राज यांनी मोर्चा काढून काय साधले?

राज ठाकरेंनी आझाद मैदानावर यशस्वी मोर्चा काढून एका दगडात अनेक पक्षी टिपले आहेत असे सर्वत्र म्हणले जात आहे. यावर लोकसत्तेतील अग्रलेख "राज आणि पृथ्वीराज" येथे वाचा -

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245...

या प्रकरणात पोलिसांचे खच्चीकरण झाल्याचे कोणी नाकारू शकत नाही. सरकारी यंत्रणांना सरकारविरुद्ध आवाज उठवणे कठीण असते याचा प्रत्यय या प्रकरणात आला. राज ठाकरेंनी या मोर्च्याचे प्रदर्शन करून जनसामान्य आणि सरकारी यंत्रणांच्या नाराजीला वाट करून दिली. हे एवढ्यावरच संपते काय? येथे एक चलाख राजकीय खेळी आहे हे कळून येतेच. लेखात म्हणल्याप्रमाणे -

इतिहासात डाव्यांना संपवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेचा वापर केला. आता राष्ट्रवादीला रोखण्यासाठी मनसेचा करावा, असा हेतू त्यामागे नसेलच असे सांगता येणार नाही. त्या वेळी ती काँग्रेसची चूक होती. आता ती घोडचूक ठरेल. तेव्हाचे वसंतराव नाईक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण नाहीत हे जितके खरे आहे तितकेच बाळासाहेब म्हणजे राज नाहीत, हे अधिक खरे आहे. राज यांची राजकीय भूक अधिक मोठी आहे आणि ती कितपत भागणार हे पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीला कितपत रोखू शकतात यावर अवलंबून आहे.

तुम्हाला काय वाटते - या मोर्चातून राज यांनी नेमके काय साधले?

Comments

गर्दि

गर्दि शिवाय काही नाही. भारताच इतिहासच खास करुन गेल्या ६५ वर्षांचा हेच सांगतो कि काँग्रेस सर्व पक्षांना गरजे प्रमाणे वापरून घेते आणि भारतीयांची गर्दि हि तात्कालिक असते. लोकांना फक्त एक माणूस हवा आहे जो मनातले विचार ओकेल. राज ते काम करत आहेत. पण सामान्य लोकांना निवडणुकीच्या वेळी या सगळ्याचा विसर पडतो आणि हे पवारबाज लोकांना चांगले माहित आहे.
एरवी प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करणारे दिग्विजय, राहूल, त्याची आई, शरद पवार आणि त्यांनी फॅमिली सगळे कसे मौन व्रत धारण करुन आहेत. विरोधकांचे बोलून झाले की मग हे लोकं सुरु होतील. आम्ही भारतात शांतता नांदवू इछितो म्हणून जातियवाद (धर्मांच्या वादाला जातियवाद का म्हणतात हे एक कोडेच आहे.) संपवण्यासाठी आम्हाला मते द्या. सर्व सामान्य लोकं आत्ता पण मते व्यक्त करतात आणि त्यावेळी त्यांना देतात. मला तर हि सगळीच २०१४ लोकसभाची तयारी वाटते आहे. सरकारकडे मुद्दे नाहीत. अपयश झाकायचे आहे. मग घडवा दंगली. मग आहेतच राज सारखे लोकं.

कडवा द्वेष

उत्तरप्रदेशात तीन शहरांत बुद्ध मूर्तीची कुठेही विटंबना झाल्याची माहिती नाही. त्यामुळे राज ठाकरे कशाच्या आधारावर माहिती देत होते, हे त्यांच्या प्रायव्हेट गुप्तचर यंत्रनानाच माहित, कोणत्याही न्यूज चानेल वर अथवा वर्तमान पत्रामध्ये विटंबना झालेली बातमी नाही, फक्त फेसबुक वर फेक फोटो आहेत. मोर्चा निषेधासाठी होता कि आंबेडकरी जनतेला डिवचण्यासाठी होता, हे कळले नाही. इंदू मिलच्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांचा बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा कडवा द्वेष प्रकट झाला आहे..

बुद्ध मूर्तींची मोडतोड

बुद्ध आणि महावीर यांच्या मूर्तीची मोडतोड झाल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया यांनी दिली होती. पण तुमचे म्हणणे खरे आहे की मोठ्या प्रमाणावर या बातमीचा गाजावाजा कुठेच झाला नाही. मुंबईप्रमाणेच उत्तर प्रदेशातही पोलिस कारवाई न करता मूकपणे दंगलखोरांचा उच्छाद पाहत उभे होते असे टाइम्स म्हणतो. (आझाद मैदानावर झालेल्या दंग्याविषयीही सविस्तर बातम्या दाबण्याचा प्रयत्न झाला की काय अशी शंका येते. उदा. वृत्तवाहिन्यांच्या गाड्यांची मोडतोड, माहिला पोलिसांचा विनयभंग वगैरे बातम्या आता कुठे बाहेर येऊ लागल्या आहेत.)

दुवे:

१. Repairing 2 vandalised parks to cost Rs 45 lakh इथे पुढीलप्रमाणे माहिती आहे

The mob, which was protesting against the alleged atrocities on Muslims in Assam and Myanmar, had damaged various structures, including the statue of Gautam Buddha inside Buddha park and the statue of Swami Mahavira at Haathi Park.

२. Akhilesh Yadav promises action against perpetrators, gives clean chit to officials who remained mute spectators इथे पुढीलप्रमाणे वाक्य बुद्ध मूर्तीविषयी ... BJP leaders visited the park in Lucknow where Buddha's statue was vandalised and held the SP's Muslim appeasement policy responsible for the violence....

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

मनसेचे भले

मनसेचे भले साधले असावे. इतरांचे माहित नाही.

न्यूजबाइट्स

राज यांना फक्त तात्कालिक न्यूजबाइट्स वगळता काही साध्य झाले आहे असे वाटत नाही. ज्या क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे असे मानले जात होते तेथे तो अजूनही आहे एवढेच यातून सिद्ध होते.

लोकसत्तेचा अग्रलेख मात्र राजकीय विश्लेषणातील अपरिपक्वतेचा नमुना वाटला. मुंबई पट्टा, नाशिक वगैरे ठिकाणी राज ठाकरेंचा प्रभाव आहेच. रझा अकादमीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मोर्चाला गर्दी जमली तर त्यांना जणू संपूर्ण विरोधी पक्षाचे प्रमुखपद मिळाले अश्या स्वरूपाची उथळ टिप्पणी करणे म्हणजे अतिच. शेवटचा परिच्छेद तरी कुबेरांच्या सनसनाटीकरण शैलीचा नमुनाच आहे :)

ता.क. : अरूप पटनाइक यांची बढती झाली आहे असे नुकतेच कळले.

आसाम दंगल आणि त्यावरून मुंबई, उत्तरप्रदेशात घडवून आणलेल्या दंगली यावर चर्चा व्हायला हवी.

सहमत आहे

राज यांना फक्त तात्कालिक न्यूजबाइट्स वगळता काही साध्य झाले आहे असे वाटत नाही. ज्या क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे असे मानले जात होते तेथे तो अजूनही आहे एवढेच यातून सिद्ध होते.

+१

(आबांनी काढलेला) मनसे आमदार हर्षवर्धन जाधव ह्यांनी पोलिसांना केलेल्या मारहाणीचा मुद्दाही विचार करण्याजोगा आहे. त्यावेळेस पोलिसांचा पुळका शिवसेनेला आला होता असे आठवते आहे.

फरक आहे

(आबांनी काढलेला) मनसे आमदार हर्षवर्धन जाधव ह्यांनी पोलिसांना केलेल्या मारहाणीचा मुद्दाही विचार करण्याजोगा आहे. त्यावेळेस पोलिसांचा पुळका शिवसेनेला आला होता असे आठवते आहे.

आबांचा हा मुद्दा खरेतर गैरलागू आहे. एक व्यक्ती विरुद्ध पोलिस (पोलिसांनीही हर्षवर्धन जाधव यांना बेदम मारहाण केली होती) आणि समूहाने केलेला पोलिसांवरील हल्ला आणि पोलिसांनी हतबलपणे तो सहन करणे यात खूप फरक आहे. दंगलखोरांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले होते, इतकेच नाही, ज्या पोलिसांनी काही दंगलखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यांना पटनाइकांनी शिव्या देऊन दंगलखोरांना सोडायला लावले होते असे बातम्यांतून समजते.

यापूर्वीच्या रझा अकादमीच्या मोर्चात पोलिस स्टेशनवर हल्ला करून मुस्लिम जमावाने दोन पोलिसांना दगडांनी ठेचून मारले होते आणि त्यांना जळत्या बसमध्ये फेकून दिले होते. याउलट मावळ येथे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर लाठीहल्ला करून गोळीबार केला होता. या प्रसंगातील 'डिफरेंशियल ट्रिटमेंट' वरून मोर्चा कोणाचा, कोणत्या धर्माच्या लोकांचा यावरून पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश वेगळे येतात का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला तर मला आश्चर्य वाटणार नाही.

योग्य मुद्दा आहे

हा योग्य मुद्दा आहे. आपल्याकडे एका समूहाला कुरवाळायचे आणि एकाला कायम चोपायचे हा नियमच आहे. एखादी दंगल जर गणपती/श्रावणात झाली तर असाच न्याय लावला जाईल का?

बरं!

"काहीही झालं तरीही पोलिसांना हात लावायचा नाही" ह्या गर्जनेमधे एक व्यक्ती म्हणून हात लावल्यास सूट आहे हे माहित नव्हते.

आयुक्तांची दुटप्पी भूमिका

लोकप्रभेतील हा लेख वाचण्यासारखा वाटला.

हो

चांगला आहे लेख...

मुद्दा तो नाही

मुद्दा आहे आबांनी दिलेले उदाहरण रझा अकादमीच्या दंगली संदर्भात गैरलागू असण्याचा.

१. रझा अकादमीच्या मोर्च्यात मुस्लिम जमावाने केलेल्या हल्ल्यात पन्नासेक पोलिस जखमी झाले.
२. हा हल्ला पूर्वनियोजित होता असेही आता समजू लागले आहे.
३. मारहाण होत असताना प्रतिकार न करण्याचे आदेश पोलिसांना वरिष्ठांकडून होते.
४. पोलिसांवर हल्ला केलेल्या काही दंगलखोरांना अटक झाली असली तरी सर्वांना अटक झालेली नाही त्यांच्यावर काय कारवाई केली जात आहे हेही अजून समजले नाही.

हर्षवर्धन जाधव प्रकरणात मला अंधुकसे आठवते त्यानुसार : पोलिसांशी वादावादी झाल्याने पोलिसांनी त्यांना मारहाण केली होती. बाहेर मारहाण झाल्यावर त्यांना पोलिस स्टेशनात नेऊनही मारहाण केल्याचा आरोप होता. पोलिसांनी त्यांना अटक करून कोर्टासमोर उभे केले होते. मारहाण करण्याचा आरोप असलेल्या पोलिसांना निलंबित करून चौकशी करण्याचे आदेश बहुतेक आबांनीच दिले होते. शेवटी काय झाले माहीत नाही. कोणाला याविषयी अधिक/योग्य माहिती असल्यास द्यावी.

स्केल (प्रमाण?), हेतू (इंटेंट), आणि परिस्थिती अश्या पातळ्यांवर रझा अकादमीच्या पोलिसांवरील हल्ल्याची तुलना हर्षवर्धन प्रकरणाशी होऊ शकत नाही. आबांनी सुद्धा ती टिप्पणी फार गंभीरपणे केली असावे असे वाटत नाही. कदाचित म्हणूनच वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी याची फार दखल घेतली नाही. उलट आझाद मैदान दंगलीतील पोलिसांवरील हल्ल्याला ट्रिविअलाइज करण्याचा प्रयत्न म्हणून टीकाच झाली.

आबांची आठवण

मुंबई हल्ल्याच्यावेळी आबा असेही म्हटले होते की मुंबई सारख्या मोठ्या शहरात अशा छोट्या छोट्या घटना होतच असतात. आबांच्या तुलनांना आमचा सलाम.

बरोबरच आहे

राजसाहेबांचे बरोबरच आहे. गोळीबाराची घटना योग्य वाटत नाही. गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे ती

 
^ वर