उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
वाचकांना आवाहन
सन्जोप राव
April 9, 2012 - 11:20 am
हैदराबाद येथील एक रसिक अभ्यासक आपला इंग्रजी-मराठी पुस्तकांचा मोठा संग्रह दान करु इच्छित आहेत. ही पुस्तके घेऊ इच्छिणार्यांनी ती वाचावीत आणि त्यांचा प्रेमाने सांभाळ करावा, इतकीच त्या दात्याची इच्छा आहे. (आणि अर्थातच ती पुस्तके हैदराबादहून आणण्याचा खर्च ज्याने त्याने करावयाचा आहे.)
'उपक्रम' च्या वाचकांपैकी कुणाला ही पुस्तके घेण्यात रस आहे का? या पुस्तकांची यादी खालील दुव्यावर पहाता येईल.
https://docs.google.com/spreadsheet/ccc?key=0AoFyKdkywQywdExGeGhLa1BMZDJ...
दुवे:
Comments
धन्यवाद : एक उपसूचना
प्रकटन दिल्याबद्दल सन्जोप राव यांचे आभार.
एक उपसूचना :
काही विशिष्ट पुस्तकांना जास्त मागणी असण्याची शक्यता आहे आणि तेवढीच पुस्तके घेण्याची इच्छा काही सभासद व्यक्त करतील.
परंतु या दात्याला ही सर्व पुस्तके एकाच व्यक्ती अथवा संस्थेला (एन्टीटीला) द्यायची आहेत.
उपक्रमावरील/ इतर मराठी संकेत स्थळांवरील सभासदांनी एकत्र येऊन एकहाती ही सर्व पुस्तके घेण्याबद्दल चर्चा केली तर बरे होईल.
तसेच काही संदर्भग्रंथ/पुस्तकसंच जर स्कॅन करून मराठी संकेतस्थळांच्या चालकांनी सामुहिकरित्या एखाद्या सेवादात्याच्या मार्फत
मुक्तपणे उपलब्ध करून दिले (डिजिटल लायब्ररी स्वरूपात) तर त्याचा भविष्यात अनेक अभ्यासूंना फायदा होईल.
अशी मोफत सेवा कोणी उपलब्ध करू शकेल काय?
अर्थात प्रताधिकाराचे उल्लंघन होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहेच.
या दिशेने चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
सहमत
प्रतिसादातील विचारांशी सहमत.
डिजिटल लायब्ररी
असाच प्रश्न पडला आहे.
पण
प्रताधिकार मुक्त पुस्तकांचे फक्त तसे करता येईल नं?
प्रताधिकार मुक्त पुस्तकांचे फक्त तसे करता येईल नं?
होय. फक्त प्रताधिकार मुक्त पुस्तकांच्या बाबतीत डिजीटल लायब्ररी स्वरुप देणे शक्य आहे. आणि प्रताधिकार असलेली पुस्तके लेखकांच्या पूर्वपरवानगीशिवाय स्कॅन करणे शक्य नाही.
बाकी पुस्तके डिजीटल स्वरुपात जतन करण्यासाठी ती स्कॅनिंग करवणे गरजेचे आहे आणि ते जर वेळखाऊ काम आहे. एकतर ही गोष्ट बाहेरुन करवून घेता येईल किंवा एखादी संस्था जी अशा तत्सम स्वरुपाची कामे करुन देते, त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
पण याबद्दल माझ्याकडे तरी कोणती माहिती उपलब्ध नाही. कुणाकडे अधिक माहिती असल्यास इथे ती दिल्यास उत्तम होईल, जेणेकरून नुसता काथ्याकूट होण्यापे़शा काहीतरी तोडगा निघाला तर उत्तमच..
- पिंगू
पुस्तके घ्यायला नक्कीच आवडतील
पुस्तके घ्यायला नक्कीच आवडतील. हैदराबादहून पुण्याला आणण्याचा खर्च काही महाग नाही आहे. पण विसुनानांनी जी उपसूचना मांडली आहे, त्यावर सांगोपांग चर्चा व्हायला हवी.
- पिंगू
सहमत
@पण विसुनानांनी जी उपसूचना मांडली आहे, त्यावर सांगोपांग चर्चा व्हायला हवी.>>> पिंगूशी सहमत
बाबौ
फारच मोठा, वैविध्यपूर्ण संग्रह आहे - जवळ ठेवायला आवडला असता.
मला ही पुस्तके हवी आहेत
मला ही पुस्तके हवी आहेत, ही लिंक ओपन होत नाही. त्यांचा दूरध्वनी किंवा संपर्क पत्ता मिळू शकेल का?
सुहास
लिंक
लिंक ओपन होत नाही :(
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
पुस्तकांबाबत्
हा पुस्तकांचा खजिना अजूनही उपलब्ध आहे का? मला आवडेल पुस्तके घ्यायला ...दात्याचे नाव नंबर पत्ता मिळाल्यास बरे होईल.
----प्रा.सौ .संगीता वायचाळ.
धत्तड तत्तड
झाली रे झाली लिंक ओपन झाली :) मजा म्हणजे काही अपवाद वगळता यातील बहुतेक कामाची पुस्तके ऑलरेडी आहेत, पण एकूणात भारी संग्रह.
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
पुढे
काही (सार्वजनिक वाचनालय स्वरूपाच्या) संस्थांनी एखाद्या दालनात सर्व पुस्तके ठेवण्यासाठी आणि स्क्यॅनिंगसाठी उत्सुकता दाखवली आहे.
प्रताधिकार कायद्यातून काही सूट मिळू शकते का ते पहावे लागेल. (खासगी वाचन आणि संशोधन या स्वरूपात स्क्यॅनिंग चालते असे कायद्यात आढळले.)
आता हे आंतरजालावरील वाचन 'खासगी' कसे बनवावे याचा विचार सुरू आहे.
परंतु नामांकित संस्था असेल तर कदाचित हे शक्य होईल.
बघू या.
मोह होतो... पण..
पुस्तकांची यादी वाचून ती वाचण्याचा व त्यांचे पालकत्व स्विकारण्याचा मोह होतो आहे. पण सध्याच्या घरच्या संग्रहातल्या पुस्तकांना कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे. एकदा पुस्तक वाचून झाल्यावर पून्हा कधीतरी चाळण्याशिवाय त्याकडे हात जात नाही. आणि बरीच शोधाशोध करून मिळवलेले पुस्तक असेच कोणाला तरी द्यावेसेही वाटत नाही. त्या पुस्तकातल्या भावनिक गुंतलेपणावर या दूव्यातून फारच मोठा रस्ता मिळाल्या सारखे वाटले. यातल्या काही पुस्तकांचा सांभाळ नक्कीच करायला आवडेल. त्या पेक्षाही एखादा नवीन उपक्रम असला तर माझ्याकडील पुस्तकांची यादी तयार करतोच. ( माझी सगळी खरेदी 1999 नंतरची आणि विषयाच्या बाबतीत कुठलाही धरबंध नसलेली आहे.)
आभार!!
माहिती दिल्याबद्दल सन्जोप राव यांचे आभार. तुमच्या मुळे बर्याच चांगल्या पुस्तकांची नावे कळत् आहेत्.
अभिजीत राजवाडे
प्रकटन व आभार
श्री. सन्जोप राव यांनी येथे दिलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार.
पुस्तकांच्या दात्याने ही सर्व पुस्तके गोव्यातील एका लायब्ररीस देण्याचे ठरवले आहे.
त्यामुळे द्वैभाषिक राज्यातील मराठी वाचकांना लाभ होईल.
या विषयावर उपरोक्त दात्याचा हा अंतिम निर्णय आहे.