इतिहास

क्लोंडायक गोल्ड रश - भाग २

रॉबर्ट हेंडरसन, कॅनडातील 'नोवा स्कॉशिया' परगण्यातला एक धाडसी युवक. सहा फुट उंच, निळ्या डोळ्यांचा, निधड्या छातीचा. त्याचे वडील बिग आयलंडवरील दिपगृहाच्या देखभालीचं काम करीत. वडीलांच्या कामात काडीचाही रस नसलेल्या हेंडरसनला नेहमीच भूमिगत सोनं दडल्याची स्वप्न पडत असत, नव्हे तशी स्वप्न तो रंगवत बसलेला असायचा. तसा तो पोटापाण्यासाठी फुटकळ उद्योग करायचा पण मनात नेहमीच हे भूमिगत सोनं धुंडाळून काढायची सुप्त इच्छा दडलेली होती. शेवटी वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने रहातं घर सोडलं आणि सोन्याच्या शोधार्थ न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे अनेक प्रांत पालथे घातले.

क्लोंडायक गोल्ड रश - भाग १

इसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज करून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्‍यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.

भाग १

भाग २.१

मागील लेखात इलियडमधील २४ बुक्सपैकी पहिल्या ३ बुकांचा सारांश आला होता. आता बुक्स ४ ते १० यांमधील कथाभाग पाहू. पहावे तिकडे नुस्ती मारामारी-महाभारतात "धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभि:" असे त्या तुंबळ युद्धाचे वर्णन दिलेय अगदी तश्शीच. शृंगार झाल्यानंतर होमरबाबांच्या अंगात वीररस उसळी मारू लागलाय असेच वाटते ती बुक्स वाचून.

आधीचे संक्षिप्त ब्याकग्रौंडः

सुरकोटला अश्व: भाग 2

(मागील भागावरून पुढे)

1971-72 या वर्षामध्ये श्री. ए.बी.शर्मा या भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञाने, सुरकोटला येथील टेकाडावर, इ.स.पूर्व 2000 या कालखंडातील घोड्याच्या अस्थी अवशेषांचा लावलेला शोध, पुढची सुमारे 20 वर्षे,जगभरच्या इतर शास्त्रज्ञांनी संपूर्णपणे अमान्यच केल्याने तसा दुर्लक्षितच राहिला. एक सुप्रसिद्ध आणि सन्मानित पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड एच मेडो (Dr. Richard H. Meadow) यांनी उलट या शोधावर टीका करताना असे सांगितले होते की:

१६६४ - सुरतेत शिवाजी

शिवाजीच्या सुरतेवरील १६६४च्या जानेवारीतील पहिल्या मोहिमेचे खालील वर्णन सुरतेमध्ये तेव्हा उपस्थित असलेल्या M.Escaliot नावाच्या ख्रिश्चन फादरने लिहून Brown आपल्या एका परिचिताकडे पाठविले होते. ते वर्णन Indian Antiquary ह्या नियतकालिकाच्या सप्टेंबर १८७९ च्या अंकात छापले होते. मला ते सर्व पत्र जालावर सापडले.

हे काही नवीन मुळीच नाही. ह्या पत्राचे संदर्भ अनेक शिवचरित्रांमधून पाहावयास मिळतात. तथापि मी तरी सर्व पत्र मुळातून आजपर्यंत कोठेच वाचले नव्हते. त्यामुळे उत्सुकतेपोटी मी ते सर्व वाचले.

'उपक्रम'च्या अन्य सदस्यांनाहि ते मुळातून पूर्णतः वाचावयास आवडेल अशा हेतूने ते येथे खाली देत आहे.

‘सुरकोटला’ अश्व: भाग 1

‘सुरकोटला‘ हे गुजरात राज्यामधील कच्छ जिल्ह्यामध्ये असलेले, एक अगदी छोटेसे खेडेगाव आहे. विकिमॅपियावरील माहितीप्रमाणे या गावाचे अक्षांश-रेखांश, साधारण 23°37′N 70°50′E असे आहेत. त्यामुळे हे खेडे कच्छची राजधानी असलेल्या भूज शहरापासून ईशान्येस साधारण 120 किमी अंतरावर तर रापर गावाच्या ईशान्येस, 22 किमी अंतरावर वसलेले आहे असे म्हणता येते. या खेड्याजवळच 16 ते 26 फूट उंच असलेले एक टेकाड बघण्यास मिळते. या टेकाडाच्या सभोवती असलेली जमीन उंचसखल असून त्यात मधेमधे लाल मातीने माखलेल्या सॅन्डस्टोन दगडाच्या छोट्या छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत.

सुधारक आगरकर

भारतीय इतिहासामधील सुप्रसिध्ध असा एक किस्सा सांगितला जातो कि टिळक व सुधारक आगरकर यांच्यामध्ये "आधी समाजसुधारणा हवी कि आधी राजकीय स्वातंत्र्य मिळायला हवे" या दोन्ही बाबीवर या दोन्ही प्रिय मित्रांचे बिनसले. पुढे आगरकर आपल्या राहिले आणि समाजसुधारणा "बुधीप्रमाण्यावाद" नियमानुसार केली. व पुढे टिळक "राष्ट्रीय सभेमध्ये" जहालांचे प्रमुख नेते बनले.

भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते.

ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.

रोजन युद्ध भाग पहिला

ट्रॉयच्या मोहिमेला निघाल्यावर ८ वर्षे भरकटण्यात आणि त्यानंतरची ९ वर्षे इतर चकमकींत गेल्यावर मग लोक जागे झाले. तद्वतच पहिल्या आणि दुसर्‍या लेखात लै अंतर आहे, पण इथून पुढचे लेख जरा लौकर येतील हे नक्की. :)

इलियडच्या आधीची अतिसंक्षिप्त पूर्वपीठिका:

 
^ वर