आंतरराष्ट्रीय

भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते.

अमेरिका आणि भारत

अवलोकन संपादन

कालच एका मित्राशी बोलताना अमेरिका आणि भारत यातील फरक याविषयी चर्चा झाली .अमेरिकस्थ मंडळीची या विषयावर मते ऐकण्यास आनंद होईल .तसेच भारतात राहणार्‍या /इतर देशात राहणार्‍या मंडळींनीही आपली मते मांडवीत.

मुख्यत: खालील मुद्दे हाताळावेत , अशी अपेक्षा आहे...

1. सरकार या संकल्पनेची व्याप्ती व मर्यादा. ...कार्ये आणि लोकांच्या अपेक्षा.

2. विचार-आचार स्वातंत्र्य liberty आणि त्याचे फायदे /तोटे

3. आर्थिक स्वातंत्र्य ,समानता आणि विषमता व त्याचे परिणाम

4. जगाकडे /इतर देशांकडे पाहण्याचा /व्यवहार करण्याचा दृष्टीकोण / विचारसरणी किंवा strategic policy

इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४

भाग ३ मध्ये खालील प्रतिसाद दिला होता. तोच इथे लेख म्हणून प्रसिद्ध करत आहे.

इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ३

रेल्वे, एनर्जी आणि पेन्शन

इंग्लंड वास्तव्यातले अनुभव-भाग २

काही काही अनुभव विलक्षण असतात. फार खोलवर परिणाम करून जातात. आज १२-१३ वर्षे झाली संगणक क्षेत्रात काम करून. इतकी वर्षे झाल्याने आणि बऱ्यापैकी टेक्निकाल आणि त्यातून प्रोडक्ट वाल्या कंपनी मध्ये काम केल्याने भलताच अहंगंड झाला होता. आपल्याला फार कळते आणि आपण फार हुशार आहोत असा की गोड गैरसमज. त्यातून हे गोरे सतत येत जाता कुठल्याही गोष्टीला ब्रीलीयंट, ग्रेट, एक्सलंट ह्याचा असा काही मारा करतात की आपल्याला म्हणजे मुठभर मासच चढते. पुन्हा प्रश्न पडतो की आपण तर असे काही लई भारी काम केले नाही मग इतके का कौतुक. हळूहळू लक्षात आले की ही त्यांची बोली भाषा आहे.

इंग्लंड वस्तव्यातले अनुभव

२००९ ते २०१२ असे तीन वर्ष इंग्लंड देशी वास्तव्य करण्याचा योग आला. एकंदरीत ३ शहरांमध्ये राहिलो. सर्व प्रथम आलो तेंव्हा साहेबाच्या देशात आपला कसा काय टिकाव लागायचा ह्याची चिंता होती. आपले विंग्रजी एकदम मराठोत्भाव त्यामुळे जरा धाक्धुकच होती. सुरवातीला जाम वैताग आला. ह्या गोऱ्या लोकांचे इंग्रजी पण आपल्या मराठी सारखेच कुस बदलते. म्हणजे वेल्श आणि स्कॉटिश लोकांचे इंग्रजी हे लंडन आणि सावुथ मधल्यांपेक्षा फारच वेगळे आहे. कंपनीच्या कामासाठी पहिल्यांदा जेंव्हा ग्लासगोचे विमान पकडले तेंव्हा आपण कुठल्या तरी वेगळ्याच प्रदेशात जात आहोत ह्याची जाणीव झाली. ते लोक काय बोलत होते तेच काही कळत नव्हते.

भारतीयांना भारतीय संस्कृती नकोशी झालीय का?

भारतात आल्यावर नेहेमीच काही तरी बदल पाहायला मिळतो. अलीकडे लोकांचा सूर पूर्णपणे बदलेला आढळतो. सगळ्याच प्रांतामधले कर्मचारी जेव्हा एखादी गोष्ट नजरेस आणून द्यायची असेल त्यावेळी सांगतात - Here in India THEY do it like this.., THEY call it xyx ..., इत्यादी
पूर्वी ते सांगत - Here in India WE do it like this.., WE call it xyx ..., हा बदल कशामुळे असावा? त्याचप्रमाणे पूर्वी Admin, Housekeeping चे लोक नमस्ते म्हणत असत, आता ते सुद्धा Hello Sir असेच म्हणतात.
त्याचप्रमाणे चित्रपट खूपच बदलेले दिसतात. कथा काही का असेना, काही भाग तरी परदेशात चित्रित झालेला आढळतो. किमान गाणी तरी.

परदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी

परदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी

मंडळी, माझ्या स्वत:च्या अनुभवावरून आणि माझ्या इतरत्र परदेशी काम करणाऱ्या मित्रांच्या बोलण्यात एक गोष्ट सतत प्रकर्षाने जाणवते ,ती म्हणजे परदेशी काम मिळवणे आणि करणे यामध्ये आपण भारतीय थोडे मागे आहोत.

तुम्हाला आश्चर्य वाटेल,पण १९८०-९० च्या काळात दुबई आणि इतर गल्फ कंट्रीज मध्ये बहुतांश म्हणजे ७०-८०% कर्मचारी भारतीय असायचे! पण गेल्या १०-१५ वर्षापासून अरेबियन कंट्रीज मध्येही फिलिपिनो /मलेशियन/श्रीलंकन/पाकिस्तानी/बांगलादेशी /नेपाली /इजिप्शियन आणि उच्चपदावर ब्रिटीश/अमेरिकन नागरिकांचे प्रमाण वाढते आहे .

रजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंग

रजत गुप्ता या भारतीय वंशाच्या उद्योगपतीची केस काही काळ गाजते आहे. इनसायडर ट्रेडिंगच्या या भानगडीत गुप्ता यांनी राजारत्नमकडे फोडलेल्या बातमीने राजारत्नम यांना गेल्या वर्षी ११ वर्षांचा कारावास सुनावण्यात आला.

हफीज सईदसाठी ५६ करोड?

हफिज सईद कोण आहे हे उपक्रमींना माहित असावे. अधिक माहिती येथे बघा: http://www.mr.upakram.org/node/3717

 
^ वर