माहिती
वैदिक गणित ?
वैदिक गणित म्हणजे नेमके काय आहे हे बहुतेकांना माहीत नसते. या वर बाजारात पुस्तके आहेत पण ती आणून वाचण्याच्या फंदात फार कोणी पडत नाही, व वाचले तरी त्यावर विचार तर फारच कमी लोक करतात. त्यातून आपली मानसिकता अशी आहे कि कोणतीही गोष्ट वेद पुराणातून आहे असे म्हंटले कि आपला त्यावर चटकन विश्वास बसतो एवढेच नव्हे तर ते आधुनिक विज्ञाना पेक्षा श्रेष्ठच असणार असा पण आपला समज असतो. या मानसिकते मुळे वैदिक गणित म्हणजे गणिताची काही तरी श्रेष्ठतम पद्धती आहे असा एक भ्रम पसरलेला आहे.
रक्ताभिसरण आणि रक्तदाब
आपल्या रक्तात काय काय असते असे लाक्षणिक अर्थाने बोलले जाते आणि ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले जातांना त्यात काय पाहिले जाते किंवा सापडते हे मी या पूर्वीच्या लेखात लिहिले होते. ही रक्ताची केमिस्ट्री (रसायनशास्त्र) झाली. पदार्थविज्ञान (फिजिक्स) किंवा त्यातल्या द्रवविज्ञान (हैड्रॉलिक्स) या शास्त्रांच्या दृष्टीकोनातून रक्ताचा अभ्यास करतांना त्यात काय दिसते हे या लेखात पाहू.
गप्पा गणितज्ञाशी! (भाग - १)
डॉ. भास्कर आचार्याबरोबरच्या गप्पा... गणिताच्या!
कदाचित उपशीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल. कोण हा डॉ. भास्कर आचार्य? त्याच्या गप्पातून काय मिळणार? याचा आपल्याशी काय संबंध? मुळात हा कुठल्या विद्यापीठाचा? स्टॅनफोर्ड, ऑक्सफर्ड, हार्वर्डचा की कुठल्यातरी गावठाणातला? त्याच्या नावावर किती पेटंट्स आहेत? खरोखरच तो स्कॉलर आहे का? गूगलवर - लिंकडेनवर त्याच्याबद्दल काय माहिती दिली आहे? ... असे अनेक प्रश्न आपल्याला सुचतील. जरा दमानं घ्या. सगळ सांगतो.
आपल्या रक्तात काय काय सापडते?
एकादा माणूस लहानपणापासूनच शांत, विनम्र, सरळमार्गी, उदार वगैरे असतो, तर दुसरा एकादा ऊर्मट, धांदरट, अडमुठा, दुष्ट वगैरे असतो. स्वभावातले असले गुणदोष ज्याच्या त्याच्या रक्तातच असतात असे अलंकारिक भाषेत म्हंटले जाते. पण प्रत्यक्षात त्या दोघांचे रक्त प्रयोगशाळेत तपासून पाहिले तर कदाचित ते एकसारखेच निघण्याची शक्यता असते. माणसाच्या रक्तात खरोखर कोणकोणत्या गोष्टी असतात आणि त्या किती प्रमाणात असतात हे आता शास्त्रीय तपासण्यांमधून पाहिले आणि मोजले जाते. त्यातल्या काही मुख्य तपासण्यांबद्दल मला असलेली माहिती या लेखात दिली आहे.
विशेषज्ञांच्या भाकितांची ऐशी तैशी!
कुठल्याही दिवसाच्या कुठल्याही वृत्तपत्रावर ओझरती नजर फिरवा, राशीफलांच्या नेहमीच्या रतीबाबरोबरच कुठल्याना कुठल्यातरी विशेषज्ञांच्या भाकितांचा उल्लेख ठळक मथळ्याखाली वाचायला हमखास मिळतोच.
भाषाशास्त्राची ऑलिंपियाड स्पर्धा
नमस्कार मंडळी,
गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांप्रमाणेच भाषाशास्त्र या विषयातही ऑलिंपियाडची स्पर्धा घेतली जाते. २००९ सालापासून भारताने या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली आहे आणि काही पदकेही मिळवली आहेत. यावर्षीपासून या स्पर्धेसाठीचे भारतीय प्रतिनिधी ठरवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी २ फेब्रुवारी २०१३ रोजी होईल. त्यातून मुख्य स्पर्धेसाठी ४ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल .
त्याआधी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे तपशील पुढीलप्रमाणे-
कालावधी: ६ दिवस (२४ ते २९ डिसेंबर, २०१२)
वेळः सकाळी १० ते दुपारी ४
उपक्रम दिवाळी विशेषांक २०१२ - प्रतिसाद आणि प्रतिक्रिया
'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उपक्रम दिवाळी अंक २०१२ प्रकाशित झाला आहे. सदस्यांनी या धाग्यावर आपले प्रतिसाद व प्रतिक्रिया नोंदवाव्यात. यंदाच्या वर्षी दिवाळी अंकाच्या लेखांना फेसबुक, गुगल प्लस आणि ट्विटर मार्फत शेअर करण्याची सोय तसेच फेसबुक आयडी वापरून प्रतिसाद देण्याची सोय देण्यात आलेली आहे. सर्व सदस्यांनी आणि वाचकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती.
दिवाळी अंकाच्या संपादकीयातून
आकाश टॅब्लेट पीसीची 'सुरस' कहाणी !
शासनाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी, अहवाल व रोज करत असलेल्या आश्वासनांची खैरात यांच्यावर विश्वास ठेऊन आपल्या देशाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्यास आपला देश अमेरिकेसकट सर्व विकसित राष्ट्रांना मागे टाकून क्रमांक एकवर केव्हाच पोचला असता. त्यासाठी एपीजे कलाम व भविष्यवेध घेणाऱ्या इतर टेक्नोक्रॅट्स यांनी निर्दिष्ट केलेल्या 2020सालाची वाट पहायची गरज पडली नसती. मुळात टेक्नोक्रॅट्सचा भर आपण विकसित करत असलेल्या तंत्रज्ञानावर आहे. तोंडपाटीलकी करून तंत्रज्ञान विकसित होत नसतात. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून भरपूर गाजावाजा केलेल्या आकाश टॅब्लेट पीसीचा उल्लेख करता येईल.
भारतातिल परिस्थिती
मित्रांनो, आपण या अखंड भारतात राहतो. एकदा फिरल्याशिवाय हा भारत किती मोठा आहे ते कळत नाही! तर या भारतात खुप मोठे आव्हान आज उभे ठाकले आहेत.
1) आज भारताला जर कोणता धोका असेल तर तो ' चीनचा' ! आज चीनी वस्तुंनी पुर्ण बाजारपेठ व्यापून टाकली आहे. शिवाय आपल्या पारंपारिक शत्रुशी पाकिस्तानशी हातमिळवणी करुन आपल्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.
गेट्स फौंडेशनचा पुढाकार: संडास सुधार संशोधन
दि बिल अँड मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या मते जगभर वापरात असलेल्या आताच्या (भारतीयांचे स्क्वॉटिंगच्या वा कमोडच्या) फ्लश टाइप संडास रचनेत सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. आपल्यासाऱख्या शहरी मध्यमवर्गीयांना आताच्या फ्लश टॉयलेटमध्ये काही उणीवा असू शकतील असे वाटत नाही. 1880 सालापासून त्या वापरात असून गेली सव्वाशे वर्षे त्यातील प्रत्येक पार्ट न पार्ट मधील डिझाइनमध्ये सुधारणा होत होत आता त्याचे optimization झालेले असावे. त्यातील फ्लशसाठी असलेल्या अत्यंत महत्वाच्या पार्टची "S", "U", "J", वा "P" आकारातून उत्क्रांत होत होत आजच्या स्थितीला ती पोचलेली आहे.