प्रवास

एका साम्राज्याच्या शोधात; पितळखोरे गुंफा भाग 4

पितळखोर्‍यामधील 4 क्रमांकाच्या विहारातून परत बाहेर आल्यानंतर समोर पडलेल्या पाषाण खंडांकडे मी बघत असतानाच, माझ्या बरोबर असलेला पुरातत्त्व विभागाचा अधिकारी, गुंफेच्या मुखाच्या बर्‍याच वर, म्हणजे मी उभा आहे त्या स्थानापासून निदान 90 ते 100 फूट तरी ऊंचीवर, असलेल्या समोरच्या पाषाण कड्याकडे माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रथम नीटसे दिसत नाही. परंतु नंतर लक्षात येते की समोरच्या उभ्या कड्यावर एवढ्या ऊंचीवर काहीतरी कोरीव काम केलेले आहे.

एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 3

४ क्रमांकाची गुंफा

पितळखोरे येथे असलेली 4 क्रमांकाची गुंफा, ही सुद्धा तसे बघितले तर भिख्खूंचे निवासस्थान किंवा एक विहार आहे. परंतु माझ्या समोर असलेल्या भग्नावशेषांवर एक नजर टाकता क्षणीच, हा विहार प्रमुख किंवा वरिष्ठ आचार्यांसाठी खोदला गेला असला पाहिजे याची खात्री पटते. अर्थात या विहारात असलेल्या कोठड्या मात्र इतर विहारांतील कोठड्यांप्रमाणेच तेवढ्याच आकाराच्या व तशाच साध्या स्वरूपातील आहेत. पण ती बहुदा त्या काळातील पद्धत असावी. कदाचित हा विहार VIP साठी असल्याने येथील सर्व कोठड्यांना लाकडी द्वार झडपा बसवण्याची व्यवस्था होती. दगडात लाकडी खुंट्या मारण्यसाठी पाडलेली चौकोनी छिद्रे काय ती आता फक्त उरलेली आहेत.

एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 2

आधी उल्लेख केल्याप्रमाणे, पितळखोरे दरीत एकूण 14 गुंफा आहेत. अजंठा गुंफांच्या मानाने हा आकडा बराच लहान आहे. त्याचप्रमाणे या गुंफांचा शोध सुद्धा अजंठा गुंफांच्या नंतरच म्हणजे 1853 च्या सुमारास लागलेला आहे. मी आता माझ्या सर्वात उजव्या बाजूस असलेल्या 1 क्रमांकाच्या गुंफेसमोर उभा आहे. माझ्या डाव्या हाताला समोरच्याच कातळकड्यावर खोदलेल्या आणखी 8गुंफा लांबवर पसरत गेलेल्या मला दिसत आहेत. माझ्या मागे असलेल्या खोल दरीच्या पलीकडच्या अंगाला 10ते 14 क्रमांकच्या आणखी 4 गुंफा आहेत.

एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 1

भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेली सह्याद्री किंवा पश्चिम घाट पर्वतराजी ही सर्वपरिचित आहे. किनारपट्टीला साधारणपणे समांतर असलेली ही सह्याद्री पर्वतराजी, भारताच्या दक्षिण टोकापासून ते पार महाराष्ट्रामधील नाशिक शहराच्या थोड्या उत्तरे पर्यंत विस्तारलेली आहे. मात्र नाशिक शहराच्या उत्तरेला असलेल्या याच स्थानापासून पूर्वेकडे, सह्याद्री पर्वतराजीला काटकोन करून, विस्तारत जाणारी आणखी एक पर्वतराजी फार कमी लोकांना माहिती आहे. सातमाला किंवा इंध्याद्री पर्वत या नावाने ओळखली जाणारी ही पर्वतराजी, दख्खनमधील प्राचीन साम्राज्यांसाठी एक सीमारेषा किंवा उत्तरेकडून होऊ शकणार्‍या आक्रमणांना प्रतिबंध करू शकेल अशी एक नैसर्गिक तटबंदी होती असे म्हणता येते.

एका साम्राज्याच्या शोधात; कार्ले गुंफा -भाग १

भारताच्या पश्चिम समुद्रकिनार्‍यालगतच असलेल्या सह्याद्री पर्वतराजीच्या एका कानाकोपर्‍यात असलेल्या नाणेघाटाच्या माथ्यावर असलेल्या गुंफेला मी दिलेल्या भेटीला आता जवळजवळ एक वर्ष होऊन गेले आहे.

हफीज सईदसाठी ५६ करोड?

हफिज सईद कोण आहे हे उपक्रमींना माहित असावे. अधिक माहिती येथे बघा: http://www.mr.upakram.org/node/3717

मदत हवी आहे-दक्षिण कोरीया

सर्व उपक्रमींना नमस्कार,

कामानिमित्त दक्षिण कोरियाला ४-६ महिने जावे लागणार आहे. उपक्रमींपैकी तिथे कोणी असल्यास किंवा तिथे काही काळ राहून आलेले कोणी असल्यास कृपया व्यनितून कळवावे.

धन्यवाद.

लेखनविषय: दुवे:

बनवासी

ऐतिहासिक दृष्टीने बघितले तर दक्षिण सह्याद्रीतील येल्लापूर गावाजवळच्या परिसरात असलेले सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे बनवासी हे गाव असे लगेच सांगता येते. या बनवासी गावाचा मागील 2250 वर्षांचा इतिहास ज्ञात आहे.

दिवाळी अंक २०११: "एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान"

सर्वप्रथम, दिवाळी अंकातील 'एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान' हा लेख वाचणार्‍यांचे व लेख वाचुन अभिप्राय कळविलेल्यांचे अनेक आभार!

लाल परी कलंदर (उत्तरार्ध)

'धमाल'

 
^ वर