प्रवास

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
--------------------------
लेखात ८० पेक्षा जास्त फोटू असल्याने ते सगळे मी येथे टाकू शकलो नाही. ( सवडीने टाकेन )
छायाचित्रांसह येथे वाचता येईल.
-------------------

कुतूहल हि खरच अजब चीज आहे. त्याच कुतूहलापोटी कुठे जाऊन काय बघायला किंवा अनुभवयाला मिळेल याची शाश्वती नाही. कुठेतरी डोंगररांगात माणसाचा थांगपत्ता नसलेल्या ठिकाणी जाऊन काही अदभुत अश्या गोष्टी आपण पाहतो. तेव्हा त्या गोष्टी आपल्या डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवण्यापलीकडे आपल्या हाती काहीच उरत नाही.

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
( Tikona Point)

शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते.
गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला. शुक्रवार संध्याकाळ उजाडली तरी ट्रेक चे काही नक्की होईना. मग थोडी हापिसातल्या फोन चे बिल वाढवल्यानंतर प्लान ठरला. लगेच आई ला फोन करून गुळाच्या पोळ्या बनवायला सांगितले.

वसईच्या घंटेचा शोध

वसईचा किल्ला (Vasai Fort)

आजकाल जरा वेगळेच वेड लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही.

भाजे येथील बौद्ध गुंफा: भाग 5

(मागील भागापासून पुढे)

18 क्रमांकाच्या गुंफेचा व्हरांडा व आतील हॉल यांच्या सामाईक भिंतीच्या उजव्या कोपर्‍यात जाळीचे डिझाईन असलेले एक गवाक्ष खोदलेले आहे, त्या गवाक्षाच्या बरोबर खालच्या भिंतीवर आणि त्याच्या उजवीकडे मिळून आणखी काही विलक्षण बास रिलिफ शिल्पे दिसत आहेत. यापैकी 3 आकृत्या गवाक्षाच्या अगदी खाली कोरलेल्या आहेत. याशिवाय गवाक्षाच्या उजव्या खालच्या कोपर्‍याला लागून, शिंगे असलेले एक हरीण आपली मान वळवून बघत असल्याचे एक बास रिलिफ शिल्प आहे.

भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 4

(मागील भागावरून पुढे)

18 क्रमांकाच्या गुंफेच्या बाहेरील व्हरांड्याच्या आतील भिंतीवर, काही निराळ्याच पद्धतीची बास रिलिफ भित्तीचित्रे आहेत. या प्रकारची भित्तीचित्रे दख्खन मधील दुसर्‍या कोणत्याच गुंफेमध्ये बघण्यास मिळत नाहीत. या भितीचित्रांतील आकृत्यांच्या अंगावर दाखवलेले कपडे, त्यांची वेशभूषा आणि त्यांच्या जवळ असलेली शस्त्रे हे सर्व अगदी निराळे व मोठे वैशिष्ट्यपूर्ण दिसते आहे.

भाजे येथील बौद्ध गुंफा भाग 1

भारतीय द्विपकल्पातील कृष्णा आणि गोदावरी या नद्यांच्या खोर्‍यांमधील प्रदेशाला दख्खनचे पठार असे सर्वसाधारणपणे संबोधले जाते. गेले काही महिने या दख्खनच्या पठारावर असलेल्या अनेक ठिकाणच्या बौद्ध गुंफांना मी भेटी देतो आहे. या बौद्ध गुंफा साधारणपणे इ.स.पूर्वीच्या तिसर्‍या किंवा दुसर्‍या शतकात प्रथम खोदल्या गेल्या आणि इ.स. नंतरच्या सातव्या किंवा काही ठिकाणी आठव्या शतकापर्यंत या गुंफात राबता चालू होता. या भेटींमध्ये माझ्या मनाला एक प्रश्न सतत पडतो आहे की गुंफा खोदून त्यात मठ स्थापन करण्याची ही पद्धत दख्खनमधील बौद्ध धर्मीयांत कधीपासून आणि कोणत्या गुंफेपासून सुरू झाली असेल?

 
^ वर