प्रवास

एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी गुंफा, भाग 2

(मागील भागापासून पुढे)

सातवाहन कुलातील कृष्ण राजाच्या कालात खोदलेल्या 19 क्रमांकाच्या गुंफेला भेट दिल्यानंतर त्या गुंफेच्या बाजूलाच असलेल्या 18 क्रमांकाच्या गुंफेकडे मी आता निघालो आहे. नाशिक येथे असलेल्या या त्रिरश्मी पर्वतातील गुंफांमध्ये, ही 18 क्रमांकाची गुंफा म्हणजे येथे असलेले एकुलते एक उपासना गृह किंवा चैत्य गृह आहे. या गुंफेची वैशिष्ट्ये अभ्यासण्यापूर्वी, सातवाहन इतिहासातील या गुंफेच्या संबंधित काही संदर्भांची उजळणी करणे योग्य ठरेल.

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - शनिवारवाडा - अहमदनगर – घृष्णेश्वर - औरंगाबाद

या वर्षीच्या सुरवातीला ०३ जानेवारी ते २५ जानेवारी २०१२ रोजी सुमारे २५० जणांनी “ पुणे ते पानिपत ” असा दुचाकीवर सुमारे ६००० किमी चा प्रवास केला. प्रवासात उन, हाडं गोठवणारी थंडी, मुसळधार पाऊस या सर्वांचा सामना करत हि मोहीम मावळ्यांनी यशस्वी केली. या मोहिमेचं सगळं श्रेय जातं ते आयोजक डॉ. संदीप महिंद यांना.

एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी गुंफा, भाग 1

नाशिक मधील त्रिरश्मी पर्वतामध्ये असलेल्या प्रसिद्ध बौद्ध गुंफा बघण्यासाठी मी आता निघालो आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून जरी आजमितीला नाशिक प्रसिद्ध असले तरी ऐतिहासिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा नाशिकचे स्थानमाहात्म्य कोणत्याही प्रकारे कमी लेखता येत नाही. नाशिक शहराचे भौगोलिक स्थानच मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. दक्षिणेकडे पसरत जाणार्‍या सह्याद्री पर्वताच्या रांगा व पूर्वेकडे पसरणारी सातमाला पर्वतराजी यांच्या कुशीत नाशिक पहुडले आहे असे म्हणता येते. शहराच्या कोणत्याही भागातून आजूबाजूला एक नजर जरी टाकली तरी सभोवती दिसणारा आसमंत काही आगळाच भासतो.

कोकणासाठी हवी जलवाहतूक

कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.

एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 4

अजंठा येथील गुंफा क्रमांक 9 ही आपण आधी बघितलेल्या 10 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच एक चैत्य गृह आहे. आयताकृती आकाराची असलेली ही गुंफा मात्र बर्‍याच लहान आकाराची आहे. ही गुंफा 22 फूट 9 इंच रूंद, 45 फूट खोल आणि 23 फूट 2 इंच उंच आहे.

एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 3

सातवाहन कालातील म्हणता येतील अशी 3 भित्तीचित्रे अजंठ्याच्या 10 क्रमांकाच्या गंफेत आहेत आणि ती अतिशय विद्रूप व खराब अवस्थेत असल्याने कॅमेर्‍याच्या सहाय्याने, झूम करून सुद्धा, त्यावरून तत्कालीन काहीही माहिती प्राप्त करण्याची सुतराम शक्यता नाही हे आपण आधी बघितले आहे. या मूळ 3 चित्रांवरून, ग्रिफिथ यांनी काढलेल्या चित्रांपैकी काही त्यांनी आपल्या पुस्तकात प्रसिद्ध केली होती. मात्र हे पुस्तक अत्यंत दुर्मिळ असल्याने मला वाचण्यास मिळणे अशक्यप्राय दिसल्याने दुसर्‍या कोणत्या पुस्तकात ही चित्रे पुनर्मुद्रित केली आहेत का याचा शोध मी घेऊ लागलो. हा शोध घेत असता श्री. जी.

हे कुठून आले?

१. इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा प्रारंभीचा काळ :-- "शक सत्रपांनी पश्चिम भारतात राज्ये स्थापन केली. त्याचा भारतीयांना त्रास होइ. त्यांचा सडकून पराभव गौतमीपुत्राने केला."
२. इसवीसनाच्या पहिल्या शतकाच्या शेवटी :- कुषाण तर थेट आख्ख्या उत्तर भारतात पसरले. फार मोथे साम्राज्य त्यांनी स्थापले विम- कुजुल कॅडफिसस च्या नेतृत्वाखाली . त्यांचा वारसदार कनिष्क तर पामीर पठार ओलांडून जाणारा पहिलाच भारतीय सत्तेचा प्रमुख ठरला. मथुरेपासून उत्तर्-पश्चिमेकडे त्याचा मजबूत अंमल होता. काश्मीर पार करून त्याने मध्य आशियायी भागातही धाडक मारत थेट चीनच्या राजाला हैर्राण केले.

एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 2

अजंठा घळीतील गुंफांमध्ये, "पूर्वकालीन गुंफा" या नावाने ओळखला जाणारा गुंफांचा गट आहे. या गटात 6 गुंफा असून त्या इ.स.पूर्व 200ते100 या किंवा सातवाहन राजे, सिमुक, कृष्ण व श्री सातकर्णी हे राज्यावर असण्याच्या कालखंडात खोदल्या गेलेल्या आहेत. या गुंफांना 8, 9, 10, 12, 13, आणि 15अ असे क्रमांक दिले गेले आहेत. या गटापैकी क्रमांक 13, व 15अ या गुंफा म्हणजे अगदी छोटे असे भिख्खू विहार किंवा भिख्खूंची निवासस्थाने आहेत. या दोन्ही गुंफांच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीचा भाग कोसळल्याने नष्ट झालेला आहे.

एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 1

शुएन त्झांग या अत्यंत विद्वान बौद्ध भिख्खूने, इ. स, 629, या वर्षी, मूळ स्वरूपातल्या बौद्ध धर्मग्रंथाचे अध्ययन व प्राप्ती हे दोन्ही हेतू मनात ठेवून, भारतात येण्याच्या आपल्या पायी प्रवासाला चीनमधून प्रारंभ केला हा इतिहासाचा भाग आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहेच. आपल्या सुदैवाने शुएन त्झांग याने आपल्या प्रवासाचे अतिशय सूक्ष्म दृष्टीने केलेले वर्णन लिहून ठेवले आहे व त्याच्या अनुयायांनी हे वर्णन जपून ठेवल्याने आपल्याला आज उपलब्ध आहे. या कालातील भारतवर्षाचे सर्वात अधिकृत वर्णन म्हणून हे प्रवास वर्णन आज गणले जाते. शुएन त्झांगने आपला परतीचा प्रवास तमिळनाडू मधील कांचीपुरम येथून सुरू केला होता.

 
^ वर