आस्तिक/नास्तिक

A philosopher: “All those who generalize are fools”
His friend: “You are one of them, as your statement itself is a generalization.”

नुकत्याच प्रसिध्द झालेल्या Global Index of Religion and Atheism (Win/Gallup International, 2013) सर्वेमधे काही आश्चर्यकारक आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. जगातील ५९% लोक स्वत:ला
धार्मिक/आस्तिक म्हणवतात तर २३% लोक अधार्मिक असून १३% लोक पक्के नास्तिक आहेत. भारतातील धार्मिक लोकांचे प्रमाण २००५ साली ८७% होते ते २०१३ मधे ८१% आले व नास्तिक लोकांचे प्रमाण त्याच काळात ४% वरून ३% वर आले. म्हणजे धार्मिक/आस्तिक लोकांचे प्रमाण ६% व आस्तिक लोकांचे प्रमाण १% ने कमी झाले. सर्वात आश्चर्यकारक आकडा चीनचा आहे. सर्वेनुसार चीनमधील ४७% लोक नास्तिक आहेत.

वरील सर्वच आकडेवारी अविश्वसनीय आहे. त्याचे कारण म्हणजे जगातील ७०० कोटी लोकसंखेपैकी केवळ ५१९२७ लोकांना प्रश्नविचारून केलेले हे परीक्षण आहे. ५७ देशातील सरासरी १००० लोकांच्या उत्तरावर आधारित असलेले हे परीक्षण कोणत्याही शास्त्रशुध्द पद्धतीत बसणारे नाही. भारतातील १२० कोटी लोकसंखेपैकी केवळ १००० लोकांना प्रश्न विचारून काढलेला निष्कर्ष सर्व भारताला लागू करणे गैर आहे. चीन मधील निम्मी लोकसंख्या नास्तिकांची आहे यावर कोण विश्वास ठेवेल? भारतात दर दहावार्षाने जनगणना होते. त्यात लोकांच्या धर्माबद्धल माहिती विचारली जाते. जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतात ०.१% लोक अधार्मिक आहेत. स्वत:ला उघडपणे पक्के नास्तिक म्हणवणारे लोक तर हाताच्या बोटावर मोजावे लागतील. भारतात जवळजवळ २०% लोक अधार्मिक आहेत व त्यातील ३% लोक पक्के नास्तिक आहेत यावर विश्वास बसतो का?

लेखनविषय: दुवे:

Comments

अविश्वास

वरील आकडेवारीवर विश्वास न ठेवण्यासारखे काय आहे ते कळले नाही. सॅम्पल सर्व्हे नेहमी याच पद्धतीनेच केला जातो. ज्यांना प्रश्न विचारले होते असे लोक दूरवर पसरलेल्या भूभागामधील असले आणि समाजाच्या सर्व स्तरामधील असले की अशा सर्व्हेचे निष्कर्ष बहुदा अचूक असतात. या सर्व्हेवरही विश्वास ठेवण्यात मला तरी काहीच अडचण दिसत नाही.

अविश्वनीय

"जगातील ७०० कोटी लोकसंखेपैकी केवळ ५१९२७ लोकांना प्रश्नविचारून केलेले हे परीक्षण आहे",हा मुद्दा ग्राह्य आहे,कि इतक्या कमी लोकान्कडुन मत घेवुन ईतर व्यक्तिना ग्रुहित धरणे योग्य वाटत नाही.

अनेक वैचारिक गोंधळ

भारतातील १२० कोटी लोकसंखेपैकी केवळ १००० लोकांना प्रश्न विचारून काढलेला निष्कर्ष सर्व भारताला लागू करणे गैर आहे.
तुमच्या मते किती लोकांना प्रश्न विचारायला हवे होते, व त्या आकड्याचे बेसिस काय ?

चीन मधील निम्मी लोकसंख्या नास्तिकांची आहे यावर कोण विश्वास ठेवेल?
एक तर तुम्ही हे पण सांगितले नाही कि नास्तिकांची संख्या लोकसंख्येच्या निम्मी हे तुम्हाला फार कमी वाटते का फार जास्त वाटते. पण तुम्हाला जे काही वाटत असो, त्या "वाटण्या"ला तरी आधार काय? समजा तुम्हाला ही संख्या फार कमी वाटते, म्हणजे तुमच्या मते नास्तिकांची लोकसंख्या फक्त निम्मीच आहे हा निष्कर्श अमान्य. तर मग चीन मधील नास्तिकांची संख्या लोकसंख्येच्या निम्म्या पेक्षा जास्त आहे हा निष्कर्श आपोआपच मान्य होतो. तो मान्य करायला तुमच्या कडे काय आधार आहे?

हे सर्व वैचारिक गोंधळ आहेत. सर्व पॉप्युलेशनचा सर्वे कधीच करता येत नाही, व सॅम्पल सर्वेतूनच पॉप्युलेशन बाबतचे निष्कर्श काढावे लागतात. पॉप्युलेशनचा साईझ जेवढा मोठा त्या प्रमाणे सॅम्पल चा साईझ पण मोठा असायला हवा. येथ पर्यंत बहुतेकांना समजते. चूक ही होते, कि बहुतेकांच्या हे लक्षात येत नाही कि सॅम्पल चा साईझ केवढा असायला हवा याचा काहीही नियम नाही. सॅम्पल चा साईझ जेवढा मोठा, निष्कर्शा बाबत तेवढा जास्त आत्मविश्वास (higher confidence level). समजा एका हौसिंग सोसयटी मधे १०० कुटुम्बे आहेत. त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न किती? या करता १०० पैकी ९९ कुटुम्बांचा सर्वे केला (फक्त एक वगळले). हा सर्वे तरी बरोबर म्हणता येईल का? statistics चा अभ्यास नसलेले बहुतेक लोक म्हणतील "हो, १०० पैकी ९९ हे सॅम्पल पुरेसे आहे". statistics चा अभ्यास केलेला म्हणेल, "या सॅम्पल वरून काढलेल्या निष्कर्शा बाबत मला खूपच आत्म्विश्वास आहे. (very high level of confidence about the inference)

समजा भारतातील १२० कोटी लोकसंखे पैकी केवळ पाच लोकांचा सर्वे करून काही निष्कर्श काढले तर ते मान्य का अमान्य? statistics चा अभ्यास नसलेले बहुतेक लोक म्हणतील १२० कोटी लोकसंखेत फक्त पाच इतक्या लहान सॅम्पल वरून काढलेले निश्कर्श मान्य नाहीत. बरोबर उत्तर हे असेल - या पेक्षा मोठ्या सॅम्पल चा दुसरा सर्वे आहे का? असल्यास तो जास्त विश्वसनीय. नसल्यास हा पाच लोकांचा सर्वे is the best we have.

या पेक्षा मोठ्या सॅम्पल चा दुसरा सर्वे आहे का?

भारतात दर दहावार्षाने जनगणना होते. त्यात लोकांच्या धर्माबद्धल माहिती विचारली जाते. जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतात फक्त ०.१ % लोक अधार्मिक आहेत.
जनगणना संपल सर्व्हे पद्धतीने होत नाही तर complete enumeration पद्धतीने होत असल्याने मला ती जास्त भरवशाची वाटते. शेवटी उपक्रमातील लेखात लेखक आपापली मतेच मांडत असतो . Let us agree that we may differ.

समजुतीचा घोळ

मला वाटते, धर्म न मानणारे आणि धार्मिक नसणारे यांना तुम्ही एकच समजत आहात. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

०,.१% धर्म न मानणारे आहेत त्यांनी जनगणेच्या वेळी आपला धर्म "कोणताच नाही" असे सांगितले असणे शक्य आहे.

याउलट, ज्यांनी आपण धार्मिक नाही असे सर्वेच्या वेळी सांगितले ते खरे म्हणजे, देव्-देव न करणारे, क्रिया-कर्म न पाळणारे असे असावेत. ज्यांनी जनगणेच्यावेळी मात्र आपला (जो कुठला धर्म त्यांना जन्मतः मिळाला आहे) तो सांगितला असेल.

ह्या दोहोंची तुलनाच चुकीची आहे.

मतेच ?

Let us agree that we may differ हे येथे अप्रस्तुत आहे. काही गोष्टी ओपीनियन च्या असतात व त्यात मतभेद असू शकतात व तेथे Let us agree that we may differ हे ठीक आहे. पण काही गोष्टी ओपीनियन च्या पलीकडच्या असतात. statistical theory ही काही matter of ओपीनियन नव्हे. हे सर्व वैचारिक गोंधळ आहेत या पासून पुढे मी जे काही लिहिले, ते statistical theory च्या काही गोष्टी सोप्या करून सांगण्याच्या रूपात होते. त्यात Let us agree to differ चा प्रश्नच येत नाही.

by the way, तुम्हाला हे अर्थातच माहीत नाही कि जनगणना complete enumeration झाल्या नंतर एक सँपल सर्व्हे केला जातो. व जर सँपल सर्व्हे चे रिझल्ट complete enumeration च्या रिझल्ट पेक्षा वेगळे आले तर complete enumeration चे रिझल्ट काही प्रमाणात सँपल सर्व्हे च्या रिझल्ट प्रमाणे बदलले जातात. अनेक वाचकांना हे वाचून कदाचित धक्का बसेल. पण हे असेच आहे व बरोबर आहे. complete enumeration हा पण एक सँपल सर्व्हे च आहे, १००% सँपलचा. पण जसजसा सँपल साईझ मोठा होतो, तसतसे त्यात sampling errors पण वाढतात. कारण सर्वे करणारे जितके जास्त तितकी त्यांची गुणवत्ता राखून ठेवणे कठीण होते व सर्वे करण्यातील काटेकोर पणा कमी होतो. प्राथमिक शाळेच्या अन-विलींग व अंडर पेड शिक्षकांनी "पाट्या टाकणे" पद्धतीने केलेल्या complete enumeration मधे sampling errors जास्त असतात. त्या नंतर जो लहान सँपल सर्व्हे केला जातो तो जास्त वरिष्ठ, जास्त competent, व जास्त sincere लोकांनी केलेला असतो, व त्यात sampling errors कमी असतात.

असो, तुम्हाला हे सर्व matter of ओपीनियन वाटत असेल तर खुशाल कचर्याच्या डब्यात फेकून द्या.

आभार

माननीय श्री चेतन पंडित , माझ्या ज्ञानात भर टाकल्या बद्धल धन्यवाद.

 
^ वर