प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे
सुशीलकुमार शिंदे
भारताचे विद्यमान गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारतात दहशतवाद्यांचे अड्डे आहेत असे बिनबुडाचे विधान करुन देशाचे नाक कापून घेतले आहे. गृहमंत्र्यांना जर देशातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांची माहिती असेल तर त्यांनी सरळ कायदेशीर कारवाई करुन त्यावर इलाज करावा. खळबळजनक विधाने करुन प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापायी भारताची विश्वासार्हता धुळीस मिळवू नये.
समाज रचनेला अर्थ आहे.
सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,
नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.
धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }
इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता
दिल्लीमधील अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी 'बलात्कार भारतात होत नाहीत इंडियात होतात' दुवा असे वादग्रस्त विधान करुन प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पाश्चात्य विवाहव्यवस्था व भारतीय विवाहव्यवस्था यांबाबत काहीतरी गोलमोल विधाने करुन आणखी गोंधळ उडवून दिला. कोणत्याही स्वरुपाच्या बाईट्ससाठी टपून बसलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी लगेचच हा मुद्दा उचलून धरला.
अमानत आणि प्रसार माध्यमे
गेले १३ दिवस दिल्लीस्थित प्रसार माध्यमांना अमानाताच्या बलात्काराचा विषय मिळाला. चांगलेच वातावरण तापवले. ह्या प्रकारची जितकी निंदा करावी तितकी थोडीच आहे. पण काही प्रश्न पडले आहेत. ह्या आधी इतक्या वेळेला ह्या घटना भारतभर घडल्या आणि अजूनही घडतच आहेत मग तेंव्हा ह्या मध्यामानी हा विषय का नाही ताणून धरला. ज्या पद्धतीत बातम्यांचे प्रसारण होत आहे आणि निवेदक ज्या आवाजात बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि काही वेळेला पार्श्वसंगीत ह्याने एक वेगळाच परिणाम जाणवतो असे मला वाटते. ह्याची खरोखर गरज आहे का?
मराठी वृत्त वाहिन्यांवरील भाषा थोडी सुधारता येईल का?
प्रचंड लोकप्रिय (!) असलेल्या मराठी वृत्तवाहिन्या आपले वार्ताहर नेमतांना त्यांचे भाषेवरील प्रभुत्व बहुतेक पाहत नसावेत.
त्यांचे मराठी उच्चार नेहमीच चुकत असतात आणि त्यांना ते उच्चार बरोबर आहेत असेच वाटते. जसे 'च' ह्याचा उच्चार 'च्य' करणे, 'ज' चा उच्चार 'ज्य' करणे. उदाहरणर्थ - नरेंद्र ज्यादव (जाधव), विठूनामाचा गज्यर (गजर).
त्याचप्रमाणे मराठी वाक्प्रचार आणि समर्पक शब्द माहित नसल्याने हिंदी वाक्प्रचार वापरणे. जसे - काट्याची टक्कर (हसू नका, हे नेहमी वापरले जाते), चार चांद लागले, इत्यादी.
नितीन गडकरी
भारतीय जनता पक्षाचे (खाण्याप्रमाणेच!) बोलण्याचा धरबंद नसलेले विद्यमान अध्यक्ष श्री. नितीनभाऊ गडकरी यांनी स्वामी विवेकानंद यांची तुलना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासोबत केल्याने मोठाच गोंधळ माजला आहे. मुळात स्वामी विवेकानंद यांचे सर्वसमावेशक हिंदुत्त्व, 'माझ्या बंधू आणि भगिनींनो' असे ख्रिश्चन-मुस्लिम बांधवांना शिकागोमध्ये उद्देशून भाषण, याचा मागमूसही भाजपा आणि संघाच्या आक्रमक हिंदुत्त्वात सापडत नाही. तरीही संघिष्ठांचा कोणताही कार्यक्रम शक्यतो विवेकानंदांचे स्मृतीपूजन करून होतो असे वाटते. मात्र गडकरींच्या या फ्रॉईडियन स्लिपमुळे विवेकानंदांबाबत भाजपाचा मुखवटा आणि चेहरा हा असा उघड झाला आहे.
राज यांनी मोर्चा काढून काय साधले?
राज ठाकरेंनी आझाद मैदानावर यशस्वी मोर्चा काढून एका दगडात अनेक पक्षी टिपले आहेत असे सर्वत्र म्हणले जात आहे. यावर लोकसत्तेतील अग्रलेख "राज आणि पृथ्वीराज" येथे वाचा -
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245...
संतप्त भारतीयांची महासत्ता - तुम्हाला हवीय?
Do we really want a superpower India populated by angry Indians? ( http://economictimes.indiatimes.com/opinion/comments-analysis/do-we-real...) हा लेख नुकताचा वाचनात आला. गेल्या काही वर्षांत घडणार्या व्यथित/त्रस्त/दु:खी/उद्वीग्न करणार्या अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा लेख आहे.
या लेखाच्या संबधाने पुढील प्रश्न पडले.
१. भारत खरेच एका व्यापक सामाजिक उद्रेकाच्या उंबरठ्यावर उभा आहे का?
२. लेखकाने दिलेली कारणे तुम्हाला पटतात का? त्याशिवायही काही कारणे असू शकतील असे तुम्हाला वाटते का?
सरकारी खर्चाने साहित्य संम्मेलने करावीत का?
लोकसत्ता व्यासपीठावर रंगलेल्या साहित्य मैफिलीत विविध साहित्यिकांनी साहित्य संमेलनाविषयी आपापली मते मांडली. त्याची बातमी लोकसत्तेत इथे वाचा -
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=241...
बातमीचा काही भाग खाली पहा -
हा खेळ सावल्यांचा
काही दिवसांपूर्वी आपण डॉ. श्री. बालाजी तांबे यांच्या लेखाविषयी आणि त्यांचा पुरस्कार करणार्या 'भविष्यपत्रा'विषयी (दैनिक सकाळ) चर्चा केली. (पाहा: हिग्ज बोसॉन आणि भविष्यपत्राचा अजेंडा
http://mr.upakram.org/node/3804 )