भारतातिल परिस्थिती

मित्रांनो, आपण या अखंड भारतात राहतो. एकदा फिरल्याशिवाय हा भारत किती मोठा आहे ते कळत नाही! तर या भारतात खुप मोठे आव्हान आज उभे ठाकले आहेत.
1) आज भारताला जर कोणता धोका असेल तर तो ' चीनचा' ! आज चीनी वस्तुंनी पुर्ण बाजारपेठ व्यापून टाकली आहे. शिवाय आपल्या पारंपारिक शत्रुशी पाकिस्तानशी हातमिळवणी करुन आपल्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.
2) दुसरे आव्हान आहे ते म्हणजे घुसखोरांचे! आज एकट्या महाराष्ट्रात आजमितीला 2 कोटी बांग्लादेशी राहतात. अन शिवाय तो ओघ अजुनही रोज सुरु आहे. आपल्या व देशाच्या द्रुष्टिने केवळ मत मिळविण्यासाठी सोईस्कर या गोष्टिकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आपल्या दैनंदिन जिवनावर परिणाम होत असुन महागाई खुप वाढली आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

बापरे!

महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
त्यात मुसलमान किती?
त्यात बांग्लादेशी किती?

उचल्ला कीबोर्ड..

2 कोटी?

म्हणजे 25 टक्के मराठी लोक हे बांग्लादेशी आहेत? (किंवा बांगलादेशातील साधारण 13 टक्के लोकांनी एकट्या महाराष्ट्रात स्थलांतर केले आहे?) बांगलादेश पूर्ण रिकामा झाला आहे काय?

अखंड भारत?

अखंड भारत म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे?

आज भारताला जर कोणता धोका असेल तर तो ' चीनचा' !

कसला धोका? बाजारपेठ आपली आहे. काय घ्यायचे काय नाही हे आपण ठरवायचे. भारतीयांनी अशी उत्पादने तयार करावीत. कोणी अडवले आहे काय? चीन सोबत मैत्री का नाही करत? जास्त फायदा आपलाच होईल आणि पाकवर पण नियंत्रण येईल?
दुसर्‍या मुद्या बाबत: तुम्ही कसे मोजले? जर तुम्हाला माहित आहेत ते कोण आहेत तर मग त्यांना हाकलुन का देत नाही अथवा सरकारला मदत का नाही करत?

अचुक माहिती!

1) आज भारताला जर कोणता धोका असेल तर तो ' चीनचा' ! आज चीनी वस्तुंनी पुर्ण बाजारपेठ व्यापून टाकली आहे. शिवाय आपल्या पारंपारिक शत्रुशी पाकिस्तानशी हातमिळवणी करुन आपल्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.

बरोब्बर! छ्या! पण आता तुम्ही हे राजरोस उघड केल्यामुळे पाकिस्तानची पंचाईत होणार नाहि का?

2) दुसरे आव्हान आहे ते म्हणजे घुसखोरांचे! आज एकट्या महाराष्ट्रात आजमितीला 2 कोटी बांग्लादेशी राहतात.

ते 'योगी बाबा' चार कोटी सांगतात. असो त्यांचे मोजणी अधिकारी वेगळ्या अध्यात्मिक पातळीचे असतील

यामुळे आपल्या दैनंदिन जिवनावर परिणाम होत असुन महागाई खुप वाढली आहे.

वा! वा! आता बांग्लादेशीच्ये खरे कारण सांगून तुम्ही भाजपची चांगलीच पंचाईत केली आहेत. ते म्हणत होते सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई वाढली आहे.

भारता ला खरा धोका भारतीयांपासुन च

धनंजय,

भारताला खरा धोका आहे तो भारतीय लोकांकडुन च. आपल्या सर्व problems ची कारणे "परकीय हात" आहे हे सांगणे म्हणजे स्वता ला फसवण्या सारखे आहे.

जे काही बांग्लादेशी येउन रहातात त्यांना राहुन कोण देते भारतीय लोक च ना. अगदी शिवसेनेच्या राज्य काळात सुद्धा बांग्लादेशी लोकांवर कारवयी केली नाही. मुंबइ महानगरपालिका तर शिवसेने कडेच आहे कित्येक वर्ष.

चीन त्या देशाला जे योग्य आहे ते करतो च आहे. भारताला कोणी आडवले आहे?

 
^ वर