पद्यानुवाद कसा करावा?

मला काही गीतांचा पद्यानुवाद करायचा आहे. पद्यानुवाद करताना मराठीत परदेशी फारशी, अर्बी, इंग्लीश शब्द वापरावे का संस्कृतप्रचुर मराठीचा वापर करावा? आंतरजालावर काही उदाहरणे मिळाली तर सांगा, रिफर करायची आहेत. उपक्रमींकडुन मदतीची अपेक्षा आहे.

Comments

कशाला त्रास घेता आणि देता

कशाला त्रास घेता आणि देता राव. आंतरजालावरचे पद्यानुवाद हास्यास्पद असतात. केविलवाणे असतात. काही मंडळी गंभीरपणे हा हास्यास्पदपणा करत असतात. तर काही जण फालतूपणे हा हास्यास्पदपणा करत असतात. असो. ही मंडळी कधी मोठी होणार नाहीत. (तरी बरे आंतरजालीय पद्यानुवाद एक सशक्त विधा किंवा मराठीतली पद्यानुवादाची समृद्ध परंपरा असा लेख कुणी कसा लिहिलेला नाही?)

अवांतर:
शाळेत असताना आमच्या वर्गातली काही मुलं असला फालतूपणा करीत असत. उदा. ""तुझ्या लोभस लोभस चेहऱ्याला कुणाची नजर न लागो, रम्यनयने!" किंवा दुसरे टोक म्हणजे "भेटवस्तू, भेटवस्तू, भेटवस्तू.. आणली आणली आणली..." वगैर वगैरे. आणि त्यावर काही शेंबड्या मुली खिखिखि करत असत. असो. गेले ते दिन आणि शेंबड्या पोरी. आजकालच्या त्या वयातल्या मुली शेंबड्या नसतात असे परवाच कुणीतरी सांगितले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जबरीच अनुवाद आहे.

"तुझ्या लोभस लोभस चेहऱ्याला कुणाची नजर न लागो, रम्यनयने!"
"भेटवस्तू, भेटवस्तू, भेटवस्तू.. आणली आणली आणली..."

:) लोळतोय.

अभिजीत राजवाडे

टवाळा आवडे....

हाहाहाहा! चर्चाप्रस्ताव वाचून काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

तुम्हाला चांगली उदाहरणे हवी असतील तर मनोगतावरील दोन रथी महारथी मला ठाऊक आहेत. परंतु मध्यंतरी एक पद्यानुवाद वाचला होता.

नायकः
भवन तव उत्तुंग आहे आणि अवरत उद्वहन
मी कसा येणार पर्युत्सुक जरी झालेय मन ।ध्रु।

नायिकाः
वाद्यवृंदाला सवे घेऊन कर तू आगमन
नवरदेवा ये अता छळते मला तव आठवण ।ध्रु।

हे संस्कृतमिश्रीत गाणे मला वात आणते तेव्हा माझा अनुवाद बघा. आवडतो का ते कळवा.

नायकः

उंच आहे इमारत वीज-पाळणा बंद आहे
कसा मी येऊ, जरी मन अन्नु-कूल आहे (अन्नुच्या कूल आवाजात म्हणा बरं का गाणं)

नायिका:

ये रे ये रे ये रे ताशापिपाणी घेऊन ये रे
तुझी आठवण येते, नवरदेवा अता ये रे

वरच्या लायनी कोणी पचवल्या तर पुढल्याही लिहिन म्हणते. ;-)

:)

+१

अभिजीत राजवाडे

पद्यानुवाद अवश्य करावा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
विवेकराव, वरील प्रतिसाद वाचून निराश होऊ नये,हतबल होऊ नये.तुमचे लेखन वाचून वाटते की तुम्ही चांगले पद्यानुवाद करू शकाल. हे मनःपूर्वक लिहितो आहे.तुम्ही म्हणता:

मला काही गीतांचा पद्यानुवाद करायचा आहे.

ही मूळ गीते कोणत्या भाषेत आहेत? मराठी गीतांचीच पद्यें करायची आहेत काय? तरी प्रत्यवाय(हरकत) नाही.करता येतील.खालील गोष्टींकडे लक्ष देणे उपयुक्त ठरू शकेलः
* पद्यानुवाद गणवृत्तात रचणे बिकट असते. शब्द योजताना फार मर्यादा पडतात. त्यामुळे अनुवाद मनाजोगता होत नाही. तसेच गण योग्य प्रकारे पडले नाहीत, तर लग्नात काही हौशी महिला स्वरचित मंगलाष्टक शार्दूलविक्रीडितात म्हणण्याचा ओढून-ताणून,मारून-मुटकून प्रयत्न करतात तशी स्थिती होऊ शकते. ते टाळावे. गणवृत्त रचनेविषयी सार्थ आत्मविश्वास असेल तर तसे अवश्य लिहावे. स्वानुभवाधारित मत सांगितले.गणवृत्तरचना चांगली जमली तर मोठा आनंद होतो हेही खरे.
*तसेच पद्यानुवाद मुक्तछंदात असणे मुळीच योग्य नाही असे मत आहे.
* म्हणून पद्यरचना तुमच्या आवडत्या अशा एखाद्या मात्रावृत्तात असावी. [उदा..ओतीत विखारी वातावरणी आग| हा वळसे घालित आला मंथर नाग(अहिनकुल-कुसुमाग्रज)]
*पद्यरचना प्रथम मनात जुळायला हवी.त्यासाठी प्रथम वृत्ताची चाल मनात बिंबायला हवी. मग शब्द आपसूक सुचतात.एक-दोन कडवी मनात रचून झाल्यावर मग कागदावर उतरवावी.त्यावेळी शब्दांत बदल होणे शक्य असते.चाल अस्खलित ओघवती हवी.
* मराठीभाषेत रूढ असलेले संस्कृत शब्द अवश्य वापरावे.मासा या शब्दाऐवजी पद्यात मत्स्य शब्द योजणे अधिक चांगले.(बट इट् डिपेंडस्...) गीताचा विषय कोणता,वातावरण काय तदनुसार शब्द योजना करावी.थोड्या विचारान्ती होतेच.
* पद्यानुवाद करावा असे तुम्हाला वाटते. त्या अर्थी करायला घेतल्यावर तुमच्या हातून होणारच.
*प्रारंभ करा.शुभेच्छा!

पण सिरिअसली..

विवेकरावांना हतबल करण्याचा प्रयत्न नाही परंतु जालावर अतिभयंकर पद्यानुवाद झालेले आहेत हे टाळता येत नाही त्यामुळे त्यांना उदाहरणे हवी असल्यास तेही वाचून हतबल होतील असे वाटते. असो.

यावरून एक प्रश्न पडला की माणसाला पद्यानुवाद करण्याची गरज का भासते? (गद्य आणि पद्य हे दोन वेगळे फॉर्म आहेत हे लक्षात घेऊन हा प्रश्न विचारला आहे. माणसाला पद्यरचनेचीच गरज का वाटते असाही प्रश्न मी गांभीर्याने विचारू शकते हे कृपया लक्षात घ्यावे तेव्हा वरील प्रश्न खोडसाळ नाही.)

खालील उदाहरण हलकेच घ्यावे -

जेव्हा नवरा बायको राजी, तेव्हा काय करेल भटजी
आयुष्याच्या रस्त्यावरती, हरून गेला बाजी*

* हा बहुधा दुसरा बाजीराव असावा. पहिला बाजीराव हरल्याचे वाचले नाही. ;-)

वगैरे ओढून ताणून रचना पद्यानुवादाता होते असे वाटते त्यापेक्षा परकीय भाषेतील पद्याचे रसग्रहण का नाही केले जात?

असो. चांगल्या रचना वाचायच्या झाल्यास मनोगतावर टवाळांचे अतिप्राचीन पद्यानुवाद वाचावे. नंतर ते (टवाळ नाही, पद्यानुवाद) बिघडत गेले असे माझे मत आहे. धनंजय यांनीही स्पॅनिश कवितांचे अनुवाद केल्याचे आठवते आणि ते हास्यास्पद नव्हते. ते दुवे देऊ शकतील.

प्रश्न कळला नाही.

यावरून एक प्रश्न पडला की माणसाला पद्यानुवाद करण्याची गरज का भासते?

प्रश्न कळला नाही. माणसाला अनुवाद ज्या कारणाने करावा लागतो त्यामुळेच पद्यानुवाद करायची गरज असावी ना?

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

तेच जाणून घ्यायचे आहे

माणसाला अनुवाद ज्या कारणाने करावा लागतो त्यामुळेच पद्यानुवाद करायची गरज असावी ना?

हे थोडेसे स्वस्त उत्तर आहे, मीही तसेच देईन कारण माझी जाण तेवढीच आहे परंतु अनुवाद करताना मनुष्य परकीय भाषेतील गद्य स्वभाषेत समजवावे, त्या भाषेत मांडलेले विचार स्वभाषकांना समजावे म्हणून प्रयत्नशील असतो. पद्य समजावून देण्यासाठी त्याचे रसग्रहण केले जाते. परकीय भाषेतील पद्य स्वभाषेत आणताना अतिशय काळजी घ्यावी लागत असावी, अन्यथा त्याचा फॉर्मच बिघडून जातो असे वाटते. विशेषतः म्हणी, दाखले, वाक्प्रचार, एतद्देशीय संकल्पना यांचा पद्यात जो वापर होतो तो अनुवाद करून वृत्तांत बसवताना अनेकांची फे फे उडते असे दिसते तरीही हा अट्टहास कशाला? (हा प्रश्न पद्यानुवाद का करावासा वाटतो हे जाणून घेण्यासाठी आहे.) त्यापेक्षा रसग्रहणच का नाही?

चित्रपटांसाठी गाण्यांचे अनुवाद होतात. त्यापैकी फार थोडी गाणी लक्षात राहतात आणि याचे कारण फसलेले पद्यानुवाद असावे असे वाटते. (एक लक्षात राहणारे आणि सर्व भाषांत प्रसिद्ध असणारे गाणे - छोटीसी आशा पण मग याला अपवाद म्हणावे का की रेहमानच्या संगीताची जादू?) अनेक उदाहरणे तपासल्यास बरेचसे पद्यानुवाद फसले आहेत असेच म्हणावे लागते.

एक उदाहरण म्हणून वरचे "उंची है बिल्डींग" बघावे. हे गाणे थोडेसे आयटेम साँग आणि विनोदी आहे. त्याचा मनोगतावरील मूळ पद्यानुवाद भजनाप्रमाणे झाला असे मला वाटते. अनुवाद करताना गाण्याचा बाज बदलणार नाही हे लक्षात घ्यावे की घेऊ नये? वैचारिक लेखाचा गद्यानुवाद करताना तो विनोदी होणार नाही याची काळजी अनुवादक घेतो असे वाटते. तसेच पद्यालाही लागू असावे की नसावे?*

मला कवितेत रुची नाही त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर जे कविता करतात किंवा परभाषेतील कविता वाचतात त्यांच्याकडून अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांची भूमिका कळेल.

परकीय पद्याचे स्वकीय पद्य करताना फक्त वृत्तांत बसवणे, चालीत बसवणे पुरेसे नाही हे मीही** सांगू शकते. तेव्हा फक्त र ला ट जोडणे आणि पद्य बनवणे एवढाच हेतू असतो का? यासोबत चांगल्या पद्यानुवादासाठी काय आवश्यक आहे हे ही कळावे.

* या प्रश्नांची उत्तरे "जो जे वांच्छिल तो ते लाहो" नसावे अशी अपेक्षा ठेवते.

** एखादे गाढवही सांगू शकते असे लिहिणार होते पण असो.

ताल आणि लय

अनुवाद करताना गाण्याचा बाज बदलणार नाही हे लक्षात घ्यावे की घेऊ नये?

अनुवाद करताना गाण्याचा बाज बदलला तर काय अर्थ उरला.. म्हणजे विनोदी गाण्याचे भजन आणि भजनाचे शृंगारिक झाल्यावर मग अनुवाद व्यर्थच ना..!

बादवे याच ओळींचा ताल आणि लय राखून असा ही अनुवाद चालेल असं वाटतं ..

उंच हाय बंगला, पाळणा बी बंद हाय..
यीव कसा आता, जरी मन तय्यार हाय..

बाकी इथले बरेचसे प्रतिसाद फर्मास.. आवडेश..

तसे नाही

हे थोडेसे स्वस्त उत्तर आहे

बरोबर आहे. सिमीत ज्ञानामुळे हे सोपे उत्तर दिले होते. आता प्रश्न बराच कळला.
तरी देखील फारसा अभ्यास नसूनही असेच वाटते.

तरीही हा अट्टहास कशाला?

पद्यानुवादाचा अट्टाहास, अनुवादाची आवड (खरंतर खाज) खर्‍या अर्थाने भागवत (शमवत) असावा. उत्तम पद्यानुवाद केल्यामुळे/केल्यानंतरच आपल्याला चांगला अनुवाद करता येतो असा अहंगंड सुखावत असावाच शिवाय (/कारण) लोकांनाही ते पटत असावे.

अर्थात गद्यानुवादापेक्षा केवळ पद्यानुवाद कठीण असतो या 'पॉप्युलर' समजाशी मी सहमत नाही. गद्यानुवादही 'तितकाच' कठीण असतो. गद्यानुवादातही अनेकदा मोठमोठी लोकं फसली आहेत. वरवर सोपे दिसुनही अनेक थोरामोठ्यांना साधे गद्यानुवाद जमलेले नाहीत. उदा. द्यायचे तर कॉन्रॅड रिक्टरच्या उत्तमोत्तम कादंबर्‍यांचा जीएंसारख्या मातब्बराने केलेला अनुवाद (माझ्यामते तरी) फसलेला आहे.

तेव्हा गद्यानुवाद आणि पद्यानुवाद यांच्यात डावे उजवे करणे मला योग्य वाटत नाही. तेव्हा मी माणसाला अनुवाद ज्या कारणाने करावा लागतो (जो व्यक्ती-काल अन् कदाचित स्थल सापेक्ष असतो) त्यामुळेच पद्यानुवाद करायची गरज असावी या ढोबळ मताशी (अजूनतरी) ठाम आहे

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

बिगर-शब्दकोशातील अर्थाचा अंतर्भाव

कवितेचे एक वैशिष्ट्य असते : तिच्या रचनेच्या "आकृती"मधून बिगर-शब्दकोश-अर्थ वापरून काहीतरी संवाद साधला जातो. हे जमले, तर कविता वाचताना कवी बहुआयामी संवाद साधतो आहे, अशी समृद्ध आणि हवीहवीशी* जाणीव रसिकाला होते.
(*"हवीहवीशी" शब्दाच्या अर्थात "परदु:ख अनुभवण्याची जाणीव"ही सुद्धा आली. लोक तिकीट विकत घेऊन "वहिनीच्या बांगड्या" वगैरे रडवणारे चित्रपट बघतात! पण हे फार अवांतर होत आहे.)

"वृत्त" आणि "यमक" ही वैकल्पिक रचनावैशिष्ट्ये आहेत. ही साधने वापरून शब्दार्थापेक्षा वेगळा, आणि अनुभवाला पोषक असा संवाद कवी घडवतो. एका प्रसिद्ध गझलकाराने केलेले वर्णन मागे श्री. चित्तरंजन यांनी पुरवले होते : गझलकार मूड जाणून त्यास पोषक असे वृत्त निवडतो. यमकामुळे एखाद्या शब्दाला येणारे बळ, किंवा अस्पष्ट यमकामुळे कवितेला येणारी दुहेरी लय, हे सगळे शब्दार्थावेगळे, आणि अनुभवाला पोषक असते. या सर्व गोष्टी कवीसाठी वैकल्पिक आहेत. एखादा कवी यमके वापरत नाही. दुसरा एखादा कवी वृत्त वापरत नाही. (पण लय न-वापरणारा कवी विरळा. मुक्तछंदाच्या अंतर्गत लयीबाबत त्यांच्या छंदोरचनेच्या पुस्तकात माधव जूलियन यांनी हे विश्लेषण दिलेले आहे.) पण काहीतरी बहुआयामी लागतेच, आणि कवी-रसिक संवादाचा अविभाज्य भागही असते.

ते वेगवेगळे आयाम मूळ भाषेतील रचनेत मोकळे करता येतच नाहीत. पण भाषांतरकाराने ठरवलेलेच असते : "भाषांतरात मूळ रचना परिपूर्णपणे नाही". तरी शब्दार्थावेगळे आयाम काढून टाकले, तर ती कविता केविलवाणी पंगू होईल का? हे त्या-त्या कवितेच्या बाबतीत ठरवावे लागते. एखाद्या भाषांतरकाराचा एखाद्या कवितेविषयी हा वैयक्तिक निष्कर्ष असू शकतो. मग जमले तर मुळातलेच आयाम वापरायचा प्रयत्न भाषांतरकार करतो. किंवा जमले तर नव्या भाषेतील कुठल्या वेगळ्या युक्त्या वापरायचे भाषांतरकार ठरवू शकतो.

अशा रीतीने भाषांतर वाचणार्‍या रसिकालाही समृद्ध बहुआयामी अनुभव मिळतो. भाषांतरकार जर चांगला असेल, तर काय करेल? मूळ भाषेत वापरलेल्या आयामाने ज्या प्रकारची समृद्धता मूळ भाषेतल्या रसिकाला जाणवते, त्याच प्रकारची समृद्धता नव्या भाषेतील रसिकाला भाषांतरात वेगळ्या कुठल्या आयामाने जाणवावी.

- - -

श्री. विवेक महाबळ यांचा प्रस्ताव अतिशय त्रोटक आहे. त्यांना सहज उत्तर देणे शक्य नाही. त्यांच्या प्रश्नावरून त्यांना हवा असेलसा वाटावा, तसा सामान्य ठोकताळा माझ्यापाशी नाही. शिवाय त्यांचा प्रस्ताव औपरोधिक आहे की नाही, हेसुद्धा स्पष्ट कळत नाही.

त्यांनी उदाहरणे दिली असती, तर विश्लेषण आणि चर्चा सुसूत्र आणि अधिक रंगतदार झाली असती. शिवाय प्रश्न थेट आहे की औपरोधिक, तेसुद्धा स्पष्ट झाले असते.

- - -
काही स्पॅनिश->मराठी पद्य-भाषांतरांचे दुवे :
एडिपस आणि कूटप्रश्न (मूळ कवी : होर्हे लुईस बोर्हेस)
गुरफटलेली आसवे (मूळ कवी : हुआन रामोन हिमेनेथ)
अशी गुमसुम आवडतेस मला (मूळ कवी : पाब्लो नेरूदा) या धाग्याखालील चर्चेत मूळ भाषेतल्या कवितेतील लय भाषांतरात आणण्याबाबत थेट चर्चा आहे.

अशीच एक संबंधित उत्तम चर्चा

उत्तम अनुवाद आणि त्याचबरोबर अनुवाद किंवा भाषांतर म्हणजे काय याबद्दल झालेली उत्तम चर्चा.

स्वान्तःसुखाय|

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धम्मकलाडू प्रश्न विचारतातः"कशाला राव त्रास घेता?"
.
प्रियालीताईंना प्रश्न पडतो."यावरून एक प्रश्न पडला की माणसाला पद्यानुवाद करण्याची गरज का भासते?"
..
या दोन्ही प्रश्नाचे उत्तर माझ्यामते एकचः"स्वतःच्या आनंदासाठी."
आपल्याला योग्य शब्द आठवले,मनासारखी रचना जमली तर आनंद होतोच.

एक अनुवाद

ऍलिस इन् वंडरलँड् मधे jabberwocky ही प्रसिद्ध कविता आहे. "अनुवाद तर करूच शकत नाही - शब्द निरर्थक आहेत - पण अर्थपूर्ण असल्याचा भास होतो. " असं कुणीसं त्याचं वर्णन केलेलं आहे.

मूळ कविता आणि या अतिशय कठीण कवितेचा माझ्या एका महान मित्राने केलेला अनुवाद पहा. मित्र म्हणतो : When a nonsensical poem is translated, there can be paradoxically even more dimensions of translation than one might expect. .

मूळ शीर्षक : jabberwocky

`Twas brillig, and the slithy toves
Did gyre and gimble in the wabe:
All mimsy were the borogoves,
And the mome raths outgrabe.

"Beware the Jabberwock, my son!
The jaws that bite, the claws that catch!
Beware the Jubjub bird, and shun
The frumious Bandersnatch!"

He took his vorpal sword in hand:
Long time the manxome foe he sought --
So rested he by the Tumtum tree,
And stood awhile in thought.

And, as in uffish thought he stood,
The Jabberwock, with eyes of flame,
Came whiffling through the tulgey wood,
And burbled as it came!

One, two! One, two! And through and through
The vorpal blade went snicker-snack!
He left it dead, and with its head
He went galumphing back.

"And, has thou slain the Jabberwock?
Come to my arms, my beamish boy!
O frabjous day! Callooh! Callay!'
He chortled in his joy.

`Twas brillig, and the slithy toves
Did gyre and gimble in the wabe;
All mimsy were the borogoves,
And the mome raths outgrabe.

जबडोबा

प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती
बोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती.

बाळा! भि‍उनी जबडोबाच्या दात-नखांना सांभाळा
जबजब पक्षी मक्कड कुक्षी मागे असती, पळा! पळा!

नायक तलवारीला हलवे शत्रू फारा दिवसांचा
तमझाडाच्या खाली बसुनी विचार करितो क्षणिकाचा.

तितुक्या वेळी भडकत डोळे कडकत जबडोबा आला
सरकत झाडीमधुनी घुसला, बुडबुड तोंडी करी साला.

असा हाणला! तसा मारला! घावाने केले तुकडे!
जबडोबाचे डोके घे‍उनी नायक परते घराकडे.

"जबडोबाची मात जाहली का रे माझ्या प्रिय पोरा?
शुभ दिन आला! तमस निघाला!" आनंदी हसती जोरा.

प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती
बोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती.


प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

ही तर नवनिर्मिती

मित्र म्हणतो : When a nonsensical poem is translated, there can be paradoxically even more dimensions of translation than one might expect. .

ही तर नवनिर्मिती झाली. अनुवाद मस्त, मजेदार आहे.

ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.ही तर नवनिर्मिती झाली.

+१

अनुवाद मस्त, मजेदार आहे.

मलाही आवडला.

रूपांतर आवडले.

खासच!

बोबडगुंता

मस्त!
वाचताना 'बोबडगुंता' झाला
ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

काही मुद्दे

कवितेचा1 अनुवाद हा बहुधा गद्यापेक्षा फार कठीण असतो. शब्दांच्या आणि अर्थांच्या पलिकडले एक संपूर्ण विश्व -- लय आणि नाद, सांस्कृतिक संदर्भ, भाषिक लकबी वगैरे वगैरे -- दुसऱ्या भाषेत ट्रान्सपोर्ट करणे केवळ अशक्य आहे. ते केवळ आपण मूळ भाषेतून 2श्वास घेत, हुंगत अनुभवू शकतो.

त्यामुळे किंबहुना कवितेचा अनुवाद करता येऊ शकत नाही असे एक मत आहे. पण नापिकीच्या काळात कवितेचा अनुवाद केल्यास तो कवीच्या मेंदूला आणि प्रतिभेला चांगला खुराक ठरू शकतो. अनेक मोठ्या कवींनी ह्याचसाठी बहुधा असे अनुवाद केले आहेत. अनुवाद करताना मूळ कवितेनुसारच शब्द निवडायला हवेत. उदा. जयदेवाच्या कवितांचा मराठीत अनुवाद करताना बहुधा फारसी, अरबी, तुर्की शब्द टाळलेच जातील असे वाटते.

बाकी आंतरजालीय अनुवादांचा अनुल्लेखच बरा.

1. पद्य आणि काव्य ह्यात फरक करायला हवा. उदा. मोरोपंतांचे ते पद्य, तुकारामाची ती कविता अशी मी सोपी व्याख्या केली आहे.
2. अगदी लिपी बदलली तरी ह्या अनुभवांत फरक पडतो. उर्दू कविता उर्दू लिपीतून वाचण्याऐवजी देवनागरी लिपीतून वाचल्यावर मला हे जाणवले की एका लिपीतून दुसऱ्या लिपीत जाताना काहीतरी हरवून जाते.

अवांतर: धनंजय ह्यांच्यासाठी

एका प्रसिद्ध गझलकाराने केलेले वर्णन मागे श्री. चित्तरंजन यांनी पुरवले होते

ह्या चर्चेत दिलेला ग़ज़ल की भावभूमि में अन्विति हा फैजच्या लेखाचा तो दुवा असावा.

आभारी आहे

दिलेले दुवे आवडले. वाचतो. चर्चा उपरोधाने टाकलेली नाही. मुलांसाठी अनुवाद करायचे होते. इथे चांगली चर्चा केली आहे, खुप माहिती मिळाली. वाचण्यासारखे खुप आहे.

प्रोत्साहनासाठी आभार. उदाहरणांसाठी आभार. मी प्रयत्न करेन काहीतरी लिहून काढण्याचा.

एक उदाहरण

लहान मुलांच्या कवितेचे हे उदाहरण घेऊया :

Twinkle, twinkle, little star,
How I wonder what you are.
Up above the world so high,
Like a diamond in the sky.

(मूळ प्रत-अधिकारमुक्त कवितेत ७ कडवी आहेत [विकिपीडिया दुवा], पण माझ्या वैयक्तिक विचारप्रक्रियेचे उदाहरण म्हणून हे पहिलेच कडवे घेऊया.)

१. मूळ कवितेचे शब्दभांडार आणि शैली : लहान मुलांच्या ओळखीचे. शब्दांची पुनरावृत्ती करण्याची ध्वन्यनुसारी लकब वगैरे.
२. अर्थाबाबत एक शंका, इंग्रजीसाठी सामान्य : नाम की क्रियापद ही संदिग्धता आहे. "Twinkle" हा एकशब्दी वाक्यखंड आहे. "(तू) चकचक-कर" असे आज्ञार्थ आहे, की "चकचक (दिसते-आहे)" असे वर्णनात्मक आहे? मराठीत अशी संदिग्धता वैचित्र्यपूर्ण आहे. संदिग्धता ठेवावी, की दोनपैकी एक पर्याय निवडावा?
३. कवितेला सोपी ४-feet(गण), आयँबिक टेट्रामीटर लय आहे. प्रत्येक गणातील आघातस्थळ अगदी जोरदार आहे. विचलन नाही.
४. एक उत्तम योगायोग : ट्विं-कल् \ ट्विं-कल् \\ लिट्-टल् \ स्टाऽर् \\ आणि चांदो-बा\चांदो-बा \\ भाग्-लास् \ काऽ \\ यांच्या ठेक्यातले सामांतर्य लक्षणीय आहे. दोन्ही बालकविता आहेत. हा योगायोग काय निर्देश करतो? हे वृत्त मराठीत कायम ठेवता येईल
५. कवितेत दोन-दोन ओळींचे अंत्ययमक आहे. शिवाय ओळीच्या शेवटी वाक्यखंड किंवा वाक्य संपते (एंड-स्टॉपिंग) बालकवितेत अंत्ययमक असल्यास तालात आवर्तने येतात, आणि ओळीच्या शेवटी न्यास मिळाल्यामुळे सोपे समाधान मिळते. अंत्ययमक आणि एंडस्टॉपिंग मराठीकरिता नैसर्गिक आहे. ते निवडण्याबाबतचा निर्णय सोपा आहे.

- - -
चिमुकल्या चांदणे (चिमुक्-ल्या \ चांद-णे)
चकचक गऽ (चक्-चक् \ गऽ)
कोण तू कुठली तू (कोण् तू \ कुठ्-लि तू)
कळेना गऽ (कळे॑-ना \ गऽ ; ळे॑ = र्‍हस्व ए॑)
जगाच्या माथ्यावर (जगाऽ-च्या॑ \ मा॑थ्या॑-वर् ; मा॑=र्‍हस्व आ॑)
उंचावरी (उं-चाऽ \ वरीऽ )
आकाशात जणूकाही (आ॑का॑-शात् \ जणु-कै)
हिरेकणी (हिरे-ऽ \ कणीऽ)

काही मुद्दे :
(०) हा कच्चा खर्डा आहे.
१. चांदोबा-चांदोबा चा ठेका जमतो आहे.
२. चांदणे, चांदणे अशी पुनरावृत्ती न-करता, तोच परिणाम च-च-च, क-क-क अनुप्रासाने साधला आहे.
३. यमके असलेले बरे. उंचावरी आणि हिरेकणी, यात फक्त "ई" अंत्यस्वराचे यमक आहे. लहान मुलांनी म्हणताना हे थोडके यमक न्यास म्हणून पुरते का?
४. शब्दभांडार लहान मुलांच्या सहज आवाक्यातले आहे. "गऽ" हा संबोधन-शब्द घेतल्याने मुळातल्या द्विरुक्तीचे पडसाद उमटतात, की मुळात नसलेला आणि फाजिल लडिवाळपणा येतो?
५. "चकचक गऽ" मध्ये चकचक हे क्रियापद की नाम? ही बाब संदिग्ध ठेवणे जमले आहे. पण हे मराठीत कृत्रिम भासते आहे, की नैसर्गिक?

वगैरे, वगैरे विचार करत भाषांतर पूर्ण करेन.

चमचम चमचम चांदणे ग .

चमचम चमचम चांदणे ग ..
( किंवा चमचम चिमुकली चांदणी ग .. )
आलीस कुठून कशी ग ..
उंच उंच आकाशी..
जणू हिरकणी तू ऐशी..

----
आपल्या मुद्द्यांचा वापर करून सहजता आणण्याचा प्रयत्न केलाय.. कदाचित काही अर्थ (जसे की what you are ऐवजी आलीस कुठून कशी ग ..) जवळपासचे जुजबी झाले असले तरी अनुवाद प्रवाही राहण्यासाठी तितकी मर्यादित space घेऊ शकतो असं वाटतं ..

आपलं काय मत आहे ?

हा हा...

प्रतिक्रिया वाचून मजा आली.

लक्श्याच्या कुठल्यातरी चित्रपटात "तुमच्यावानी कुनी माज्या जिंदगीत येइल, तर लई झ्याक होइल, तर लई झ्याक होइल" असं गाणं होतं.

पद्यानुवाद कसा करावा?

माझी भर

"इवलीशी चान्दणी
लुकलुकती ग
लुकलुकती ग
जणु
आकाशातली हिरकणी
चमचमती ग
चमचमती ग
आकाशातल्या
जम्माडितली
तू कुठली ग
तू कुठली ग"

गावरान

 
^ वर