भारतीयांना भारतीय संस्कृती नकोशी झालीय का?

भारतात आल्यावर नेहेमीच काही तरी बदल पाहायला मिळतो. अलीकडे लोकांचा सूर पूर्णपणे बदलेला आढळतो. सगळ्याच प्रांतामधले कर्मचारी जेव्हा एखादी गोष्ट नजरेस आणून द्यायची असेल त्यावेळी सांगतात - Here in India THEY do it like this.., THEY call it xyx ..., इत्यादी
पूर्वी ते सांगत - Here in India WE do it like this.., WE call it xyx ..., हा बदल कशामुळे असावा? त्याचप्रमाणे पूर्वी Admin, Housekeeping चे लोक नमस्ते म्हणत असत, आता ते सुद्धा Hello Sir असेच म्हणतात.
त्याचप्रमाणे चित्रपट खूपच बदलेले दिसतात. कथा काही का असेना, काही भाग तरी परदेशात चित्रित झालेला आढळतो. किमान गाणी तरी.
भारतीय चवीचे जेवण असणारे hotel आणि Mcdonald ह्यापैकी गर्दी हि Mcdonald कडे जास्तच दिसते. हि स्थिती मुंबई, बंगलोर आणि दिल्ली सगळीकडेच आहे.
भारतीय team members नेहेमीच ग्लोबल level वर अपडेट असतात. पण त्यांना त्यांच्या प्रांताबद्दल, भाषेतील साहित्याबद्दल इतर काही माहिती विचारली तर सांगत येत नाही. क्रिकेट पेक्षा ते इंग्लिश Premier आणि F - १ वर भरभरून बोलतात.
ढोबळमानाने बरेच भारतीय म्हणता येतील अशी प्रतीके आता लोप पावत असल्याचे जाणवते.
भारतीयांना भारतीय संस्कृती नकोशी झालीय का, कि आता खऱ्या अर्थाने जागतीकीकरण झिरपत आहे?

Comments

इट्स बाउअंड टू हॅपन!

मला वाटतं जो पर्यंत आपण "सर्वीस प्रोवायडर" आहोत आणि ते "कस्टमर" आहेत तो पर्यंत हे असच चालत रहाणार. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे होउन आणि एव्हडी लोकसंख्या असून देखिल आपण "कस्टमर" बनू शकलो नाहे ही शोकांतिकाच.

मला नुकताच आलेला एक अनुभव सांगतो.

एक सहकार्‍याची अगदी पंधरा मिनिटानंतर युरोपियन कस्टमर बरोबर महत्वाची मिटींग व नंतर सोबतच लंच होतं तरी तो लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला होता.

मी: अबे पीपीटी अभीतक तैयार नाही हुई क्या हमेशा की तरह?
तो: अरे पीपीटी कल ही करके रखी थी, पर ये XXX गोरे लोग साले लंच के वक्त गंदे गंदे क्वेश्चन्स पुछते है. इंडीया मे कितने स्टेट्स है? ऑफिशियल लँग्वेजेस कितनी है? यही विकिपिडीआपे पढ रहा हूं. साले खूद विकिपिडीआपे क्युं नही पढते?

:)

इट्स बाउंड टु हॅपन बट...

फॉर एन्टायर्ली डिफ्रंट रीझन्स.
संस्कृती नेहमी बदलत असते. पंचवीस वर्षांपूर्वींच्या रीतीभाती आज नाहीत. आज कुणी मोठ्या माणसांच्या पायां पडताना (मुळात कुणी पायां पडतच नाही) दोन्ही हात पायांना लावत नाहीत. मुली आणि बायकासुद्धा एक हात जेमतेम लांबवून नमस्कार करतात. कालचे सोळा सोमवारचे व्रत आज नाही. आज मार्गशीर्षातले गुरुवार आहेत. आज शहरांमधूनतरी साडी अदृश्य होते आहे. तरुण मुली जीन्सकडे वळल्या आहेत. आज कुणी परवचा म्हणत नाही. त्याऐवजी संध्याकाळी योगा, आर्ट ऑव्ह लिविंग्,जिम वगैरेला जातात. सोमवारी रात्री सिद्धीविनायकाला पायी चालत जातात. शिरडीला पायी पालख्या, दिंड्या काढतात, वारीतही हौस म्हणून थोडा वेळ सामील होतात. आज वानप्रस्थामध्ये कुणी हरी हरी करीत बसत नाही. त्याऐवजी भटकंतीचे ग्रूप जॉइन करतात.
भारतीयांना जगाचे भान नाही हा पूर्वी आत्मटीकेचा विषय असायचा. तेव्हाही एखाद्या भारतीयाला अंबाला,धनबाद, गाझियाबाद कुठे आहे हे सांगता आले असते असे नाही. आता त्याला कमीत कमी न्यू यॉर्क, लॉझेंजिलीस, फ्रँक फुर्ट, अ‍ॅम्स्टरडॅम हे कुठे आहे ते तरी सांगता येते. (भलेही अंबाला धनबाद अजूनही त्याला माहीत नसतील). पंचवीस तीस वर्षांपूर्वींची मराठी आज नाही. भाऊ पाध्येंचीही भाषा आज शिळी वाटते. आज कुणी तूप-गूळ-पोळीचा लाडू न्याहारीला खात नाही. पराठे,डोसा,मॅगी,बटाटावडा खातात.
हे सर्व क्रमप्राप्त आहे. पण एक लक्षात घेणे जरूर आहे. ही जी बदलते आहे, ती संस्कृती भारतीयच आहे, बदलते आहे ती भाषा मराठीच आहे. फक्त ती आपल्या स्मरणात असलेली भाषा/संस्कृती नाही. ती आपल्या मुलांच्या स्मरणात राहाणार असलेली भाषा/संस्कृती आहे. आणि हे असे दर पिढीच्या बाबतीत घडत आलेले आहे. तेव्हा संस्कृतीच्या नावाने टाहो फोडण्यासारखे काही झालेले नाही.

सहमत आहे.

ही जी बदलते आहे, ती संस्कृती भारतीयच आहे, बदलते आहे ती भाषा मराठीच आहे. फक्त ती आपल्या स्मरणात असलेली भाषा/संस्कृती नाही. ती आपल्या मुलांच्या स्मरणात राहाणार असलेली भाषा/संस्कृती आहे.

राही यांचे वरील मत पटले.
बरेचदा आपण विनाकारण आपले पूर्वीचे दिवस आठवून 'गेले ते दिन गेले...' चा राग आळवत बसतो.

अमेरिकेला या

भारतीय पदार्थ, संस्कृती, सणवार वगैरे हवे असतील तर अमेरिकेला या.

शांघायला

किंवा शांघायला या. तुम्हाला संस्कृती नक्की कशाला म्हणायचे आहे?

उच्छाद

अरे काय चाललंय काय? ह्या नॉस्टाल्जियाने उच्छाद मांडलाय नुसता. कुठेही जा हा काही पाठ सोडत नाहीयेय. जेथे जातो तेथे हा माझा सांगाती, जालवितो सक्ती करूनिया. .

वडा-पाव

भारतीय चवीचे जेवण असणारे hotel आणि Mcdonald ह्यापैकी गर्दी हि Mcdonald कडे जास्तच दिसते.

अजिबात नाही. कोणत्याही शहरात Mcdonald + KFC + PizzaHut + PapaJones इत्यादींची एकत्रित संख्या भारतीय जेवणांच्या हॉटेलांच्या संख्येपेक्षा खूपच कमी आहे. व भारतीय जेवणांची हॉटेले ओस तर पडलेली नाहीत (पुण्यात कोणत्याही चांगल्या भारतीय जेवणांच्या हॉटेलां मध्ये टेबल करता रांग लावून वाट बघावी लागते) तेव्हां हम्बुर्गर किंवा पिझा खाणार्यांची संख्या पण कमी खूपच कमी आहे.

आणी संस्कृतीच्या spatial व temporal सीमारेषा काय? म्हणजे असे कि, भारतीय लोक पिझ्झा खावू लागले तर तो भारतीय संस्कृतीचा ह्रास असेल, तर त्याच न्यायाने पुण्यात जर कांदेपोहे व थालपीट ऐवजी मसाला-डोसा, इडली, उत्थपा, वडा-संभार याचा खप जास्त असल्यास तो मराठी संस्कृतीचा ह्रास म्हणायचा का? त्याच प्रमाणे चहा, कॉफी किंवा शर्ट pant आता तरी "आपले" झाले, का अजून ते "परकेच" आहेत ?

आणी जाता-जाता, पुण्यात सगळ्यात जास्त खपणारा पदार्थ वडा-पाव, किंवा त्याच इतका पॉपुलर पावभाजी, हे कोणत्या संस्कुतीतले पदार्थ ?

चुकीची निरिक्षणे

अलीकडे लोकांचा सूर पूर्णपणे बदलेला आढळतो. सगळ्याच प्रांतामधले कर्मचारी जेव्हा एखादी गोष्ट नजरेस आणून द्यायची असेल त्यावेळी सांगतात - Here in India THEY do it like this.., THEY call it xyx ..., इत्यादी>>>>

माझ्या मते ही English नीट येत नसल्या मुळे झालेली चुक असावी.

<<भारतीय चवीचे जेवण असणारे hotel आणि Mcdonald ह्यापैकी गर्दी हि Mcdonald कडे जास्तच दिसते<<>> भारतीय चवीची जेवण देणारी hotels १०० पट काय १००० पट जास्त आहेत MAC+Domino+PH etc पेक्षा. आणि सगळी भरुन वाहत आहेत.

<<क्रिकेट पेक्षा ते इंग्लिश Premier आणि F - १ वर भरभरून बोलतात.>>
Cricket कधी भारतीय संस्कृती चा भाग होता?

<<भारतीय team members नेहेमीच ग्लोबल level वर अपडेट असतात. पण त्यांना त्यांच्या प्रांताबद्दल, भाषेतील साहित्याबद्दल इतर काही माहिती विचारली तर सांगत येत नाह>>
एकुणच साहित्या बद्दल काही माहीती नसते, मग ते English मधले असो किंवा मायबोली मधले असो.

खरी भारतिय संस्कृती तर जोरात वाढत चालली आहे!!!

ज्या गोष्टींना खरी भारतीय संस्कृती म्हणुन ओळखायला पाहीजे त्या जोरात वाढत आहेत. उदाहणार्थ

१ - लग्नात हुंडा घेणे आणि मोठ्या प्रमाणावर खर्च आणि बडेजाव करणे.
२ - बुवाबाजी - आता तर गल्लोगल्ली महाराज आणि बुवा झाले आहेत, काही माता पण आहेत. सर्वांचे दुकान जोरात चालु आहे.
३ - भ्रष्टाचार - ही तर खरी भारतीय संस्कृती. ती ही जोरात वाढते आहे

"उपक्रम"

"उपक्रम" ला कुणीतरी वाचवा हो.

हा हा..

मला वाटतं मीच हा धागा गंभीरपणे आणि पोझिटीव्हली घेतला. :)

हो.

हो.

आता ह्यापुढील थोडे महत्वाचे प्रश्न -

बऱ्याच उपक्रमीन्ना बदल घडत आहे हे मान्य आहे. काही जणांनी बदल हाच भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे असे लिहिले.
काही जणांना 'गेले ते दिन गेले' इत्यादी म्हणून गळा काढण्यात अर्थ नाही असेही स्पष्ट केले. अमेरिकेचे अमान्त्रणही मिळाले.
आत काही महत्वाचे. भारतीय संस्कृती मधील एक प्रतिक म्हणजे, एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य काढणे आणि एकत्रित कुटुंब पद्धती.
एकत्रित कुटुंब पद्धती तर आता खूप कमी उरलेली दिसते जसे गुजराती, मारवाडी, इत्यादि समाजात. हि मोडकळ किती वेगाने होत आहे?
'एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य काढणे' हा भाग अजूनही पूर्वीसारखाच आहे का? की आता तो पण हळूहळू लोप पावत आहे?
वरील दोन गोष्टीमागील करणे कोणती आहेत? स्त्रीचे स्वत:च्या पायावर उभे राहणे?
कृपया प्रतिसाद द्यावेत. पुढील २/३ दशकांमध्ये भारताचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवन कसे असेल ह्यावर भर द्यावा.
आभार.

उत्सुकता..

'एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य काढणे' हा भाग अजूनही पूर्वीसारखाच आहे का? की आता तो पण हळूहळू लोप पावत आहे?

उत्सुकता लक्षात आली. ;) तुमचा अनुभव काय? :>

मर्मग्राही

आणि लक्ष्यवेधी/भेदी प्रतिसाद.

या पुढचा मुद्दा आत्ताच सांगावा

काही जणांनी बदल हाच भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे असे लिहिले.

भारतीयच नव्हे तर कोणत्याही संस्कृतीत बदल हे होतच असतात.

भारतीय संस्कृती मधील एक प्रतिक म्हणजे, एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य काढणे आणि एकत्रित कुटुंब पद्धती.

हा तुमचा मुख्य मुद्दा होता तर तुम्ही सुरवातीलाच तो मांडायला हवा होता. तुमचे आधीचे मुद्दे - चित्रपटांचे परदेशात चित्रण, McDonald, इंग्रजी बोलणे, - इत्यादी खोडून निघाल्या नंतर तुम्ही हा नवीन मुद्दा काढत आहात. लहान मुलांना कोडे घातल्या सारखे - त्याचे उत्तर दिलेस, मग आता याचे उत्तर सांग बघू. हा पण जर खोडून निघाला तर भारतीय संस्कृतीचे आणखीन नवीन महत्वाचे कोणते चिन्ह पुढे करणार ते आत्ताच सांगावे म्हणजे थेट त्याच्यावरच चर्चा करता येईल.

मिसळपाव...

मला वाटते अश्या प्रकारच्या चर्चांसाठी मिसळपाव उपलब्ध आहे.
उपक्रम वर माणूस काहीतरी बुद्धीला खाद्य मिळवण्यासाठी येतो.

ठ्ठो!

और ये लगाऽ सिक्षर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

(या प्रकारच्या प्रतिसादांसाठीही मिपा आहेच ;))

व्याख्या

सोन्स्क्रूती म्हंजे काय? तुम्हाला नक्की काय अभी प्रेत आहे ते आधी नीट लिवा ब्वा!

-सोन्स्क्रूतीक आडकित्ता

फलित

चर्चा सुरु कुठे होते ह्यापेक्षा ती कुठे आणि कशी संपते हे जास्त महत्वाचे आहे.
बहुदा उपक्रम वर कुठलीच चर्चा 'उपक्रम' होवून संपत नाही!!!

थोरा मोठ्यांची मुक्ताफळे

थोरा मोठ्यांची मुक्ताफळे ऐकल्यावर ही चर्चा पुन्हा एकदा आठवली. ;-)

वैचारिक मागासले पणा

आजकालची तथाकथित सुशिक्षित (?) इंग्रजाळलेली कॉन्व्हेंट एज्युकेटेड नवीन पिढी आणि कथित विज्ञानवादी नास्तिक ढोंगी (अ)विचारवंत यांना हिंदू धर्माचे आणि रूढी-परंपरांचे वावडे आहे. जुने ते सगळे टाकावू / मागासलेले आहे आणि धर्म,देव, संस्कार,संस्कृती याबद्दल आस्था दाखवणे म्हणजे वैचारिक मागासले पणा असे मानणारे अनेक लोक आहेत .......................!

विज्ञानवादी आणि नास्तिक

विज्ञानवादी आणि नास्तिक यांना हिंदू धर्माचे आणि रूढी-परंपरांचे वावडे असणे योग्य आहे पण म्हणून जुने ते सर्व टाकाऊ किंवा मागासलेले असा त्यांचा आवेश असतो यात फारसे तथ्य नाही.

 
^ वर