प्रवास
दख्खनच्या पठारावर -1
एखाद्या लहान पोराच्या हातातल्या खेळण्यातून निघावे तसले आवाज करत आमची बस रस्त्याने खडखडत, धडधडत धावते आहे. बसणार्या प्रत्येक धक्क्याबरोबर, बसखालच्या स्प्रिंगा किरकिर, चिरचिर करत राहतात.
देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 6
चविष्ट ख्मेर भोजनाचा आस्वाद घेऊन मी रेस्टॉरंटच्या बाहेर येतो. समोरच्याच बाजूला असलेला हा जलाशय जगातील सर्वात मोठा पोहण्याचा तलाव म्हणून ओळखला जातो. याचे नाव आहे स्रा स्रान्ग(Sra Srang). या नावाचा अर्थ होतो शाही स्नानगृह.
देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 5
मी अंगकोर मधल्या प्रसिद्ध, बांते स्राय(Banteay Srei) या मंदिराला भेट देण्यासाठी निघालो आहे. हे मंदिर ‘अंगकोर आर्किऑलॉजिकल पार्क मधल्या मंदिरांच्या पैकी एक गणले जात नाही. ते सियाम रीप पासून अंदाजे 25 ते 30 किमी अंतरावर तरी आहे.
देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 4
अंगकोर वाट मंदिराच्या पहिल्या पातळीवरून दुसर्या पातळीकडे जाण्यासाठी ज्या मूळ दगडी पायर्या बनवलेल्या आहेत त्या चढायला कठिण असल्यामुळे त्याच्यावर आता लाकडी पायर्या बसवण्यात आलेल्या आहेत.
पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८
देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 3
लिफ्ट मधून हॉटेल लॉबीकडे जाण्यासाठी उतरत असताना हातावरच्या घड्याळाकडे माझे सहज लक्ष जाते. घड्याळ पहाटेचे 5 वाजल्याचे दाखवत आहे. लॉबीमधे श्री. बुनला माझी वाटच बघत आहेत. मी गाडीत बसतो व अंगकोर वाट च्या दिशेने गाडी भरधाव निघते.
देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 2
अंगकोर थॉम हे शहर, ख्मेर राजा सातवा जयवर्मन याने आपल्या राज्यकालात म्हणजे 1181 ते 1220 या वर्षांमधे बांधले होते. या शहराचा आकार अचूक चौरस आकाराचा आहे. या चौरसाची प्रत्येक बाजू 3 किलोमीटर एवढ्या लांबीची आहे.
देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 1
सियाम रीप च्या विमानतळावर माझे विमान थोडेसे उशिरानेच उतरते आहे. सिल्क एअर सारख्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध विमान कंपनीच्या उड्डाणांना उशीर सहसा होत नसल्याने आजचा उशीर थोडासा आश्चर्यकारकच आहे.