अनुभव

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
--------------------------
लेखात ८० पेक्षा जास्त फोटू असल्याने ते सगळे मी येथे टाकू शकलो नाही. ( सवडीने टाकेन )
छायाचित्रांसह येथे वाचता येईल.
-------------------

कुतूहल हि खरच अजब चीज आहे. त्याच कुतूहलापोटी कुठे जाऊन काय बघायला किंवा अनुभवयाला मिळेल याची शाश्वती नाही. कुठेतरी डोंगररांगात माणसाचा थांगपत्ता नसलेल्या ठिकाणी जाऊन काही अदभुत अश्या गोष्टी आपण पाहतो. तेव्हा त्या गोष्टी आपल्या डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवण्यापलीकडे आपल्या हाती काहीच उरत नाही.

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
( Tikona Point)

शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते.
गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला. शुक्रवार संध्याकाळ उजाडली तरी ट्रेक चे काही नक्की होईना. मग थोडी हापिसातल्या फोन चे बिल वाढवल्यानंतर प्लान ठरला. लगेच आई ला फोन करून गुळाच्या पोळ्या बनवायला सांगितले.

वसईच्या घंटेचा शोध

वसईचा किल्ला (Vasai Fort)

आजकाल जरा वेगळेच वेड लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही.

ओज-शंकराची कहाणी

श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.

महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव

दिनांक १०.०१.२०१३ रोजी मी पुण्याहून अहमदनगर, औरंगाबाद, वेरूळ मार्गे धुळे येथे येत होतो. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कन्नड घाट ओलांडून पुढे आल्यावर पोलिसांच्या तपासणी पथकाने माझे वाहन (मारूती ओम्नी एम एच १४ बीएक्स ६२८७) थांबविले. माझा वाहन चालविण्याचा परवाना मूळ स्वरुपात आणि वाहनाच्या दस्तऐवजांच्या प्रती छायांकित स्वरुपात तपासल्यावर तपासणी पोलिसाने मला वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात नसल्याबद्दल दंड भरावा लागेल असे सूचित केले. त्यावर मी खासगी वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात बाळगण्याची गरज नसून छायांकित प्रती चालतात हे त्यास सांगितले.

इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४

भाग ३ मध्ये खालील प्रतिसाद दिला होता. तोच इथे लेख म्हणून प्रसिद्ध करत आहे.

इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ३

रेल्वे, एनर्जी आणि पेन्शन

इंग्लंड वास्तव्यातले अनुभव-भाग २

काही काही अनुभव विलक्षण असतात. फार खोलवर परिणाम करून जातात. आज १२-१३ वर्षे झाली संगणक क्षेत्रात काम करून. इतकी वर्षे झाल्याने आणि बऱ्यापैकी टेक्निकाल आणि त्यातून प्रोडक्ट वाल्या कंपनी मध्ये काम केल्याने भलताच अहंगंड झाला होता. आपल्याला फार कळते आणि आपण फार हुशार आहोत असा की गोड गैरसमज. त्यातून हे गोरे सतत येत जाता कुठल्याही गोष्टीला ब्रीलीयंट, ग्रेट, एक्सलंट ह्याचा असा काही मारा करतात की आपल्याला म्हणजे मुठभर मासच चढते. पुन्हा प्रश्न पडतो की आपण तर असे काही लई भारी काम केले नाही मग इतके का कौतुक. हळूहळू लक्षात आले की ही त्यांची बोली भाषा आहे.

इंग्लंड वस्तव्यातले अनुभव

२००९ ते २०१२ असे तीन वर्ष इंग्लंड देशी वास्तव्य करण्याचा योग आला. एकंदरीत ३ शहरांमध्ये राहिलो. सर्व प्रथम आलो तेंव्हा साहेबाच्या देशात आपला कसा काय टिकाव लागायचा ह्याची चिंता होती. आपले विंग्रजी एकदम मराठोत्भाव त्यामुळे जरा धाक्धुकच होती. सुरवातीला जाम वैताग आला. ह्या गोऱ्या लोकांचे इंग्रजी पण आपल्या मराठी सारखेच कुस बदलते. म्हणजे वेल्श आणि स्कॉटिश लोकांचे इंग्रजी हे लंडन आणि सावुथ मधल्यांपेक्षा फारच वेगळे आहे. कंपनीच्या कामासाठी पहिल्यांदा जेंव्हा ग्लासगोचे विमान पकडले तेंव्हा आपण कुठल्या तरी वेगळ्याच प्रदेशात जात आहोत ह्याची जाणीव झाली. ते लोक काय बोलत होते तेच काही कळत नव्हते.

 
^ वर