गणिताची आवड
'गंणित ' हा समुदाय निर्माण / स्थापन केल्याबद्दल शैलेश यांचे अभिनंदन !
वास्तविक हा वीषय अत्यंत गरजेचा. तसा सोपा . [ पैकी च्या पैकी गुण याच विषयात जास्त वेळा पडतात.] पण तया विषयाचे अवडंबर माजवले गेले. ' गणित येणारा तो हुशार ' असे भासवले गेले. पुर्वी S.S.C. ला गणित घेणारा तो ' स्कॉलर ' अशी समजूत ! हे सर्व आपणच निर्माण केले . त्या मुळे पालक आणि मुलें गणिताला ( गणोबाला ) घाबरूनच राहीली.
या समुदायातर्फे गणिताबद्दलची भिती घालविण्याचा - किंवा कमी करण्याचा - प्रयत्न केला गेला तरी मोठे काम होईल.
या द्रुष्टीने शरद कोर्डे आणि आवडाबाई यांचे प्रयत्न छान .
आपणही मुलांना सोपे सोपे हिशेब , कॅलेंडरच्या पानावरील गमती-जमती , वहानांच्या नंबर प्लेट वरुन होणारे खेळ ई. गोष्टीं मधुन गणिताविषयी आवड निर्माण करु शकतो.
जाता जाता एक गम्मत-------
१ वर्ग = १
११ वर्ग = १२१
१११ वर्ग = १२३२१
११११ वर्ग = १२३४३२१
१११११ वर्ग = १२३४५४३२१
हे असे १११११११११ वर्ग = १२३४५६७८९८७६५४३२१ पर्यंत चालु राहील.
Comments
अगणित!
गणित हा विषयच 'अगणित' असा असल्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाला तो नेहमीच दुर्बोध वाटलाय. अगदी अंकगणित,बीजगणित आणि भूमिती हे प्राथमिक प्रकार घेतले तरी त्यातील अंकगणित हे त्यातील 'काळ,काम आणि वेग, तुटलेल्या तोट्या,गळणारे हौद (पुलं चे शब्द उसने घेऊन) वगैरे प्रकार नेहमीच डोकेदुखी वाटत. भूमिती हे आणखी एक क्लीष्ट प्रकरण. त्यात अजून ट्रीग्नॉमेंट्री हे त्याहून अवघड प्रकरण. त्यातल्या त्यात बीजगणित(प्राथमिक अवस्थेतील) समजायला किंचित सोपे वाटते.
ह्यापुढच्या अगणित प्रकारांची नामावळी वाचूनच घशाला कोरड पडते(ती नावे देखिल अगम्यच वाटतात).तेव्हा त्याच्या वाटेला कोण जाणार? त्यामुळे अशा तर्हेच्या गणिताच्या प्रांतात लिलया वावरणार्यांबद्द्ल माझ्या मनात नेहमीच कौतुकमिश्रित आदरच असतो.
हेच..
त्यामुळे अशा तर्हेच्या गणिताच्या प्रांतात लिलया वावरणार्यांबद्द्ल माझ्या मनात नेहमीच कौतुकमिश्रित आदरच असतो.
हेच म्हणतो!
तात्या.
सांगू शकाल?
वहानांच्या नंबर प्लेट वरुन होणारे खेळ
कोणते खेळ होऊ शकतात ते सांगू शकाल का?
पल्लवी
काही खेळ
लहान मुलासाठी आपण मागत आहात असे ग्रुहित धरून लिहित आहे-
सम पाट्या जास्त दिसतात की विषम ते मोजणे
आकड्याची बेरीज करून ती बेरीज सम येते की विषम ते पाहाणे
अशी बेरीज करून कोण लवकरात लवकर १०० पर्यत पोचतो ते पहाणे
अजून ह्याच प्रकारे खेळ शोधून काढु शकतो, काही वेळाने अजून काही लिहेन
धन्यवाद आवडाबाई
धन्यवाद आवडाबाई
पल्लवी
नंबर प्लेट !
नंबर प्लेटवरुन अनेक खेळ खेळता येतील .
उदा. चार अंकांमधुन विवीध जोड्या तयार करुन बेरिज, वजाबाकी, गुणाकार करुन मनोरंजक उत्तरे काढता येतील.
८३९२ -- पहिल्या दोन अंकांची बेरिज दुस-या दोन अंकांच्या बेरजे एवढी आहे.
४३१२ -- एक आड एक अंकांची बेरिज सारखी आहे.
८४३६ -- एक आड एक अंकांचा गुणाकार सारखा आहे.
७२४१ -- पहीला अंक उरलेल्या अंकांच्या बेरजे एवढा आहे.
वगैरे अनेक प्रकार करता येतील.
कॅलेन्डर मधिल कोणताही चौरस [ २ बाय् २ ; ३बाय् ३ ; ४ बाय् ४ ] घेतला असता कर्णावरील अंकांची बेरिज सारखीच येते.३बाय् ३ मधे ती मधल्या अंकाच्या दुप्पट असते.
पेरांचा खेळ
हाताची पेरं वापरून २ ते २८ आकडे मोजून दाखवायला सांगणे हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे लहानग्यांना बेरीज व गुणाकार शिकवण्यासाठीचा.
- वेदश्री.