भारतीय उपखंडातील अंत्यसंस्कार

महास्तूपवंशातली एक कथा http://mr.upakram.org/node/3697 येथे आधी दिली आहे. प्रियाली यांनी सुचवल्याप्रमाणे यातील अंत्यसंस्कारांचा मुद्दा येथे हलवत आहे. यात जी चर्चा झाली त्यातील काही दुवे संपादकांना येथे हलवता आले तर बरे होईल.

http://mr.upakram.org/node/3697#comment-63706
http://mr.upakram.org/node/3697#comment-63719
अशोक कोल्हटकर यांच्या प्रतिसादातील काही भाग http://mr.upakram.org/node/3697#comment-63598
---------
अस्थिंबरोबर पुरण्याच्या गोष्टींबद्दल जे काही लिहून ठेवले गेले आहे त्यापैकी काही पद्धती पाहून जुन्या चिनी संस्कृतींशी त्यांचा काही संबंध आला असावा का असे वाटते. इजिप्तमध्ये लाकडी मानवी बाहुल्या शवपेटिकेबरोबर पुरण्याची पद्धत होती. तशीच लाकडी बाहुल्या पुरण्याची पद्धत चीनमध्येही होती असे दिसते. (पूर्वी या देशांमध्ये एखादा राजा मरण पावला की त्याच्याबरोबर नोकरचाकर, घोडे, रथ पुरले जात, नंतर ती पद्धत सोडून बहुदा लाकडी वस्तू पुरल्या जाऊ लागल्या). http://history.cultural-china.com/en/56History9562.html हे सांगण्याचे कारण म्हणजे हे वर्णन श्रीलंकेच्या महावंसामध्येही सापडते. उदा. महावंसातील लेखनात स्तूपातील 'स्वर्गाचे' वर्णन करताना चार टोकांना चार राजे (बहुदा लोकपाल) आहेत असे म्हटले आहे. मला अलिकडेच यावरून एक अजून (Xinjiang) प्रांतातील हूणांच्या कबरीचा दुवा मिळाला जो येथे देत आहे. http://history.cultural-china.com/en/56History9802.html ह्या कबरींमध्ये काय मिळाले ह्याची अधिक माहिती मिळाली नाही. पण हुणांच्या कबरीचे वर्णन हे वरील वर्णनातील विटा बसवल्या या वर्णनाशी थोडेसे जुळते. हूण आणि बौद्ध यांचे काही संबंध आले होते का इ. प्रश्न तपासण्यासारखे असतील असे वाटते.
यावरून आठवण झाली ती मागे उपक्रमाचे एक सदस्य चंद्रशेखर यांनी चीनमध्ये सापडलेल्या लाकडी टॅबलेटांचा लेख उपक्रमावर प्रकाशित केला होता अथवा त्याचा दुवा दिला होता. याबद्दल उपक्रमींनी, विशेषतः बौद्ध लेखनाशी परिचित असलेल्या उपक्रमींनी भर घालावी असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

एक अजून दुवा - अंत्यसंस्काराबद्दल

मूळ प्रतिसादः http://www.misalpav.com/node/21078#comment-384064

ज्या पद्धतीचे वर्णन ४ दिशांना चार लोकपाल आदी आहे तसेच वर्णन चिनी उत्खननात दिसले. तसेच वन्य प्राण्यांना मारणार्‍या यंत्राचा उल्लेख वेगळा वाटला. शिवाय मी वर जे वायूविजनाची सोय केली असे लिहीले आहे ते मूळ भाषांतरकाराने 'fixed a fan with the force of the wind and closed it with a bolt' असे लिहीले आहे (जे बहुतेक मी चुकीच्या अर्थाने वायूविजनाबद्दल समजले).
खालील दुवा (अजून एका चिनी उत्खननात ब्लास्ट ब्लोअर म्हणून कबरींमध्ये मिळाल्याची बातमी आहे). ह्याचा उपयोग नक्की कसा करत होते याबद्दल माहिती नाही - ते बघावे लागेल असे वाटते.
http://www.china.org.cn/english/culture/97500.htm

परत याचा अर्थ ही चिनी पद्धत होती - तेथून आपल्याकडे आली वगैरे काही म्हणायचे नाही. फक्त ही एक संशोधनाची दिशा असू शकते. त्याबद्दल पुरावे न मिळाल्यास ते चूक म्हणून सोडून देता येईल.

अंत्यसंस्काराविषयी

अंत्यसंस्काराविषयी काही वेगळी चर्चा सुरू करता येईल का? या एकाच चर्चेत अनेक विषय भरले गेले आहेत. थोडे वेगळे करता येतील का?

हो चालेल

चालेल, पण कसे करायचे?

मला वाटते - भारतीय उपखंडातल्या अंत्यसंस्कारांवरून अशी चर्चा सुरु करता येईल.

चालेल की

तुम्हाला वाटते तसे काही मुद्दे (विस्कळीत असले तरी चालतील किंवा मूळ चर्चेपेक्षा वेगळे असले तरी चालतील) घेऊन ते वेगळे मांडा. भारतीय उपखंडातील अंत्यसंस्कार असेच शीर्षक चालेल की.

मला कार्यव्यग्रतेमुळे फार लिहिणे सध्या जमत नाहीये. त्यात या चर्चेत खूप मुद्दे झाले की कुठे पाहावे ते कळत नाही, तेव्हा वेगळी चर्चाच होऊ दे.

भारतीय उपखंडातील अंत्यसंस्कार

इतरत्र चाललेल्या चर्चेत हडप्पा आणि मोहेंजोदारो शहरांतील संस्कृती ही तथाकथित आर्यांचीच होती का या विषयी चर्चा सुरू होती. हडप्पाकालिन संस्कृतीचे किंवा तत्कालिन शहरराज्यांचे तीन काळ ठरवले जातात. त्यापैकी लोथलचा काळ हा तिसर्‍या टप्प्यातील आहे (म्हणजे हडप्पानंतर बर्‍याच काळाने). या काळी मृतशरीराचे दहन करण्याची पद्धत होती असे वाचले आहे. परंतु मूळ हडप्पा संस्कृतीत मृतशरीरांचे काय केले जात होते याची विशेष माहिती नाही.

हडप्पा आणि मोहेंजेदारोमधून मृत अस्थी वगैरे मिळाल्याबद्दल माहिती आहे का?

मेहरगढ

भारतीय उपखंडातील अंत्यसंस्कार हा चर्चा विषय फारच विशाल आहे. यावर डॉक्टरेट साठी एक प्रबंध लिहिता यावा. त्यामुळे काही महत्वाचे मुद्दे देता येतील. ते सुद्धा एका प्रतिसादात देणे शक्य होणार नाही.भारतीय द्वीपकल्पातील अंत्यसंस्कार या विषयात चीनमधील शिंजियांग प्रांतातील अंत्यसंस्कार सुद्धा तपासणे गरजेचे आहे असे मला वाटते. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तेथील अतिशय कोरड्या हवामानामुळे तेथील दफनभूमी अजून उत्तम स्थितीत टिकलेल्या आहेत. शिंजिआंग भागाचे वायव्य भारतातील गांधार वगैरे भागांशी जवळचे संबंध असल्याने दफन करण्याच्या पद्धतींत बराच सारखेपणा आहे असे जाणवते.
सुरूवात करायची तर बलुचिस्थान मधील मेहरगढ पासून केली पाहिजे कारण भारतातील आधुनिक मानवाचे प्रथम वसतिस्थान येथे होते. इ.स.पूर्व 7000 ते इ.स.पूर्व 3000 या प्रदीर्घ कालखंडात (सिंधू खोरे संस्कृती पूर्व काल) येथे मानवी वस्ती होती. फ्रेंच उत्खनन शास्त्रज्ञांनी या भागात अतिशय मौल्यवान असे संशोधन केलेले आहे. 1974-75 व 1977-78 मध्ये केलेल्या मोहिमांच्यात या उत्खनन शास्त्रज्ञांनी दफन भूमी उत्खनन करून त्या कालात दफन कसे करत असत याची बरीच माहिती मिळवलेली आहे. ही सर्व माहिती या दुव्यावर (परिच्छेद 3. 2 व 3.5 )वाचता येऊ शकेल.
थोडक्यात सांगायचे तर चिखलापासून तयार केलेल्या शवपेटीत मृत देह (विशेषेकरून लहान मुलांचे) ठेवले जात असत. मृत व्यक्तीबरोबर त्याचे टेराकोटा, तांबे व ब्रॉन्झ व मौल्यवान पाषाण या पासून बनवलेले दागिने आणि इतर वैयक्तिक प्रिय गोष्टी ठेवत असत. काही ठिकाणी जनावरांचे बळी(अर्थातच घोडा नाही. व धान्यही सापडले आहे. मृत देह पूर्व पश्चिम असा व डोके पश्चिमेकडे ठेवलेले असे. बर्‍याच ठिकाणी मातीची भांडी आढळतात. मूळ दुवा खूपच माहितीपूर्ण व रोचक आहे. त्या शिवाय हा दुवाही बघावा.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

+१

भारतीय उपखंडातील अंत्यसंस्कार हा चर्चा विषय फारच विशाल आहे. यावर डॉक्टरेट साठी एक प्रबंध लिहिता यावा. त्यामुळे काही महत्वाचे मुद्दे देता येतील
+१
सध्या शासन दप्तरी "हिंदू" नोंद लावणारे सर्वच समान पद्धतीने विवाह संस्कार अंत्य संस्कार असे विधी करत असतील ही माझी समजूत पार चुकीची ठरली त्या समाजबद्दल ऐकल्यावर.
धुळे-ज्ळगाव ह्यापरिसरातील पारधी,भिल्ल ह्यांच्या व विदर्भातील गोंड वगैरे जनजातींच्या पद्धती व मध्यप्रदेशातील वनवासी ह्यांच्या फार म्हणजे फारच वेगळ्या आहेत. भारतात सहाएक हजार जाती/समाज आहेत म्हणतात, त्यातल्या कित्येकांची पद्धती मुख्य प्रवाह म्हणवल्या जाणार्‍या त्रिवर्णापेक्षा भलतीच वेगळी.
अजून एक् उदाहरण म्हणजे लिंगायत का कुठल्यातरी समाजात मिठाच्या पोत्यांसह शवाचे दफन करण्याची पद्धती आहे. पारंपरिकरित्या आपल्याकडे दहन करतात,जाळतात, त्यापेक्षा हे भलतेच भिन्न आहे.

--मनोबा

हिंदू

>>सध्या शासन दप्तरी "हिंदू" नोंद लावणारे सर्वच समान पद्धतीने विवाह संस्कार अंत्य संस्कार असे विधी करत असतील ही माझी समजूत पार चुकीची ठरली त्या समाजबद्दल ऐकल्यावर.
धुळे-ज्ळगाव ह्यापरिसरातील पारधी,भिल्ल ह्यांच्या व विदर्भातील गोंड वगैरे जनजातींच्या पद्धती व मध्यप्रदेशातील वनवासी ह्यांच्या फार म्हणजे फारच वेगळ्या आहेत. भारतात सहाएक हजार जाती/समाज आहेत म्हणतात, त्यातल्या कित्येकांची पद्धती मुख्य प्रवाह म्हणवल्या जाणार्‍या त्रिवर्णापेक्षा भलतीच वेगळी.

शासनदरबारी भिल्ल गोंड यांची नोंद हिंदू म्हणून असते ? आश्चर्य आहे. कारण खरे तर आदिवासी जमाती या हिंदू धर्माचा भाग नाहीत. त्यांच्या पद्धती वेगळ्या असणे साहजिक आहे.

नितिन थत्ते

दहन विरुद्ध दफन आणि इतिहास

मीना प्रभुच्या कुठल्याशा पुस्तकात 'दहन' करण्याची पद्धत अवलंबवून भारतीय उपखंडात इतिहासाची मोठी हानी झाली आहे अश्या धर्तीचे वाक्य वाचल्याचे स्मरते. अन्य धर्मियांत शव दफन केल्यामुळे - त्याच बरोबर अनेक तत्कालीन वस्तु शिलालेल्ख वगैरे दफन केल्याने बराच इतिहास समजणे सोपे झाले आहे असे काहिसे ते मत होते.

याबद्दल उपक्रमींचे मत जाणून घ्यायला आवडेल

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

हडाप्पाकालीन अंत्यसंस्कार

सिंधू खोरे संस्कृती ही मेहरगढ संस्कृतीनंतर विकसित झाल्याने साहजिकच त्या संस्कृतीमधील रितीरिवाज या संस्कृतीत पाळले जाणे साहजिकच होते. ही संस्कृती केवढ्या विशाल भू प्रदेशावर पसरलेली होती त्याची कल्पना चित्र क्रमांक 1 वरून यावी.

indus civilization

सिंधू खोर्‍यातील संस्कृतीमधील अंत्यसंस्काराचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शित केलेले आहे. चित्र क्रमांक 2

Rakhigarhi burial

हरयानाच्या हिस्सार जिल्ह्यातील राखीगढी येथील दफन भूमीतून बाहेर काढलेल्या मृत देहाचा हा सांगाडा आहे. मृत स्त्री 165 सेँमी उंचीची मध्यम वयाची महिला आहे व हातातील बांगड्यांवरून विवाहित असावी.शव उत्तर दक्षिण ठेवलेले असून मृत स्त्रीची दृष्टी पश्चिमेकडे वळवलेली आहे. डोक़्याशी त्या कालीन अंत्यविधीच्या वेळी उपयोगात आणणारी भांडी त्या स्त्रीला परलोक निवासात उपयोगी पडावी म्हणून ठेवलेली आहेत.
राखीगढी हे स्थान सिंधू संस्कृतीकालीन स्थानांपैकी महत्वाचे आहे कारण या मध्ये सापडलेल्या वस्तूंचा काल इ.स.पूर्व 3000 च्या आसपास आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सिंधू संस्कृतीचे टप्पे

सिंधू संस्कृतीचा भूभाग विशाल असला तरी सर्वच शहरे एका काळात बांधलेली नाहीत. या विषयी अधिक माहिती वेळ झाला की देईन. थोडक्यात सांगायचे तर सिंधू संस्कृतीतील शहरांचे तीन विभाग केलेले आहेत. त्यापैकी लोथल, ढोलकविरा वगैरे शहरे ही तिसर्‍या टप्प्यातील आहेत. या लोकांचा वैदिक संस्कृतीशी संबंध आलेला असावा. या संस्कृतीला कदाचित घोडा ठाऊक असणेही शक्य आहे. (घोड्याचा सर्रास वापर होत असेल असे सांगता येत नाही) परंतु या शहरांत मृतांचे दहन केले जात असे.

म्हणजेच, मेहेरगढ किंवा हडप्पा वगैरे संस्कृतींत सुरू झालेल्या पद्धती पुढे बदलत गेल्या असे म्हणता येईल.

दहन का दफन

१९३८ सालामध्ये भारताचे तत्कालीन आर्किऑलॉजी विभागाचे डायरेक्टर जनरल राव बहादूर के. एन. दिक्षित यांनी मद्रास विद्यापीठात सिंधू खोरे संस्कृती या विषयावर काही भाषणे दिली होती. ही भाषणे पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत. दिक्षित यांच्या म्हणण्याप्रमाणे मोहेंजो-डारो येथे मृत देहांचे दहन करण्यात येत असण्याची शक्यता होती. मात्र हडप्पा येथे दफन केले जात होते. त्यामुळे आधी असलेली दफन पद्धत पुढे दहन पद्धत झाली असे बहुदा नसावे. दोन्ही पद्धती रूढ असाव्या असे मला वाटते. हे पुस्तक बघायचे असल्यास या दुव्यावर जाऊन लेक्चर्स ऑन प्री हिस्टॉरिक सिव्हिलायझेश न्स ऑफ इंडस व्हॅली या पुस्तकावर क्लिक करावे. (पृष्ठ क्रमांक 38, लेक्चर क्रमांक 4)
सिंधू खोरे संस्कृतीमधील दोन महत्वाची उत्खनने काली बंगाफर्मान खास येथे केली गेली आहेत. याठिकाणी काली बंगा येथे सापडलेल्या अवशेषात यज्ञवेदी सापडलेली आहे व येथील अवशेष इ.स.पूर्व 1900 च्या कालातील असावेत असा अंदाज आहे. याठिकाणी मोठी दफ्न भूमी सापडलेली आहे. फर्मान खास येथील उत्खननातील अवशेष हे उत्तर हडाप्पा काल इ.स.पूर्व 2500-2000 मधील आहेत. येथे मोठी दफन भूमी सापडलेली आहे.
काली बंगा येथील वस्ती ही सिंधू संस्कृती व वैदिक संस्कृती यांच्या संक्रमणकालातील मानली तर त्या कालातही दफन पद्धती सुरूच होती असे म्हणावे लागते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

संक्रमण काळ

काली बंगा येथील वस्ती ही सिंधू संस्कृती व वैदिक संस्कृती यांच्या संक्रमणकालातील मानली तर त्या कालातही दफन पद्धती सुरूच होती असे म्हणावे लागते.

कुठलीही पद्धती बदलून दुसरी पद्धत रूढ होताना जर संक्रमण झालेले नसेल तर ती पद्धती लादल्याने मारून मुटकून नव्या पद्धतीचा अवलंब केला जातो. जर सिंधू संस्कृतीत वैदिक पद्धत लादली गेली नसेल तर दफन आणि दहन या दोन्ही पद्धती एकाच वेळी रूढ असणे सहजशक्य आहे. कालीबंगा, ढोलविरा, लोथल वगैरे शहरे सिंधू संस्कृतीत नंतरच्या काळातील मानता येतील. त्या काळात वैदिक संस्कार या संस्कृतींनी अवलंबले होते परंतु पूर्वीचे संस्कार सोडले नव्हते असे म्हणता येईल.

पुन्हा नमूद करावेसे वाटते की भटक्या जमाती आपले मृतदेह कबरी बांधून ठेवत नाहीत. दफन केले तरी तेथे चबुतरे आणि चौथरे बांधणे ही त्यांची पद्धती नव्हे. या गृहितकानुसार तथाकथित आर्यांची दहन पद्धती त्यांच्या भटक्या स्वरूपाशी मेळ खाणारी आहे.

या विपरीत, भटक्या जमाती काही विशिष्ट कारणांसाठी चौथरे बांधत असे र. चिं. ढेर्‍यांचे म्हणणे दिसते. त्याविषयी लिहिणे रोचक ठरेल पण ते इतरत्र कधीतरी.

चार दिशांचे चार महाराजे

मूळ चर्चेशी किंचित अवांतर प्रतिसाद देते.

ज्या पद्धतीचे वर्णन ४ दिशांना चार लोकपाल आदी आहे तसेच वर्णन चिनी उत्खननात दिसले.
हे वर्णन श्रीलंकेच्या महावंसामध्येही सापडते. उदा. महावंसातील लेखनात स्तूपातील 'स्वर्गाचे' वर्णन करताना चार टोकांना चार राजे (बहुदा लोकपाल) आहेत असे म्हटले आहे.

कोसंबींच्या एका लेखात चार महाराजांचा उल्लेख हा असा सापडला - पूर्व दिशेचा पालक महाराजा धृतराष्ट्र; तो गंधर्वाचा अधिपति. त्याला पु्ष्कळ पुत्र आहेत. ते देखील बुद्धाला पाहून दुरून नमस्कार करतात. दक्षिण दिशेचा पालक महाराजा विरुढ; तो कुंभण्डांचा अधिपति. त्याला पुष्कळ पुत्र आहेत; ते पण बुद्धाला पाहून दुरून नमस्कार करतात. पश्चिम दिशेचा पालक महाराजा विरूपाक्ष; तो नागांचा अधिपति. त्यालाहि पुष्कळ पुत्र आहेत; आणि तेहि बुद्धाला पाहून दुरून नमस्कार करतात. उत्तर दिशेचा पालक महाराजा कुबेर (कुवेर); तो यक्षांचा अधिपति. त्यालाहि पुष्कळ पुत्र आहेत.

असो.

वर चित्रा यांनी

मला अलिकडेच यावरून एक अजून (Xinjiang) प्रांतातील हूणांच्या कबरीचा दुवा मिळाला जो येथे देत आहे. http://history.cultural-china.com/en/56History9802.html ह्या कबरींमध्ये काय मिळाले ह्याची अधिक माहिती मिळाली नाही. पण हुणांच्या कबरीचे वर्णन हे वरील वर्णनातील विटा बसवल्या या वर्णनाशी थोडेसे जुळते.

येथेदुवा पाहता तो हान राजघराण्याविषयी असावा असे वाटते. शिनजांग (Xinjiang) प्रदेशावर हान राजघराण्याची सत्ता होती पण ते हे हुण नव्हेत. हुण ही भटकी आणि रानटी जमात होती. भटक्या जमाती सहसा आपल्या मृतांच्या कबरी बांधत नाहीत. उलट, मृतशरीरांची विल्हेवाट लावली जाते, त्याचे कारण असे की शत्रूला त्याच्या मृतदेहाची विटंबना करणे शक्य होऊ नये म्हणून. (भटक्या जमातीत मित्र कमी आणि शत्रू अधिक असतात)

चंगीझ खान हा हुण नव्हे पण भटक्या जमातीतील रानटी टोळीतील व्यक्ती. त्याने लढाया करून मंगोलियात संपत्ती आणून राज्य वसवले, इमारती बांधल्या (म्हणजे भटकेपणाला तिलांजली दिली) तरीही चंगीझ मेल्यावर त्याचा मृतदेह गुप्तपणे उलन बटोरजवळील टेकड्यांमध्ये कुठेतरी पुरण्यात आला. त्यासोबत कोणतीही निशाणी, कबर वगैरेचा ठाव ठिकाणा नव्हता.

शिंजियांग मधील दफन भूमी

ऑरेल स्टाइन यांनी रेशीम मार्गावरील अस्ताना या ठिकाणच्या दफन भूमीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले होते. त्यांच्या या उत्कह्ननाबद्दलची माहिती त्यांच्या इनरमोस्ट एशिया भाग 2 पृष्ठसंख्या 642-718 वर दिलेले आहे. ज्यांना रुची असेल त्यांनी जरूर वाचावे.

हे पुस्तक वाचण्यासाठी या दुव्यावर जाऊन 'इनरमोस्ट एशिया' व्हॉल्यूम 2 वर क्लिक केल्यास हे पुस्तक वाचता येईल.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

दिशांचे महाराजे

बहुतेक सर्व बौद्ध मठांच्या बाहेर या चार दिशांच्या महाराजांची चित्रे भडक रंगात रंगवलेली आढळतात. लढाख मधील लामायुरू मठाबाहेर रंगवलेल्या या महाराजांचे मी काढलेले फोटो या दुव्यावर बघता येतील. ज्यांना रुची असेल त्यांनी जरूर बघावे

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चित्रे भडक रंगात रंगवलेली

अवांतर होइल, पन ह्याबद्दल ऐकले आहे ते असे:-
भारतीय उपखंडात चित्रे भडक रंगात रंगवलेली कारन उष्णताही अधिक असे तसेच पावसाळ्यात पाणीही.
ह्यासर्वात टिकून रहावेत असे रंग वापरण्यासाठी अधिकाधिक ठासून, गडद करून ते पवापरले जात. अधिकचे थर चित्रांवर लावले जात.
एकूणच चित्रशैली मग त्याच अंगाने विकसित झाली. इथून मग बौद्ध धर्मासोबत इतर पौर्वात्त्य देशांतही पसरली.

--मनोबा

वैदिक संस्कृती आणि अंत्यसंस्कार..

वैदिक प्रथांमध्ये जे १६ संस्कार महत्त्वाचे मानले आहेत त्यातील अखेरचा संस्कार म्हणजे 'अग्निसंस्कार'. मृत शरीरावर (पार्थिव) अग्निसंस्कारच का करायचा (दहन) याची निश्चित एक श्रद्धा होती. वेदांतही पुनर्जन्म मानला जाई. शरीर सोडून आत्मा स्वर्गात देवांकडे जातो व तेथून पुन्हा नवा देह प्राप्त करुन जन्म घेतो, हीच श्रद्धा पुढे गीतेतही अधोरेखित केली आहे (वासांसि जीर्णानि यथा विहाय) पार्थिव पंचमहाभूतांत विलीन होते. दफनाने केवळ चारच महाभूतांनाच पार्थिव मिळते, पण अग्निसंस्कारामुळे पाचवे तत्त्व असलेला अग्नि या पार्थिवाला शुद्ध करतो, ही भावना होती. त्यामुळे मृत शरीर चितेवर ठेऊन जाळण्याची पद्धत होती.

आश्चर्याची बाब म्हणजे सती जाण्याचा उल्लेख वेदांत आहे, पण तो दंडक म्हणून नसून उलट स्त्रीला सती जाण्यापासून परावृत्त केले आहे. स्वखुशीने पतीसमवेत सहगमन करणार्‍या स्त्रीला उद्देशून ज्या ऋचा आहेत त्यात विनवले आहे, की तिने चितेवरुन उतरुन खाली यावे, आपला निर्णय बदलावा आणि पुन्हा जोडीदार शोधून जीवन घालवावे. मृताच्या आवडत्या वस्तूंचे दहन करण्याची प्रथा दिसून येत नाही.

वैदिक काळात दहन आणि दफन अशा दोन्ही पद्धती रुढ होत्या याचा पुरावा आपल्याला ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात मिळतो. पंधरावी ऋचा पूर्वजांना समर्पित केली असून दहन झालेले (अग्निदग्ध) आणि न झालेले (अनग्निदग्ध) अशा दोन्ही पूर्वजांना आवाहन केले आहे. आजही ते पाळले जाते. पार्थिव जर शिशुचे असेल तर त्यावर अग्निसंस्कार न करता दफन करतात. गुरुजी श्राद्ध करताना घराण्यात मुंजा (ब्रह्मचारी), कुमारिका, विधवा यांचा तपशील विचारुन घेतात व त्यांच्यावर अग्निसंस्कार झाले होते का, हेही विचारतात.

(अवांतर - बौद्ध धर्मातील अंत्यसंस्काराच्या इतिहासाची माहिती नाही, परंतु बुद्धावर मात्र अग्निसंस्कार झाले होते. त्याच्या अस्थी आणि रक्षा आठ गणराज्यांना कलशातून दिल्या गेल्याचे वाचले आहे.)

वैदिक काळातील अंत्यसंस्कार

श्री. योग प्रभू यांनी उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद. मी वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दफन व दहन या दोन्ही अंत्यसंस्कार पद्धती बहुदा वैदिक संस्कृतीच्या आधीपासूनच भारतात चालत आलेल्या असाव्यात. बुद्धांवर अग्निसंस्कार केले होते हे माहितीच आहे. मला प्रश्न एवढाच आहे की दफन करायचे का दहन याचा निर्णय कसा घेतला जात असे. वेदात या संबंधी काही मार्गदर्शक सूक्ते आहेत का? का निरनिराळ्या जाती जमाती आपापल्या परंपरांचे पालन करत होत्या?

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अंदाजपंचे

अंदाजपंचे बाण मारायची मुभा असल्यास माझा तर्कः- प्रत्येक नगरराज्यानुसार कुटह्ली पद्धती प्राबल्याने प्रचलित आहे ते बदलत असावे. म्हणजे वायव्येकडील यौधेय गणराज्याची पद्धती वेगळी(तिथे इतर ठिकाणहून आलेले जनप्रवाह आपापल्या पधती चालूच ठेवणार सुरुवातीच्या काळात, पण स्थानिकांचे संख्याबाहुल्य असेल.) पूर्वेकडच्या नेपालजवळील शाक्यांची पद्धती वेगळी.

अवांतर शंका:- मृत्युबद्दल् एवढी चर्चा सुरुच आहे तर शंका विचारून घेतोअ. त्या काळात इन्शुरन्स ही संकल्पना होती का? म्हणजे वेगळ्या रुपात का असेना पण होती का? कर्ता मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुम्बास आधार मिळायची व्यवस्था काय होती? कर्ता जर नैसर्गिक मेला असेल, अपघातात गेला असेल किंवा राज्यासाठी लढताना धारातीर्थी पडला असेल तर काय न्याय लावला जाई? मृतकाचे कर्ज पुढील पिढीवर येत असे काय?
पुरोहितांशिवाय अजून कोणाकोणाचे आर्थिअक् हितसंबंध कीम्वा चरितार्थ लोकांच्या मृत्यूशी गुंतले होते?

--मनोबा

शूद्रांचे नक्की असावे

पुरोहितांशिवाय अजून कोणाकोणाचे आर्थिअक् हितसंबंध कीम्वा चरितार्थ लोकांच्या मृत्यूशी गुंतले होते?

शूद्रांचे नक्की असावे.

बापाचे कर्ज इतकेच नव्हे तर बापाचे पाप पुत्रांनी फेडावे ही हिंदू संकल्पना नव्हे काय? ते करताना तो नैसर्गिक मृत्यू मेला की राज्यासाठी असा विचार नेहमीच केला जात असावा असे वाटत नाही. तसा विचार केला तर त्या पुरोहितांची पोटे चालणे कठीण वाटते. यासाठीच कर्मविपाक वगैरेंचे पाक घोटले गेले असावे. चू. भू. द्या. घ्या.

पुरोहित

>ते करताना तो नैसर्गिक मृत्यू मेला की राज्यासाठी असा विचार नेहमीच केला जात असावा असे वाटत नाही. तसा विचार केला तर त्या >पुरोहितांची पोटे चालणे कठीण वाटते. यासाठीच कर्मविपाक वगैरेंचे पाक घोटले गेले असावे.
पुरोहित वर्ग स्वार्थी, कूपमंडूक, आणि हीन विचार बाळगणारा होता/आहे हे आपण मान्यच करून टाकूया. पण पुरोहितांकडे लक्ष देताना इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे (मुख्यत; राज्यकर्त्यांचे शासन कशा प्रकारचे होते, त्याचा जनतेला कसा फायदा-तोटा होत होता), याकडे दुर्लक्ष होते असे वाटते. मन यांचा प्रश्न अवांतर आहे, पण त्यांच्या प्रश्नाचे वरचे उत्तर पुरेसे नाही.

माझ्या मते नैसर्गिक मृत्यू किंवा राज्यासाठी हा विचार ज्यांच्या पदरी सैन्य असते, जे लोकांची पोटे भरायला पैसे देतात, त्यांनी करायचा असतो. त्याने त्याचे साम्राज्य बळकट होते का कमजोर होते हे ठरत असते. अशोकाच्या काळात त्याने युद्धानंतर जे काही लोकांना शांत करण्यासाठी केले ते या राजकारणाचाच भाग होते असे वाटते. त्याला नीतीची अजिबात जोड नव्हती असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही, पण अशोकाने वापरलेली पद्धत चुकीची होती असे माझे मत झाले आहे, पण त्याबद्दल अपेक्षेप्रमाणे चर्चा झालेली नाही.

हं!

पुरोहित वर्ग स्वार्थी, कूपमंडूक, आणि हीन विचार बाळगणारा होता/आहे हे आपण मान्यच करून टाकूया.

असा सरसकट विचार निदान मला तरी मान्य नाही त्यामुळे वरील वाक्य अनावश्यक वाटते परंतु स्वार्थ आणि हीन विचार ही कोणा एकाची मक्तेदारी नाही, स्वार्थ कोणालाही सुटलेला नाही आणि बळी तो कान पिळी हे ही खरे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे ज्याला शक्य आहे ते तो खातोच. असो. माझा प्रतिसाद फक्त मन यांच्या प्रतिसादातील एका वाक्याबाबत होता जे उद्धृत केले आहे. तरीही, त्यांचा पुढील प्रश्न की मृताचे कर्ज पुढे चालवले जाई का? याचे उत्तरही त्या प्रतिसादात आहे.

मन यांचा प्रश्न अवांतर आहे, पण त्यांच्या प्रश्नाचे वरचे उत्तर पुरेसे नाही.

उत्तर पुरेसे नाही हे मान्य पण म्हणूनच आपण चर्चा करतो आहोत असे समजते. मृतांना भरपाई देणे हे पूर्वी सक्तीचे नसावे. आपल्या मर्जीतील सरदार, व्यापारी वगैरेंचा मृत्यू झाल्यास त्यांना भरपाई किंवा त्यांच्या नातलगांना सेवेत रुजू केले जात असावे परंतु सर्वसामान्य सैनिक याला वंचित असू शकेल. माझ्या अत्यल्प वाचनानुसार स्पार्टामध्ये मृत सैनिकांना आणि त्यांच्या विधवा, मुलांचे पालनपोषण केले जाई. पण एकंदरीत त्यांची संस्कृती विधवांशी पुनर्विवाह करणे वगैरेशी बांधील दिसते. तेथे सैनिक आणि मुले उत्पन्न करणारी स्त्री हे दोघेही महत्त्वाचे मानले जात. तशी काहीशी पद्धत ग्रीकोरोमन समाजातही असावी. भारतीय संस्कृतीबद्दल तशी काही माहिती असेल तर वाचायला आवडेल.

असो. विषय या चर्चेसाठी अवांतर असावा.

पण अशोकाने वापरलेली पद्धत चुकीची होती असे माझे मत झाले आहे, पण त्याबद्दल अपेक्षेप्रमाणे चर्चा झालेली नाही.

मला वाटते तुम्ही सविस्तर लिहिलेत तर त्या अनुषंगाने चर्चा होईल. तूर्तास चर्चा पुढे कशी न्यावी याबाबत मी स्पष्ट नाही.

लग्ने इ.

> असा सरसकट विचार निदान मला तरी मान्य नाही
स्पष्ट करण्याबद्दल आभार पण ऐतिहासिक गोष्टींचा चारी अंगांनी विचार करायचा तर त्यापैकी पुरोहितांची स्वार्थी, हीन वृत्ती ही बहुतांश सर्व काळात, सर्व देशांत समान असल्याने तोच एक विचार सबळ होऊन प्रश्नाच्या इतर बाजूंकडे लक्ष जात नाही म्हणून ते मान्य करून पुढे जाऊ असे म्हटले.

> भारतीय संस्कृतीबद्दल तशी काही माहिती असेल तर वाचायला आवडेल.
ब्राह्मणांखेरीज इतर जातींमध्ये पाट लावणे, विधवाविवाह, लग्नाआधी किंवा लग्नाशिवाय एकत्र राहणे हे तेवढे गैर समजले जात नसावे. उत्तरेमध्ये विधवेशी दीरांची लग्ने होण्याची प्रथा तेवढी अपरिचित नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात विधवा राणीने राजपुत्राला जन्म दिल्यानंतरही दुसरे लग्न करू नये, केल्यास तिला तिची मालमत्ता मिळणार नाही असे आले आहे, याचा अर्थ राण्यांची दुसरी लग्ने होत असावीतच . ही लग्ने करण्यावर बंधन आणण्याचा प्रयत्न अर्थशास्त्रात झालेला दिसतो, याचे कारण शेवटी सत्ता एकाच कुटुंबाकडे रहावी असा हेतू आहे,पण तरीही मध्यम/ उच्चवर्गीय सोडले तर इतरांना लग्नांवर आणू पाहत असलेल्या या बंधनांची फारशी झळ लागली नसावी असे वाटते.

तसेच The Oxford Handbook of Hindu Economics and Business. By H. D. Vinod (२०१२) येथील पान ३३वर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळावे.

http://books.google.com/books?id=37q-ZS80hqAC&pg=PA33&dq=welfare+of+old+...

शिवाय खाली
http://mr.upakram.org/node/3710#comment-63864 येथील संदर्भावरून बापाचे कर्ज मुलांनी भागवावे ही पद्धत केवळ भारतीय नाही असे दिसून येईल.

असो. मन यांना अधिक काही प्रश्न असतील तर त्यांनी दुसरा धागा काढावा असे सुचवते.

अशोकाची चर्चा इतरत्र आहे तेथे वेळ मिळाल्यास अधिक स्पष्ट करेन.

आर्थिक हितसंबंध

>>पुरोहितांशिवाय अजून कोणाकोणाचे आर्थिअक् हितसंबंध कीम्वा चरितार्थ

हे फारच अवांतर होते आहे असे वाटते.
इन्शुरन्स ही कल्पना नवीन असावी. कुटुंबासाठी बचत करणे ही कल्पना जुनी असावी.
मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते.
http://en.wikipedia.org/wiki/Debt:_The_First_5000_Years येथे मेसोपोटेमिया येथील कर्ज, मुलांवर येणारे ॠण याबद्दल अधिक माहिती मिळेल. In this early form of borrowing and lending, farmers would often become so mired in debt that their children would be forced into debt peonage, though they were periodically released by kings who canceled all debts and granted them amnesty under what later came to be known, in ancient Israel, as the Law of Jubilee

मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते. मृतकाचे कर्ज पुढील पिढ्यांवर येणे हे जाती-धर्म- देशापलिकडील रीतींमध्ये मोडते.

दहन व दफन परिस्थितीनुसार..

वैदिक पद्धतीमध्ये दहनाचा अधिकार प्रत्येकाला होता, परंतु ज्याला लाकडे, तूप, तीळ हा खर्च परवडणे शक्य नसे, अशा लोकांना दफनाचाही मार्ग उपलब्ध होता. याबाबत मार्गदर्शक ॠचा नाहीत मात्र त्रिवर्णाच्या लोकांनी मंत्राग्नियुक्त दहन करावे, अशी प्रथा होती. जेथे मंत्रज्ञ ब्राह्मण उपलब्ध नसेल तेथे भडाग्नि देऊन नंतर अकरा दिवसांच्या प्रेतक्रियेत त्याचे परिमार्जन केले जाई.

एक थोडी माझी माहिती दुरुस्त करतो. वैदिक काळात मृताच्या शरीराबरोबर तीळ, तूप व सुवर्ण इतकेच जाळले जाई. सूत्रकाळात अनुस्तरणी म्हणून विधी निर्माण झाला. त्यात गाय किंवा बकरी मारुन तुकडे प्रेताच्या अवयवावर ठेवत. मृताला प्रवासात ती गाय उपयोगी पडावी, असा अर्थ, पण ही प्रथा पुढे लोप पावली. चितेत मृताच्या आवडीचे पदार्थ जाळले जात नसत, पण काही ठिकाणी पिंडासमवेत ते ठेवण्याची प्रथा आजही दिसते.

धन्यवाद,

चर्चा पुढे चालवल्याबद्दल.
बरीच माहिती हाती येते आहे, त्यातली काही सपशेल अवांतर असली तरी हरकत नाही. सध्या वेळ कमी आहे, पण वाचते आहे.
हान आणि हूण यांत गोंधळ झाला खरा. :-) पण म्हणायचे एवढेच आहे की या चालिरीती भारताच्या सध्या रूढ सीमेपलिकडल्या प्रदेशातही रूढ असाव्यात किंवा तेथून आल्या असू शकतील. चीनचे आणि बौद्ध काळातले भारताचे संबंध लक्षात घेता याबद्दल अधिक विचार व्हावा.

 
^ वर