हफीज सईदसाठी ५६ करोड?
हफिज सईद कोण आहे हे उपक्रमींना माहित असावे. अधिक माहिती येथे बघा: http://www.mr.upakram.org/node/3717
या व्यक्तीसाठी भारतीय गृहमंत्रालयाने आजच्या डॉलर भावाने ५५ करोड रुपये देऊ केले आहेत. ही बातमी सर्व मुख्य वर्तमानपत्रांत होती. अधिक माहिती येथे बघा -
http://indiatoday.intoday.in/story/india-offers-pak-rs-56-crore-for-hand...
Exasperated with Pakistan's refusal to act against Hafiz Saeed, Home Secretary R. K. Singh offered that India would even be ready to pay Rs.56 crore to Pakistan in case Saeed is handed over to them.
ही बातमी वाचून काही प्रश्न पडले -
- अश्याप्रकारे गुन्हेगार आणि दहशतवाद्यांच्या हस्तांतरणासाठी पैसे देऊ करणे योग्य वाटते काय?
- गृहमंत्रालयाकडून अश्याप्रकारचे जाहीर दावे करणे तुम्हाला पटते काय?
- पैसे देऊन इतर राष्ट्रांत दडलेल्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्याची इतर उदाहरणे जागतिक राजकारणात आहेत काय?
- हफीज सईदसाठी अदमासे ५५-५६ कोटी ही रक्कम कशी ठरवली गेली असावी?
ही बातमी वाचून काही प्रश्न पडलेही बातमी वाचून काही प्रश्न पडलेही बातमी वाचून काही प्रश्न पडलेही बातमी वाचून काही प्रश्न पडलेही बातमी वाचून काही प्रश्न पडलेही बातमी वाचून काही प्रश्न पडलेही बातमी वाचून काही प्रश्न पडलेही बातमी वाचून काही प्रश्न पडलेही बातमी वाचून काही प्रश्न पडलेही बातमी वाचून काही प्रश्न पडलेही बातमी वाचून
उपक्रमींना काय वाटते?
Comments
च्यायला!
>>हफीज सईदसाठी अदमासे ५५-५६ कोटी ही रक्कम कशी ठरवली गेली असावी?
अहो फाळणीनंतर महात्माजींनी तितकेच देऊ केले नव्हते का नवजात पाकला ;) अतिशय दळभद्री आकडा आहे तो- आणि हफीझसाठी देणे वगैरे कहरच आहे.
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
चाचा
कॉलिंग थत्ते चचा! त्यांच्याकडे ह्या विषयावरची आंतरजालिय पीएचडी आहे.
हेहेहे
माझ्याही डोक्यात हेच आले होते. फक्त
दळभद्री नव्हे "लाडका" आकडा असावा. तो तोंडावर फेकला की आजही पाकिस्तान खूश होईल असा काहीसा अंदाज असावा. ;-) पण डॉलरच्या वाढत्या भावाने आकडा पंचावन्न कोटींवर येऊन ठाकला असावा. याला योगायोग म्हणावे की लीला? ;-)
बाकी, हफीझसाठी ५५ कोटी देऊ करणे वगैरे लय भारी! ;-) गृहमंत्रालयाने इतरांच्या (दाऊद वगैरे) किंमती ठरवल्या आहेत काय? हे दरपत्रक कुठे मिळू शकेल असे मलाही प्रश्न पडले. ;-)
इतर प्रश्नांची उत्तरे विशेषतः देशांतर्गत अशी खरेदी-विक्री केल्याची उदाहरणे सापडतात का हे जाणून घेण्यास आवडेल.
डॉलरचा विनिमय दर
आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीत डॉलर वापरत असावेत. विनिमय दर ~५६ रुपये प्रति डॉलर असल्यास "१ करोड डॉलर" असे बक्षीस जाहीर केले असावे. बक्षिसाची रक्कम "राउंड नंबर" असण्याची प्रथा आहे.
अन्य देशांनी अतिरेक्यांच्या अटकेकरिता बक्षिसे जाहीर केलेली आहेत. ओसामा बिन लादिनकरिता यू.एस.अमेरिकेने बक्षीस जाहीर केले, असे अंधुक आठवते.
सनसनाटी धागे?
हा धागा केवळ सनसनाटी आहे असे वाटते. तो सुरू करण्याआधी धागाकर्त्याने थोडी माहिती स्वतः गोळा केली असती तर हा धागा सुरू करण्याची आवश्यकता आहे काय असा प्रश्न कदाचित् त्यालाच पडला असता.
जालावर थोडेसे पाहिल्यावर (US bounty on Hafiz Saeed हे गूगलमध्ये घालून पहा) असे वाटले हा धागा म्हणजे 'बातका बतंगड बनाना' अशा प्रकारचा दिसतो.
अशी एक बातमी आहे (खरी का खोटी माहीत नाही पण बातमी आहे हे खरे) की अमेरिकेने सईद हाफिजवर १० मिलिअन डॉलर्सची 'बाउंटी' लावली आहे. त्या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना गृहसचिवांनी 'आपण तेव्हढी रक्कम पाकिस्तानला द्यायला तयार आहोत' असे संभाषणाच्या ओघात सांगितले - 'a verbal tit-for-tat at an interaction'. (येथे पहा.)
दोन राष्ट्रांमधील अधिकृत बोलणी कशी असतात हे आपण सर्व जाणतोच. ते ज्ञान वापरून कोणाहि वाचकास लगेच जाणवेल की गृहसचिवांचे हे उद्गार हे खर्या वस्तुस्थितीचे निदर्शक मानण्याची आवश्यकता नाही. ५५-५६ कोटि रुपये म्हणजे आजच्या विनिमय दरानुसार १० मिलिअन डॉलर्स हे लक्षात येताक्षणीच ही शंका यायला हवी होती.
भारताने खरोखरच काही बक्षीस जाहीर केले तर ते ५५ कोटि अशी मधलीअधली रक्कम असणार नाही तर ५० कोटि अशी round figure असेल कारण बक्षिसांच्या रकमा eye-catching ठेवण्याची पद्धत आहे.
गृहसचिवांनी असे म्हणावयासच नको होते असा आरोप करता येईल पण तो संपूर्ण वेगळा मुद्दा आहे.
मला तरी हे असेच दिसते आणि म्हणून पुढच्या चार प्रश्नांना उत्तर देणे आवश्यक वाटत नाही.
करोड?
मराठी लिहिताना 'करोड' या शब्द धागाकर्त्याला का वापरावासा वाटला याचे कुतुहल आहे. प्रतिसाद देणार्यांनी त्याचे 'कोटी' केलेले आहे. मराठीत चपखल पर्यायी शब्द नसेल तर ती गोष्ट वेगळी, पण 'कोटी' हा काही देवदुर्लभ म्हणावा असा शब्द नाही.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता
पोकळ बोभाटा
धागाकर्त्याने चर्चा सुरू करण्यापूर्वी तपशील मुळातून वाचायला हवे होते. हा (उपक्रमाच्या प्रवृत्तीविरूद्ध) केवळ पोकळ सनसनाटी निर्माण करणारा धागा झाला.
यावेळी आपल्या सचिवांनी सईदविरूद्धचे अधिकचे पुरावे पाकच्या हवाली केले. त्यावेळी पाकिस्तानी पत्रकारांनी आपल्या सचिवांना खोडसाळ पणे विचारले की "आता हे पुरावे देऊन अमेरिकेची 'बाऊंटी' तुम्ही मिळवणार का?" त्यावर सचिवांनी तोडीस तोड उत्तर दिले "की हे पुरावे पैसे मिळवण्यसाठी देत नसून, पाकिस्तान हाफिज सईदला सोपवणार असल्यास उलट आम्हीच तुम्हाला तितकेच पैसे देऊ"
या खोडसाळ प्रश्नाला दिलेल्या सडेतोड उत्तराचा असा पोकळ बोभाटा का?
का एकदा धागा सुरू केला की त्यावर प्रतिक्रीया द्यायची जबाबदारी 'खबरदार'ने तशीही नाकारली असल्याने असे प्रश्न विचारणेच गैरलागू असावे?
ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>
एक ठळक उदाहरण
1. अश्याप्रकारे गुन्हेगार आणि दहशतवाद्यांच्या हस्तांतरणासाठी पैसे देऊ करणे योग्य वाटते काय ?
इतर मार्ग थकल्यावर पैसे देऊन गुन्हेगार किंवा दहशतवादी हस्तगत करता येत असतील तर अयोग्य नाही.
2. गृहमंत्रालयाकडून अश्याप्रकारचे जाहीर दावे करणे तुम्हाला पटते काय?
भारताच्या गृहसचिवांनी जशास तसे उत्तर दिलेले दिसते. त्यांचे उत्तर गंभीरपणे घ्यायला नको.
3.पैसे देऊन इतर राष्ट्रांत दडलेल्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्याची इतर उदाहरणे जागतिक राजकारणात आहेत काय?
आहेत की. आता आपल्या शेजारी राष्ट्राने तर अशाप्रकारे अब्जावधी डॉलर कमावले आहेत. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ ह्यांनी आपल्या लाइन ऑफ फायर ह्या पुस्तकात स्पष्ट म्हटले आहे की, "We have captured 689 and handed over 369 to the United States. We have earned bounties totalling millions of dollars."
(दुवे: http://www.amnesty.org.au/hrs/comments/2167/ किंवा http://www.defence.pk/forums/world-affairs/2343-us-paid-millions-al-qaed...)
4. हफीज सईदसाठी अदमासे ५५-५६ कोटी ही रक्कम कशी ठरवली गेली..
वर उत्तर आलेले आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
१० मिलीअन
१. अश्याप्रकारे गुन्हेगार आणि दहशतवाद्यांच्या हस्तांतरणासाठी पैसे देऊ करणे योग्य वाटते काय?
>> हे हस्तांतरांसाठी नसावेत, हे शोधासाठी असावेत.
२.गृहमंत्रालयाकडून अश्याप्रकारचे जाहीर दावे करणे तुम्हाला पटते काय?
>> काही हरकत नाही, नाहीतर पकडनार कसे ? अमीष दाखवने गरजेचे आहे.
३. पैसे देऊन इतर राष्ट्रांत दडलेल्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्याची इतर उदाहरणे जागतिक राजकारणात आहेत काय?
>> आइकण्यात नाही.
४. हफीज सईदसाठी अदमासे ५५-५६ कोटी ही रक्कम कशी ठरवली गेली असावी?
१० मिलीअन डॉलर देऊ केले आहेत.
१० मिलीअन डॉलर देउ केले आहेत.
---------------------
-धनंजय कुलकर्णी