माहिती

गर्भधारणेचे बाजारीकरण

जननक्षमतेचा व्यापार

विज्ञान (व तंत्रज्ञान) शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन

श्रद्धेच्या प्रांतातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी बुद्धीप्रामाण्यवादी चिकित्सक अनेक वैज्ञानिक पुरावे सादर करत असतात; प्रत्यक्ष प्रयोगांचे दाखले देत असतात; समीकरण मांडतात; सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे दाखले देतात; ग्राफ्स काढून मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करतात. या त्यांच्या पुराव्यातून, दाखले - संदर्भातून भ्रामक विज्ञानाच्या आधारे चढवलेले श्रद्धेचे इमले कोसळू लागतील, असा एक (भाबडा) आशावाद चिकित्सक कार्यकर्त्यांच्या मनात दडलेला असतो. परंतु सश्रद्धांच्या समोर हे सर्व पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यासारखे होत असते.

आस्तिक/नास्तिक

A philosopher: “All those who generalize are fools”
His friend: “You are one of them, as your statement itself is a generalization.”

नुकत्याच प्रसिध्द झालेल्या Global Index of Religion and Atheism (Win/Gallup International, 2013) सर्वेमधे काही आश्चर्यकारक आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. जगातील ५९% लोक स्वत:ला

जमीनीचे क्षेत्रफळ

नमस्कार मित्रांनो
आपली मदत हवी आहे
जागेचे क्षेत्रफळ आणि भाव कसे काढायचे?
काही प्रश्न

* 1 एकर जमीनचे, जर स्क्वेयर मीटर मध्ये तिचे क्षेत्र काढायचे असल्यास किती येईल?

* 500 रु. प्रती वार(यार्ड) या दराने 1 एकर जमीनीला किती भाव येईल?

* 4442 वार(यार्ड) चे गुन्ठामध्ये मध्ये किती क्षेत्र येईल?

* 1000 रु. प्रति गुन्ठा या दराने 1 एकर जमीनचे किती भाव किती येईल?

* 6000 रु. प्रति स्क्वेयर मीटर या दराने 1 एकर जागेचे भाव किती येईल?

* 4442 वार(यार्ड) म्हणजे किती गुन्ठे?

* जर 1000 रु. प्रति गुन्ठा या दर असलेल्या जागेचे प्रती,चौरस मीटर(स्क्वेयर मीटर) दर कीती येईल?

क्लोंडायक गोल्ड रश - भाग २

रॉबर्ट हेंडरसन, कॅनडातील 'नोवा स्कॉशिया' परगण्यातला एक धाडसी युवक. सहा फुट उंच, निळ्या डोळ्यांचा, निधड्या छातीचा. त्याचे वडील बिग आयलंडवरील दिपगृहाच्या देखभालीचं काम करीत. वडीलांच्या कामात काडीचाही रस नसलेल्या हेंडरसनला नेहमीच भूमिगत सोनं दडल्याची स्वप्न पडत असत, नव्हे तशी स्वप्न तो रंगवत बसलेला असायचा. तसा तो पोटापाण्यासाठी फुटकळ उद्योग करायचा पण मनात नेहमीच हे भूमिगत सोनं धुंडाळून काढायची सुप्त इच्छा दडलेली होती. शेवटी वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने रहातं घर सोडलं आणि सोन्याच्या शोधार्थ न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे अनेक प्रांत पालथे घातले.

क्लोंडायक गोल्ड रश - भाग १

इसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज करून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्‍यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.

डॉ. केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची संपूर्ण सामग्री महाजालावर उपलब्ध करून दिली आहे. ज्ञानकोशकारांचे ह्यापेक्षा उचित स्मारक करता येणार नाही. प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार.
http://ketkardnyankosh.com

खालील दुव्यावर ज्ञानकोशाच्या रचनेचा इतिहास सांगणारे डॉ. केतकरांचे पुस्तक उपलब्ध आहे.
http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/244

भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3)

कार्पोरेट्सचा अधाशीपणा, नफेखोरी व आक्रमक मार्केटिंग आणि उद्योगविश्वात रूढ होत असलेले बिल् गेट्स मॉडेल - नवीन सॉफ्टवेर ऍप्स शोधल्या शोधल्या मायक्रोसॉफ्टला विकून पैसे कमावण्याची पद्धत - इत्यादीमुळे बाजारात कुठलेही नवीन उत्पादन येण्यास प्रचंड वेळ लागतो. बौद्धिक संपदा स्वामित्व हक्क प्रस्थापित करून आपली खुंट बळकट केल्याशिवाय एकही पाऊल पुढे ठेवता येत नाही. आपण शोधलेल्या उत्पादनात बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करत असल्यास त्यासाठीच्या पेटंट्सला वाटेकरी करून घेतल्याशिवाय उत्पादन बाजारात आणता येत नाही.

 
^ वर