इतिहास
ग्रामदैवत
हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते.
खूब लड़ी मर्दानी ...
सध्या मी The hero with a thousand faces १ हे जोसेफ कॅम्पबेल यांचे पुस्तक वाचत आहे.
आमचा त्यांचा इतिहास
इतिहास हा बर्याचजणांच्या नावडीचा विषय, सहसा कामाचा किंवा फायद्याचा नसणारा परंतु भूतकाळात डोकावायला प्रत्येकालाच आवडते. तेव्हा इतिहासाचे अवघड ओझे सांभाळून आपली आणि इतरांची पाळेमुळे खणून काढण्याची आवड असणार्यांचा हा समुदाय
अप्सरा
प्रस्तावना: हिंदू पुराणांत वारंवार येणाऱ्या अप्सरांबद्दल माहिती गोळा करावी असे काही दिवसांपूर्वी डोक्यात आले परंतु ही माहिती आपल्या पुराणांत संकलित नसून सर्वत्र विखुरलेली आहे.
लिझ माइटनर - भाग २
लिझ माइटनर - भाग १ वरून पुढे
दरम्यानच्या काळात जर्मनीत असलेल्या ओट्टो हानशी पत्रांच्या माध्यमातून तिचा संपर्क होता. लिझच्या सांगण्यावरून ऑट्टो हानने युरेनियम वर न्यूट्रॉन्सचा मारा करण्याचा प्रयोग केला. युरेनियमवर न्यूट्रॉन्सचा मारा केल्यानंतर त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉनमध्ये रूपांतर झाले. या निष्कर्षांचे स्पष्टीकरण रसायनशास्त्रज्ञ असणाऱ्या हानला देता आले नाही. इतकेच नाही तर इतर भौतिकशास्त्रज्ञांनाही याचा उलगडा झाला नाही.
लिझ माइटनर - भाग १
मानववंशाचा इतिहास असंख्य लहानमोठ्या घटनांनी भरलेला असला तरी संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या घटना तश्या मोजक्याच आहेत. दुसरे महायुद्ध आणि त्या काळादरम्यान लागलेला अणुबॉम्बचा शोध या घटनांनी मानवजातीचे जीवनच बदलून टाकले. दुसऱ्या महायुद्धाशी निगडीत कथा असंख्य आहेत पण त्यापैकी लिझ माइटनरची गोष्ट तिच्या आयुष्यासारखीच उपेक्षित राहिली.