्हणले जाउ शकते.
कुठलाही खेळ हा दोन देशांच्या मधे होत नाही, तर दोन किंवा जास्त clubs मधे होतो. अगदी olympic सुद्धा.

दोन देशांमधे फक्त युद्ध हा एक च खेळ होतो आणि सैनिक हेच देशासाठी काम करतात.
पण जनतेला मुर्ख बनवले जाते.

जेंव्हा कारगील वर पाकिस्तानी सैन्याशी भारतीय सैन्य लढत होते, तेंव्हा हे so called देशासाठी खेळणारे लोक world cup खेळत होते आणि ते सुद्धा पाकिस्तान world cup मधे खेळत असताना. त्या खेळाडुंमधे हा तेंडुलकर पण होता. देश संकटात असताना, कोणाला world cup मधुन निघुन यावे असे वाटले नाही. आता तर पुन्हा पाकीस्तान शी खेळणार आहेत. एका तरी खेळाडुनी त्या बद्दल नकार दिला आहे का?

रोचक

>>देशासाठी फक्त सैनिक काम करतात.

हे वाक्य खूपच रोचक आणि धाडसी आहे.

ऱोचक पण खरे आहे

बाकीच्या वेळेला सैन्य काही ही करत असु दे, पण परकीय आक्रमणा ला तोंड द्यायला त्यांनाच जावे लागते.

पेशा

तो त्यांच्या पेशाचा भाग आहे. देशासाठी किती व पेशासाठी किती? विवाद्य मुद्दा आहे.

-१

नाही. पेशा वगैरे ठिक आहे, पण थिरिऑटीकली अगदी देशसेवा म्हणून नाही पण सैनिक त्यांचं नेमून दिलेलं काम स्वतःचा जीव धोक्यात घालून (पक्षी इतर पेश्यात अ‍ॅप्लिकेबल ठरणारे सेफ्टी स्टँडर्डस इथं लागू होत नाहीत) त्यामुळे सैनिक इतर नोकरदारांपेक्षा (अगदी पोलिसांपेक्षाही) वेगळे ठरतात.

देशासाठीच

देशासाठी किती व पेशासाठी किती? विवाद्य मुद्दा आहे.

चर्चेची दिशा जर भरकटली आहे, पण माझे नातेवाईक व मित्र यात अनेक जण सैन्यात होते/आहेत - army, navy, airforce, सर्व दलात. पायलट आहेत, पाणबुडीत आहेत, वगैरे. युद्धात लढलेले आहेत. त्यांचे जीवन मी माझ्या लहानपणा पासून जवळून पाहिले आहे व म्हणून सैनिक लढतात ते फक्त देशा साठी, हे मला पूर्ण मान्य आहे.

प्राण देणे हा पेशा असूच शकत नाही. पेशा म्हणजे चरितार्थ करता पैसे मिळवण्या करता आपण जे करतो, ते. इतर कोणत्याही कामाचे मोल पैश्यात करता येते, त्या कामाचा (skill चा) बाजार भाव काय आहे ते पाहून. पण प्राण बलिदान करण्याचे मोल करता येत नाही. "आम्ही तुला भरपूर पैसे देतो, जा आपला जीव दे" असे कुणालाही सांगता येत नाही. (आणी सैनिकांना, अधिकार्यांना भरपूर पैसे मिळतात, असे पण नाही). army त असलेल्या माझ्या काही मित्रांना हा प्रश्न मी विचारला आहे - एकाद्या मोहिमेवर जायचे असते, जिवंत परत येण्याची काहीही खात्री नसते, मरण्याचीच शक्यता जास्त, तर तुम्ही सैनिकांना कसे motivate करता, किंवा तुमचे स्वत:चे motivation काय ? व प्रत्येकाचे उत्तर एकच असते - देशाकरता जीव द्यावा लागेल हे मनात ठसलेले असते. आपल्या तुकडीचा अभिमान व तुकडी अंतर्गत चुरस पण असते. (जसे, मागच्या युद्धात त्या तुकडीला २ महावीर व ५ वीर चक्रे मिळाली. आपल्याला त्या पेक्षा जास्त मिळवायचे आहे). पण देश अभिमान हे मुख्य motivation.

खेळाडू देशा करता खेळतात हे चूकीचे आहे. "देशाच्या वतीने" खेळतात असे म्हणावे. दोहोत फरक आहे. आपण आपला देश, प्रदेश, महाविद्यालय, यांच्या करता जरी नव्हे, तरी यांच्या वतीने खेळू शकतो. पण हे सुद्धा त्यांनाच समजेल ज्यांनी स्वत: खेळात competetive स्तरावर भाग घेतला आहे.

देशाच्या वतीने सुद्धा नाही, कुठल्यातरी क्लुब च्या वती ने.

देशाच्या वती ने हे पण चुक आहे. कुठल्या तरी club च्या वती ने खेळतात. आपण जसे कुठल्यातरी Company मधे काम करतो तसे.

त्यांचा खेळ पाहुन आपण आपले फक्त मनोरंजन करुन घ्यावे. त्यापेक्षा जास्त value देउ नये. देशाशी सबंध तर अजिबात जोडु नये.

सैनिक त्याचा पेशा करुन माझ्यावर उपकार करत असतो. तेंडुलकर खेळला काय किंवा नाही खेळला काय मला त्यानी काही फरक पडत नाही.

अवांतर

बांबूच्या परांदीवर चढून प्लास्टरिंग्, गवंडीकाम करणारे, भूमिगत गटारांच्या छोट्याश्या मॅनहोल मध्ये उतरून कार्बन मोनॉक्साइडने मरणारे, खोल समुद्रात छोट्या होडक्यानिशी मासेमारी करणारे, सर्कशीतले ट्रपीझ आर्टिस्ट आणि क्रूर जनावरांशी खेळणारे हे सगळे पोटासाठी प्राण तळहातावर धरणारे लोक. यांची मृत्युसंख्या शांतताकाळातल्या सैनिकांच्या मृत्युसंख्येपेक्षा केव्हाही अधिक असते. सैन्यदलातला सेलर किंवा फुट्-सोल्जर हा देशप्रेमाने प्रेरित होऊन सैन्यात भरती होत नसतो. कमिशन्ड अधिकार्‍यांची गोष्ट वेगळी असू शकते. हा प्रतिवाद नाही.आर्ग्युमेंटमध्ये चूक राहू नये म्हणून जोडलेली पुरवणी आहे.

हो

म्हणूनच मी वरच्या माझ्या प्रतिसादामध्ये थिरिऑटीकली म्हणालो. सैनिक सोडून प्रत्येक पेशात 'थ्रेट टू लाईफ' नसलं पाहिजे. त्यासाठी लायसन्स देताना कर्मचार्‍यांच्या सेफ्टी आणि विम्या संदर्भात मालकाला काळजी घ्यावी लागते. पण तसं भारतात होत नाही. फटाक्यांच्या कारखान्यात काम करणारे शेकडो लोक दरवर्षी मरतातच. अगदी परवाच पुण्यात तेरा मजूर ठार झालेल्या घटनेला पण अपघात म्हणवत नाही.

धोका, आणी "मारा वा मरा" यात फरक

तस म्हंटल तर प्रत्येकच कामात काही professional hazard असतो. एरवी वातानुकूलित खोलीत बसून काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वारंवार विमान प्रवास करावा लागतो व विमान दुर्घटनेचा धोका असतो. (माझे तीन सहकारी विमान अपघातात गेले आहेत). पण म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याचे काम धोकादायक या सदरात मोडत नाही. एकाद्या कामात असलेला incidental धोका, व थेट "kill or get killed" परिस्थिती, यातील फरक लक्षात घ्यावा.

तेंडुलकर खेळला काय किंवा नाही खेळला काय मला त्यानी काही फरक पडत नाही.

असे असेल तर गीत सेठी याने कमालीची एकाग्रता व अचूकपणा दाखवत बिलियर्डस मध्ये ८०० पोइण्ट चा ब्रेक केला काय किंवा नाही केला काय; किशोरी अमोणकर यांनी अजरामर असा भूप गायला काय किंवा न गायला काय; जयवंत दळवी यांनी "संध्या छाया" लिहिले काय किंवा नाही लिहिले काय; याने पण तुम्हाला काहीच फरक पडत नसावा? नशीबवान आहात.

हे माझ्यासाठी उद्देशून नसलं तरी चोंबडेपणा करतोय.

असे असेल तर गीत सेठी याने कमालीची एकाग्रता व अचूकपणा दाखवत बिलियर्डस मध्ये ८०० पोइण्ट चा ब्रेक केला काय किंवा नाही केला काय; किशोरी अमोणकर यांनी अजरामर असा भूप गायला काय किंवा न गायला काय; जयवंत दळवी यांनी "संध्या छाया" लिहिले काय किंवा नाही लिहिले काय; याने पण तुम्हाला काहीच फरक पडत नसावा? नशीबवान आहात.

भावनाओं को समझो. मला वाटत खेळ आणि कला यांना महत्व आहेच. वरच्या उदाहरणांबद्द्ल काही बोलायचं नाही, पण बॉलीवूड आणि क्रिकेट मध्ये त्याचा अतिरेक होतो आहे. अगदी परवाच झारखंड राज्यसरकरने करीना कसल्याश्या डान्स शो साठी १.४ कोटी रुपये दिले म्हणे! किंवा एव्हडी शासकीय यंत्रणा हाताशी असताना आणि इतर कुठलीही स्पर्धा नसताना आधिच अब्जाधीश असलेल्या खेळाडू, सिनेस्टार मंडळींना ब्रँड अँबेसिडर का करत असावेत?

विषय

लेख तेंडुलकरविषयी आहे हे खूप उशीरा कळले.

हा हा

:-) पुरत्या लेखात कुठेही सचिन तेण्डुलकरचे नांव नव्हते. तरी पण काहींना लेख त्याच्या बद्दल आहे असे वाटले व मग मी पण त्यांच्या भावनांचा आदर केला .

पंडित तुम्हाला कळले नाही हो मला काय म्हणायचे आहे ते

<<<तेंडुलकर खेळला काय किंवा नाही खेळला काय मला त्यानी काही फरक पडत नाही.
असे असेल तर गीत सेठी याने कमालीची एकाग्रता व अचूकपणा दाखवत बिलियर्डस मध्ये ८०० पोइण्ट चा ब्रेक केला काय किंवा नाही केला काय; किशोरी अमोणकर यांनी अजरामर असा भूप गायला काय किंवा न गायला काय; जयवंत दळवी यांनी "संध्या छाया" लिहिले काय किंवा नाही लिहिले काय; याने पण तुम्हाला काहीच फरक पडत नसावा? नशीबवान आहात. >>>

मला म्हणायचे होते की जर मला criket चा खेळ आनंद देत असेल तर मला Pointing चा खेळ पण तेव्हडाच आनंद देतो. किशोरीताई देशासाठी गातात असा दावा करत नाहीत.

माझी comment फक्त देशासाठी किंवा देशाच्या वतीनी खेळणे ह्या बद्दल होता.

भाबडे

 • तेंडूलकर यांनी फेरारी मिळाल्यावर त्यावर कर भरावा लागू नये अशी सरकारकडे मागणी केली होती. त्यावेळी त्यांची ऐपत नक्कीच होती व त्या विशिष्ट सामन्याचे बक्कळ पैसेही मिळालेच होते.
  नुकतेच त्यांनी जाहिरातीमधून मिळालेल्या पैशावर सर्वसामान्यांप्र्माणे कर भरावा लागू नये, म्हणून आपला पेशा 'कलावंत' मानावा अशी आपल्या प्राप्तीकाराबाबत भूमिका घेतली होती.
  सरकारकडून त्यांना क्रिकेटसाठी की काय, भूखंडाची मागणी केली होती.
  -----
  त्यांच्या व्यवसायाचा आणि देशाचा संबंध असाही आहे.
  ------
  त्यांनी चांगलं खेळायचं बंद करून कित्येक महिने की वर्षे लोटली आहेत. इतर कोणाही देशात अशा पूर्वपुण्याईवर इतका काळ संघात राहता येत नाही. अखेर त्यांना निवृत्त होण्याची बुद्धी झाली, हे खेळावर फार फार मोठे उपकार आहेत.
  ------
  दुर्दैवाने यात सचिन यांचा काहीच दोष नाही. त्यांचे भाबडे चाहते, (ज्यांना देश आणि खेळ यातला संबंध, व्यक्तीपेक्षा खेळ महत्त्वाचा वगैरे समजत नाही) हेच त्यांचे खरे भांडवल.

स्वधर्म

ह्या येथे एक पुर्वीचा लेख देतो

हल्लीच इंग्लंड बरोबरच्या झालेल्या क्रिकेट कसोटीत भारताला हार मानावी लागली व सचिन सामन्यात धावा काढू शकला नाही म्हणून विविध बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी दिवसभर व मध्य रात्री पर्यंत ह्या घटनेला अक्षरशः कुटून काढले. सचिनने संदीप पाटिलला केलेला फोन, त्यावर तो काय बोलला असेल ह्याच्या अटकळी ह्या वाहिन्या लावीत बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात सुद्धा मोठाल्या बातम्या आल्या होत्या. बातमीत दिले होते, सचिन म्हणतो, "क्रिकेट सिलेक्टर्स् ना जर का वाटत असेल की मी धावा काढू शकणार नसेल तर त्याने भारतीय संघात माझा समावेश करू नये". सिलेक्टरस् हेही म्हणत होते की अजून दोन कसोट्या राहिल्या आहेत, कोलकत्याची इडन गार्डनवर होणारी व नागपूरची, ह्या दोन कसोट्यांमधून सचिनला धावा काढण्याची संधी मिळेल व तो येणाऱ्या कसोट्यां मध्ये धावा काढून खरा उतरेल.

ह्या पार्श्वभूमीवर कारगिलमधल्या ऑपरेशन विजय मध्ये लॉन्गरेंज पॅट्रोलवर गेलेल्या व पाकिस्तानच्या हातून पकडल्या गेल्यावर हालाहाल करून मारण्यात आलेल्या कॅप्टन सौरभ कालिया व त्याच्या बरोबरच्या जवानांची हृदयाचा ठाव घेणारी बातमी माझ्या कानावर पडत होती. वाटले सचिनला जशी कोठच्या कसोटीत धावा जमल्या नाहीत तर पुढच्या येणाऱ्या कितीतरी कसोट्यांना धावा काढायची एक, अजून एक, अशा कितीतरी संध्या मिळत राहतात. पण कॅप्टन सौरभ कालिया व त्याच्या बरोबरच्या जवानांना जीवनाच्या कसोटीत जिवंत राहायच्या धावा काढण्यासाठी अजून एकच संधी त्यांच्या सिलेक्टरने दिली असती तर किती बरे झाले असते. थोडी चूक झाली असेल, थोडा अंदाज चुकला असेल तेवढ्यात पाकिस्तानी रेंजरसने त्या पॅट्रोलला पकडले व त्यांना जीवनातूनच आऊट केले .....हालाहाल करून. सचिनला परत परत मिळणाऱ्या संधीला बघून आज दिवंगत कॅप्टन सौरभ कालियाच्या आई वडिलांना काय वाटत असेल.

आपण राष्ट्रव्रत घेतले का
त्या संबंधी येथे अजून वाचा
http://rashtravrat.blogspot.com/
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/

संधी

सचिनला परत परत धावा काढायची संधी मिळते हे ठीक.

पण मला वाटते की अशी परत परत संधी मिळत नाही हे कॅप्टन सौरभ कालिया यांना सैन्याची नोकरी स्वीकारण्यापूर्वी पासून ठाऊक असते. आणि आपल्याकडे तरी अजून इस्रायलप्रमाणे (?) सक्तीची लष्करभरती होत नाही.

इथे सौरभ कालिया किंवा इतर सैनिक यांच्या "त्यागा"ला कमी वगैरे लेखण्याचा हेतू नाही पण दोन गोष्टींची तुलनाच होऊ शकत नाही. सैन्याचा/सैनिकांचा (अस्थानी) उदोउदो करून सिव्हिलियन समाजाला कमी लेखण्याचे कारण नाही.

उलट फर्नेसजवळ काम करणारे, किंवा इतर धोकादायक कामे करणारे यांना बरेचदा धोका आहे हेही ठाऊक नसते.

थत्ते साहेब

आपले विचार बरोबर आहेत व पटले. खरे आहे

सैनिकांना माहित असते (आधीच) ते बळीचे बकरे आहेत म्हणून.

हा लेख कोणाला कमी दाखवण्यासाठी मी लिहिला नव्हता (सचिनचा मी पण तेवढाच फॅन आहे जेवढे बाकीचे आहेत). सिव्हीलीयन जॉब्स् ना पण कमी लेखण्याचा प्रयत्न नाही ह्यात.

मला न्युज बघतात बघता सहज विचार आला मनात की ही न्युज बघून कदाचित कालियाच्या आईला मी जे लिहिले ते वाटले असेल का. व मी ते लिहिले.

परत एकदा

राही यांना २१ तारखेला "एकाद्या कामात असलेला incidental धोका, व थेट "kill or get killed" परिस्थिती, यातील फरक लक्षात घ्यावा" हे लिहिल्या नंतर मला स्वत:लाच असे वाटत होते कि सैनिकी पेशा व इतर कामातील धोका यातला फरक मला शब्दात पकडता आला नाही. जरा जास्त चांगले शब्द आत्ता उमगले.

मच्छीमारी, कोळसा खाण, सर्कस, अगदी हवाई दलात Test पायलट, या सर्व व अश्या अनके कामात धोका असतो तो केवळ अपघाताचा. कोणी तुम्हाला जीवे मारायला टपून बसलेले नसते. या उलट युद्धात तुमच्या विरुद्ध माणसे व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे / यंत्रणा असते ज्याचा एकमेव उद्देश तुम्हाला ठार मारणे हा असतो.

फरक

फरक आहे.....

मच्छीमारी, कोळसा खाण, सर्कस, अगदी हवाई दलात Test पायलट, या सर्व व अश्या अनके कामात धोका असतो तो केवळ अपघाताचा. कोणी तुम्हाला जीवे मारायला टपून बसलेले नसते. या उलट युद्धात तुमच्या विरुद्ध माणसे व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे / यंत्रणा असते ज्याचा एकमेव उद्देश तुम्हाला ठार मारणे हा असतो त्याच बरोबर तुमच्याकडेही योग्य ती शस्त्रास्त्रे दिलेली असतात.

लष्कर व देशभक्ती

पुर्वी माझ्या मनात लष्कर व देशभक्ती याचे अतूट नाते होते. लष्करात भ्रष्टाचार शक्यच नाही कारण तो देशभक्तीचा प्रांत आहे. भ्रष्टाचार हे देशविरोधी तसेच अनैतिक कृत्य आहे. मी एकदा लष्करात भरती होण्यासाठी गेलोही होतो. वैद्यकीय चाचणीच्या शेवटच्या टप्पात मला वरिष्ठ लष्करी वैद्यकीय अधिकार्‍याचे सर्टिफिकिट आणण्यासाठी एएफ एम सी मधे पाठवले होते. तिथे पाठीचा एक्स रे काढण्यात आल्यावर मला फिट म्हणुन सर्टिफिकेट दिले. मी आनंदाने घेउन ते गेट पर्यंत गेलो. तेवढ्यात मला शिपाई मागून आला व साहेबांनी बोलावले आहे असे सांगितले . मी गेलो व साहेबांनी माझ्याकडे पाहिले. मी स्तब्धच. मग मला ते सर्टिफिकेट बघू असे सांगितले. मी दिले. त्यावर त्यांनी फिट च्या ऐवजी अनफिट असे लिहिले व मला परत दिले. याचा अर्थ मला नंतर इतरांनी सांगितला तो असा कि तू डॉक्टरला पैसे दिले नाहीत, आम्ही दिले. मग मला साक्षात्कार झाला. असो
पुढील काळात वर्तमानपत्रातील लष्कराच्या बातम्यांनी वास्तवाची जाणीव प्रगल्भ केली. लष्कर हे समाजातून आलेल्या माणसातूनच तयार झालेले आहे.

सचिन हा अतुलनीय का आहे ह्याचे उत्तर मिळाले का?

चेतन ह्यांनी सुरु केलेल्या चर्चेला मिळालेले प्रचंड प्रतिसाद, लष्करी पेशा आणि क्रिकेट ची तुलना, (एका महाभागाने तर सचिन ला मिळालेल्या संधी पाहून एका शहीद जवानाच्या पालकांना काय वाटले असेल असेही लिहिले), हे सगळे पहिले तर लक्षात येते तो खरच शतकामधील महान खेळाडू आहे.त्याचाविषयी बोलण्यास लिहिण्यास लोकांना आवडते.

अजूनही सामन्याची टिकीटे त्याच्या नावावर विकली जातात, लोक सचिन विषयी बातमी चालू असेल चानेल बदलत नाहीत, सचिनने ५० धावा जरी काढल्या तरी भारत आरामात जिंकतो, लोक आजही त्याने शतकच ठोकले पाहिजे अशीच अपेक्षा ठेवतात.

हे सर्व उगीच होत नाही तर त्यामागे लोकाचे खरे प्रेम असते. त्यामुळे पोटशूळ होऊ देवू नये आणि सामन्याचा आनंद घ्यावा.

गेले ते दिवस

लोक आजही त्याने शतकच ठोकले पाहिजे अशीच अपेक्षा ठेवतात
मला वाटते सचिनचे चाहते हल्ली त्याच्या कडून फक्त दोनच अपेक्षा ठेवतात. त्याचा स्कोर किमान दोन आकड्यात तरी पोहोचावा; व तो त्रिफळाचीत होऊ नये. मोठ्या धाव संख्येची अपेक्षा आर अश्विन कडून असते.

 
^ वर