छायाचित्र आस्वाद: सुर्यास्त

आमच्या घरापासुन थोड्या अंतरावर रस्त्याच्या बाजूला फिरताना ही पायवाट दिसली. क्षितीजापर्यंत वळणे घेत पोहचणारी पायवाट आणि योगायोगाने त्याच्या टोकाशी अस्ताला चाललेले सूर्यबिंव असा छान देखावा कॅमेर्‍यात टिपता आला.

विजेचे खांब आणि तारा थोड्या रसभंग करणार्‍या आहेत, कातरुनही पाहिल्या पण शेवटी असेच बरे वाटले.

IMG_1151

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

पण नेहमीसारखी मजा आली नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विजेच्या ताराखांबांचे काय करावे?

विजेच्या ताराखांबांचे काय करावे? चित्रांबाबत हा प्रश्न पुष्कळदा पडतो. बर्‍याच चित्रांच्या बाबतीत कुठलेच समाधानकारक उत्तर सापडत नाही.

आणखी दोन

Chicago 163

sunset

ही दोन्ही उत्तम!

ही दोन्ही उत्तम!

अतिशय वेगवेगळे भावनिक पडसाद आहेत. दोन्ही चित्रे एकापाशी एक असल्यामुळे विसंवादाचे काही भावनिक पडसाद आहेत का? याबाबत अनिश्चित.

लेखातील चित्र अधिक आवडले

लेखातील चित्र अधिक आवडले, तारा/खांब हा चित्राचाच एक भाग असू शकतो अशी कल्पना केल्यास ते तेवढे वेगळे वाटत नाही, असा विचार केल्यास पुढील वेळेस विचार करुन तारा न चुकवता दुसर्‍या पद्धतिने चित्र काढता येईल.

कुठले शहर हे ?

हे कुठले शहर / गाव आहे ?
---------------------
-धनंजय कुलकर्णी

ओळखा पाहू..

मूळ लेखक इथे नसल्याने ठाम उत्तर देता येत नाही. वरच्या एका फोटोमध्ये डाउन टाउन आहे. फोटो मिडवेस्टातील आहे. डाउन टाउनच्या फोटोवर माउस फिरवल्यास "शिकागो१६३" असे दिसते पण हे शिकागो नाही. तिथल्या इमारती उत्तुंग आहेत. या शहराच्या आसपास लेक ईरी आहे. (फोटोतील पाणी लेक ईरीचे नाही) सर्व फोटो त्या शहरातील असण्याची शक्यता आहे. बघा ओळखता येते का शहर?

आपली,
(डिटेक्टिव) प्रियाली.

अनावश्यक भाग.

मुळ लेखातील चित्रात 'फोर ग्राऊंड' जास्त आले आहे. चित्र खालुन क्रॉप केले तर अजून परिणामकारक आणि सूर्यबिंबाला महत्त्व देणारे होईल. तारांचा विशेष त्रास होत नाहिए.

 
^ वर