उपक्रम

प्रस्ताव

सप्रेम नमस्कार,
आपल्या समुदायाचे ३७ सदस्य आहेत. परंतु, बालसाहित्याशी निगडित विचारांची फारशी देवाण-घेवाण झालेली दिसत नाही.
आपल्या समुदायाचा उद्देश हा केवळ बालसाहित्यापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये बालशिक्षण, बालविकास आणि कायदा व सुव्यवस्था ह्या विषयाचा अंतर्भाव असावा असे वाटते.

समाज रचनेला अर्थ आहे.

सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,

नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.

धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }

मराठी वृत्त वाहिन्यांवरील भाषा थोडी सुधारता येईल का?

प्रचंड लोकप्रिय (!) असलेल्या मराठी वृत्तवाहिन्या आपले वार्ताहर नेमतांना त्यांचे भाषेवरील प्रभुत्व बहुतेक पाहत नसावेत.

त्यांचे मराठी उच्चार नेहमीच चुकत असतात आणि त्यांना ते उच्चार बरोबर आहेत असेच वाटते. जसे 'च' ह्याचा उच्चार 'च्य' करणे, 'ज' चा उच्चार 'ज्य' करणे. उदाहरणर्थ - नरेंद्र ज्यादव (जाधव), विठूनामाचा गज्यर (गजर).

त्याचप्रमाणे मराठी वाक्प्रचार आणि समर्पक शब्द माहित नसल्याने हिंदी वाक्प्रचार वापरणे. जसे - काट्याची टक्कर (हसू नका, हे नेहमी वापरले जाते), चार चांद लागले, इत्यादी.

उपक्रम दिवाळी विशेषांक २०१२ - प्रतिसाद आणि प्रतिक्रिया

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

उपक्रम दिवाळी अंक २०१२ प्रकाशित झाला आहे. सदस्यांनी या धाग्यावर आपले प्रतिसाद व प्रतिक्रिया नोंदवाव्यात. यंदाच्या वर्षी दिवाळी अंकाच्या लेखांना फेसबुक, गुगल प्लस आणि ट्विटर मार्फत शेअर करण्याची सोय तसेच फेसबुक आयडी वापरून प्रतिसाद देण्याची सोय देण्यात आलेली आहे. सर्व सदस्यांनी आणि वाचकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती.

दिवाळी अंकाच्या संपादकीयातून

जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे?

(१) जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे?
(२) तसेच, सहावे स्थान शत्रू, रोग दर्शवते. त्यानुसार जर सहाव्या स्थानात सिंह राशी असून त्याचा मालक रवी बाराव्या स्थानात कुंभ राशीत असेल तर त्याचे फळ काय मिळेल?
(३) आणि दहाव्या स्थानात धनू राशी असून त्याचा मालक गुरू हा तिसर्‍या स्थानात चंद्राबरोबर वृषभ राशीत असेत तर त्याचे फळ काय?

लेखनविषय: दुवे:

नवे उपक्रम

नमस्कार,
चर्चेचा विषय वाचून गैरसमज करुन घेऊ नका. मी उपक्रमाच्या नव्या रुपा बद्दल माहिती वगैरे काही देणार नाहीये अथवा ते कसे असावे/नसावे हि चर्चा करणार नाहीये. उपक्रमाचे नवे रुप हे निमित्त मात्र आहे.
दर्जेदार चर्चा/लेख आणि छायाचित्र हे उपक्रमाचे वैशिष्ठय ठरले आहे आणि उपक्रमाने ते पेलले सुद्धा आहे. पण उपक्राच्या नव्या रुपासोबत एक नवी ओळख सुद्धा तयार व्हावी हा एक विचार मनामध्ये घोळत होता (उपक्रम व्यवस्थापनाशी याचा काही एक संबंध नाही. हे आपले माझे विचार आहेत.) म्हणूनच हि चर्चा सुरु करत आहे.

शाहरुख आणि इतर सेलेब्रिटींना लगाम घालावा का?

ज्यांच्याकडे लोक रोल मॉडेल म्हणून बघतात त्या शाहरुख आणि इतर सेलेब्रिटींनीही ताळतंत्र सोडून दिल्याच्या खबरा आपण रोज वाचतो. मटातील बातमी अशी -

शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणा!

पद्यानुवाद कसा करावा?

मला काही गीतांचा पद्यानुवाद करायचा आहे. पद्यानुवाद करताना मराठीत परदेशी फारशी, अर्बी, इंग्लीश शब्द वापरावे का संस्कृतप्रचुर मराठीचा वापर करावा? आंतरजालावर काही उदाहरणे मिळाली तर सांगा, रिफर करायची आहेत.

वाचकांना आवाहन

हैदराबाद येथील एक रसिक अभ्यासक आपला इंग्रजी-मराठी पुस्तकांचा मोठा संग्रह दान करु इच्छित आहेत. ही पुस्तके घेऊ इच्छिणार्‍यांनी ती वाचावीत आणि त्यांचा प्रेमाने सांभाळ करावा, इतकीच त्या दात्याची इच्छा आहे.

तर्काची इंगळी डसलीऽ गं बाई मला!

मित्रांनो आधी हाच लेख मी काहिसा घाईघाईत सादर केला होता. त्यामुळे सादरीकरणात बरेच दोश राहून गेले होते. त्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो.

 
^ वर