इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ३

रेल्वे, एनर्जी आणि पेन्शन
इंग्लंडला सुरवातीला आलो तेंव्हा इथल्या रेल्वेच्या एकंदर चकचकीतपणाला एकदम भुललो. पहिले दर्शन एकदम उत्तम होते. अत्यंत स्वच्छ रेल्वे बसायची सीटे पण एकदम गुबगुबीत. म्हणजे आपल्याकडे फर्स्ट क्लासने प्रवास करावा असेच वाटले. सुरवातीचे वर्ष लंडन बाहेर गेल्याने रेल्व्चा प्रवास इतका झाला नाही. तुरळकच कधीतरीच लंडन वा ऑक्सफर्डला फिरायला म्हणून. नाही म्हणायला चिरंजीवांना निळी रेल्वे आवडायची म्हणून जवळच्या न्यूबरी ह्या छोट्या गावात जायचो कधीकधी. पण तिकीट असे फारसे नसल्याने रेल्वेचा इंगा कळला नाही. पुढे स्कॉटलंड आणि लंडनचे प्रोजेक्ट मिळाल्यावर काही गोष्टी एकदम अंगावर आल्या. जर का आधीच तिकीट काढले नसेल आणि आयत्या वेळी काढले तर प्रचंड महाग. म्हणजे २ महिन्यांपूर्वी नीट व्यवस्थित प्लान करून तिकीट काढले तर अंतराप्रमाणे अगदी ९ पौन्डला मिळेल पण आयत्या वेळी हेच तिकीट एकदम १००-२०० पर्यंत. एकदम मित्राकडे लीड्सला गेलो होतो. आधी तिकीट काढल्याने लंडन ते लीडस म्हणजे जवळपास २८० ते ३०० किलोमीटर अंतर फक्त १५ पौंडात मिळाले. तिकडे गेल्यावर काही कारणांमुळे एक दिवस अजून वाढवला. आता दुसऱ्या दिवशीचे तिकीट एकदम १७० पौंड झाले. शेवटी मग सरळ टाकसी केली आणि लंडनला आलो. ते जास्त स्वस्तात पडले. लंडन मध्ये राहायला लागल्यावर किमान महिन्याचे ३०० ते ५०० पौंड फक्त रेल्वेच्या पास वर जायचे. म्हणजे मिळणाऱ्या पगारातला फार मोठा हिस्सा फक्त जाण्यायेण्यावारच खर्च होतो. ज्यांना काही सवलती मिळतात त्यांचे थोडे भागते पण सामान्य माणूस तसा भरडलाच जातो.

सगळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ३ ते ६ हा पिक पिरियड. ह्यात तिकीट महाग मात्र बाकीच्या वेळी तिकीट ३०-४०% स्वस्त. सगळ्या रेल्वे कंपन्या दरवर्षी तिकीट दर वाढवतात. एकतर सरकारी रेल्वेचे खासाजीकरण केले. आता जास्त कंपन्या असणे शक्यच नाही कारण प्रचंड खर्च आणि फार मोठे नेटवर्क. म्हणजे फक्त ४-५ खागाजी कंपन्यां. सगळ्या रेल्वे नेटवर्क विभाग पडून ते ह्याच ४-५ कंपन्यांमध्ये वाटलेले. मग एकाने दर वाढवले की दुसरा वाढवतो. म्हणजे ग्राहकाचा फायदा व्हावा आणि चांगली सेवा मिळावी म्हणून रेल्वेचे खासगीकरण केले. पण इथे उलटेच झालेले दिसते. Thatchar बाकीच्या कळत खासगीकरणा एकदम जोर आला. पाणी, वीज, टेलीफोन सगळ्याचे खासगीकरण. सगळ्या ह्या खासगी कंपन्या दर कमी वगैरे ना करता दर वर्षी वाढवातातच. व्हिच? नवाची एक संस्था आहे. ती ह्या सगळ्या विरुद्ध बराच आवाज उठवते. पण तसा फारसा फरक पडलेला दिसत नाहीत. सध्या आपल्याकडे जसे केजरीवाल नेम आणि शेम करतो तसे त्यांनी मध्यंतरी रेल्वे आणि एनर्जी कंपन्यांवर बीबीसीवर १ तासाची मालिकाच सदर केली. त्यात दाखवून दिले की हे खासगीकरण म्हणजे नुसती नफेखोरी आहे. लोकांना नुसते ओरबाडत आहेत. पण फार काही फरक पडला नाही. जसा हिवाळा चालू होएईल तश्या सगळ्या एनर्जी कंपन्या आपले दर वाढवतात कारण हिवाळ्यातच सगळ्यात जास्त लाईट आणि गैस लागतो. उन्हाळ्यात रात्री १० पर्यंत दिवस असल्याने एकदम कमी वीज लागते. म्हणजे जेंव्हा हिवाळ्यात एकदम नफा कमावून घेतात आणि वर पत्र पाठवतात की आता पुढील सप्टेंबर पर्यंत आह्मी दर वाढवणार नाही. हा मोठा शहांजोगेपणच झाला. सध्या तर लोक भलतीच खावालेली आहेत. एकतर प्रचंड मंदी आणि त्यातून ही महागाई. कित्येक लोक आपल्या सारखीच काटकसर करायला लागले आहेत.
विजेवरून आठवले. आमचा परचेसिंग मनेजर काही काही मजेदार किस्से सांगायचा. साधारणपणे १९८३-८४ पर्यंत २४ तास वीज सगळीकडे नव्हती. कित्येक वेळेला ना सांगता लोडशेडींग होत असे. मग खाटीकखान्यांची पंचाईत व्हायची कारण मास सडून जायचे. मग लोकांची झुम्मड उडायची कारण तेंव्हा मास एकदम स्वस्तात मिळे. तसेच घराघरात पूर्वी शेकोटीची सोय होती. घरातच लाकूड जाळून घर गरम करायचे. आणि मग त्याच्या धुराने सगळीकडे एक काळा थर जमा होत असे. साधारणपणे १९८५ नंतर नवीन टेक्नोलोजी आली आणि मग गरम पाणी किंवा विजेवर चालणारे हिटर सगळीकडे आले. मग २ काचा असलेली खिडकी आली. म्हणजे पूर्वी एकाच काचेची खिडकी असे आता २ काचा लावतात आणि त्यामध्ये थोडी जागा ठेवतात. ह्यामूळे खिडकीतूने आत येणारी थंड हवा कमी होते. हलू तर ३ काचा असलेली पण काही घरे बांधली आहेत. जेणे करून हिटिंगचा खर्च कमी होईलच आणि त्यामुळे ग्रीनहौस गैसेस वातावरण सोडण्याचे प्रमाण कमी होईल.
पण एकंदरीत सगळे राहणीमान प्रचंड महाग आहे. ज्याप्रमाणात सामान्य माणसाचे पगार आहेत त्याप्रमाणात वीज, रेल्वे अगदी बस ह्याचे भाडे प्रचंड आहे. आपल्याकडे आपण फारच स्वस्तात राहतो आणि ह्यांच्या सारखी सेवा मिळावी ही अपेक्षा धरतो.

इथे जवळपास सगळ्यांनाच स्टेट पेन्शन मिळते. त्यासाठी ठराविक वयोमर्यादा आहे. सध्या पुरुषाला ६५ आणि स्त्रियांना ६० वयानंतर पेन्शन मिळते. अगदी प्रायव्हेटमध्ये काम करण्यार्यांना पण मिळते. आपल्या पगारातूने ठरवूक हिस्सा नैशनल हेल्थ इन्शुरन्सला जातो. पगावाराचा कर वेगळाच असतो आणि नैशनल हेल्थ इन्शुरन्स वेगळा. जितका आपण नैशनल हेल्थ इन्शुरन्स भरू तितकीच रक्कम कंपनी पण भरते. ह्यातूने सगळ्यांना फुकट वैद्यकीय सेवा मिळतात. म्हणजे कुठलेही आजारपण असू देत हॉस्पिटलमध्ये सर्व गोष्टी फुकट. हॉस्पिटलमधून सुटल्यावर जर का काही औषधे लागली तर ती पर प्रिस्क्रिप्शन वर घायची आणि त्याचे पैसे आणि तेही ठरलेले ७ का ८ पौंड द्यायचे. मग त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये एकच औषध असू देत अथवा ३-४ असू देत. हा प्रकार आवडला आपल्याला. इथे आल्या आल्या माझ्या एका मित्राचे पाठीचे हाड मोडले. तो बर्फावरून घसरून पडला. त्याची सगळी ऑपरेशन्स एक पैसाही खर्च न करता झाली. शिवाय लंगडत होता म्हणून लंडनमध्ये सगळीकडे बस वा रेल्वेच्या प्रवासासाठी एक पास मिळाला. त्यावर तो कुठेही पिक आवर्स सोडले तर फुकट प्रवास करू शकत होता.
तर आपण जो नैशनल हेल्थ इन्शुरन्स भरतो त्यामधून वैद्यकीय आणि नंतर पेन्शन मिळते. ह्याशिवाय सरकारी लोकांना वेगळे अजून भत्ते मिळतात. प्रायव्हेटमध्ये काम करण्यारांना त्यांच्या कंपनीच्या पेन्शन फंडात पैसे टाकायला लावतात. अर्थात हे पहिल्यांदा एकदम छानच वाटते. पण २ वर्षांनतर लक्षात आले की ह्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. पेन्शन हा एक टाईम बॉम्ब आहे. कारण १९५४ च्या आधी जन्माला आलेल्या स्त्रियांना बहुदा ५५ आणि पुरुषांना ६०व्या वर्षीच पेन्शन मिळायचे. लोकसंख्या जशी कमी झाली आणि लोकांची क्रयशक्ती कमी झाली तसे नैशनल हेल्थ इन्शुरन्समध्ये जाणारी रक्कम कमी कमी होत गेली. अनेक लोक नैशनल हेल्थ इन्शुरन्स आणि कर वाचवा म्हणून contracting करतात. म्हणजे कायम नोकरी नाही. कायम नोकरी वर फारच कमी पगार आहेत. पण हेच सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल तर कर एकदम कमी. म्हणजे तसा कमी नसतो पण अनेक पळवटा काढून जवळपास ७०-८५% टक्के रक्कम आपल्या हातात राहते. म्हणजे जो कायम नोकरी वाला आहे त्याला वर्षाला जर क ४०००० पौंड पगार असेल तर तेच कोनट्राकटींग करून एकदम ७०००० ते ९०००० च्या घरात जाते. मग भलताच फरक पडतो. त्याच बरोबर इथे अनेक भत्ते दिले जातात. त्याचाही प्रचंड प्रमाणात दुरुपयोग करणारे लोक आहेत. म्हणजे ४-५ मुले जन्मला घालून काम ना करता स्टेटच्या भत्त्यांवर राहायचे. ह्यांना राहायला घर, प्रत्येक मुलामागे दर आठवड्याला काही ठराविक रक्कम मिळते. आणि ते सगळे एकदम ४०००० ते ६०००० पौंडाच्या घरात उत्पन्न होते. सध्या ह्याच्वर बरीच टीका झाली आहे. बऱ्याच कुमारी माता पण आहे. कारण स्टेट सगळी मुलाची जबाबदारी पण घेते. म्हणजे कोणतरी आपल्याला जेवू खाऊ घालणार आहे ह्याची खात्री आहे. त्याचा दुरुपयोग करणारे आणि आपल्याकडे अश्याच चांगल्या योजनांचा दुरुपयोग करणारे ह्याच्या मानसिकतेमध्ये काही फरक नाही.

पण ह्या सगळ्यामुळे मिळणारे पेन्शन कमी झाले. शिवाय काही लोक एकदम आईतखावू पण बनली आहेत. म्हणजे आपल्यासारख्यांना हे लोक आकर्षित करून आपल्या पगारातून हे सगळे कर वसूल करतात आणि ह्या लोकांना पोसतात. नैशनल हेल्थ इन्शुरन्स सर्विसेसवर आता खर्च कमी करा असा आरडाओरडा चालू झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मिळणारी वैद्यकीय सेवा खराब झाली आहे. मग सरकारने आता पेन्शन मिळणारे वयच वाढवले आहे. आता तर अजून काही वर्षांनी पुरुषांच्या वयाच्या ७० वर्षनंतर आणि स्त्रियांना ६८ वयानंतर पेन्शन मिळेल आणि साधारण २०३० पर्यंत निवृत्तीच्या वयावर जी सध्याची ६७ची मर्यादा आहे ती काढण्याचा प्लान आहे. म्हणजे पेन्शन वगैरे विसरून जा आणि मरेपर्यंत काम करा. हे भलतेच भीतीदायक चित्र आहे. १-२ क्लायंटकडे असे पहिले की लोकांना पेन्शन मिळेल ह्याची खात्रीच नाहीये. २००८ च्या झटक्याने आता आपण काहीतरी पुंजी जमवली पाहिजेल ह्याची ह्या लोकांना हळूहळू जाणीव होते आहे. काही लोक तर पेन्शन मध्ये पैसे टाकणे पण बंद करत आहेत कारण लोकांना जेंव्हा वेळ येईल तेंव्हा ते आपल्याला मिळेल ह्याची खात्रीच राहिली नाहीये. बऱ्याचश्या पेन्शनवाल्या कंपन्या शेयर बाजारात पैसे गुंतवितात आणि २००८ नंतर अशी अनेक प्रकाराने उघडकीस आली की कंपन्या एकदम डबघाईला आल्या आहेत आणि आपले पेन्शन मिळेल ह्याची खात्री कोणालाच राहिली नाहीये.
हे सगळे पहिले की वाटते आपल्याकडे डाव्या संघटना जो प्रोव्हिडंट फंडाचे पैसे शेयर बाजारात गुंतवायला विरोध करता ते अगदी योग्यच आहे असे म्हटले पाहिजेल. माझा एक मित्र इन्शुरन्सवाल्या क्लायंटकडे प्रोजेक्टवर होता. त्याचा अनुभव तर अजून धक्कादायक होता. हे लोक, म्हणजे इन्शुरन्सवाले ह्यांना फुकट दुसऱ्याचे पैसे गुंतवायला मिळतात त्यामूळे भरपूर पैसे खातात. म्हणजे नको असलेली अनेक आयटी प्रोजेक्ट्स. प्रोजेक्ट्ससाठी काय वाटेल तेवढ्या टीम्स. बरीच प्रोजेक्ट्स आखलेल्या वेळेच्या बाहेर गेलेली. १-२ लोकांचे राजीनामे वगैरे होतात पण मुळातच ह्यांच्या खिशातून पैसे जात नसल्याने बरीचशी बेफिकिरी पण अनुभवायला मिळाली
आता शेवटचे दोन मुद्दा लिहून ही मालिका थांबवतो. इथे आल्यावर वेळ भरपूर मिळतो. एकतर बरेचदा कामाच्या ठिकाणी वा जवळपास घर घेतल्याने घरी लवकर जायला मिळते. उरलेल्या वेळ कसा घालवायचा असा प्रश्नच पडतो. इंटरनेटची उत्तम सोय असल्याने यूट्यूब बघ एकडले तिकडले लेख वाच. ह्यात बऱ्याच पाकिस्तानी वृत्तपत्रांची आणि त्यांच्या टी.व्ही. कार्यक्रमांची माहिती झाली. बरेच कर्यक्रम बघता असे लक्षात आले की त्यांचे काही काही टी.व्ही. निवेदक हे आपल्या टी.व्ही. निवेदकांपेक्षा बरेच बरे आहे. नजम सेठी हा माणूस तर उत्तम विश्लेषक आहे. मध्यंतरी पाकिस्तानचा रहेमान मलिक आपल्याकडे येवून बरीच मुक्ताफळे उधळून गेला. म्हणजे २६/११ हा बाबरीमशीद पडल्या साराखेच आहे वगैरे. तो इकडे यायच्या आधी एका कार्क्रमात नजम सेठीनी हे असे होणार असे सांगितले होते. तो इकडे यायच्या आधी आपल्या पेपरात पाकिस्तान सीमेवर उगाचच गोळीबार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अश्याच १-२ अजून बातम्यांचा हवाला देवून त्याने सांगितले होते की जे काही चालले आहे ते चांगले नाहीये. भारताने मुळातच अपेक्षा कमी करण्यासाठी कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून अश्या बातम्या देवून एक प्रकारे एक पावूल मागेच घेतले आहे. आता ह्याला पाकिस्तानकडून उत्तर मिळणारच आणि बहुदा ते बहुदा मलिक स्वतःच करतील. ह्या माणसाचे अनेक प्रोग्राम्स मी बघितले आहेत. आणि एकदम विश्वासाहार्य पत्रकार आहे. चूकला चूक आणि बरोबरला बरोबच म्हणणार. दुर्दैवाने आपल्याकडे असले पत्रकार बघायला मिळणे कठीण आहे. ज्याचे त्याचे गट झालेले दिसतात आणि आपल्या टी.व्ही. बद्दल तर विचारायलाच नको. त्याचे काश्मीर वरचे विवेचन जरूर एईकावे आपली झापडे उघडायला नक्की मदत होते.
ह्या शिवाय तारीक अलि नावाचा पाकिस्तानी पण आता ब्रिटीश नागरिक आहे. हा गृहस्थ कम्यूनिस्त आहे. ह्याचे ब्रिटीश रेल्वेवरचे ताशेरे आईकाण्यासारखे आहेत.

दुसरा मुद्दा ग्रंथालय. म्हणजे इकडे उत्तम ग्रंथालये आहेत हे माहिती होते पण त्याच्या अनुभव फारच सुखद आहे. कुठल्या छोट्यातल्या छोट्या गावांत अद्ययावत ग्रंथालय मिळेल. तिथे कुठलीही फी न घेता फुकुत वाचनाची सोय आहे. फक्त तुम्हाला तुमचे नाव रजिस्टर करायचे. तेही १० मिनिटांचे काम. आपले ओळखपत्र दाखवून एक साधा फॉर्म भरून लगेच तिथल्या तिथे सदस्य होता येते. बरीच चांगली पुस्तके आपल्याला सहज हाताळता येतात आणि एखादे पुस्तक मागविता पण येते. ग्रंथपालांच्या तोंडावर कधीही नाराजी पहिली नाहीये. सतत हसतमुख वा मदत करायला तत्पर. म्हणजे वि. स. खांडेकरांची, अत्रे, पु.ल. आणि विश्वास पाटलांची पुस्तके पण वाचून काढली. काही पुस्तके आपल्याच लोकांनी इथे भेट दिलेली वा ह्यांनी स्वतः विकत घेतलेली. नुसती मराठीच नव्हे तर बंगाली, तामिळी, हिंदी पण बघितली. वेगवेगळे सेक्शनच होते. हा म्हणजे जरा धक्का होता. सर्व ग्रंथालयात इंटरनेटची फुकट १ तास सुविधा आहे. ह्याशिवाय अगदी झेरोक्स पण काढता येते. हे कुठेतरी आपल्याकडे झाले पाहिजेल. पुण्यातल्या एका ग्रंथालयाचा मी बरेच वर्षे मेम्बर होते. तिकडे एकतर भुक्कड पुस्तके दर्शनी विभाग ठेवलेली असावयाची आणि लिस्ट मधून शोधलेली पुस्तके मिळतीलच ह्याची खात्री नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

:-)

>हे खासगीकरण म्हणजे नुसती नफेखोरी आहे. लोकांना नुसते ओरबाडत आहेत. पण फार काही फरक पडला नाही.
>आपल्याकडे आपण फारच स्वस्तात राहतो आणि ह्यांच्या सारखी सेवा मिळावी ही अपेक्षा धरतो.

तुम्ही फारच खरे बोलता हो. :-)
छान, अनुभवांवर आधारित लेख आवडले.

आभारी आहे

इथे आल्यावर बरेच भ्रमाचे भोपळे फुटले हो. आपल्याकडे फारच एकतर्फी चित्र रंगवले जाते. मग वेगळे अनुभव आल्यावर मत बदलणे भाग पडले. अजून खूप काही लिहिता येईल. पुन्हा कधीतरी लिहीन.

होय

>इथे आल्यावर बरेच भ्रमाचे भोपळे फुटले हो.

खरे आहे. पण असे झाले तरी ते संकेतस्थळावर आणि प्रत्यक्षातही मान्य करणारे फार कमी.
झाकली मूठ झाकलीच ठेवणारे जास्त.
किंवा मग अगदी दुसरे टोक - आपल्या देशात किंवा दुसरे म्हणजे परदेशात काहीच ठेवलेले नाही म्हणणार्‍यांचे.
तुम्ही ते दोन्ही करत नाही हे पाहून बरे वाटले.
असे सरळपणे, आणि मोकळेपणाने मांडलेले विचार वाचून सुखद धक्का बसला.

हा हा...

पुणेकर अजुन थोडे दिवस जाउद्या. आणखी थोडसं जग (आणि भारतसुद्धा फिरा) मग तुम्हाला वाटेल आपण कशा-कशाची तुलना करतोय!

परदेशात (अर्थात प्रगत देशात) गेलेले/जाउन आलेले मी दोन प्रकारचे लोक बघितलेत.

१. पहिल्यांदाच प्रदेशात जाउन हुरळून गेलेले: तिथली स्वच्छता, टापटीप, निसर्ग, सार्वजनिक व्यवस्था, सौजन्य, प्रामाणिकपणा वगैरे वगैरेंचं कौतुक करून भारताला शिव्या देणारे.

२. इथल्या व्यवस्थेला, जिवनशैलीला कंटाळून तिथं स्थाइक झालेले: भारत पण अगदीच काही हॅ नाहिये हं असं म्हणणारे. तिथं बसून भारताच्या प्रगतीचे दाखले देणारे. दिल्लीत सामुहीक बलात्कार झाला की आमच्याकडेही बोस्टनलाही रात्री एकटी-दुकटीनं फिरणं 'सेफ' नाहीये असं म्हणणारे. :)

पुणे

अजुन थोडे दिवस जाउद्या.>> खरे आहे तुमचे. तसा मी पुणे सोडून १३ वर्षांनी पुन्हा येतोय. आधीच्या ९ वर्षांपैकी ५ बंगलोरला आणि ४ हैदराबादला काढली आहेत. अधून मधून मुंबई, नगर आणि चंद्रपूर असे प्रवास घडले. पण फार हिंडणारा मी नाहीये. आपल्याला एकाच ठिकाणी जास्त दिवस रहायल आवडते. कुठल्याही गावाचे खरे रूप १०-१२ दिवसांच्या ट्रीपमध्ये वा ६ महिन्यांच्या वासाव्यात कळत नाही असे माझे मत आहे. म्हणजे तसेही कितीही वर्षे राहिलो तरी बरेच भाग आपल्याला अनभिज्ञच असतात.

दिल्लीत सामुहीक बलात्कार झाला की आमच्याकडेही बोस्टनलाही रात्री एकटी-दुकटीनं फिरणं 'सेफ' नाहीये असं म्हणणारे.>> आता लंडन आणि बाकीच्या ठिकाणी ह्या घटना सर्रास घडतात हो. तिथला फुकट मिळणारा मेट्रो पेपरात ह्या अश्या अनेक बातम्या असतात. अगदी एका लहान मुलाला त्यच्या सावत्र बापाने मायक्रोव्हेव मध्ये घालून मारले अशी पण वाचल्याचे स्मरते. म्हणजे तसा माणूस सगळीकडे सारखाच आहे. तसाच पशुत्व सर्व देशात दिसते. पण शिक्षा होएईल ह्याची भीती आहे. कायदा आणि सुव्यवस्था ह्याची योग्य अंमलबजावणी परदेशात होते हे समक्ष पहिले आहे.

बाकी वरती मी ग्रंथालय बद्दल म्हणालो तसे हैदराबादला कोटी ह्या भागात मराठी ग्रंथालय आहे. तिथे लोक कमी असतील पण बरीच बरी पुस्तके दर्शनी भागात ठेवलेली बघितली पण भरपूर पुस्तके कपाटातून हाताळायला मिळणे हा प्रकार तसा आपल्याकडे कमीच आहे.

असो.

हम्म...

आता लंडन आणि बाकीच्या ठिकाणी ह्या घटना सर्रास घडतात हो. तिथला फुकट मिळणारा मेट्रो पेपरात ह्या अश्या अनेक बातम्या असतात. अगदी एका लहान मुलाला त्यच्या सावत्र बापाने मायक्रोव्हेव मध्ये घालून मारले अशी पण वाचल्याचे स्मरते.

उदाहरणच द्यायचं झालं तर मी ऑस्ट्रीयामध्ये काही काळ वास्तव्य केलय. तिथच, एका बापानं आपल्या पोरीलाच चोविस वर्षे खिडकीही नसलेल्या तळघरात तब्बल २४ वर्षे डांबून ठेउन असंख्य वेळा तिच्यावर बलात्कार केला होता. त्याच्यापासून तिला सात मुलं झाली होती. त्यापैकी एका अर्भकाला त्याने फर्नेसमध्ये जाळून मारलं होतं. तीन मुलं तिथंच तळघरात रहात होती. पण म्हणून देखिल मी एकूणच आपल्यादेशातल्या स्त्रियांच्या परिस्थितीची तुलना ऑस्ट्रीयाबरोबर करायला धजावणार नाही.

असो.

अवांतर होईल पण

अजून विसरलात -

३. परदेशी वारे लागल्यानंतर भारतात राहून भारताला नावे ठेवणारे

४. भारतात न राहता भारताला नावे ठेवणारे

ते असू दे. वरील लोकांचे वर्णन अनुभवातून आले असे धरले तरी तुम्ही बॉस्टनचा उल्लेख केलाच आहेत, म्हणून लिहीते. अवांतर आहे म्हणून पां ढर्‍या ठशात.

*गुन्हे सर्वत्र होतात. प्रमाण कमी अधिक.

एका तरुण मुलीबद्दल तिच्यावर झालेल्या बलात्कारावरून त्या मुलीबद्दल विनोद करणार्‍या अमेरिकेतल्या छोट्या गावातल्या फुटबॉल खेळाडूची कथा तुम्ही वाचली असेल (तसे तुम्ही जगभरातल्या गोष्टींबद्दल माहिती ठेवून असता असे दिसल्याने) असे गॄहित धरते. नसल्यास ही वाचावी असे सुचवते.
http://www.cnn.com/2013/01/04/justice/ohio-rape-online-video/index.html

तशीच दुसरी बॉस्टनमधली नाही, पण जवळचीच गोष्ट.
http://www.dailymail.co.uk/news/article-2222236/Four-teenagers-gang-rape...

अजून एक डिस्टर्बिंग बातमी.
http://www.boston.com/metrodesk/2012/12/06/wakefield-man-faces-more-than...

हे सर्व अमेरिकनांचे दोष दाखवण्यासाठी नाही. हे असे गुन्हेगारीचे घृणास्पद प्रकार सगळीकडे चाललेले असतात हे दाखवायचे आहे. बाकी, दिल्लीमध्ये स्त्रिया, मुले सुरक्षित नाहीत हे तर झालेच.
तशाच स्त्रिया आणि मुले इतरही अनेक ठिकाणी सुरक्षित नाहीत हे मानले तर त्यावर उपाय सुचतात, करता येतात. तसेच आपण कसे सुरक्षित राहू याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. कॉन्टेक्स्टमध्ये असले तर मुद्दाम धोके ओढवून घेऊ नये हा सल्ला मला पटतो.

लोक सर्वत्र सगळ्या प्रकारचे असतात. काही बरे आणि काही वाईट. आपल्या स्वतःचे किंवा आपल्या देशबांधवांचे किंवा एखाद्या जमातीचे जनरलायझेशन करून आयुष्यभर दोष देत बसणे मला निरर्थक वाटते. आपल्या आजूबाजूला जे काही चाललेले असते ते मागे घडून गेलेल्या गोष्टींचे सार असते. ते अचानक बदलत नाही. ते बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. लोकांचे शिक्षण हा खूप महत्त्वाचा उपाय आहे.

*

असो. मूळ मुद्यावर येते -
पाश्चिमात्य देशांत जे चांगले दिसते त्यामागचे कष्ट खूप असतात. ते दिसत नाहीत.
पुणेकर यांनी ते फार छान लिहीले आहे असे मला वाटले.
असो.

सहमत

पाश्चिमात्य देशांत जे चांगले दिसते त्यामागचे कष्ट खूप असतात. ते दिसत नाहीत.>> १०००% सहमत. आपल्याकडे एक संस्था आपण ६० वर्ष टिकवून ठेवू शकत नाही. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि लंडन स्कूल ऑफ एकोनोमिक्स ह्या संस्था आतून बघितल्या. तसेच एका संस्थेत १ वर्षा छोटा मनेजमेंटचा कोर्स केला. फरक जाणवतो हो. सगळ्याच संस्था चांगल्या नाहीयेत पण ज्या आहेत त्या दर्जा टिकवून आहेत. खूप मेहेनत घेतात. आपल्याकडे अगदी हाताच्या बोटावर मोजावेत इतके चांगले शिक्षक भेटतात. सगळीकडे प्रचंड मेहेनत आणि कष्ट दिसले. मुख्य फरक कायदा आणि सुव्यवस्था. आपण इथेच मार खातो.

ओ तै...

आपल्या स्वतःचे किंवा आपल्या देशबांधवांचे किंवा एखाद्या जमातीचे जनरलायझेशन करून आयुष्यभर दोष देत बसणे मला निरर्थक वाटते

तसं नाहिये. आपण कुठे चुकतो, कशात कमी आहोत हे माहित असण्यात आणि मान्य करण्यात कसलाही कमीपणा नाही. उलट ते कळल्याशिवाय सुधारणा होणारच नाही. एक संस्था गावं दत्तक घेते आणि तिथं विविध उपक्रम राबवते. मी तिथं शक्य तेंव्हा जाउन मदत करत असतो.

मला काय म्हणायचं आहे ते परत एकद सांगतो. प्रश्न फक्त बसमधे झालेला बलात्काराचा नाहिये. कुठलेशे आंजावरचे आकडे आणि बातम्या दाखवून तुमचं

हे असे गुन्हेगारीचे घृणास्पद प्रकार सगळीकडे चाललेले असतात..

लोक सर्वत्र सगळ्या प्रकारचे असतात. काही बरे आणि काही वाईट.

म्हणणं पटत नाही. मुद्दा फक्त त्या सहा नराधमांचा नाहिये. त्या संपुर्ण घटणाक्रमात त्यांच्या घरापर्यंत येण्याचं भाडं नाकारणारे रिक्षा चालक, वेळेत न येणारी डिटीसीची बस, परमिट नसलेली बस रस्त्यावर धाउ देणारी यंत्रणा, त्या दोघांना मदन न करणारे असंख्य लोकं, हद्दीवरून वाद घालणारे पोलिस, इस्पितळातली लोकं सगळे सगळे जबाबदार आहेत. द होल ब्लडी सिस्टीम इज रॉटन.

आणि हे एका मेडीकल विद्यार्थिनीबरोबर झालय. मला खूप काही महीत आहे असं अजिबातच नाही पण मी बिहार, उत्तरप्रदेश पंजाब पासून तामिळनाडूमधल्या नाव देखिल मला उच्चारता येणार नाही अशा गावातल्या अरूंद गल्ल्यात हिंडलो आहे. आणि हे सगळं बघायला इथं गेलच पाहिजे असंही नाही. अगदी पुण्या मुंबईत जिथं ४० ते ५०% लोकं स्लम मध्ये रहातात तिथं काय परिस्तिथी असेल असं वाटतं तुम्हाला?

पाश्चिमात्य देशांत जे चांगले दिसते त्यामागचे कष्ट खूप असतात.

अलबत! कष्ट आहेतच. ते तर कुणिही अमान्य करू शकत नाही.

असो.

अंमलबजावणी

तसा मी कमीच हिंडलो आहे. मुळात माझा स्वभावाच नाही. पण हैदराबाद काय आणि बंगलोर काय आणि पुणे काय. सगळीकडे जाणवणारा समान धागा म्हणजे असलेले नियम न पाळणे. मूळात ज्यांनी संस्कार करायचे तेच लोक नियम पाळत नाहीत मग बाकीचे कशाला पळतील. सगळीकडे आपण पोलिसाला चिरीमिर देतो. आताशा पोलीस स्वतःहूनच चिरीमि मागतात. म्हणजे आपणच सवय लावली. साधारणपणे १९९६-७ साली पुण्यात सिग्नल न पाळणे हा प्रकार चालू झाला होता. म्हणजे लाल दिवा असेल तर सरला सगळ्यांनी घुसायचे. हे करणे जसे अशिक्षित होते तितकेच शिक्षित पणे होते. आता ह्याला कोण काय करणार. सध्या हा प्रकार कमीच पाहायला मिळतो आहे. बरी गोष्ट आहे. पण मुळातच आपल्या ह्या चुका आपल्याला कश्या काय चालतात हाच मला प्रश्न पडला आहे. शिवाय सगळ्यांना माहिती असून देखील कोणीच काही करायला तयार नाही. कायद्याची जोपर्यंत कडक अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे असेच चालू रहाणार. इतके कायदे आहेत पण कोणी राबवायचे हाच प्रश्न आहे.

चिरिमिरी

आताशा पोलीस स्वतःहूनच चिरीमि मागतात.

तेंव्हाही तेच मागत होते. पण संपुर्ण यंत्रणा किडली आहे. सर्वसामान्यांना कायद्याची भिती न राहण्याचे एक मुख्य कारण म्हणजे कायदा सुव्यवस्था राखणारेच ती धाब्यावर बसवुन नोटा भरताना प्रत्येकजण पाहतो. काही करा, पैसे द्या अथवा राजकारण्यांचा वट वापरा आणि सुटा पुढच्या वेळेसाठी तेच करायला ही आपली संस्कृती झाली आहे. बर सर्व सामान्य पोलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जगणे पाहिल्यास ते तरी काय करणार हा प्रश्न येतोच. असाच मुद्दा शिक्षकांचा. समाज घडवणारे सांभाळणारे हे दोन घटक एवढे पिचलेले आणि रसातळाला गेले आहेत की फारशी चांगले विचार करवत नाही. क्रांती वगैरे होणे फार दुरची गोष्ट आहे. हा, पण बदल घडवायचा असेल तर स्वतःपासून हवा हे मात्र प्रत्येकाने आत्मसात करायला हवे.

सहमत

हैदराबादला राहत होतो त्या गल्लीत एका मारवाड्याने घर भांधायला काढले. आह्मी राहत होतो ते हवेशीर घर ह्याच्या घरामुळे एकदम कोंडवाडा होवून बसले. भिंती इतक्या वाजल की एका टागेत त्याच्या घरात जाऊ शाकू. म्हणजे हा प्रकार पूर्वी मी नगरला आजोळी पहिला होता. परंतू तेंव्हा घरे जुन्या धाटणीची होती. ह्या व्यतिरिक्त हा मारवाडी त्याच्या भावूबंधांना रात्री १० ते सकाळी ६ ह्या वेळात कामाला बोलवायचं. १ वर्ष झोप म्हणून अशी नाहीच. मुलाचे इतके हाल झाले की शेवटी त्याला मी पुण्याला पाठवले. गम्मत म्हणजे सगळे मागाहून त्याला नावे ठेवणार पण कोणीच त्याला जाब विचारायला तयार नाही. मी शेवटी वैतागून पोलिसात तक्रार केली. तर सगळे उलटेच झाले. मलाच आधी पोलिसाने झापले. मग मी दुसऱ्या स्टेशनला तक्रार केली. त्यांनी मारावाद्याक्डून मस्तपैकी हफ्ता वसुली केली १ महिना आणि नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

लंडनला जिथे राहत होतो त्या इमारती मध्ये २ कपल्स रात्री पिऊन धिंगाणा घालत असत. तेंव्हा कोणीही न सांगता सोसायटीने नोटीस बोर्डावर लगेच नोटीस लावली की रात्री १० नंतर घराबाहेर आवाज आला नाही पाहिजेल. १-२ वेळा वार्निंग दिली आणि नंतर चक्क पोलिसांना बोलावून घर खाली करायला लावले. हा फरक आहे. एकही गोष्ट आपण प्रामाणिकपणे करत नाही आणि जे करतात त्यांना नाउमेद करतो.

चित्र वाईट नक्कीच आहे

सध्याचे आपले चित्र नक्कीच खुप वाईट आहे. खास करुन मोठ्या शहरांमध्ये. पण गम्मत अशी आहे की भारतात अशी शहरे आहेत तरी किती? सुधारणा खरच खुप अशक्य आहे का? मुळात निर्नायकी अवस्था हे खरे दुखणे आहे. मला वाटते की अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे शेवटचे चांगले नायक असावेत त्यांना थोडाफार मान होता आणि जे पटत नाही ते पटत नाही हे सांगायची भिती नव्हती.
भारतात लोकशाहीचा अतिरेक झाला आहे हे खरे. प्रत्येकाला काही झाले कि व्यक्ति स्वातंत्र्यावर गदा, पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा वगैरे. जणू काही भारतात सगळीकडे गदा युद्धच सुरु आहे. या सगळ्याचा परिपाक सध्याची व्यवस्था बलण्यात/सुधारण्यात आहे असे मला वाटते.

आता अवांतर झालच आहे तर...

हैदराबादला राहत होतो त्या गल्लीत एका मारवाड्याने घर भांधायला काढले. आह्मी राहत होतो ते हवेशीर घर ह्याच्या घरामुळे एकदम कोंडवाडा होवून बसले. भिंती इतक्या वाजल की एका टागेत त्याच्या घरात जाऊ शाकू.

याचा तुम्हाला किती मनस्ताप झाला असेल ते मी स्वानुभवामुळे समजू शकतो. बहुतेक मोठ्या शहरांमध्ये असंच आहे. बंगरुळात तर हे प्रकरण अतिशय भिषण आहे. तिथं घर शोधताना नैसर्गिक प्रकाश आणि वायुविजन असणं म्हणजे खूपच लक्सुरिअस गोष्ट आहे हे माझ्या ध्यानी आलं. अगदी भाडं दहा-पंधरा हजार देण्याची तयारी असली तरी आणि गावाबाहेर रहाण्याची तयारी असली तरी अशी घरं मिळत नाहीत. लेक सिटी म्हणून ओळखलं जाणार्‍या या शहराचे छोटी-छोटी तळी बुजवून बांधकामं करून बारा वाजलेत. उलट मोठ्या तळ्याची तुंबलेली गटारं झालियेत. मी रहायचो त्याच्या पुढे मडीवाला लेक म्हणून जवळून जाताना देखिल नाक मुठित धरून जावं लागणारं तळं आहे. ते दरवर्षी थोडं थोडं बुजवून तिथं "लेक व्यु" प्रोजेक्ट्स सुरू होतात :). 'कावेरी वाटर सार' असं म्हणून एजंटने दिलेल्या घरात पाण्याची पातळी खाली गेल्यानं फक्त बोरचं मिळणारं पाणी दोन महिन्यात बंद झालं. किती खोल खणावं याचं बंधन न पाळता प्रत्येक वर्षी तिथल्या सोसायटीत पृथ्वीला आरपार भोक पडेपर्यंत बोरवेल खणतच आहेत.

त्यापूर्वी 'इलेक्ट्रॉनिक सीटी' म्हणून दिवसाला ५-६ तास लोडशेडींग होणारा भाग आहे तिथं रहात होतो. :). तिथं बिल्डींगवरच मोबाइल टॉवर होता. लाईट गेली की ते प्रचंड आवाजाचा जनरेटर चालू करत असतं. इतका मोठ्ठा आवाज की फोनवरचं बोलणंही ऐकू येत नसे. घरमालकाशी भांडून झालं, पोलिस तक्रार करून झालं पण तो प्रश्न मी घर सोडल्यावरच सुटला.

बन्गलोर

बंगलोरचा मला स्टे चांगला झाला. मल्लेश्वरममध्ये छोटेच पण बरे खर मिळाले होते. शिवाय माझी बहिण पण तिकडे राहायची त्यामुळे ठीक ठाक होते. च्यायला पण सगळीकडे हाच त्रास हो. मला नाही वाटत भारतात एक शहर असेल जिथे नीट कायदा लोक पाळतात. बाकी ह्या बंगलोर आणि पुण्यापेक्षा मला हैदराबाद जास्त आवडले. हैदराबादला जाताना सगळ्यांनी भीती घातली कुठे मुसलमान शहरात जातो वगैरे. पुण्यापेक्षा दशपटीने चांगले रस्ते आणि सुविधा. असो पण सगळीकडे सारखीच गर्दी. आताशा बंगलोर तर पाहवत नाही. ह्याच्याच उलट मला इंग्लंडमध्ये जाणवले की प्रयत्नपूर्वक घरांची आखणी आणि ठराविक लोकसंख्या झाल्यानंतर चक्क बांधकामांना परवानगी नाकारतात. थोडक्यात काय तारतम्य आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी जोपर्यंत आपल्याकडे होत नाही तोपर्यंत आपण असेच राहणार

:-)

अद्याप वाचते आहे. हा भाग थोडा मोठा वाटला.

तरी १-२ गोष्टी सोडून दिल्या

झालं खरा मोठा. पण तरी मी फारच त्रोटक लिहिले आहे आणि १-२ गोष्टी सोडून दिल्या. उदाहणार्थ सीबीबीसी हा लहान मुलांसाठी असलेला चानेल. १०-१२ मिनिटांचे छोटे छोटे इतके कार्यक्रम आहेत आणि त्याची गुणवत्ता खरोखर उच्च दर्जाची वाटली. टीमी टाईम अथवा चगिंगटन सारखे कार्यक्रम आपण मोठे पण एन्जोय करू असे आहेत. आपल्याकडे पण दिसतो हा चानेल. ह्याशिवाय बाकी न्यूज आणि टीवी वर लिहिता येईल. तिकडे गेल्यावर कळले की आपले जवळपास सगळे हिंदी सिनिमे आणि अगदी ६०-७० च्या दशकातातील गाजलेली गाणी हि इंग्रजी गाण्यान्वरून चक्क जशी च्या तशी धापलेली आहेत. हे म्हणजे फारच झाले असे वाटून गेले.

ढापलेली गाणी

ढापलेल्या गाण्यांबद्दल लिहू नका ते सर्वांनाच माहित असते पण चांगल्या टीव्ही चॅनेल्स बद्दल अवश्य वेगळ्या भागात लिहा

तरी १-२ गोष्टी सोडून दिल्या

तिकड्च्या शिक्षण पध्दतीबद्दल माहिती द्यावी वाचायला आवडेल.

इथेच माहिती लिहितो

मी इकडे आलो तेंव्हा मुलगा २.५ वर्षांचा होता. इथे सगळ्या मुलांना ३ वर्षांनतर दर आठवडयाला १५ तास विनाखर्च शिक्षणाचा नियम आहे. म्हणजे हे शिक्षण तुम्ही कौन्सिलच्या शाळेत म्हणजे थोडक्यात महानगरपालिकीच्या शाळेत घ्या अथवा कुठेही घ्या. म्हणजे काही पालक दिवसभर मुलांना नर्सरीमध्ये ठेवतात. तर दर आठवडयाला ह्या नर्सरी सरकारकडे त्या १५ तासांचे पैसे फॉर्म्स भरून मिळवतात म्हणजे थोडक्यात ग्रांट मिळवतात. जर का नर्सरी करत नसेल तर तुम्ही भरलेल्या करातून तुम्हाला सुट मिळते. तुमच्या ऑफिसमध्ये तसे सांगायचे म्हणजे पगारातूनच कर कापला जाताना कमी कापला जातो. घरापासून सगळ्यात जवळच्याच शाळेत तुम्हाला अडमिशन मिळते. म्हणजे आह्मी खूप ठिकाणी फॉर्म्स भरले पण जवळ्याच शाळेत तुम्हाला अडमिशन मिळते.
सर्व शाळांचे ईन्स्पेक्षन होवून त्याच्या माहिती http://www.ofsted.gov.uk/ ह्या वेबसाईटवर मिळते. सर्व शाळांचे मुल्यांकन करून अ दर्जा, ब दर्जा असे दिलेले असते. अ दर्जावाली अर्थातच चांगली. ह्या शाळात अडमिशन मिळवण्यासाठी बरेच लोक स्वतःचे राहते घर सोडून शाळेच्या जवळ भाड्याच्या घरात राहायला जाताना पहिले आहे. ह्याशिवाय अनेक लोक, मुख्यत्वे भारतीय, खोटी माहिती देवून अडमिशन मिळवतात. अर्थात पकडले गेलेल्या पण अनेक केसेस पहिल्या आहेत आणि १-२ लोकांना पोलीस कोठडीपण मिळाल्याची बातमी वाचली आहे. जरा अवांतर झाले. असो.
पण मुख्य मुद्दा सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. साधारणपणे ४ वर्षांची मुले झाली की त्यांना रिसेप्शन मध्ये म्हणजे बहुदल आपल्याकडे सिनियर के.जी. मध्ये अडमिशन मिळते. मग शाळा एकदम सकाळी ९ ते ३.३० पर्यंत होवून जाते. प्रत्येक वर्गात फार तर ३० मुलेच पाहायला मिळाली आणि प्रत्येक वर्गावर एक मुख्य शिक्षिका आणि तिच्या मदतीला ५ शिक्षक. पण हे दिवसभर असतात. म्हणजे आपल्याकडे एका वेळी एकाच शिक्षक तासावर असतो. पण ३-५ शिक्षक तासावर पहिले. मग दर ५ मुलांमागे एक शिक्षक असे गणित आहे. कधी कधी जेंव्हा शिक्षक कमी असतात तेंव्हा पालकांना मदतनीस म्हणून बोलावतात. माझ्या मुलाला सुरवातीला पूर्ण इंग्रजी मध्याचा फारच त्रास झाला. कारण हैदराबादला तसा तो घरातच होता. त्यामुळे एकदम शाळेत घातल्यावर तो फारच भांबावून गेला. मग कधीतरी म्हणाला की शाळेत त्याला बाकीचे त्रास देतात आणि टीचर लक्ष देत नाही. मग बायको मदतनीस म्हणून गेली काही दिवस. जसे त्याला थोडे थोडे बोलता आले किंवा टीचरला सांगता यायला लागले तसे जाणे बंद केले. पण मुख्य प्रश्न मुलांनाच की टीचरला ना सागता येणे. गोरी पोरे जरा जात्याच दांडगट वाटली. म्हणजे अंगापिंडाने मजबूतच आहे शिवाय काही मुले पार लहान वयातच आय माय ह्यांचा छान उद्धार करतात. मग शाळेतून पालकांना नोटीस जाते आणि कधी कधी फार झाले तर चक्क काढून टाकलेले पण पहिले.
खेळायला भरपूर वेग वेगळ्या गोष्ठी. रंग, पाणी आणि चिकणमाती ठेवलेलीच असते. ज्याला जे पाहिजेल तो ते खेळतो. दररोज १० मिनिटे फक्त सर्व मुलांना गोल करून गोष्ट सांगायला बसवतात. काही मुले बसताच नाहीत. आह्माला ६ महिन्यांनतर सांगितले की तुमचा मुलगा अजिबात बसत नाही त्याला जरा घरी बसायची सवय लावा. पण त्याला जवळपास १ वर्ष लागले पण तशी फारशी तक्रार आली नाही. कारण २-३ वर्षांची मुले किती बसणार हा दृष्टीकोन.
मात्र ४-५ वर्षांची झाली की हाच नियम चांगला कडक होताना पहिला. रिसेप्शनला पण भरपूर खेळायला मिळते. त्यामुळे दिवटा आनंदात होता. आमच्या समोर एक गुजराथी कुटुंब राहायचे. त्यांचा मुलगा जसा पहिलीत गेला तसा जाम वैतागला कारण आता खेळ बंद झाले आणि बराच अभ्यास वाढला. आपल्याकडे सर धोपट म्हणतात की इकडे काही शिकवत नाहीत वगैरे. उलट असे लक्षात आले की शाळेतच भरपूर अभ्यास करून घेतात. त्या गुज्जू मुलाला शालेतुउन कधीही अभ्यासाचे पुस्तक घरी आले नाही. मात्र त्याचे वाचन कमी होते म्हणून घरी वाचून घ्यायला वेग वेगळ्या लेव्हलची पुस्तके मिळायची. ह्या व्यतिरिक्त ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही त्यांच्यासाठी दर आठवड्याला १ तास वेगळा वर्ग असे. काही ठिकाणी तर चक्क हिंदी मधून पण सूचना दिलेल्याचे आईकीवत आहे. म्हणजे रेडिंगला एका शाळेत जवळपास ५०% भरतीय आणि पाकिस्तानी मुले होती तिकडे हा प्रकार चालायचा असे त्या शाळेत मुले असलेल्या पालकांनी सांगितले.
पण एकंदरीत आपल्यापेक्षा जरा कमीच त्रास देतात मुलांना. जास्त अपेक्षा नाहीत. म्हणजे आपल्याकडे ३ वर्षांच्या मुलाकडून लोक काय वाटेल ते घोकून घेतात. आह्मी इकडे फोन केला की आमचीच उजळणी व्हायची मुलाला आता ए तो झेड येते का. काही महाभागांनी त्यांच्या मुलाकडून पाढे पण पाठ करून घेतलेले पहिले. इथे मात्र पहिलीत आल्यानंतर पाढे आहेत. हे म्हणजे आपल्या लहानपणची आठवण झाली. पहिलीत गेल्या नंतरच तर पाढे आणि लिखाण होते. म्हणजे ह्यांनी उगचाच मुलांचे बालपण काही हिरावून घेतले नाहीये.
पण मुलांना शाळेत अजिबात रागावत नाहीत. फार तर एका खुर्चीवर बसवितात. त्याचा पण मुलांना फार राग येतो. सगळी पद्धत जरा अजबच आहे. म्हणजे ही लोक इतकी शिस्तप्रिय आहेत पण मुलांच्या बाबतीत एकदम लवचिक. ह्याचे परिणाम नंतर दिसतात. प्रचंड उद्दाम होतात. एकतर कायद्या प्रमाणे मुलांना मारता येत नाही त्यामुळे घरात आणि बाहेर कोणीच बोलत नसल्याने प्रचंड टवाळक्या आणि धुडगुस घालतात.
असो पण ह्या लोकांनी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था उत्तम ठेवली आहे. आपल्याकडच्या सारखी खाजगी शिक्षण पद्धती फारशी दिसली नाही. म्हणजे खासगी शाळा आहेतच पण तीअकडे म्हणजे प्रचंड श्रीमंत असेल तरच बाकी सर्सामान्य आणि अगदी श्रीमंतांची मुले पण महानगर्पलीकेच्याच शाळेत जातात. जवळपास प्रत्येक शाळेच्या जवळ अगदी ५-१० मिनिटे चालण्याच्या अंतरावर किमान २-३ तरी बघा मिळतील. हा प्रकार फार आवडला. आपल्याकडे हे झाले पाहिजेल. बागच नाहीत बुवा. एक ती ताथवडे बाग. ती पण इतकी खचाखच भरलेली आणि इथे इतक्या विस्तीर्ण बाग की काही विचारू नका.
शाळेत आणि मुख्य म्हणजे ग्रंथालयात खूप पुस्तके मिळतात. सगळी पुस्तके लहान मुलांच्या लेव्हलची वाटली. खूप खूप चित्र आणि काही काही पुस्तके तर आपल्या पंचतंत्र, चायनीज आणि जापनीज व अरेबियन पुस्तकांची भाषांतरे. त्यात वरती त्या त्या भाषेतल्या ओळी म्हणजे हिंदी/पंजाबी आणि बंगाली वगैरे आणि खाली इंग्रजी भाषांतर. त्याच्या जोडीला योग्य चित्र. म्हणजे भाषा कळली नाही तरी चित्रांवरून त्या गोष्टीचे आकलन होते. शिवाय सगळ्या गोष्टींमधून अजिबात नैतिकतेच आणि चांगल्या वागणुकीचा डोस मिळत नाही. मुले जशी वागतात तश्याच गोष्ठी आणि हेच मुलाने खूप एन्जोय केले असे म्हणीन मी.
आमच्या समोरच्या गुज्जू मुलाचे गणित चांगले होते तर त्याला पहिल्या सह महिन्यातच ते पुढील वर्षाच्या गणिताच्या तासाला पाठवायचे. असाच अनुभव माझ्या मराठी मित्राला आला. त्याचा मुलगा पूर्ण मराठी माध्यमातून इकडे पहिलीत आला. पहिल्या वर्षात शाळेने त्याच्या वर मेहेनत घेवून इंग्लिश शिकवले मग त्याने जशी लय पकडली तसे तसे त्याला ते वरच्या वर्गातल्या काही काही गोष्टी शिकवायचे. म्हणजे तो दुसरीत गेला तेंव्हा त्याचे इंग्रजी सोडून बाकीचे विषय ते ३ किंवा चौथीचे होते.
पण हे सगळे छान छान दहावी पर्यंतच आहे. नंतर शिक्षण प्रचंड महाग आहे. इतके दिवस जे ब्रिटीश नागरिक आहेत त्यांना कोलेजची फी ३००० पौंड होती आणि बाकीच्यांना ९०००-१२००० होती .म्हणजे ह्यांची सगळी सोय आपण बाहेरून आलेलो लोक करायची आणि सरकार पण कॉलेजेसना सढळ मदत करायचे पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. आता फी एकदम ९००० पौन्दापर्यंत वाढली आहे. त्याचा फटका अनेक लोकांना बसला आहे. त्यामुळे बरेचदा हे लोक १०-१२ होतात किंवा छोटी मोठी डिग्री घेतात. असो पण एकांदरीत सार्वजनिक शिक्षण व्यवस्था चांगली आहे असेच म्हणावे लागेल.

वेगळा लेख करा

वेगळा लेख करा बघू या प्रतिसादाचा

ठीक आहे.

हा इथला प्रतिसाद काढता येईल काय?

इथेही असू द्या

कॉपी पेस्टने स्वतंत्र लेख करा इतकेच.

रेल्वे

इंग्लंडातली रेल्वे प्रणाली चांगलीच आहे, शिवाय स्थानके देखील उत्तमरित्या सांभाळलेली आहेत. सेंट पान्क्रास, युस्टन, किंग्जक्रॉस ही लंडनमधली काही मोठी स्थानके बघण्याजोगी आहेत. पुणेकरांनी वर सांगितल्याप्रमाणे रेल्वे प्रवास महाग आहेच, अशात पुन्हा एक भाडेवाढ झाली आहे. अनेकदा रेल्वेऐवजी कोचने फिरणे स्वस्त पडते.

पुन्हा एक भाडेवाढ?

अवघड आहे. म्हणूनच म्हटले आपण भारतात खुपच स्वस्तात राहतो आणि आपल्याला फायदे सगळे तिकडच्या सारखे हवे असतात पण त्या साठी लागणारी किंमत द्यायची तयारी नाहीये. दुसरा प्रश्न लोकसंख्येचा आहे असे माझे मत आहे. कारण आपल्या सारखी बेसुमार लोकसंख्या असेल तर अशी प्रणाली चालणे कठीण आहे. सेंट पान्क्रास आणि किंग्जक्रॉस खरोखर पाहण्यासारखे आहे. क्लाफाम पण प्रचंड मोठे जंक्शन आहे.

हम्म...

बरोबर. लोकसंख्या आणि गरीबी.

आपल्याला फायदे सगळे तिकडच्या सारखे हवे असतात

तिकडच्या सारखी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था "फास्ट", "क्लीन", "रिलाएबल" नसली तरी किमान "सेफ" असावी असं वाटतं. एका वर्षात फक्त रेल्वे ट्रॅकवर आणि रेल्वेमुळे भारतात किती लोकं मरतात तो आकडा बघून वाईट वाटतं. आणि आपण ते "अपघात" समजतो. पण (माझ्या कामाचा संबंध सेफ्टी सिस्टीम्सशी येत असल्यामुळे) ते "अपघात" नसतात हे सांगू शकतो. काही केसेस मध्ये रेल्वे किरकोळ भरपाई करत असेल. पण ते अपघात होउ नये म्हणून यंत्रणा उभी करायला खूप पैसे लागतील आणि (खूप) तिकीटवाढ करून चालणार नाही कारण जिथं जवळजवळ ४०% लोकं पॉवर्टी लाईनच्या खाली रहात असतील, तिथं दरवषी हजारो लोकं मेली तरी चालतील पण करोडो लोकांना परवडणारी तिकीटं पाहिजेत. :(

बरोबर कि चुक?

जिथं जवळजवळ ४०% लोकं पॉवर्टी लाईनच्या खाली रहात असतील, तिथं दरवषी हजारो लोकं मेली तरी चालतील पण करोडो लोकांना परवडणारी तिकीटं पाहिजेत. :(

हे बरोबर कि चुक? आपण महत्व कशाला द्यायला हवे? सुविधा असण्याला कि असलेल्या सुविधांचा दर्जा सुधारण्याला?

एकदम रास्त प्रश्न

आहेत त्या सुविधांचा दर्जा सुधारला पाहिजेल. जवळपास ९ वर्षे बंगलोर आणि हैदराबाद हून दर १५ दिवसांनी पुण्याला जायचो. दर वेळी एकच अनुभव मधला बर्थ असेल तरच रात्रीची जरा झोप मिळेल. काही काही महत्वाच्या स्टेशनला तर एकदम लोक चढतात की आपण उठलो तर आपलीच जागा परत मिळेल ह्याची खात्री रहात नाही. कित्येक वेटिंगवरच प्रवास करतात. दारा जवळच्या जागा असतील विचारायलाच नको. स्वच्छतेच्या नावाने बोंबच. पण इंग्लंडच्या अनुभवावरून असे वाटते की आपल्याकडे फारच कमी तिकीट आहे. खर्च कसा काय भागवणार. माझा भाऊ रेल्वेमध्येच होता. त्याच्याकडून आईकलेले एक एक अनुभव विचित्र आहेत. लोकं रेल्वेचे समान चक्क पळवतात. लोखंड पळवतात आणि बाहेर विकतात. कुठे कुठे रेल्वे प्रशासन लक्ष ठेवणार. लोकांची मानसिकता पण विचित्र आहे. दर वेळी मत्री बदलला की तो त्याला पाहिजेल त्या मार्गाने नवी गाडी काढणार. त्यासाठी लागणारी यंत्रणा आणि तेवढे जाळे आहे क क्षमता आहे क ह्याची फारसा विचार नाही. :(( पण तरीही रेल्वेचे कौतुक आहे की ती चालू आहे.

 
^ वर