धर्म

शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |

शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ।
"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात, "देशपरत्वे व धर्मपरत्वे उत्तरक्रियांचे अनेक प्रकार आहेत.मेलेल्या माणसाच्या प्रेताचा चटदिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणालाही म्हणता येत नाही.शवाचा निकाल लावला म्हणजे हे काम आटोपते तर त्याविषयी विशेष चर्चा करण्याची गरज पडती ना.पण या दु:खदायक कामामागे त्याहूनही क्लेशकारक अशा विधींचे दुट्टें प्रत्येक धर्माने लावून दिले आहे. हिंदूंनी हे और्ध्वदेहिक प्रकरण भयप्रद,अमंगळ व कष्टमय केले आहे.गोवर्‍या रचण्यापासून राख होईपर्यंत आणि नंतरसुद्धा विधीच विधी.

मंत्रसामर्थ्य

परवा एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.”
त्यांच्या या विधानात काही तथ्य आहे काय? या ऊर्जेचा प्रत्यक्ष प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला? ॐ मधील प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली भरमसाट विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक भोळसट गलिबलांना असली विधाने महान सत्ये वाटतात .ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,वा! काय विद्वत्ता आहे असे म्हणतात , हे खरे.

वन्ही तो चेतवावा रे .....

॥ श्रीराम समर्थ॥
वन्हि तो चेतवावा रे.......... www.samarthramdas400.in
महाराष्ट्रदेशीं संताचा महान वारसा आहे. भागवत संप्रदाय, नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय अशा अनेक समॄद्ध परंपरा आहेत. सर्व प्रकारची आस्मानी आणि सुल्तानी संकटे पचवून या साऱ्या परंपरा महाराष्ट्रात आणि भारतवर्षात केवळ टिकूनच नव्हे तर दिवसेंदिवस वर्धिष्णु होत आहेत, हे महाराष्ट्राचे परम भाग्यच!

समाज रचनेला अर्थ आहे.

सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,

नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.

धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }

'डार्विन' ची वंशावळ

मानवाच्या उत्क्रांतीविषयी अनेक तर्क-वितर्कांचे फवारे गेली कित्येक वर्ष ' बुद्धीजीवी ' लोक उडवत आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय झालेले आणि बहुतांशी सर्वांनी मान्य केलेले तर्क म्हणजे "डार्विन चे सिद्धांत" !!! डार्विनच्या या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार, " या पृथ्वीवरील जीवजंतू हे नैसगिक बदला नुसार आपापल्या शरीर रचनेत बदल घडवून आणत असतात आणि या पृथ्वीतलावर जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करत असतात". या नियमाला इंग्रजीमध्ये "Natural Selection" असे संबोधण्यात येते.

मंत्र विज्ञान

मंत्र विज्ञान

सध्या नवरात्री उत्सव सुरु आहे ,अनेक भक्त सप्तशती/देवीच्या मंत्रांचे जप,/हवन,//पाठ करतात

आस्तिक दृष्टीकोनातून विचार केल्यास मंत्र-विज्ञानाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण असे मिळू शकेल ---=

१. मंत्र हा मन,बुद्धी आणि त्यापेक्षा तरल अशा सूक्ष्मदेहांवर कार्य करतो

२. ब्रेनवेव्ह साऊंड थेरपी नुसार विशिष्ट ध्वनिलहरी वर मन एकाग्र झाल्यास मेंदूच्या अवस्था बदलतात ,
म्हणजे १-४ हर्ट्झ डेल्टा,/ ५- ८ हर्ट्झ थिटा / ९-१२ हर्ट्झ अल्फा /१३-१६ हर्ट्झ बीटा .........इ.या मेंदूच्या अवस्थांचा मूड्स आणि स्वभावाशी जवळचा संबंध आहे .

लेखनविषय: दुवे:

जगन्मातेची प्रतिमा

नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. सोशल नेटवर्किंग साइटवरल्या एका ग्रुपमध्ये एक प्रसंग त्या निमित्ताने घडला. तेथे अनेक उपक्रमी असल्याने त्यांनी या चर्चेत भाग घेतलाच पण इतर उपक्रमींचे मत यावर जाणून घेणे महत्त्वाचे वाटले म्हणून चर्चा प्रपंच. लज्जागौरीचे चित्र टाकून त्या जग्नमातेला नमस्कार करणार्‍या एका गुणी इतिहास तज्ञाच्या पोस्टवर अनेक लोकांच्या भावना आईला/ मातेला अशा स्वरूपात दाखवल्याने दुखावल्या.

लज्जागौरीचे चित्र येथे देत आहे. ते उपक्रमींना नवे नसावे. हा मातृकेचा प्राचीन फॉर्म आहे.

एकच आडनाव असणार्‍या दोन व्यक्ति लग्न करू शकतात का ??

माझे एका मुलीवर प्रेम आहे...आणि मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगून टाकल्या आहेत... ती माझ्याशी लग्न कारला तयार आहे पण समस्या एकच आहे की आमच्या दोघांचे आडनाव सारखेच आहे...माझ्या घरी काही समस्या येणार नाही पण तिने तिच्या घरी विचारावे म्हणून सहज याबद्दल विचारलं तर घरून तिला अस उत्तर मिळाले की "आडनाव सारखेच आहे, तुमचे लग्न होऊ शकत नाही " कारण काय तर तुम्ही भाऊ बहीण लागता म्हणे... तस पहिलं तर आमच्या कुटुंबाचे आणि तिच्या कुटुंबाचे दूर दूर पर्यन्त संबंध नाहीत ... आम्ही मूळ सांगलीचे आणि ते मूळ नागपुरचे.... असं कसं होऊ शकता कृपया कोणी मला मदत करू शकेल का इथे याबद्दल????

लेखनविषय: दुवे:

कौषीतकी उपनिषद आणि काही प्रश्न

माझ्या मुलीला इतिहासाच्या अभ्यासासाठी कौषीतकी उपनिषद आहे. असे लक्षात आले की मुलांना त्याचा संदर्भ आणि थोडाफार अर्थ कळला तरी अधिकाराने त्यावर भाष्य करणे किंवा त्यावर आधारित उत्तरे देणे जमलेले नाही. मला उपनिषदे, अध्यात्म वगैरे गोष्टींमध्ये अजिबात गती नाही. कौषीतकी हा शब्द देखील मी व्यवस्थित लिहिला आहे की नाही याची कल्पना नाही. थोडेफार समजवून दिल्यावर पुढे मला अधिकारवाणीने समजावता येत नाही.

 
^ वर