कला

चेतन ची शोकांतिका

एखाद्या व्यक्तिचे विचार, त्याचे महात्म्य जगाला कळतच नाही. सॊक्रेटीसला त्याच्याच समाजातील विद्वान ओळखू शकले नाहीत, ज्ञानेश्वर आदी भावंडांचे मोठेपण तर त्यांच्या जन्मगावातील लोकांनाच कळले नाही. गांधींच्या लाखोंच्या संख्येने असणार्‍या भक्तांनासुद्धा गांधीजी कळलेच नाहीत (गांधींच्या शरीराचा खून नथूराम ने केला हे खरे असले तरी गांधींचा वैचारिक खून त्यांचे अनुयायी म्हणवणार्‍यांनीच केला, अन्यथा गांधींच्या तत्वाला हे तथाकथित अनुयायी जागले असते तर त्यांनी प्रतिक्रियेदाखल पुण्यात शेकडो ब्राह्मणांची घरे जाळलीच नसती).

दिवाळी अंक - वाचलेले काही फुटकळ-१

'अक्षर' दिवाळी अंकातला सुलेखा नागेश यांचा डॉ. नयना पटेल यांच्या आणंद येथील कृत्रीम गर्भारोपणाचे इस्पितळ व भाडोत्री मातांचे (सरोगेट मदर्स) वसतिगृह याविषयीचा लेख रोचक आहे. उपजीविकेची मर्यादित साधने असलेल्या स्त्रियांचे आयुष्य अशा उपक्रमात सहभागी झाल्याने कसे बदलून गेले आहे, तथापि या गोष्टींमध्ये सहभागी होणे याला समाजात अद्याप मान्यता कशी नाही आणि त्यामुळे या सरोगेट मदर्सना हे सगळे लपूनछपून कसे करावे लागते याबातची माहिती रंजक तरीही विचार करायला लावणारी आहे.

दोन चित्रे

शिकागो ट्रिब्यूनच्या मुख्य इमारतीवरील पाटीपहिले चित्र अमेरिकेतील शिकागो इथे घेतलेले आहे. शिकागोला भेट दिलेल्यांना शिकागो ट्रिब्युनची इमारत ओळखीची असेलच. शिकागोहुन प्रसिद्ध होणारे शिकागो ट्रिब्युन ह्या वर्तमानपत्रच्या मुख्य इमारतीवरच्या भव्य पाटीमधून 'शिकागो' ही अक्षरे निवडून ते चित्रात वापरली आहेत.

दुसरे चित्र अहे कॅलिफोर्नियाततील वाइन निर्मितीसाठी जगप्रसिद्ध 'नापा व्हॅली' इथले आहे. तिथल्या भौगोलिक वैशिष्ठ्यांमुळे हा प्रांत वाइन उत्पादकांसाठी फार महत्वाचा समजला जातो.

लेखनविषय: दुवे:

छायाचित्र आस्वाद: सुर्यास्त

आमच्या घरापासुन थोड्या अंतरावर रस्त्याच्या बाजूला फिरताना ही पायवाट दिसली. क्षितीजापर्यंत वळणे घेत पोहचणारी पायवाट आणि योगायोगाने त्याच्या टोकाशी अस्ताला चाललेले सूर्यबिंव असा छान देखावा कॅमेर्‍यात टिपता आला.

लेखनविषय: दुवे:

सुमारीकरणाचा उत्कर्षबिंदू की उथळीकरणाची नीचतम पातळीँ?

आजकाल जिथेतिथे 'विद्वान', 'व्यासंग' आणि 'व्यासंगी' हे शब्द प्रतिसादांतून लिखाणांतून मुक्तपणे फेकण्यात -- राजेश खन्नाच्या शैलीत सुपरफॉस्फेट, युरिया फेकावी तसे -- येतात.

छायचित्र आस्वाद: प्रागमधील कमानी

प्राग शहरात बर्‍याच ठिकाणी अश्या कमानी दिसल्या. इथल्या स्थापत्याचे हे वैशिष्ठ्य आहे की बर्‍याच ठिकाणी अशी शैली असते हे माहित नाही. स्थापत्यशास्त्रातील जाणकारांनी त्यावर टिप्पणी केल्यास मलाही जाणुन घ्यायला आवडेल.

लेखनविषय: दुवे:

छायाचित्र आस्वाद: प्राग- चेक रिपब्लिक

बर्‍याच दिवासात छायाचित्र/प्रकाशचित्र समुहात नवे काही आले नाही म्हणून प्राग मधील ही दोन चित्रे देत आहे. प्राग हे युरोपातल्या चेक रिपब्लिक ह्या देशाच्या राजधानीचे असे नयनरम्य शहर आहे.

लेखनविषय: दुवे:

ग्रेस गेले, ग्रेस गेली...

माझी आणि ग्रेसची ओळख झाली महाश्वेता मालिकेच्या "भय इथले संपत नाही...". त्यावेळी मला या कवितेतल्या बर्‍याच ओळी समजायच्या नाही. त्यानंतर जेंव्हा मला पं.

भारतीय उपखंडातील अंत्यसंस्कार

महास्तूपवंशातली एक कथा http://mr.upakram.org/node/3697 येथे आधी दिली आहे. प्रियाली यांनी सुचवल्याप्रमाणे यातील अंत्यसंस्कारांचा मुद्दा येथे हलवत आहे. यात जी चर्चा झाली त्यातील काही दुवे संपादकांना येथे हलवता आले तर बरे होईल.

अभिनेत्रीचं आत्मचरित्र

जर... एक अभिनेत्री आत्मचरित्र लिहिते आहे, तर तुम्हांला तिच्या आत्मचरित्रात काय ( आणि काय-काय) वाचायला आवडेल?

 
^ वर