रजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंग

रजत गुप्ता या भारतीय वंशाच्या उद्योगपतीची केस काही काळ गाजते आहे. इनसायडर ट्रेडिंगच्या या भानगडीत गुप्ता यांनी राजारत्नमकडे फोडलेल्या बातमीने राजारत्नम यांना गेल्या वर्षी ११ वर्षांचा कारावास सुनावण्यात आला. वॉलस्ट्रीटवरील या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा समावेश कायदेपंडितांच्या अभ्यासक्रमात होईल असे म्हणले जात आहे.

सिक्युरिटी फ्रॉडच्या केसमध्ये गुप्तांनाही २५ वर्षे कारावासाची सजा होऊ शकते. एवढी मोठी शिक्षा होणार नाही याबद्दल त्यांचे वकील आशावादी आहेत. वॉलस्ट्रीटवर गुप्त बातम्या फोडल्या जात नसाव्या यावर विश्वास ठेवता येत नाहीत. त्यातून गुप्तांविषयीचे सर्व पुरावे परिस्थितीजन्य आहेत परंतु

खालील बातमीत म्हणल्याप्रमाणे -

http://in.news.yahoo.com/gupta-went-way-court-jail-233213869.html

Gupta decided to take on the SEC, the federal agency tasked with protecting investors, maintaining order in markets and facilitating capital formation in the US.

In what turned out to be a gross misstep, Gupta filed a case against the SEC alleging that he was singled out for treatment that differed from others in the investigations against Rajaratnam.

गुप्तांनी उचललेल्या पाऊल त्यांच्यावर उलटले आणि यंत्रणा त्यांच्यामागे हात धुवून लागली.

हा संपूर्ण घोटाळा पाहिला की काही प्रश्न पडतात.

  1. इनसायडर ट्रेडींगमधून कोणाचे कसे नुकसान होते?
  2. कायद्याच्या दृष्टीने हा मोठा गुन्हा का गणला जातो?
  3. रजत गुप्तांना या केसमध्ये गोवण्यात आले असावे असे वाटते काय?
  4. या केसवरून एनआरआय आणि परदेशात उद्योग करू पाहणार्‍या भारतीयांनी बोध घेणे आवश्य आहे काय?

रजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंगरजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंगरजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंगरजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंगरजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंगरजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंगरजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंगरजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंगरजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंगरजत गुप्ता आणि इनसायडर ट्रेडिंग

Comments

इनसायडर ट्रेडिंग

इनसायडर ट्रेडींगबद्दा नुकतेच येथे वाचले. शेअरच्या किंमतीवर फरक होणे हे सामान्य शेअरहोल्डरला नुकसानीचे असल्यानेच हा फसवणूकीचा मोठा गुन्हा ठरतो असे वाटते.

तूर्तास एवढेच.

योगायोग

एका श्रीलंकन वंशाच्या आणि एका भारतिय् वंशाच्या आरोपिला एका दुसर्‍या भारतिय् वंशाच्या वकिलाने गजाआड केले आहे या केस मधे.

सत्य लवकरच बाहेर येईल. मी मात्र प्रीत भरारा यांचा फॅन् झालो आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Preet_Bharara

अभिजीत राजवाडे

असेच

मी मात्र प्रीत भरारा यांचा फॅन् झालो आहे.
प्रीत भरारा ह्यांच्याकडे सगळ्यांनीच एक रोल मॉडेल म्हणून बघायला हवे. रजत गुप्तांचे करियर असे संपले असे वाटले नव्हते. दुर्दैवी. कायद्यानुसार शिक्षा व्हावी. गुप्तासमर्थकांनी टीव्हीवर जे रूदन केले ते जरा अतीच वाटले. तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उत्तरे

  1. सामान्य शेअरहोल्डर्सचे
  2. सामान्य शेअरहोल्डर्समध्ये कायदा बनविणारे बाबू लोकसुद्धा असावेत
  3. नसावे
  4. इन्सायडर ट्रेडिंगच्या आशेने कोणाकडे पैसे गुंतविण्यास सोपविणे हासुद्धा गुन्हा ठरू शकेल (असे मला वाटते)

शेयर मार्केट

अन आम्ही. काडीचाही संबंध नाही.
म्हणजे तसं म्हटले, तर काही शेयर्स कुणीतरी सांगितले म्हणून घेतलेले, अन ती 'मारूती प्लास्टीक्स' नावाची कंपनीच 'डीलिस्ट' झाली नंतर. काहीतरी ९०-९१ साली ३-४०० रुपयांचे ते शेयर्स होते.
खरे तर उदा. निरमा कंपनीचे शेयर्स बाजारात १००० रुपयांना आज मिळतात, उद्या १२०० होतात अन् परवा ७०० वर मार्केट बंद होते. म्हणजे नक्की काय होते तेच मला समजत नाही. यामुळे निरमाची पुडी बाजारात आज १०० उद्या १२० अन् परवा ७० रुपयांना मिळते असेही होत नाही. निरमा कंपनीच्या फ्याक्ट्रीच्या जमीनीची किम्मत बदलत नाही, अन तिथल्या कुणा कर्मचार्‍याचा पगारही बदलत नाही.
मग बदलते ते नक्की काय?
बरे, मी निरमा १२०० ला विकला, तर मला २०० फायदा झाला म्हणून मी खुष. अन् जो घेतो तो पण तर खुषिनेच घेतोय ना? कदाचित तो म्हणत असेल की मी गेल्या वर्षी १६००ला विकला होता, अजून ३ महिन्यांनी हाच वाढेल! म्हणजे तो ही खुष! मग बुडतो तो कोण?
हे गणित मला तरी काही कळत नाही.
बहुतेक कुवतीपेक्षा जास्त पैसे तिथे लावून जुगार खेळणारे बुडत/उडत असावेत.
अशावेळी, हे इन्सायडर वै प्रकरण माझ्या लेव्हलच्या यथातथाच वित्तिय कुवत असलेल्या माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे असे म्हणून प्रतिसाद संपवतो.

(रमीच नाही तर लॅडीजमधे सुद्धा हारणारा, हाडाचा जुगारी) आडकित्ता
***
टीपः
१. हा ललितलेखासारखा भासणारा प्रतिसाद आहे.
२. हा प्रतिसादासारखा दिसणारा ललित/विनोदी लेख नाही.
३. सबब, उपक्रमाच्या धोरणात बसेल असे वाटते. नसेल बसत तर कृपया तंबी द्यावी, मी स्वयंसंपादित करीन अथवा मा.संपादकांनी उडवावा.

ह्म्

१.इनसायडर ट्रेडींगमधून कोणाचे कसे नुकसान होते?
इनसायडर ट्रेडींगची उपलब्धता ज्यांना नसते त्यांचे नुकसान होते.

२.कायद्याच्या दृष्टीने हा मोठा गुन्हा का गणला जातो?
ऑल मेन आर (सपोझ टू बी) ई॑क्वल!! (एटलीस्ट फॉर ऑपॉरट्यूनीटी)

३.रजत गुप्तांना या केसमध्ये गोवण्यात आले असावे असे वाटते काय?
माहित नाही, हर्षद मेहता, हसन अली व सुनील तटकरे ह्यांना देखील असेच वाटते.

४.या केसवरून एनआरआय आणि परदेशात उद्योग करू पाहणार्‍या भारतीयांनी बोध घेणे आवश्य आहे काय?
म्हणजे चोर्‍या करताना लक्ष ठेवावे असे काय?

राज राजरत्नम आणि प्रीत भरारा(रजत गुप्ता) बद्दल हा प्रदिर्घ लेख वाचनीय आहे, एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी असा लेख आहे.

असे का लिहिले आहे?

प्रीत भरारा(रजत गुप्ता)

असे का लिहिले आहे?

प्रीत भरारा आणि रजत गुप्ता हि दोन् वेगवेगळी माणसे आहेत्. मला खात्री आहे तुम्हालाही हेच म्हणायचे आहे आणि हि शुद्धलेखनातील् चुक आहे.

अभिजीत राजवाडे

धन्यवाद

सुधारणा सुचनेसाठी धन्यवाद. असे वाचावे. - प्रीत भरारा(रजत गुप्ता बद्दल लेखात फार लिहिलेले नाही)

 
^ वर