जमीनीचे क्षेत्रफळ

नमस्कार मित्रांनो
आपली मदत हवी आहे
जागेचे क्षेत्रफळ आणि भाव कसे काढायचे?
काही प्रश्न

* 1 एकर जमीनचे, जर स्क्वेयर मीटर मध्ये तिचे क्षेत्र काढायचे असल्यास किती येईल?

* 500 रु. प्रती वार(यार्ड) या दराने 1 एकर जमीनीला किती भाव येईल?

* 4442 वार(यार्ड) चे गुन्ठामध्ये मध्ये किती क्षेत्र येईल?

* 1000 रु. प्रति गुन्ठा या दराने 1 एकर जमीनचे किती भाव किती येईल?

* 6000 रु. प्रति स्क्वेयर मीटर या दराने 1 एकर जागेचे भाव किती येईल?

* 4442 वार(यार्ड) म्हणजे किती गुन्ठे?

* जर 1000 रु. प्रति गुन्ठा या दर असलेल्या जागेचे प्रती,चौरस मीटर(स्क्वेयर मीटर) दर कीती येईल?

* जर 500 रु. प्रती वार(यार्ड) या दर याप्रमाणे 40 गुन्ठे जागेचे प्रती,चौरस मीटर(स्क्वेयर मीटर) दर कीती येईल?

* 2221000 रु. जागेचे भाव 500 प्रति वार(यार्ड) या दर याप्रमाणे येते अस्लेल्या जागेचे एकूण गुन्ठामध्ये क्षेत्र किती येईल?

लेखनविषय: दुवे:

Comments

एकर, स्क्वेयर यार्ड/फूट/मीटर, गुन्ठा

* 1 एकर जमीनचे, जर स्क्वेयर मीटर मध्ये तिचे क्षेत्र काढायचे असल्यास किती येईल?
1 एकर = 4840 स्क्वेयर यार्ड = 43560 स्क्वेयर फूट = 4046.8564224 स्क्वेयर मीटर

* 500 रु. प्रती वार(यार्ड) या दराने 1 एकर जमीनीला किती भाव येईल?

तुम्हाला 500 रु. प्रती स्क्वेयर वार (यार्ड) म्हणायचे असावे. 500* 4840 = 24,20,000 रुपये

* 4442 वार(यार्ड) चे गुन्ठामध्ये मध्ये किती क्षेत्र येईल?

गुन्ठा हे standard unit नाही. साधारणत: 1 गुन्ठा = 121 स्क्वेयर यार्ड = 1089 स्क्वेयर फूट = 101.17141056 स्क्वेयर मीटर
4442 स्क्वेयर वार(यार्ड) = 4442 /121 = 36.7107 गुन्ठा

* 1000 रु. प्रति गुन्ठा या दराने 1 एकर जमीनचे किती भाव किती येईल?

1 एकर = 40 गुन्ठा. 1000 रु. प्रति गुन्ठा या दराने 1 एकर जमीनची किंमत = 40,000 रुपये

* 6000 रु. प्रति स्क्वेयर मीटर या दराने 1 एकर जागेचे भाव किती येईल?

4046.8564224 X 6000 = 24281138.53 रुपये

* जर 1000 रु. प्रति गुन्ठा या दर असलेल्या जागेचे प्रती,चौरस मीटर (स्क्वेयर मीटर) दर कीती येईल?
1 गुन्ठा = 101.17141056 स्क्वेयर मीटर. 1000 रु. प्रति गुन्ठा = 9.88 प्रति चौरस मीटर

* जर 500 रु. प्रती वार(यार्ड) या दर याप्रमाणे 40 गुन्ठे जागेचे प्रती,चौरस मीटर(स्क्वेयर मीटर) दर कीती येईल?

1 स्क्वेयर यार्ड = 0.83615 स्क्वेयर मीटर. 500 रु. प्रती स्क्वेयर वार(यार्ड) = 597.98 प्रती स्क्वेयर मीटर
हा per unit area दर आहे. जागा 40 गुन्ठे असो वा कितीही.

* 2221000 रु. जागेचे भाव 500 प्रति वार(यार्ड) या दर याप्रमाणे येते अस्लेल्या जागेचे एकूण गुन्ठामध्ये क्षेत्र किती येईल?

36.7107 गुन्ठा

महोदय,

देवाने आपल्याला दुसरे काही दिले नसेल तरी गूगल दिले आहे ना?
त्या सर्च मधे यूनिट कन्वर्जन, सोपे गुणाकार, कठीण इक्वेशन्स काही ही लिहून उत्तर मिळते हो. उपक्रमावर असे धागे पाहून जीव तीळ तीळ तुटला..

^ वर