उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र आस्वाद: प्राग- चेक रिपब्लिक
वैद्य
July 2, 2012 - 6:31 pm
बर्याच दिवासात छायाचित्र/प्रकाशचित्र समुहात नवे काही आले नाही म्हणून प्राग मधील ही दोन चित्रे देत आहे. प्राग हे युरोपातल्या चेक रिपब्लिक ह्या देशाच्या राजधानीचे असे नयनरम्य शहर आहे. परीकथेतील भासावेत असे रस्ते, पूल, इमारती डोळ्यांचे पारणे फिटणारे आहेत.
दोन्ही चित्रे कॅनन रेबेल टी१आय ने १८-५५ची किट लेन्स वापरुन काढलेले आहेत.
दुवे:
Comments
झकास
अप्रतिम, छान, अहाहा, अतीव सुंदर. असो.(खूप झाली विशेषणे आणि मी काही विशेषणसम्राट नाही)
तर उत्तम प्रकाशचित्रे. विशेषतः खालच्या चित्रातली गॅलरी, तिचा कठडा आणि बाजूला असलेले फ्लॉवरपॉट, भिंतीचा रंग. झकास!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
वा
वा. दुसर्या फोटोमधील रंगसंगती आणि मांडणी झकास.
(पहिल्या फोटोमध्ये हवा तितका रमलो नाही.)
सहमत
दुसरा फोटो छान वाटतोय, युरोपात छोट्या गॅलर्यात फुलांची/शोभेची झाडे लावण्याची पद्धत आहे, त्यामुळे उन्हाळ्यात सगळीकडे सुंदर रंगसंगती दिसते, ते अचूक टिपले आहे. पहिला फोटो थोडा कंटाळवाणा आहे, घरांच्या मागच्या बाजूच्या कॅनालचे चित्र असल्याने(तसे वाटते) त्यातला जिवंतपणा कमी असल्याचे भासते, प्रत्यक्ष डोळ्याला ती जागा सुंदर दिसत असणार. असे अजून व प्रागचे वैशिष्ठ्य दाखवणारे फोटो डकवा अशी विनंती करतो.
सहमत आहे
दोन्ही फोटो चांगलेच आहेत. दुसरे चित्र जास्त भावले. कारणे वरीलप्रमाणेच.
धन्यवाद
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. आणखी दोन चित्रे टाकतो आहे.
+१
असेच म्हणतो.
दुसरा फोटो अधिक आवडला
------------------
ऋषिकेश
------------------
मस्तच
फारच छान आहेत. मी तर पहिल्या चित्रामध्ये कचाकुंडी कुठे दिसते का? शोधत होतो. डोळ्याला सवय नाही ना असे पहायची :)
दोन्ही फोटो आवडले
मला पहिल्या फोटोतील डावीकडील बाजू अधिक भावली. परंतु खालील पाण्याचा नाला थोडा विरस करणारा वाटला.
माणूसच उभा आहे
अरे त्या गॅलरीत तर माणूसच उभा आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आभारी आहे
प्रतिसाद देणार्या सर्वांचा आभारी आहे. मलाही दुसर्या चित्राचे कंपोजिशन जास्त आवडले. पहिल्या चित्रात चेक गणराज्यातली टिपिकल लाल छपरे आणि रंगीत इमारती तसेच ढगाळ हवेमुळे स्पष्ट आलेले बारकावे ह्यामुळे दिला आहे.
नाला तसा स्वच्छ असल्याने तितका खटकला नाही :)