बातमी

बिन लादेन रिपोर्ट

बिन लादेनच्या लपण्याच्या जागेवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर ह्य सर्व गोष्टीची तपासणी करून अहवाल देण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक कमिशन नेमले होते. त्या कमिशनचा ३००+ पानांचा अहवाल अल-जझीराच्या संस्थळावर www.aljazeera.com येथे वाचण्यासाठी/उतरवून घेण्यासाठी उपलब्ध झाला आहे.

'युद्धस्य कथा रम्या:' म्हणून कोणास तो वाचायची इच्छा असल्यास तेथे जावे असे सुचवितो.

लेखनविषय: दुवे:

डॉ. केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची संपूर्ण सामग्री महाजालावर उपलब्ध करून दिली आहे. ज्ञानकोशकारांचे ह्यापेक्षा उचित स्मारक करता येणार नाही. प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार.
http://ketkardnyankosh.com

खालील दुव्यावर ज्ञानकोशाच्या रचनेचा इतिहास सांगणारे डॉ. केतकरांचे पुस्तक उपलब्ध आहे.
http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/244

युरेका फोर्ब्स ची ग्राहक हित विरोधी भूमिका

डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड या धुळे जिल्ह्यातील अवधान एमआयडीसी स्थित नामांकित उद्योग संस्थेने आपल्या कर्मचार्यांकना स्वच्छ व शुद्ध पेयजल मिळावे या करिता युरेका फोर्ब्ज या पुणे स्थित कंपनीकडे विचारणा केली असता युरेका फोर्ब्ज तर्फे श्री. पियूष अरोंडेकर यांचेकडून दिनांक १४.०८.२०१२ रोजी अ‍ॅक्वागार्ड आर ओ (रिवर्स ओस्मोसिस) प्युरिफायर कम कुलर चा प्रस्ताव देण्यात आला.

उपक्रम दिवाळी विशेषांक २०१२ - प्रतिसाद आणि प्रतिक्रिया

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

उपक्रम दिवाळी अंक २०१२ प्रकाशित झाला आहे. सदस्यांनी या धाग्यावर आपले प्रतिसाद व प्रतिक्रिया नोंदवाव्यात. यंदाच्या वर्षी दिवाळी अंकाच्या लेखांना फेसबुक, गुगल प्लस आणि ट्विटर मार्फत शेअर करण्याची सोय तसेच फेसबुक आयडी वापरून प्रतिसाद देण्याची सोय देण्यात आलेली आहे. सर्व सदस्यांनी आणि वाचकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती.

दिवाळी अंकाच्या संपादकीयातून

आकाश टॅब्लेट पीसीची 'सुरस' कहाणी !

शासनाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी, अहवाल व रोज करत असलेल्या आश्वासनांची खैरात यांच्यावर विश्वास ठेऊन आपल्या देशाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्यास आपला देश अमेरिकेसकट सर्व विकसित राष्ट्रांना मागे टाकून क्रमांक एकवर केव्हाच पोचला असता. त्यासाठी एपीजे कलाम व भविष्यवेध घेणाऱ्या इतर टेक्नोक्रॅट्स यांनी निर्दिष्ट केलेल्या 2020सालाची वाट पहायची गरज पडली नसती. मुळात टेक्नोक्रॅट्सचा भर आपण विकसित करत असलेल्या तंत्रज्ञानावर आहे. तोंडपाटीलकी करून तंत्रज्ञान विकसित होत नसतात. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून भरपूर गाजावाजा केलेल्या आकाश टॅब्लेट पीसीचा उल्लेख करता येईल.

गेट्स फौंडेशनचा पुढाकार: संडास सुधार संशोधन

दि बिल अँड मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या मते जगभर वापरात असलेल्या आताच्या (भारतीयांचे स्क्वॉटिंगच्या वा कमोडच्या) फ्लश टाइप संडास रचनेत सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. आपल्यासाऱख्या शहरी मध्यमवर्गीयांना आताच्या फ्लश टॉयलेटमध्ये काही उणीवा असू शकतील असे वाटत नाही. 1880 सालापासून त्या वापरात असून गेली सव्वाशे वर्षे त्यातील प्रत्येक पार्ट न पार्ट मधील डिझाइनमध्ये सुधारणा होत होत आता त्याचे optimization झालेले असावे. त्यातील फ्लशसाठी असलेल्या अत्यंत महत्वाच्या पार्टची "S", "U", "J", वा "P" आकारातून उत्क्रांत होत होत आजच्या स्थितीला ती पोचलेली आहे.

वॉटर किट वापरून कार चालवणारा पाकिस्तानचा "रमर पिल्ले"!

पाला पाचोळा, जडी - बुटी सारख्या वनस्पतीजन्य वस्तूंचा वापर करून जगातील कुठल्याही प्रकारचा असाध्य रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो याबद्दल तुम्ही चुकून जरी असहमती दर्शवली तरी या भानगडीत मी का पडलो असे तुम्हाला वाटू लागेल व तसले विधान केल्याबद्दल पश्चात्तापाची वेळ तुमच्यावर येईल. परंतु केवळ रोगोपचारच नव्हे तर आपल्या महान देशाची इंधन समस्यासुद्धा वनस्पती इंधनाच्या अभूतपूर्व शोधातून चुटकीसरशी सुटू शकते यावर 1990च्या दशकात अनेकानी विश्वास ठेवला होता व या वनस्पती इंधनाचा महान संशोधक, केवळ हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेला, रमर पिल्ले हा तमिळ युवक होता हे अनेकांच्या आठवणीत असेल.

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन , चिपळूण

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन , चिपळूण येथे ११, १२ आणि १३ जानेवारी २०१३ ला होणार आहे हे सर्वश्रुत आहेच. या संबंधीची अधिक माहिती वेळोवेळी http://www.facebook.com/86VeAkhilaBharatiyaMarathiSahityaSammelana या फेसबुक पृष्ठावर प्रसिद्ध केली जाईल. कृपया या पृष्ठाला अवश्य भेट द्यावी.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'. आणि बहुतेक सगळ्या धरणांच्या बाबतीत होतं तसं इथेही पुनर्वसनाच्या नावाने बोंब आहे. मात्र मागच्या आठवड्यात मेल आलं की आता तिथे सत्याग्रह चालू होतोय. सत्याग्रह म्हणजे, आपल्या हक्काच्या जमिनीवर पेरणी करणं, तिथे ठाम उभं राहणं. पाणी चढलं तरी हरकत नाही. पाहिजे तर बुडून मरू पण हक्क सोडायचा नाही. नर्मदेतले अशा पद्धतीचे फोटो बघितलेच असतील बहुतेकांनी. इथेही तसंच काहीसं.

महाराष्ट्र-शब्दकोश

मराठीभाषाप्रेमींसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन महाजालावर उपलब्ध झालेलं आहे. य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे ह्यांनी आठ खंडांत संपादलेला महाराष्ट्र-शब्दकोश आता खालील दुव्यावर उपलब्ध झाला आहे. श्री. खापरे ह्यांचे मनःपूर्वक आभार !!!

 
^ वर