छायचित्र आस्वाद: प्रागमधील कमानी

प्राग शहरात बर्‍याच ठिकाणी अश्या कमानी दिसल्या. इथल्या स्थापत्याचे हे वैशिष्ठ्य आहे की बर्‍याच ठिकाणी अशी शैली असते हे माहित नाही. स्थापत्यशास्त्रातील जाणकारांनी त्यावर टिप्पणी केल्यास मलाही जाणुन घ्यायला आवडेल.

फोटोसाठी विषय पुरवायला मला ह्या कमानी उत्कृष्ट वाटल्या.

दोन्ही चित्रे कॅनन रेबेल टी१आय ने १८-५५ची किट लेन्स वापरुन काढलेले आहेत.

Untitled

Untitled

लेखनविषय: दुवे:

Comments

गंमत आहे

यातल्या पहिल्या फोटोत वेगवेगळ्या आकारांच्या कमानी आहेत का? नेमकं कळत नाही. मागे चित्रा यांनी कमानींवर लेख लिहिला होता - स्थापत्यकलेतील कमानींचा वापर त्याची आठवण झाली.

विविध आकारांतील युरोपीय कमानी येथे आहेत.

छान लेख

अरे हो! हा लेख विसरुनच गेलो होतो. लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

आवडले

दोन्ही फोटो आवडले, पहिल्या फोटोत सगळ्याच कमानी सुंदर आहेत, फक्त फोटोची वेळ बदलल्यास अजून मस्त फोटो येईल, तसेच दुसर्‍या फोटोत प्रकाश-रंगाचे गणित मस्त जमले आहे, थोडा कॉन्ट्रास्ट अधिक असता तर मजा आली असते असे वाटते, पण दुसरे चित्र आणि चित्रातील जागा मस्त आहे.

प्रियालींनी दिलेल्या दुव्यातच खालिल वाक्य आहे - The Romans were the first builders in Europe, perhaps the first in the world, fully to appreciate the advantages of the arch, the vault and the dome.

एकाच लेखात सगळी चित्रे टाकत गेल्यास एकाच ठिकाणी सगळे बघावयास मिळेल.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

दोन्ही चित्रे आवडली

पहिल्या चित्राला काळ्या कोटातल्या बाईमुळे परसनॅलिटी आली आहे. दुसऱ्या चित्रातली रंगसंगती आवडली. नेहमीप्रमाणे चित्रे आवडली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अँगल

पहिला फोटो मुद्दाम या कोनातून काढला आहे का? कमानीची उंची विशेष नसल्याने तेवढीशी रंगत येत नाही.

पहिला फोटो साधारण असा दिसतो आहे -

वॉल्ट २
दुसर्‍या छायाचित्रात जी बिल्डिंग आहे ती जुनी आहे का नवी?

बरोबर!

दुसर्‍या दुव्यामधे अचुक माहिती मिळाली. हीच शैली बर्‍याच ठिकाणी दिसली.
दुसर्‍या दुव्यातील बिल्डिंग जुनीच असावी असा अंदाज आहे.

 
^ वर