परदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी

परदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी

मंडळी, माझ्या स्वत:च्या अनुभवावरून आणि माझ्या इतरत्र परदेशी काम करणाऱ्या मित्रांच्या बोलण्यात एक गोष्ट सतत प्रकर्षाने जाणवते ,ती म्हणजे परदेशी काम मिळवणे आणि करणे यामध्ये आपण भारतीय थोडे मागे आहोत.

तुम्हाला आश्चर्य वाटेल,पण १९८०-९० च्या काळात दुबई आणि इतर गल्फ कंट्रीज मध्ये बहुतांश म्हणजे ७०-८०% कर्मचारी भारतीय असायचे! पण गेल्या १०-१५ वर्षापासून अरेबियन कंट्रीज मध्येही फिलिपिनो /मलेशियन/श्रीलंकन/पाकिस्तानी/बांगलादेशी /नेपाली /इजिप्शियन आणि उच्चपदावर ब्रिटीश/अमेरिकन नागरिकांचे प्रमाण वाढते आहे .

कित्येक आफ्रिकन कंट्रीज मध्ये तर सरसकट चायनीज कंपन्यांना सगळी कंत्राटे मिळत असून साहजिकच फक्त चीनी कर्मचारी भरले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द अमेरिकेत भारतीय NRI पेक्षा फिलीपाईन्स या छोट्याशा देशातील जास्त नागरिक कामासाठी आहेत.

माझ्या मते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत लक्ष घालून योग्य ती पावले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर भारतीय तरुणांनीही अधिकाधिक प्रयत्न करून आणि आवश्यक ते शिक्षण/प्रशिक्षण आणि अनुभव घेवून परदेशी नोकऱ्यांची कास धरावी. आज सुदैवाने मुंबईत अनेक चांगले एजंट्स असल्याने निदान गल्फ मध्ये तरी भारतीय ४०-५० % पर्यंत आहेत,पण त्यातही केरळ आणि गुजरात येथील लोकच जास्त प्रमाणात आहेत .

या विषयावर आपली सर्वांची मते /अभिप्राय/सूचना अभिप्रेत आहे.जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर परदेशी भारतीय कर्मचाऱ्यांचा टक्का वाढायलाच हवा, ज्यायोगे परदेशी चलनाची गंगाजळी सतत भरलेली राहील,असे मला वाटते. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असूनही जर आपण जगाला योग्य ते मनुष्यबळ पुरवू शकत नसू,तर यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय?

"एकमेका सहाय्य करू...अवघे धरू सुपंथ!"
मंदार कात्रे - mandar.eng@gmail.com

लेखनविषय: दुवे:

Comments

एक उपयुक्त दुवा

भारताला परदेशस्थ भारतीयांकडून होणारी मिळकत, या विषयाबाबत हा दुवा उपयोगी ठरावा (दुवा)

निम्नस्तरीय कामे

निम्नस्तरीय कामे करण्यात उच्चशिक्षित भारतीयांना विशेष रुची नसते हे वेगळ्याने सांगायला नको. तशी कामे करणार्‍या इतरांचा मोठा प्रश्न संवादाचा असतो.त्यामुळे गल्फमध्ये चटकन नोकरी मिळेल तशी युरोपीय देशांत किंवा अमेरिकेत मिळणे कठीण होते.

अधिक नंतर लिहिते.

माझ्या अनुभवावरून...

...ती म्हणजे परदेशी काम मिळवणे आणि करणे यामध्ये आपण भारतीय थोडे मागे आहोत.

असहमत!

त्याचबरोबर भारतीय तरुणांनीही अधिकाधिक प्रयत्न करून आणि आवश्यक ते शिक्षण/प्रशिक्षण आणि अनुभव घेवून परदेशी नोकऱ्यांची कास धरावी

.
सहमत!

हे सत्य असल्यास

या अभ्यासात परदेश म्हणजे फक्त अमेरिका-पश्चिम युरोप आणि गल्फ धरले आहे की दक्षिण अमेरिका, आफ्रीका, आशिया, ऑस्ट्रेलिया खंडही जमेस धरले आहेत? सर्वसमावेशक चित्र बहुदा तुम्ही रगवलेल्या चित्राच्या विपरीत असावे असे वाटते (केवळ अंदाज - विदा नाही)

अनन् जर प्रस्तावात म्हटलेले सत्य असल्यास, भारतात अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे लक्षण मानावे का?
आणि तसे असल्यास कॉग्रेस सरकारने गेली ७-८ वर्षे राबवलेल्या धोरणांचा हा सु-परिणाम म्हणावा का?

खरे असावे.

निव्वळ शिरगणती(हेड्-काउंट्)वरून तरी अमेरिकेत,त्यातल्यात्यात न्यूयॉर्कमध्ये चिनी डोकी जास्त दिसतात.चिनी,जपानी,कोरिअन हे साधारणतः सारखे दिसत असल्यानेही तसे वाटत असेल कदाचित. आपल्या भारतीयांशी सारखेपणा असणारे म्हणजे पाकिस्तानी आणि सिंहली लोक. पण ते संख्येने नगण्य आहेत. त्यांच्या नगण्यतेमुळे एकंदर भारतीयांच्या दृश्यमानतेमध्ये फारसा फरक पडत नाही. इकडचा कानोसा घेतला तर अमेरिकेमध्ये कायमचे जाण्याची क्रेझ थोडी कमी झाल्याचे जाणवते. अजूनही यूएस विजासीकर्स ची संख्या प्रचंड आहे आणि प्रचंड वाढतेही आहे पण त्या वाढीचा वेग मंदावतो आहे असे वाटते.
इतर जगाविषयी माहीत नाही.

काही कारणे

अमेरिकेची ढासळलेली अर्थव्यवस्था, कडक विसा नियम आणि आउटसोर्सिंग ही मुख्य कारणे अमेरिकेकडे जाणारा लोंढा कमी करणारी वाटतात.

कामाला स्तर कशाला?

<<निम्नस्तरीय कामे करण्यात उच्चशिक्षित भारतीयांना विशेष रुची नसते हे वेगळ्याने सांगायला नको. . >> प्रियाली

कामांना कसले हो स्तर? कष्ट करुन आपली रोजी रोटी प्रत्येकानी मिळवावी. कुठले काम छोटे किंवा मोठे नसते. भारतात ल्या शिक्षणा चा असा काय दर्जा असतो ( IIT आणि शासकीय colleges सोडुन )?

शासकीय कॉलेजांतील शिक्षणाचा दर्जा

शासकीय कॉलेजातील शिक्षणाचा दर्जा नक्कीच उल्लेखनीय म्हणावा इतका चांगला नाही हे स्वानुभवाने सांगू शकतो. कॅंपस भरती -ब्रॅंड नेम व शिक्षणाचा तुलनेने माफक खर्च वगळता शासकीय महाविद्यालयांमध्ये 'दर्जात्मक' चांगुलपणा (म्हणजे इतर महाविद्यालयांना नावे ठेवण्याइतका) असे काही नसते.

चायनीज कंपन्या

कित्येक आफ्रिकन कंट्रीज मध्ये तर सरसकट चायनीज कंपन्यांना सगळी कंत्राटे मिळत असून साहजिकच फक्त चीनी कर्मचारी भरले जातात.माझ्या मते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत लक्ष घालून योग्य ती पावले उचलली पाहिजेत.

या मुद्द्यावर मला अधिक लक्ष वेधायचे आहे.अनेक आफ्रिकन कंट्रीज मध्ये चीन आपले बस्तान बसवत आहे. त्या देशांशी दीर्घकालीन करार करून तेल-संशोधन आणि मूलभूत सुविधा विकास यासाठी मदत करत आहे, त्यामागे साहजिकच भविष्यात तेल आणि अन्य महत्त्वाच्या खानिजांवर/ अन्य दृष्टीकोनातून लोण्याच्या गोळ्यावर चीनचा डोळा आहे .साहजिकच तिथली सगळी कंत्राटे आपाल्याच कंपन्यांना देवून चीनी कर्मचारी भरले जातात.

भारत हे का करू शकत नाही?

चीनी कर्मचारी

मला गल्फमध्ये चिनी कर्मचारी दिसले नाहीत (सद्य परिस्थिती माहित नाही पण १०-१२ वर्षांपूर्वी नक्कीच नसावे.) तेथे फिलोपिनो अधिक तसेच केरळी आणि बांग्लादेशी पण या कंत्राटी कामगारांची परिस्थिती फारशी बरी नाही. अनेक लोक एकाच अपार्टमेंटमध्ये ठासून भरलेले असतात. त्यांना फारशा सुविधा नाहीत, सोबत कुटुंब नाही अशी गत असते.

थोड्याफार अनुषंगाने लहानसहान भारतीय कंपन्या भारतीय इंजिनिअर अमेरिकेत उचलून आणतात त्यांचीही परिस्थिती अशीच असते. अनेक धंद्यांमध्ये फसवेपणा आढळतो. काही अग्रगण्य भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना इतका कमी पगार देतात की अमेरिकेतील निम्न मध्यमवर्गीय वर्गासोबत त्यांच्या एरियामध्ये राहणे, गाड्या शेअर करणे त्यांना भाग पडते.

या पार्श्वभूमीवर चीनी कर्मचार्‍यांची परिस्थिती कशी असते?

न म स्का र!

सामान्यतः मायबोली नामक सायटीवर माझे वास्तव्य जास्त असते. इथे पहिलाच प्रतिसाद लिहितो आहे.
इथेही हा लेख पाहून तिथे मी मांडलेला एक मुद्दा पुन्हा मांडतो. कारण उपक्रमावर बरीच विचारी मंडळी आहेत असे दिसते आहे.
(तिथलाच प्रतिसाद इथे डकवतो आहे, कारण लेखही सेम सेम आहे. तसेच संपूर्ण चर्चेत हा मुद्दा कुणाला दिसलाच नाहीये, किंवा काणाडोळा करण्यात आलेला आहे.)

-->
इब्लिस | 5 October, 2012 - 00:39

हं.
इतकी चर्चा झाली तरी कुणालाही धागा कर्त्यांनी केलेला विनोद सापडला नाहीये.

च्या&&#$र्‍#, इस्कटून जोक सांगायचा म्हंजे जरा कठिण आहे.

तर मंडळी, जोक असा आहे
>>माझ्या मते भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत लक्ष घालून योग्य ती पावले उचलली पाहिजेत. त्याचबरोबर भारतीय तरुणांनीही अधिकाधिक प्रयत्न करून आणि आवश्यक ते शिक्षण/प्रशिक्षण आणि अनुभव घेवून परदेशी नोकऱ्यांची कास धरावी. <<

म्हणजे,
या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने, या देशात शिकून तयार झालेल्या 'डोक्यांना' देशाबाहेर कटवायचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना शिकविण्यासाठी आधी एक तर माझ्या ट्याक्स चा पैका खर्च केला पाहिजे, अन मग नंतर त्यांना बाहेर देशी पाठविले पाहिजे. देश गेला तेल लावत. हाकानाका! डालर आणून फेकू थोडे. अन थितं बसून चर्चा करू माबोवर अन इतर मसं वर, भारत मागासलेला कसा आहे त्याबद्दल डोळा मारा तिकडं बाप 'गेला' तर मला अर्धं जग पार करून येता येत नाही म्हणून अंत्यसंस्कारांचं व्हीडू शूटींग काढून आसवं ढाळू...

अकलेचे दिवाळे म्हणतात, ते हेच!

आपण काय विचार मांडतो आहोत, याचा विचार न करता उचल्ला कीबोर्ड, लागले टंकायला!

बघा,
जोक इस्कटून सांगितलाय.
हसू कुनाकुनाला येतंय??

(संतप्त) इब्लिस.
<--

या प्रतिसादाचा पुढचा भागही तिथे त्या धाग्यावर आहे. जिज्ञासूंनी पहावा..

मथितार्थ असा आहे, की येथील रिसोर्सेस वापरून येथील हुशार मुलांना ट्रेनिंग द्यावे अन मग देशाबाहेर धाडून द्यावे असे धोरण सरकारने राबवावे काय? मग या देशासाठी काम करणार कोण?

 
^ वर