इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४

भाग ३ मध्ये खालील प्रतिसाद दिला होता. तोच इथे लेख म्हणून प्रसिद्ध करत आहे.
मी इकडे आलो तेंव्हा मुलगा २.५ वर्षांचा होता. ग्रंथालयात खूप पुस्तके मिळतात. दर मुलामागे १०-१५ पुस्तके एकाचवेळी ३ आठवड्यांसाठी मिळतात. शिवाय ग्रंथालय फुकटच असते. सगळी पुस्तके लहान मुलांच्या लेव्हलची वाटली. खूप खूप चित्र आणि काही काही पुस्तके तर आपल्या पंचतंत्र, चायनीज आणि जापनीज व अरेबियन पुस्तकांची भाषांतरे. त्यात वरती त्या त्या भाषेतल्या ओळी म्हणजे हिंदी/पंजाबी आणि बंगाली वगैरे आणि खाली इंग्रजी भाषांतर. त्याच्या जोडीला योग्य चित्र. म्हणजे भाषा कळली नाही तरी चित्रांवरून त्या गोष्टीचे आकलन होते. शिवाय सगळ्या गोष्टींमधून अजिबात नैतिकतेच आणि चांगल्या वागणुकीचा डोस मिळत नाही. मुले जशी वागतात तश्याच गोष्ठी आणि हेच मुलाने खूप एन्जोय केले असे म्हणीन मी. दुसरा प्रकार म्हणजे इथे अनेक टोडलर ग्रूप्स असतात. बहुदा २-४ वर्षांच्या मुलांना टोडलर म्हणतात. खूप ठिकाणी ह्या वयोगटासाठी चर्च, कौन्सिल आणि काही सामाजिक संस्था किंवा प्रायव्हेट संस्था पण त्यांना सरकार मदत करते १ ते २ तासांचे शिबीर ठेवतात. हे रोज नसते पण रोज कुठे ना कुठेतरी मिळतेच. आपल्याकडे जशी फुटाफुटावर देवळे आहेत तशी इथे चर्चेस दिसली आणि जवळपास प्रय्तेक चर्चची शाळा तरी आहे किंवा त्यांच्या प्रार्थना हौल शेजारीच एक छोटीसी खोली किंवा कधी कधी बरीच मोठी खोली असते. तिथे हे वर्ग भारतात. मला तर हा एक प्रकारचा संस्कार वर्गाच वाटला. म्हणजे कोणी उपदेश देत नाही. पण सगळी इंग्रजी गाणी आणि त्यावर शारीरिक हालचाली. ह्या हालचालीच मुलांना आवडतात. खेळायला पण बरीच खेळणी असतात. माझ्या मुलाला स्कूटर खेळायला इथे मिळाली मग नंतर भरपूर माती आणि पाणी. सगळी चंगळच. कारण घरात हे असले करायला मिळत नाही. मग तो वाट बघत बसायचा. रेडिंगला बरेच असे टोडलर फुकटात होते पण लंडन मध्ये दर दिवसाला १-२ पौंड द्यावे लागायचे. अर्थात हे परवडले कारण घरात एकटेच बसून जाम त्रास देतात पोरे. किती आई वडिलांचे तेच तेच तोंड बघणार. मुलांना शेवटी मुलेच लागतात खेळायला.

इथे सगळ्या मुलांना ३ वर्षांनतर दर आठवडयाला १५ तास विनाखर्च शिक्षणाचा नियम आहे. म्हणजे हे शिक्षण तुम्ही कौन्सिलच्या शाळेत म्हणजे थोडक्यात महानगरपालिकीच्या शाळेत घ्या अथवा कुठेही घ्या. म्हणजे काही पालक दिवसभर मुलांना नर्सरीमध्ये ठेवतात. तर दर आठवडयाला ह्या नर्सरी सरकारकडे त्या १५ तासांचे पैसे फॉर्म्स भरून मिळवतात म्हणजे थोडक्यात ग्रांट मिळवतात. जर का नर्सरी करत नसेल तर तुम्ही भरलेल्या करातून तुम्हाला सुट मिळते. तुमच्या ऑफिसमध्ये तसे सांगायचे म्हणजे पगारातूनच कर कापला जाताना कमी कापला जातो. घरापासून सगळ्यात जवळच्याच शाळेत तुम्हाला अडमिशन मिळते. म्हणजे आह्मी खूप ठिकाणी फॉर्म्स भरले पण जवळ्याच शाळेत तुम्हाला अडमिशन मिळते.

सर्व शाळांचे ईन्स्पेक्षन होवून त्याच्या माहिती http://www.ofsted.gov.uk/ ह्या वेबसाईटवर मिळते. सर्व शाळांचे मुल्यांकन करून अ दर्जा, ब दर्जा असे दिलेले असते. अ दर्जावाली अर्थातच चांगली. ह्या शाळात अडमिशन मिळवण्यासाठी बरेच लोक स्वतःचे राहते घर सोडून शाळेच्या जवळ भाड्याच्या घरात राहायला जाताना पहिले आहे. ह्याशिवाय अनेक लोक, मुख्यत्वे भारतीय, खोटी माहिती देवून अडमिशन मिळवतात. अर्थात पकडले गेलेल्या पण अनेक केसेस पहिल्या आहेत आणि १-२ लोकांना पोलीस कोठडीपण मिळाल्याची बातमी वाचली आहे. जरा अवांतर झाले. असो.

पण मुख्य मुद्दा सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. साधारणपणे ४ वर्षांची मुले झाली की त्यांना रिसेप्शन मध्ये म्हणजे बहुतेक आपल्याकडे सिनियर के.जी. मध्ये अडमिशन मिळते. त्यासाठी कौन्सिलच्या वेबसाईटवरच ऑनलाइन अर्ज भरायचा. त्यात आपल्याला पाहिजेल त्या शाळांचा क्रम द्यायचा. बहुदा ६-७ शाळांचा अग्रक्रम देता येतो. अडमिशनचे नियम पण तिथेच बघायला मिळतात. मुख्य म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे घराजवळची शाळा, म्हणजे मुलांनी शाळेत चालत आले पाहिजेल आणि त्यांचा व्यायाम घडवा हा उद्धेश, मग कोणाचा भाऊ/बहिण असेल तर त्याला प्राधान्य. जर का चर्चची शाळा असेल तर त्यांच्या संमंधीत मुलांना आधी अडमिशन मिळते. आपल्या घरी पत्र येते कुठे मिळाली जागा मिळाली ह्याचे. ह्याशिवाय जर का एखाद्या शाळेत जागा खाली झाली तर शाळा आपल्याला पत्र लिहून कळवते की जागा खाली आहे तुम्हाला अडमिशन घ्यायची असेल तर भेटा. आह्मी मुलाची शाळा बदलली कारण आधी मिळालेली जरा लांब होती. म्हणजे चालत जायला २५ मिनिटे लागायची आणि मग दुसरे अपत्य झाल्यावर बायकोला झेपेना. मग जवळच्या शाळेतून बोलावणे आल्यावर तिकडे जावून शाळा बघून आलो. शाळेत गेल्यावर मुलाला तिथल्या शिक्षांनी छान सामावून घेतले. म्हणजे पहिल्याच भेटीत त्याने सांगितले की मला इथे यायचे. हे सगळे आमचे बोलणे मराठीतूनच चालले होते. कोणीही काहीही म्हटले नाही. उलट शाळेतून सांगितले की तुम्ही तुमच्या भाषेत बोला. आह्मी त्याचे इंग्रजी करून घेऊ. मला आधी हे लै भारी वाटले पण नंतर विचार करता असे वाटले की नाहीतरी इथे सगळीकडे इंग्रजीच बोलावे लागते मग त्यांनी असे सांगितल्याने फार काही हुरळून जाण्यात अर्थ नाही. कारण तिथे स्थाईक झालेल्या काही भारतीय कुटुंबांकडे जाणे येणे झाले तेंव्हा लक्षात आले की त्यांची मुले ही पूर्णपणे ब्रिटीश आहेत. पण तरीही लोकांनी आपली भाषा बोलावी हा त्यांचा दृष्टीकोण घेण्यासारखा आहे.

साधारणपणे ४ वर्षांपासून शाळा एकदम सकाळी ९ ते ३.३० पर्यंत होवून जाते. प्रत्येक वर्गात फार तर ३० मुलेच पाहायला मिळाली आणि प्रत्येक वर्गावर एक मुख्य शिक्षिका आणि तिच्या मदतीला ५ शिक्षक. पण हे दिवसभर असतात. म्हणजे आपल्याकडे एका वेळी एकाच शिक्षक तासावर असतो. पण ३-५ शिक्षक तासावर पहिले. मग दर ५ मुलांमागे एक शिक्षक असे गणित आहे. कधी कधी जेंव्हा शिक्षक कमी असतात तेंव्हा पालकांना मदतनीस म्हणून बोलावतात. माझ्या मुलाला सुरवातीला पूर्ण इंग्रजी मध्याचा फारच त्रास झाला. कारण हैदराबादला तसा तो घरातच होता. त्यामुळे एकदम शाळेत घातल्यावर तो फारच भांबावून गेला. मग कधीतरी म्हणाला की शाळेत त्याला बाकीचे त्रास देतात आणि टीचर लक्ष देत नाही. मग बायको मदतनीस म्हणून गेली काही दिवस. जसे त्याला थोडे थोडे बोलता आले किंवा टीचरला सांगता यायला लागले तसे जाणे बंद केले. पण मुख्य प्रश्न मुलांनाच की टीचरला न सागता येणे हा असतो. गोरी पोरे जरा जात्याच दांडगट वाटली. म्हणजे अंगापिंडाने मजबूतच आहे शिवाय काही मुले पार लहान वयातच आय माय ह्यांचा छान उद्धार करतात. मग शाळेतून पालकांना नोटीस जाते आणि कधी कधी फार झाले तर चक्क काढून टाकलेले पण पहिले.

खेळायला भरपूर वेग वेगळ्या गोष्ठी. रंग, पाणी आणि चिकणमाती ठेवलेलीच असते. ज्याला जे पाहिजेल तो ते खेळतो. दररोज १० मिनिटे फक्त सर्व मुलांना गोल करून गोष्ट सांगायला बसवतात. काही मुले बसताच नाहीत. आह्माला ६ महिन्यांनतर सांगितले की तुमचा मुलगा अजिबात बसत नाही त्याला जरा घरी बसायची सवय लावा. पण त्याला जवळपास १ वर्ष लागले पण तशी फारशी तक्रार आली नाही. कारण २-३ वर्षांची मुले किती बसणार हा दृष्टीकोण. ह्याशिवाय जर का एखाद्याला खेळत किंवा चित्रकलेत किंवा गायनात आवड असेल तर त्याला खरोखर पाठींबा देतात हे अनुभवास आले. म्हणजे माझ्या मुलाला चित्रकला आवडायची तर त्याची आवड आम्हाला जाणीवपूर्वक सांगितली. माझ्या एका मित्राचा मुलगा चांगला पियानो वाजवतो असे लक्षात आल्यावर त्याला त्यांनी तसे ट्रेनिग द्या असे आवर्जून सांगितले. हा प्रकार चांगला वाटला.

रिसेप्शनला पण भरपूर खेळायला मिळते. त्यामुळे दिवटा आनंदात होता. आमच्या समोर एक गुजराथी कुटुंब राहायचे. त्यांचा मुलगा जसा पहिलीत गेला तसा जाम वैतागला कारण आता खेळ बंद झाले आणि बराच अभ्यास वाढला. आपल्याकडे सर धोपट म्हणतात की इकडे काही शिकवत नाहीत वगैरे. उलट असे लक्षात आले की शाळेतच भरपूर अभ्यास करून घेतात. त्या गुज्जू मुलाला शालेतुउन कधीही अभ्यासाचे पुस्तक घरी आले नाही. मात्र त्याचे वाचन कमी होते म्हणून घरी वाचून घ्यायला वेग वेगळ्या लेव्हलची पुस्तके मिळायची. ह्या व्यतिरिक्त ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही त्यांच्यासाठी दर आठवड्याला १ तास वेगळा वर्ग असे. काही ठिकाणी तर चक्क हिंदी मधून पण सूचना दिलेल्याचे आईकीवत आहे. म्हणजे रेडिंगला एका शाळेत जवळपास ५०% भरतीय आणि पाकिस्तानी मुले होती तिकडे हा प्रकार चालायचा असे त्या शाळेत मुले असलेल्या पालकांनी सांगितले.
पण एकंदरीत आपल्यापेक्षा जरा कमीच त्रास देतात मुलांना. जास्त अपेक्षा नाहीत. म्हणजे आपल्याकडे ३ वर्षांच्या मुलाकडून लोक काय वाटेल ते घोकून घेतात. आह्मी इकडे फोन केला की आमचीच उजळणी व्हायची मुलाला आता ए तो झेड येते का. काही महाभागांनी त्यांच्या मुलाकडून पाढे पण पाठ करून घेतलेले पहिले. इथे मात्र पहिलीत आल्यानंतर पाढे आहेत. हे म्हणजे आपल्या लहानपणची आठवण झाली. पहिलीत गेल्या नंतरच तर पाढे आणि लिखाण होते. म्हणजे ह्यांनी उगचाच मुलांचे बालपण काही हिरावून घेतले नाहीये.
पण मुलांना शाळेत अजिबात रागावत नाहीत. फार तर एका खुर्चीवर बसवितात. त्याचा पण मुलांना फार राग येतो. सगळी पद्धत जरा अजबच आहे. म्हणजे ही लोक इतकी शिस्तप्रिय आहेत पण मुलांच्या बाबतीत एकदम लवचिक. ह्याचे परिणाम नंतर दिसतात. प्रचंड उद्दाम होतात. एकतर कायद्या प्रमाणे मुलांना मारता येत नाही त्यामुळे घरात आणि बाहेर कोणीच बोलत नसल्याने प्रचंड टवाळक्या आणि धुडगुस घालतात.

असो पण ह्या लोकांनी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था उत्तम ठेवली आहे. आपल्याकडच्या सारखी खाजगी शिक्षण पद्धती फारशी दिसली नाही. म्हणजे खासगी शाळा आहेतच पण तीअकडे म्हणजे प्रचंड श्रीमंत असेल तरच बाकी सर्सामान्य आणि अगदी श्रीमंतांची मुले पण महानगर्पलीकेच्याच शाळेत जातात. जवळपास प्रत्येक शाळेच्या जवळ अगदी ५-१० मिनिटे चालण्याच्या अंतरावर किमान २-३ तरी बघा मिळतील. हा प्रकार फार आवडला. आपल्याकडे हे झाले पाहिजेल. बागच नाहीत बुवा. एक ती ताथवडे बाग. ती पण इतकी खचाखच भरलेली आणि इथे इतक्या विस्तीर्ण बाग की काही विचारू नका.

आमच्या समोरच्या गुज्जू मुलाचे गणित चांगले होते तर त्याला पहिल्या सह महिन्यातच ते पुढील वर्षाच्या गणिताच्या तासाला पाठवायचे. असाच अनुभव माझ्या मराठी मित्राला आला. त्याचा मुलगा पूर्ण मराठी माध्यमातून इकडे पहिलीत आला. पहिल्या वर्षात शाळेने त्याच्या वर मेहेनत घेवून इंग्लिश शिकवले मग त्याने जशी लय पकडली तसे तसे त्याला ते वरच्या वर्गातल्या काही काही गोष्टी शिकवायचे. म्हणजे तो दुसरीत गेला तेंव्हा त्याचे इंग्रजी सोडून बाकीचे विषय ते ३ किंवा चौथीचे होते.
पण हे सगळे छान छान दहावी पर्यंतच आहे. नंतर शिक्षण प्रचंड महाग आहे. इतके दिवस जे ब्रिटीश नागरिक आहेत त्यांना कोलेजची फी ३००० पौंड होती आणि बाकीच्यांना ९०००-१२००० होती .म्हणजे ह्यांची सगळी सोय आपण बाहेरून आलेलो लोक करायची आणि सरकार पण कॉलेजेसना सढळ मदत करायचे पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. आता फी एकदम ९००० पौन्दापर्यंत वाढली आहे. त्याचा फटका अनेक लोकांना बसला आहे. त्यामुळे बरेचदा हे लोक १०-१२ होतात किंवा छोटी मोठी डिग्री घेतात. असो पण एकांदरीत सार्वजनिक शिक्षण व्यवस्था चांगली आहे असेच म्हणावे लागेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

मालिका छान सुरू आहे.

फक्त प्रकाशित करण्यापूर्वी जर पुन्हा एकवार नजरेखालून घातलेत तर, डोळ्यांना खुपणार्‍या ढोबळ चुका सुधारता येतील.

इंग्लंडात काय किंवा अमेरिकेत काय, शालेय शिक्षणाचा खर्च सरकार अगदी व्यवस्थित करते (ज्यांना खाजगी शाळा परवडत नाहीत त्यांच्याकरीता). पण महाविद्यालयीन शिक्षण मात्र खाजगी क्षेत्राकरिताच सोडलेले दिसते (अमेरिकेतील कम्युनिटी कॉलेजेस वगळता). त्यामुळे ह्या देशांत पदवीधर तसे कमीच आढळतात. मात्र व्यवसायपूरक डिप्लोमा/सर्टेफिकेट वगैरे मिळवून लगेच कमावते होतात.

अवांतर १ - इंग्लंडात जवळपास प्रत्येक भिकारी एक कुत्रा बाळ्गून असतो. स्वतःच्या खाण्याची मारामार असताना ही मंडळी कुत्रे का बाळगतात असा प्रश्न पडायचा. वरवर चौकशी करता असे समजले की, तिथे बेकार भत्याप्रमाणे कुत्राभत्तादेखिल मिळतो! खरे की काय?

अवांतर २ - आपल्याकडे जशी फुटाफुटावर देवळे आहेत तशी इथे चर्चेस दिसली

असेल बॉ. मला तर नाक्यानाक्यावर पब्स दिसले! मनी वसे ते ... ;)

धन्यवाद

मला घाटपांडे पण म्हणाले होएते शुद्धलेखन सुधारा. जरा प्रयत्न करतोय पण इतका वेळ लागतो आहे की नंतर कंटाळा येतो. पण पुढील वाटचालीसाठी जरा जास्त प्रयत्न करीन.

पण महाविद्यालयीन शिक्षण मात्र खाजगी क्षेत्राकरिताच सोडलेले दिसते>> आईकून माहिती आहे पण प्रत्यक्ष अनुभव कमी आहे. त्यामुळे फार लिहिले नाही. उगाचच कशाला थापा मारायच्या. पण तिथे जे काही वर्तमानपत्रात वाचायला मिळते त्यावरून असे वाटते की सर्सामान्य लोकांचे हालच हो. विशेषतः कल्लू लोकांचे. म्हणजे लेकाचे आपल्या इथे येवून तुम्ही दलितांना काय वागवले वगैरे शेखी मिरवितात पण ह्यांच्याकडे कल्लू लोकांना फार काही वेगळे वागवत नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे. लंडनला जी दंगल उसळली ती मी प्रत्यक्ष पहिली आहे. आधी सुरवात ह्या काळ्या लोकांच्या मुस्कटदाबीनेच झाली.

तिथे बेकार भत्याप्रमाणे कुत्राभत्तादेखिल मिळतो! खरे की काय?>> कल्पना नाही हो. सुदैवाने माझ्या आजूबाजूला कुत्रेवाले कमीच आले. म्हातारे लोक मुले जवळ नाहीत म्हणून कुत्री/मांजरी पाळतात. सोबत छान होते आणि त्या निमित्ताने त्यांना बाहेर जायला मिळते. मला हे तर्कट अजून पेललेले नाहीये की स्वतःच्या मुलांना घराबाहेर काढायचे आणि ह्या कुत्र्र्या मांजरांना मात्र तळहाताच्या फोडासारखे जपायचे. बहुदा प्राणीमात्र बोलत नाहीत आणि आपण सांगू तेच करतात त्यामुळे जुळवून घेणे सोपे जात असावे. माझ्या दुसऱ्या अस्सल ब्रिटीश क्लायंटकडे एकाहीकडे कुत्र नव्हत. गम्मत म्हणजे एक प्रोजेक्ट मानेजारीण बाई जी अमेरिकन होती ती मात्र माझे कुत्रे आणि माझे कुत्रे करायची आणि हे सगळे ब्रिटीश लोकं तिची जाम चेष्टा करायचे. पण विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जर का श्वानाने शी केली तर बरीच लोकं स्वतः ती उचलत असत. काही ठिकाणी तर चक्क कुत्र्याची विष्ठा टाकायची वेगळी पेटी पहिली. बहुदा काहीतरी नक्की करत असावेत म्हणजे आपल्याकडे गांडूळखत असते तसेच काहीतीतरी पण नक्की माहिती नाही.

मला तर नाक्यानाक्यावर पब्स दिसले>> :)) ते काय सांगणे झाले काय हो. मी टाऊन सेंटरच्या अगदी जवळ राहायचो तिथे खरोखर एकाच रांगेत किमत ५-६ पब्ज सहज दिसायचे. विशेषतः उन्हाळ्यात रात्री दारू पिऊन जाम दंगा घालायची मंडळी. ह्यांचे एक एक किस्से लिहिले तर १-२ भाग बनतील पण ते बरेच अश्लील ह्या सदरातच मोडतील. काही भागात तर रस्त्या लगत घर असेल रात्री झोप मिळणे कठीणच!!! म्हणा ही मंडळी जेवताना पाणी पीतच नाहीत दारूच पितात त्याला आता कोण काय करणार. एकाच प्याला इंग्रजीत रुपांतरीत झाले तर कदाचित चांगले चालेल. :)

गम्मत आहे

गम्मतच आहे. आपल्या इथली शिक्षण संस्था याच ब्रिटिशांनी बनवली आहे. पण ती सध्या तरी कुचकामी आहे. दुसरा मुद्दा असा की तिथे सगळेच इंग्रजी माध्यमात शिकतात पण भारतात परिस्थिती वेगळी आहे. मातृभाषेतले शिक्षण नाहिसे होत चालले आहे. ज्ञानाची भाषा इंग्रजी होत चालल्याने त्यात आता फारसे गैर वाटत नाही. किंबहुना नवे तंत्र भारतीय भाषांमध्ये उपलब्ध नसते हा एक मुद्दा आहेच.
भारतात शिक्षणाचा आधीच आनंद आहे त्यात भर म्हणून शिक्षकांना शिकवणी सोडून अनेक कामे लावली आहेत.

सरकारी गाढवपणा

काय सांगावे महाराजा. माझे आई आणि वडील दोघही शिक्षक होते. शिक्षणक्षेत्राची प्रथम हळूहळू आणि नंतर झपाट्याने होणारी दुरवस्था फार जवळून बघितली आहे. आमच्या आईला काय वाटेल त्या कामाला आपले मायबाप सरकार जुम्पायाचे. जनगणना काय निवडूणकीचे हमाली काम काय. कठीण आहे. २-३ वर्षात मला इथे एकाही शिक्षक असले अशैक्षणिक काम करताना आढळला नाही. उलट ह्या सगळ्या कामांना तात्पुरते लोक इथले सरकार घेते. थोडक्यात एक प्रकारे ही नवीन रोजगार निर्मितीच झाली की . आपले सरकार मात्र शिक्षकांना महसूल न मिळवून देणारे खाते समजतो. त्यामुळे ह्या असल्या कामांना जुंपतात. आपल्या इथे पूर्वीच्या काळी गुरुची मोठी थोरवी होती आता शिक्षक हा चेष्टेचा विषय झाला आहे. इथे मात्र अजूनही शिक्षकाला बराच मान आहे.

किंबहुना नवे तंत्र भारतीय भाषांमध्ये उपलब्ध नसते हा एक मुद्दा आहेच.>> तुम्ही असे म्हणता. १-२ उदाहरणे देतो. अमेझॉनच्या वेबसाईटवर अल्केमिस्ट किंवा इंडिअन अल्केमिस्ट असा सर्च मारा. त्यात एका अमेरिकनाने लिहिलेले पुस्तक आहे. पाऱ्यापासून सोने आणि चांदी बनविण्याचा उल्लेख आहे. शेवटची नोंद १९८४ साली बिर्लांच्या समोर झाली आहे. परीक्षण केल्यावर खऱ्या सोने/चांदी पासून अगदी मामुली फरक दिसला. म्हणजे आपल्याकडे बरेच होते पण सतत ज्ञान कोंडून ठेवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व गोष्टी उशिरा मिळतात ही भारतीय मनोवृत्ती त्यामुळे एखाद्याला ज्या विषयात रस आहे त्याचे पूर्ण ज्ञान गुरु देताच नाही. ह्याने प्रचंड नुकसान झाले. गम्मत म्हणजे एकाही भारतीयाला ह्यावर शोध घेवून बोली भाषेत ते प्रसिद्ध करावे असे वाटले नाही. हाच प्रकार वैदिक गणिताबाबतीत. नको त्या अंधश्रद्धा बाळगून पाहिजेल ते ज्ञान झाकून ठेवायचे ह्या करंटेपणाला काय म्हणावे.

दुसरा पडलेला प्रश्न आपले मराठी साहित्यीक काय करत होते. इंग्रजीमध्ये इतक्या वेगवेगळ्या विषयांवर लिखाण होते त्या सगळ्याला साहित्याच म्हणतात आपल्याकडे मात्र कविता, कथा, कादंबरी आणि फार तर आत्मचरित्रात्मक लेख. त्यातही १-२ नाराळीकरांसारखे अपवाद सोडले तर बाकी आनंदच आहे. अजूनही पुं.लं. आणि खांडेकरांपलीकडे धाव घेणे अवघड होते आहे. म्हणजे ह्या साहित्यिक लोकांनी का नाही प्रयत्न केले. तो विश्वकोश अजून व्हायचा आहे. साधी छोटी मराठी डिक्शनरी पण आपल्या लोकांना करता येऊ नये? बौद्धिक दिवाळखोरी दुसरे काय.

भाग ३ मध्ये खालील प्रतिसाद दिला होता. तोच इथे लेख....

मा़झ्या विनंतीला मान देवून हा लेख लिहिलात त्याबद्द्ल आपला आभारी आहे. पण परिक्षा पध्दत कशी असते त्याबद्द्ल थोडी माहिती द्यावी. मी असे ऐकून आहे की त्यासाठी पाठांतराची गरज लागत नाही प्रश्नप्रतिकेतच उत्तरे असतात. (objective type).

नवीन भागासाठी विषय देतोय "Employment System" कशी आहे. लेखाची वाट पाहत आहे.

फारशी माहिती नाही

माझा मुलगा फौन्डेशनलाच होता त्याला परीक्षा नव्हतो म्हणजे शाळेत अडमिशन घेताना कोणीही मुलांचे आणि आई वडिलांचे मुलाखत सत्र घेत नाहीत. तिथे ३-४ विभाग केले आहेत वयोमानाप्रमाणे. बहुदा ३-५ हा फौन्डेशन, ६-७ की स्टेज-१, ३-६ की स्टेज-२, ७-९ की स्टेज-३, १०-११ की स्टेज-४. प्रत्यके स्टेज मधून पुढे जाताना परीक्षा असते पण ती नक्की कशी असते ते माहिती नाही. पण माझ्या मुलाचे प्रगतीपुस्तक वरचेवर घरी यायचे. त्यात बरेच डीटेल्स असायचे. आज वाचन नीट झाले नाही किंवा चांगले वाचले किंवा आज १० मिनिटे जागेवर बसला. खेळणी आवरायला मदत केली वगैरे. म्हणजे छोट्या छोट्या घटना पण लिहिलेल्या आढळल्या. पण थोड्या प्रमाणावर पाठांतर लागतेच हो. निदान मी केलेल्या मनेजमेंट कोर्सला तरी चांगली ३ तासांची डोक्याचा भुगा करणारी परीक्षा होती. फक्त नुसतीच घोकंपट्टी नव्हती प्रत्यक्ष अनुभवावर पण आधारित होती. पण कदाचित तो मनेजमेंट कोर्स असेल म्हणून पण असेल पण तिथे अनेक मुले वेगवेगळ्या विषयांच्या परीक्षेला आलेली पहिली मी. काहींची १.५ तासांची होती तर काहींची २ तास . पण ह्यापलीकडे अनुभव नसल्याने फार लिहिणे सयुक्तिक वाटत नाही.

Employment System बद्दल पण तसा त्रोटक अनुभव आहे. भरपूर छोट्या मोठ्या recruitment एजन्सिज आहेत. बरेचसे जॉब्स त्यांच्या मार्फतच मिळतात. तशी तिथली प्रथा दिसली. माझ्या क्लायंटकडे जेंव्हा एक जागा उपलब्ध झाली तेंव्हा त्यांनी ३-४ एजन्सिजना माहिती देवून त्यांच्या तर्फे लोक मुलाखतीला बोलावले. त्यातला एक जण रुजू झाला आणि २ महिन्यात म्हणाला की हे काम मला आवडले नाहीये तुम्ही जॉब साईटवर दिलेले डीटेल्स आणि प्रत्यक्ष काम ह्याच्यात तफावत आहे. त्याने त्या एजन्सीला पण सांगितले आणि चक्क त्यांना दुसरा जॉब शोधायला सांगितले आणि त्याला नंतर मिळाला पण. आता हे सगळीकडेच असेल असे सांगणे अवघड आहे. माझ्या माहितीतले अनेक लोक २००८-२००९ मध्ये HSMP व्हिसावर आले होते त्यांना जॉब मिळवणे प्रचंड अवघड गेले . सगळीकडे त्यांना यूकेचा अनुभव लागतो. म्हणजे असेही बघितले की भारतात आयटीचा अगदी ९-१० वर्षांचा अनुभव पण तिथे त्याला फारशी किंमत मिळत नव्हती. बऱ्याच खटपटी नंतर कमी दर्जाचे काम आणि कमी पगार ह्यावर लोक राहिलेली बघितली. ह्याव्यतिरिक्त बरेच लोक तेंव्हा परत भारतात पण गेले कारण १-२ वर्षे रिकामे बसणे परवडत नव्हते. काही लोकांनी असे सांगितले की जे २००७ च्या आधी आले त्यांना बरेच सोपे गेले. बहुदा २००८-२००९ च्या मंदीचा परिणाम पण असू शकेल. पण माझा अनुभव तरी असा आहे की सुरवात होएइपर्यन्त बरीच कटकट आहे. आधी म्हटल्या प्रमाणे राहणीमान फारच खर्चिक आहे आणि बरेचदा इतका खर्च होतो की त्या दबावाखाली तिथेच राहिले जाते. शिवाय परत गेल्यावर आपल्याकडे लोक चेष्टा करतील आणि नातेवाईक काय म्हणतील ह्याने पण तिथे राहिलेले पहिले. सांगताना मात्र इथली हवा, पाणी , रस्ते व कमी भ्रष्टाचार अशी नावे देतात पण मला भेटलेल्या १० पैकी ६ जणांचे खरे कारण वेगळेच होते. हे जरा अवांतर झाले.

...बद्दल पण तसा त्रोटक अनुभव आहे.

धन्यवाद आपले प्रामाणिक मत मांडल्याबद्द्ल.

पाठांतराची गरज

पाठांतराची गरज लागत नाही हे खरे आहे. प्रश्नपत्रिका ऑबजेक्टिव असली तर ५ पर्यायांपैकी एक उत्तर खरे असणार तेव्हा उत्तरे प्रश्नपत्रिकेत असतात हे खरेच.

परंतु, म्हणजे मुले निबंध, संदर्भासहित स्पष्टीकरणे, सबजेक्टिव उत्तरे लिहितच नाही हे खरे नाही. अमेरिकेतील शाळांमध्ये तुम्ही जे काही करता त्या सर्वाला गुणांकन दिले जाते. यात गृहपाठ, क्लासवर्क, क्विझेस, प्रोजेक्ट्स, बुक रिपोर्टस सर्वच्या सर्व धरलेले असते. फक्त ते क्वीझ नसेल तर ते १ तासात किंवा ३ तासात पूर्ण करा असे बंधन नसून दोन दिवसांत किंवा आठवड्याभरात पूर्ण करा असे अपेक्षित असते.

माहिती

धन्यवाद माहिती बद्द्ल.

तुम्हाला आणि पुणेकरांना तिकडच्या न्यायव्यवस्थे बद्द्ल माहिती द्यावी हि विनंती.

तद्दन मूर्खपणा

पाऱ्यापासून सोने आणि चांदी बनविण्याचा उल्लेख आहे. शेवटची नोंद १९८४ साली बिर्लांच्या समोर झाली आहे. परीक्षण केल्यावर खऱ्या सोने/चांदी पासून अगदी मामुली फरक दिसला. म्हणजे आपल्याकडे बरेच होते पण सतत ज्ञान कोंडून ठेवणे आणि . . . हाच प्रकार वैदिक गणिताबाबतीत. नको त्या अंधश्रद्धा बाळगून पाहिजेल ते ज्ञान झाकून ठेवायचे ह्या करंटेपणाला काय म्हणावे.

साहेब, तुम्ही कोणत्या शाखेचे विद्यार्थी? कारण विज्ञान शाखेचे जुजबी शिक्षण घेतलेल्याला पण हे माहीत असते कि एलिमेंट/ मिक्स्चर/ कम्पाउंड म्हणजे काय, व कोणत्याही केमिकल रिअक्शन ने एका एलिमेंट चे दुसरे एलिमेंट करता येत नाही. एलिमेंट बदलण्या करता, म्हणजेच Atomic Number बदलण्या करता nuclear reaction लागते व हे तंत्रज्ञान केमिस्ट्रीच्या पलीकडचे तर आहेच, पण nuclear reaction ही कोणाच्या समोर टेस्ट ट्यूब मध्ये करून दाखविण्याची गोष्ट पण नव्हे. काय वाट्टेल ती केमिकल रिअक्शन केली तरी पारा हा पाराच राहणार व त्याच्या एका अणूचेही इतर कशात रूपांतर होणे शक्य नाही. आणि समजा कोणची तरी reaction करून पाऱ्याच्या अणूचे सोने/चांदी चे अणू झाले, तर खऱ्या सोने/चांदी पासून अगदी मामुली फरक दिसला म्हणजे काय? either ते नवीन अणू सोन्याचे होते, किंवा सोन्याचे नव्हते. मामुली फरक म्हणजे काय? कठोर शब्द वापरण्या करता क्षमस्व, पण हा सगळा तद्दन मूर्खपणा आहे.

तीच कथा वैदिक गणिताची. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या पुस्तकात (Scientific Edge: The Indian Scientist from Vedic to Modern Times, 2003) एक पूर्ण चाप्टर वैदिक गणित या विषयावर लिहिला आहे, कि वैदिक mathematics is neither वैदिक nor mathematics. जे आहे ते फक्त अंकगणित आहे, म्हणजे निव्वळ आकडेमोड, mathematics नव्हे (no theorems and principles). व ही आकडेमोड पद्धती पण थातूर-मातुर भोंदूपणा आहे.

खरा करंटेपणा हा आहे कि कोणीही उठावे आणी पाऱ्या पासून सोने, किंवा पाण्या पासून पेट्रोल बनविण्याच्या थापा माराव्यात, व चांगले सुशिक्षित भारतीय त्यावर विश्वास ठेवतात.

मुख्य मुद्दा

म्हणजे आपल्याकडे बरेच होते पण सतत ज्ञान कोंडून ठेवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व गोष्टी उशिरा मिळतात ही भारतीय मनोवृत्ती त्यामुळे एखाद्याला ज्या विषयात रस आहे त्याचे पूर्ण ज्ञान गुरु देताच नाही. ह्याने प्रचंड नुकसान झाले.>>बहुदा हा मुख्य मुद्दा बाकीच्या संधर्भात आपल्या नजरेतून सुटला असावा. इथे मला रोमिला थापर ह्यांची आठवण होते. आर्य भारताबाहेरून आले ह्यावर त्या कायम ठाम होत्या. आत्ता नवीन पुराव्यावरून ते तसे नसावे आणि नक्की सांगणे अवघड आहे असे म्हटल्याचे स्मरते. म्हणजे एखादी गोष्ट आत्ताच्या स्थितीत सिद्ध होत नाहीये त्यामुळे ते थोतांड वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत आपल्याला सर्व घटक शोधता येत नाहीयेत आणि आहेत त्या चाचाण्यांनुसार पाऱ्या पासून सोने बनत नाही हे सिद्ध होते असे म्हणणे मान्य आहे.

तीच गोष्ट वैदिक गणिताची. सर्व गोष्टी लिखित स्वरूपात नसल्याने त्यामागचे उगम सापडत नाहीत. जुन्या लोकांनी पुढील पिढीला देताना त्यामागची भूमिका सांगितली नाही अथवा नवीन पिढीने त्यावर विचार करून ते आत्मसात केले नाही. नारळीकरांचा लेख मी वाचाला नाहीये त्यामुळे जास्त बोलणे सयुक्तिक होणार नाही. लेख जरूर वाचीन आणि पटला तर विचार नक्कीच बदतील ह्याची खात्री बाळगावी.

किंवा पाण्या पासून पेट्रोल बनविण्याच्या थापा माराव्यात, व चांगले सुशिक्षित भारतीय त्यावर विश्वास ठेवतात.>> कृपया बादरायण संदर्भ जोडू नयेत आणि शीतावरून भाताची किंवा सब घोडे बारा टक्के असेही करू नये.

कठोर टीका जरूर करावी पण उगाचच शिक्षणावर आणि वैयक्तिक पातळीवर घसरू नये असे वाटते. नाहीतर सुशिक्षित आणि शिक्षित ह्यात फरक काय राहिला?

का टिका करु नये?

@पुणेकर - तुम्ही जर लिहिणार असाल की पार्‍यापासुन सोने बनवता येते आणि ते १९८४ साली पण करुन दाखवले तर तुमचे शि़क्षण काढलेच पाहिजे. चेतन पंडितांशी पूर्ण सहमत.
अहो थोडा common sense तरी वापरा. material change requires either Automic fission or Fusion. ते असे शक्य होत नाही. ही chemical reaction पण नाही.
तसे alchemist ही गोष्ट सगळ्या culture मधे आहे, तशीच परीस ही concept पण सगळ्या culture मधे आहे. ह्यात नविन काही नाही, पण कसलाही थोडा सुद्धा पुरावा नाही. theorotically पण हे सिद्ध करता येत नाही तर practically काय करणार.
वैदिक गणित पण असेच आहे, चेतन म्हणाला तसे ते प्रार्थमिक अंकगणित आहे. त्यात काही विषेश नाहिये.

वेदांचा उदो उदो करणार्‍यांसाठी : कोणी खरेच वाचले आहेत का? ओशोंच्या मते १०० वाक्यातले १-२ वाक्य थोडे तत्वज्ञान म्हणावे असे आहे. बाकी माझ्या शेतावर पाऊस पडु दे, माझ्या शत्रु च्या शेतात दुष्काळ पडु दे. शेजार्‍याची / शत्रु ची गाई गुरे मरु देत. असले आहे.

टीका जरूर करा

टीका अवश्य करा. माझे त्या बद्दल काहीही म्हणणे नाहीये. आपले मत बदलायला मला कधीही त्रास होत नाही. मुळात माझा त्यावर विश्वास आहे अस्सा समज आहे त्याला आक्षेप आहे. वर म्हटल्या प्रमाणे मुख्य मुद्दा मांडण्यासाठी मी ते संदर्भ दिले आहेत. मूळ मुद्दा बाजूला राहिला आणि बाकीच्या वाक्यांचा संदर्भ विरहित अर्थ काढून त्यावरच चर्चा करायला लागलो तर काहीच हाती लागणार नाही. पुन्हा सांगतो. सद्य परिस्थितीत ते पटत नाही. त्यामुळे ते थोतांड आहे हे मलाही इतके दिवस वाटत होते. पण तेच पुस्तक वाचल्यावर असे वाटले की मुळातच त्यात काय घटक आहेत हे आपल्याला आत्ता माहिती नाही. ते कुठेही लिहिलेले सापडत नाही त्यामुळे ते नाकारले जात आहेत.

वेदांचा उदो उदो करणार्‍यांसाठी : कोणी खरेच वाचले आहेत का?>> मी वेद वाचले नाहीयेत पण तुम्ही वाचले आहेत का? मी त्यावर काहीही भाष्य केलेल नाहीये. पुन्हा बदरायण संबंध कशासाठी जोडायचे. अजून एक उदाहरण माझे आजोबा १९९५ साली वारले. ते स्वतः जुन्या काळातील डॉक्टर होते. वयाच्या ६० वर्षी गुढगे दुखीचा त्रास झाला. त्यांची शत्राक्रिया पण झाली पण फारसा आराम मिळाला नाही. मग त्यांनी एका आयुर्वेदिक डॉक्टरकडून काही औधाढे घेतली त्याने बराच आराम मिळाला. त्यावर जंग जंग पछाडून त्या आयुर्वेदिक डॉक्टरकडून ते काय आहे ते माहिती करून घायचा प्रयत्न केला पण त्याने काही दाद लागू दिली नाही. पुढे तो माणूस वारला. म्हणजे माहिती असलेले लोप पावले. पुन्हा मुद्दा हा आहे की आपण आपल्याकडचे होते ते नीट लिहून पुढील पिढीस दिले नाही. हा आहे. असो कारण एखाद्याची प्रतिमा मनात तयार झाली की त्यावरच फक्त आपण react करत राहतो.

चालुदेत

मी वेद वाचले नाहीयेत पण तुम्ही वाचले आहेत का?

चला तुम्हीतर सांगून टाकले कि तुम्ही वाचले नाहियेत. त्यामूळे आता पलिकडून काय उत्तर येते पाहतो आहे. :) कोणीच वाचले नसतील तर काय करायचे? याच नियमाने ज्याने भारताची घटना बदलायचा प्रयत्नच केला नाही तर भारताच्या घटने बद्दल अथवा भारताच्या राजकिय सामाजिक बदला बद्दल भाष्य करुन नये काय?

घटना तज्ञ

त्या साठी अनेक घटना तज्ञ आहेत की. आणि त्यांचे मत तरी कुठे एक मेकांशी जुळते.

हे भारतीय शिक्षण पद्धतीचे अपयश आहे का?

पुणेकर यु के ला गेलेत म्हणजे graduate तरी नक्किच असणार. म्हणजे १५ यत्ता शिकलेला माणुस असा पार्‍यापासुन सोने बनते वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवतो म्हणजे काय अर्थ काढायचा?

आनंद आहे

नारळीकरांचा लेख मी वाचाला नाहीये त्यामुळे जास्त बोलणे सयुक्तिक होणार नाही. लेख जरूर वाचीन आणि पटला तर विचार नक्कीच बदतील ह्याची खात्री बाळगावी.
पटला तर ? म्हणजे तुम्हाला असे वाटते कि तुमचे गणिताचे ज्ञान नारळीकर यांच्या तुलनेत जास्त नसले तरी त्यांच्या बरोबरीचे तरी आहे, व म्हणून गणित या विषयावर नारळीकर जे सांगतात ते बरोबर का चूक या वर निर्णय घेण्यास तुम्ही सक्षम आहात. आनंद आहे.

पाण्या पासून पेट्रोल बनविण्याच्या थापा . . . कृपया बादरायण संदर्भ जोडू नयेत आणि शीतावरून भाताची किंवा सब घोडे बारा टक्के असेही करू नये.

म्हणजे पाऱ्याचे सोने करता येते यावर तुम्ही ठाम आहात तर. करा. अवश्य करा. पाऱ्याचे सोने करा. तुमची क्रुती काय आहे ते माहीत नाही, पण एक सोप्पी क्रुती देत आहे. पाऱ्याचा atomic number ८० आहे व सोन्याचा ७९ आहे. म्हणजे पाऱ्याच्या न्यूक्लीयस मध्ये फक्त एक प्रोटोन जास्त आहे. तो काढला कि पाऱ्याचे सोने झालेच. घड्याळ दुरुस्त करताना लहान भाग उचलण्यास वापरतात तसा एक चिमटा (tweezer) घ्यावा; एक चांगले सूक्षमदर्शी यंत्र घ्यावे व त्यातून बघत पाऱ्याच्या न्यूक्लीयस मधून एक एक प्रोटोन काढून फेकून द्यावेत. दोन प्रोटोन काढलयास आणखीन चांगले. atomic number ७८ म्हणजे प्लटीनम, ते तर आणखीन महाग आहे. माझ्याकडे दोन तीन जुने थर्मामीटर पडले आहेत. तुमचा पत्ता सांगा, तुम्हाला पाठवून देतो. त्यातील पाऱ्याचे सोने करा, अर्धे तुम्हाला ठेवून घ्या, अर्धे मला द्या.

वादा साठी वाद

आपण आणि प्रसाद दोघेही जर वादा साठी वाद घालणार असाल तर आपण वादात नक्कीच जिंकाल. प्रत्येक वाक्याचा किस पडला म्हणजे आपण फार शहाणे आहोत आणि बाकीचे मुर्ख आहेत असे होत नाही. असो.

मी कधीही म्हणले नाही की मी वेद वाचले

वेदांचा उदो उदो करणार्‍यांसाठी : कोणी खरेच वाचले आहेत का? ओशोंच्या मते १०० वाक्यातले १-२ वाक्य थोडे तत्वज्ञान म्हणावे असे आहे. बाकी माझ्या शेतावर पाऊस पडु दे, माझ्या शत्रु च्या शेतात दुष्काळ पडु दे. शेजार्‍याची / शत्रु ची गाई गुरे मरु देत. असले आहे.>>>

मी म्हणलोच नाही मी वेद वाचले असे. ओशोंचे मत सांगीतले. त्यानी वाचले असण्याची शक्यता ५०% असेल.
मी रिकामटेकडा नाही वेद वाचत बसायला.

रिकामटेकडा

मी रिकामटेकडा नाही

आम्ही कुठे म्हणतो आहे तसे? आम्हाला तुमचे नाव दिसते आहे प्रसाद१९७१.
रिकामटेकडा नावाचे एक सदस्य होते. शोध घेतल्यास ते निखिल जोशी या सदस्याकडे जाते.
मला तर येथे कोणीच मी वेद वाचले आहेत असा उल्लेख दिसला नाही. :)

पुन्हा समज-गैरसमज

त्यानी वाचले असण्याची शक्यता ५०% असेल.>> हे म्हणजे पुन्हा समज-गैरसमज. असो. दुसर्याला आपले मुद्दे पटविण्यासाठी त्या व्यक्तीच्या बाकीच्या गोष्टींचे मूल्यमापन करून नामोहरम करणे ह्यात जालावर लोक धन्यता मानतात त्यातले हे प्रतिसाद वाटतात. मूळ मुद्द्यावर सहमती असावी अशी अशा आहे. बाकी एखादा माणूस कसा आहे हे फक्त नुसत्या प्रतिसादावरून कळत असेल तर तुम्ही लोक ज्योतिषांपेक्षा काही वेगळे नाही

२००० वर्षानंन्तर

२००० वर्षा नंतर आणि मधल्या काळात atomic war, अतिरेकी वगैरे नी जर मानव पुन्हा आदिवासी झाला. आणि त्याला कुठे star trek चे poster किंवा superman शक्तीमान चे comics मिळाले तर त्याला वाटेल की २००० वर्षा पूर्वी माणसे उडत होती.

तसेच हे आहे.

आदिवासी

जर मानव पुन्हा आदिवासी झाला.

जर कळले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे. म्हणजे मानव परत परत आदिवासी होतो अथवा झाला आहे असा अर्थ घ्यायचा का? कि आणखी काही? तसे असेल तर ज्याला आपण वेद/महाकाव्ये इत्यादी म्हणतो हे कधीतरी झाले आहे असे समजावे लागेल. ते सत्य आहे असे म्हणणे योग्य ठरेल का? अर्थात हे मी म्हणत नाहीये, तुमच्या आदिवासींच्या वाक्यावरुन मी आपला एक तर्क करतो आहे.
आदिवासी होण्यासाठी या अणू युद्ध अथवा अतिरेकी याच गोष्टी लागतात का? नाही हो, आपल्याकडे योजना आहेत आदिवासींसाठी ते कशाने झाले असावेत? अतिरेकी हल्ला की पार्‍याचे सोने करताना झालेला अणुस्फोट? कि आपले उगाचच त्यांना आदिवासी म्हणतात? तुमच्याकडे काही दाखला आहे का?

अशिक्षित

अनिल अवचटांच्या एका लेखात एक अनुभव होता. त्याचा थोडक्यात सारांश असा की माणूस जास्त शिकला की स्वतःला शहाणा समजतो आणि सांगितलेल्या गोष्टी आईकात नाही आपलेच गाडे पुढे दामटवातो. ह्या उलट गावातले अशिक्षित सांगितलेल्या गोष्टी बरेचदा नीट फॉलो करतात. बहुदा आपण पहिल्या सदरात मोडता असा वरून माझा प्राथमिक समज झाला आहे. तो खोटा ठरो अशी इच्छा.

एकमेकांना शेलकी विशेषणे

एकमेकांना शेलकी विशेषणे देऊन झाली असतील तर थांबा आता. झाली नसतील तर ती थांबवण्याची कृपा करा.

अवांतर

वैदिक mathematics is neither वैदिक nor mathematics. जे आहे ते फक्त अंकगणित आहे, म्हणजे निव्वळ आकडेमोड, mathematics नव्हे (no theorems and principles). व ही आकडेमोड पद्धती पण थातूर-मातुर भोंदूपणा आहे.

वैदिक गणित पण असेच आहे, चेतन म्हणाला तसे ते प्रार्थमिक अंकगणित आहे. त्यात काही विषेश नाहिये

अगदी हेच मत मांडण्यासाठी (जलद आकडेमोड वगळता त्यात "गणित" असे काही नाही) मी शेजारच्याच एका संस्थळावर एक उपहासात्मक पाककृती लिहिली होती.

अर्थात, अनेकांना तो उपहास एकतर समजला नाही वा झेपला नाही, ही बाब अलाहिदा!

बाकी मूळ लेखावर प्रतिसाद वर दिला आहेच.

सहमत

जलद आकडेमोड वगळता त्यात "गणित" असे काही नाही>> सहमत हो. मुद्दा असा आहे की ते गणित आहे का नाही ह्याचा नाहीये. त्यावर वाद घालताच नाहीये. गोष्टी नीट लिहून संग्रहित करण्याचा आहे. पण इथे ते सोडून बाकीच्यावारच वाद आणि ते पण एकदम खालच्या पातळीवर. असो. शब्दाने शब्द वाढत जातो म्हणतात त्याचे उत्तम उदाहरण तस्मात जास्त मनावर ताण न घेणे उत्तम.

आदिवासी शब्द चुकला माझा

आदिवासी शब्द चुकला माझा. मला म्हणायचे होते, की काही कारणांनी २००० वर्षांनी त्यावेळच्या माणसाचा आधीच्या इतिहासाशी संबध तुटला तर अशी गफलत होऊ शकते.

 
^ वर