महाराष्ट्र-शब्दकोश

मराठीभाषाप्रेमींसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन महाजालावर उपलब्ध झालेलं आहे. य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे ह्यांनी आठ खंडांत संपादलेला महाराष्ट्र-शब्दकोश आता खालील दुव्यावर उपलब्ध झाला आहे. श्री. खापरे ह्यांचे मनःपूर्वक आभार !!!
http://www.khapre.org/portal/url/dictionary/index.aspx
मराठीच्या कोशांत धातूंची (क्रियापदांची) णेन्त रूपं दिलेली असतात. तशीच ह्या कोशात आहेत. पण जुन्या लेखनपरंपरेनुसार णें असं शिरोबिंदुयुक्त रूप वापरलेलं असतं. म्हणून करणे असं शोधल्यास माहिती मिळणार नाही. करणें असं रूप घालून शोधावं लागेल.

Comments

धन्यवाद

उत्तम दुवा.

http://www.khapre.org हे संस्थळ मराठी, संस्कृत इत्यादि भाषांतील खूप साहित्य उपलब्ध करून देते. त्यामागे कोण व्यक्ति वा संस्था आहेत ते जाणून घ्यायला आवडेल. कोणास अशी काही माहिती आहे काय?

विशाल खापरे

विशाल खापरे यांची साइट असावी आणि इतर कुटुंबियही मदतीस असावे असे वाटते. थोडी अधिक माहिती येथे आहे.

+१

उत्तम दुवा. बुकमार्क केला आहे.

असेच

वा. फार चांगली सोय झाली आहे. मी काही फारशी वापरात नसलेली क्रियापटे टाकून तपासले. उत्तम.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर