इंग्लंड वास्तव्यातले अनुभव-भाग २

काही काही अनुभव विलक्षण असतात. फार खोलवर परिणाम करून जातात. आज १२-१३ वर्षे झाली संगणक क्षेत्रात काम करून. इतकी वर्षे झाल्याने आणि बऱ्यापैकी टेक्निकाल आणि त्यातून प्रोडक्ट वाल्या कंपनी मध्ये काम केल्याने भलताच अहंगंड झाला होता. आपल्याला फार कळते आणि आपण फार हुशार आहोत असा की गोड गैरसमज. त्यातून हे गोरे सतत येत जाता कुठल्याही गोष्टीला ब्रीलीयंट, ग्रेट, एक्सलंट ह्याचा असा काही मारा करतात की आपल्याला म्हणजे मुठभर मासच चढते. पुन्हा प्रश्न पडतो की आपण तर असे काही लई भारी काम केले नाही मग इतके का कौतुक. हळूहळू लक्षात आले की ही त्यांची बोली भाषा आहे. सतत येता जाता थांकु आणि सॉरी म्हणणे हा त्याच्या जीवनाचा एका भागच आहे. त्यामुळे उगाचच हुरळून जाण्यात काही अर्थ नाही. म्हणजे वेळ आली की सरळ लाथ घालायला कमी करत नाहीत आणि मग टे गोड बोलणे कुठच्या कुठे जाते. आपण तोपर्यंत असे वाटून घेतो की हे आपल्याला फार मानतात आणि आपण आता इथे छान काम वगैरे केले आहे मग एक दोन गोष्टी इकडे तिकडे झाल्याने असा काय फरक पडतो. हा खास आपला भारतीय बाणा. आपण आपले १-२ अपराध असेच पोटात घालतो किंवा सांभाळून घायचा प्रयत्न करतो असला काही प्रकार तीनही क्लायंटकडे बघायला मिळाला नाही. वेळ आली की सरळ बाहेर. फार तर १-२ वार्निग्स. मग त्यातून गोरे गोऱ्यांना पण सोडत नाहीत. हा अनुभव पहिल्याच क्लायंटकडे पहिल्याने जरा सावध झालो.
शेवटच्या क्लायंटकडे मात्र आलेला अनुभव फार काही शिकवून गेला. साधारणपणे गेल्या १० वर्षात इतकी प्रोजेक्ट्स केली पण मुळातून एखादी कंपनी आयटी मुळे वर खाली होताना पहिल्यांदाच बघायला मिळाले. क्लायंट लहान होता आणि मी एकटाच सुरवातीला त्याच्याकडे होतो. नंतर २ स्पेन वरून कन्सलटंट आले. इथे अनुभवला फारच किंमत आणि त्यातून एकाच ठिकाणी आधी काम केले असेल की लगेच तुम्हाला ते परत बोलावितात. भारतात नुसते टेक्निकल वर टेक्निकल इंटरव्ह्यू द्यायची सवय. इकडे मात्र भलतेच प्रश्न विचारले. तुझ्या प्रोजेक्ट मध्ये काय प्रोब्लेम्स आले. ते कसे सोडवले. किती वेळ लागला. तुझा वाट किती. सगळा प्रोजेक्ट नीट सांग. हा अनुभव वेगळा होता. भारतात प्रश्न विचारताना एकएका टेक्निकल गोष्टींचा कीस पडतात इथे मात्र ह्या प्रशांपुढे खरोखर काम केले नसेल तर उघडे पडायला वेळ लागायच्या नाही.
प्रोजेक्ट चालू झाल्या नंतर ६-७ महिन्यात क्लायंटच्या लक्षात आले की ही नवीन सिस्टीम आपल्याला झेपणारी नाही. पण पेरेंट कंपनीच्या निर्णयाला नाकारता पण येईना. जुनी सिस्टीम एकदम सुटसुटीत आणि त्यांना पाहिजेल तशी बनवलेली. नवीन इआरपी सिस्टीम मात्र इतकी किचकट की सगळ्या जुन्या लोकांना घाम फुटला. कोणीच वापरायला तयार होएईना. सगळ्यांना भीती आपण ह्या नव्या सिस्टीममुळे बाहेर जाणार नाही ना. हा अनुभव फारच हादरवून गेला. म्हणजे जुन्या लोकांचा होणारा कोंडमारा इतक्या जवळून पहिल्यांदाच बघायला मिळाला. इथे आपल्या आई वडिलांना मोबाईल हाताळता येत नाही म्हणून खिल्ली उडवलेली पण जेंव्हा हाच प्रश्न पोटापाण्याचा झाला तेंव्हा मात्र त्यातली गंभीरता लक्षात आली. उद्या आपल्यावर पण हीच वेळ कधी ना कधी येणार आहे ह्याची एकदम जाणीव झाली.
गोष्टी ह्या थराला गेल्या की क्लायंटच्या फायनान्स डायरेक्टरने राजीनामा दिला. २ दिवसात सेल्स डायरेक्टरने पण हाय खाल्ली. क्लायंटचा सिएओ इतके दिवस निवांत होता. फार काही लक्ष घालत नव्हता. मग एक दिवस तो स्वतःच बसला सगळी सिस्टीम समजून घेतली. पर्चेसिंग्चा ६२ वर्षांचा डायरेक्टर निवृत्त होणार होता. त्याला गळ घालवून त्याने २ वर्ष थांबले. हा ६२ वर्षांचा बाबा बाकीच्या सगळ्या तरुणांपेक्षा त्या सिस्टमला न घाबरता समोर गेला. दोघांनी मिळून आणि आमच्या ३ लोकांच्या सहाय्याने सगळ्या नव्या प्रोसेसेस बसवल्या. बाकीच्यांना धीर देवून सगळे प्रोजेक्ट पूर्ण होएइपर्यन्त सिएओ बाबा जगाचा हलला नाही. लीडर कसा असावा ह्याचा उत्तम नमुना पाहायला मिळाला.

फायनान्स डायरेक्टर मला आवडायचा. बराच बोलघेवडा होता आणि जरा सांभाळून घेताना होता. त्याची होणारी घुसमट फारच जवळून पहिली. नवीन तंत्रज्ञानाने होणारे बदल इतके विचित्र असतील असे कधीही
वाटले नव्हते. जोडीला त्याचा मुलगा आता १७ वर्षांचा झाला होता आणि अजून त्याच्याच जवळ राहत
होता ह्याचा एक वेगळा ताप त्याच्या डोक्याला होता. म्हणजे आपण आईकून होतो की मुले लवकर घराबाहेर पडतात वगैरे. पण इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहत होते. इथे बापच आपल्याला मुलाच्या बाहेर जाण्याची
वाट बघत होता. त्याचे त्याने आता बघावे. माझा आपला भाबडा प्रश्न की तो कुठे राहील. त्याच्या शिक्षणाचे
काय वगैरे. त्यावर त्याला कर्ज मिळेल. कुठल्या साईडला जायचे ते तो त्याचे ठरवेल. म्हणजे मुलगा व मुलगी शिकून बाहेर पडेपर्यंत चांगला २० ते ३० हजार पौंडाच्या कर्जत बुडालेला असतो. शिवाय लवकर नोकरी मिळेल ह्याची काहीच खात्री नाही. मग घर घ्याचे दडपण. म्हजे ते पण कर्जच. शिवाय कार तर हवीच.
म्हणजे असे करता करता प्रचंड कर्ज इथे प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. म्हणजे की मंडळी लिव्हिंग बियोंड मिन्स हा काय प्रकार आहे हे त्याच्या तोडून कळले. पण लेकाचे निवांतच असतात. कारण जे काही होएईल ते सगळ्यांचेच होणार आहे. शिवाय पेन्शन मिळणार असल्याने आणि स्टेट वेगवेगळे भत्ते देत असल्याने खायची सोय आहे ह्याची खात्री आहे. ह्यावर एका मित्राशी चर्चा करताना असे मत बनले की आपण उद्यासाठी जगतो आहोत. म्हणजे मरमर करून आपण पैसे साठवतो, कायम २ पैसे गाठीला असावेत आणि अंथरून पाहून पसरावेत पण इथे सगळे उलट मामला आहे. कारण उद्याची सोय आहे. शिवाय लोकांनी पैसे खर्च केले नाहीत तर सरकार चालणार कसे. म्हणजे इथे तुमच्या खिशात पैसेच शिल्लक राहू शकत नाहीत अशी सगळी व्यवस्था आहे. आपण बाहेर येतो. कसेही काटकसरीत राहतो. म्हणजे भारतात माज असतो. घरी १-२ लोक पण कामाला ठेवू इथे मात्र कातरून कातरून किंवा दाताच्या कण्या खाणे ही म्हण सार्थ करून पैसे वाचवतो. पण इथेच ज्याला कायमचे राहायचे आहे त्याचे अवघड आहे. घराचे कर्ज, वीज आणि गैस चे बिल, पाणीपट्टी असला एक एक खर्च आहे की इथला सामान्य माणूस आपल्याकडच मध्यमवर्गीय माणूस ह्यात काही फरक नाही वाटला. हिवाळ्यात कित्येक लोक गरिबीत ढकलेले जातात कारण हिटिंगचा खर्च परवडत नाही. काही काही वयस्कर लोक थंडीने गारठून गेल्याच्या बातम्या पण पहिल्या. म्हणजे जवानी आहे तोपर्यंत चंगळ करून घ्या नंतर कठीण आहे.

असो तर हा फायनान्स डायरेक्टर गेल्या नंतर फार वाईट वाटले. म्हणजे वयाच्या ५२ व्या वर्षी एकदम सगळे रोजचे कामाचे स्वरूप बदलायचे आणि त्याचा येत असलेला ताण काय असतो ते बघितले की एकदम गालाबालायला झाले. नंतर ३-४ महिन्यांनी दुसरीकडे नोकरी मिळाल्याची ईमेल आली आणि बरे वाटले. एकदम सिईओला छेडले त्याच्या बद्दल तेंव्हा सिईओ पण म्हणाला मला असे काही होएईल असे वाटलेच नाही रे. म्हणजे बदल होणार आहे आणि तो बराच मोठा असेल असे सगळ्यांनाच माहिती होते. पण जेंव्हा झाला तेंव्हा म्हणजे एकदम उलाथापालाथच झाली. नवीन फायनान्स डायरेक्टरला खास ट्रेनिग्साठी यू.एस. पाठविले. तेंव्हा हळहळला म्हणाला हेच मला आधी का नाही सुचले. आपली चूक इतक्या प्रांजळपणे कबुल करणारा इतक्या वरच्या लेव्हलचा माणूस पहिल्यांदाच बघितला.

२०११ला तिकडे अपत्य प्राप्ती झाली आणि अजून काही गोष्टी कळल्या. म्हणजे आपल्याकडे जसे केळवण करतात तसे हे लोक बेबी शौवर करतात. बाळंतीणीला भेटायला येताना पौष्टीक काहीतरी घेवून येणार. आपल्या सारखीच सगळे काही ना काही मदत करतात. म्हणजे फार काही फरक जाणवला नाही आपल्या आणि ह्यांच्या पद्धतीमध्ये. फक्त रात्री कितीही रडले तरी पोराला आपल्या जवळ घेत नाहीत. त्यावर सरळ उत्तर उद्या सकाळी मला ऑफिस आहे. ह्याच्याकडे बघत बसलो तर रोज उशीर होएईल आणि ते परवडणार नाही. एकंदर हा प्रकार मला प्राकटीकल वाटला. इथे आपल्याकडे आपण भलतेच लाड करतो. आमचे दिवटे रात्र रात्र झोपत नसे. मग त्याच्या बरोबर आपण पण जागा हा प्रकार. म्हणजे महिना महिना झोप नाही. त्यांचे ते बरोबर सवयी लावतात. रात्री ७-८ ला सगळी मुले झोपलेली असतात आणि सकाळी ५-६ ला उठतात. म्हणजे हल्ली आपल्याकडे लोक रात्री कितीही वेळ जगतात असला काही प्रकार नाही. शुक्रवार, शनिवारी आणि रविवार काय जगायचे ते जगातील पण बाकीच्या आठवड्यात ठरलेले वेळापत्रक. हा जरा धक्का होता मला. अगदी खूप पूर्वी ११९९० च्या आधी रात्री ९ ला झोपलेलो आठवले. तेंव्हा कोणाकडे ९ वाजता जायचे म्हणजे कठीणच होते. म्हजे हे लोक त्यांची जीवनशैली तशी जपूनच आहेत असे वाटले.

ह्या क्लायंटकडे असाल ब्रिटीश लोक होते. बरीच मंडळी चांगली २०-३० वर्ष संसार करणारी दिसली. म्हणजे सरसकट आपल्याकडे असे विधान केले जाते की इकडे कुटुंब संस्था नाहीये वगैरे. मला तर उलट अनुभव आला. फक्त पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा वाटला. उगाचच तंगड्यात तंगडे नाही. एक जन आयरिश होता. आणि एका क्रेडीट कंट्रोलर बाई ग्रीक होती. नवरा ब्रिटीश होता. दोघांची कुटुंबे ही आपल्या भरतोय कुटुंबांसारखीच भली थोरली. ५-६ बने ३-४ भाऊ. त्यांची मुले वगैरे. म्हणजे उगाच आपली संस्कृती महान हा भ्रम जरा दूर झाला. ख्रिसमसला आपल्या सारखेच एकत्र जमणे आणि एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे. काही फरक नाही.

बाकी आयरिश आणि ब्रिटीश, स्कॉटिश आणि ब्रिटीश आणि वेल्श आणि ब्रिटीश अशी भारत पाकिस्तान वाग्युद्धे पण पाहायला मिळाला. आणि हो जुन्या कंपनीमध्ये एक तमिळ होता आणि एक मल्लू होता. आणि मल्लू सांगतो हे तमिळ आमच्याकडे भांडी घासतात. आह्मी तसे श्रीमंत लोक आहोत. प्रत्येकाला नारळी, पोफळीची बाग आहे. आणि बाग काम करायला हे तमिलनाडूमधून लोक आह्मी ठेवतो. ध्यानात ही एक नवीनच भर.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

आपल्याकडे असे विधान केले जाते की इकडे कुटुंब संस्था नाहीये वगैरे.

जसं दाखवलं जातं तसं दिसतं. ज्या बातम्या झळकतात तशीच संस्कृती असते असे नाही. आज भारतीय वृत्तपत्रे कोणी वाचली तर बालात्कारांच्या बातम्या वाचून घाम फुटेल. एखाद्याला हा बलात्काऱ्यांचा देश वाटेल... दोन चार महिन्यांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती असो.

परदेशातील इंटरव्यू

भारतात नुसते टेक्निकल वर टेक्निकल इंटरव्ह्यू द्यायची सवय. इकडे मात्र भलतेच प्रश्न विचारले. तुझ्या प्रोजेक्ट मध्ये काय प्रोब्लेम्स आले. ते कसे सोडवले. किती वेळ लागला. तुझा वाट किती. सगळा प्रोजेक्ट नीट सांग. हा अनुभव वेगळा होता. भारतात प्रश्न विचारताना एकएका टेक्निकल गोष्टींचा कीस पडतात इथे मात्र ह्या प्रशांपुढे खरोखर काम केले नसेल तर उघडे पडायला वेळ लागायच्या नाही.

:-) अगदी खरे. भारतात इंटरव्यू देताना इंटरव्यू घेणारे अतिशय आढत्येने बोलतात आणि इंटरव्यूला आलेला गरजू असल्याने आपण त्याचा कसाही पाणउतारा करू शकतो अशी काहीशी स्थिती असते. निदान माझा तरी अनुभव काही ठिकाणी असा होता. तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगत असला तरी कीस काढून तुम्हाला कसे खोटे पाडता येईल यात तर अगदी आनंद मानला जातो.

त्याच्या अगदी उलट स्थिती मला अमेरिकेत दिसते. इंटरव्यूला आलेल्याला इतके कम्फर्टेबल करायचे की तोच तुमच्या डोक्यावर बसून तुम्हाला ४ गोष्टी शिकवेल. टेक्निकल डिटेल्समध्ये घुसण्याऐवजी माणसाचे कम्युनिकेशन, त्याचे टीमवर्क, त्याच्या आवडी निवडी असल्या गोष्टींवर अधिक भर, मग यातून नको ते लोक निवडायचे.

माझ्या ऑफिसात हे दोन-चार वेळा झाल्यावर मी वैतागून नाराजी दाखवली की थोडा ब्यालन्स दाखवा. तेव्हा पासून परिस्थिती थोडीशी बरी आहे आणि हा ब्यालन्स असेल तर पुस्तकी technical पोपटपंची कोण करते आहे आणि प्रत्यक्ष काम करणारे कोण आहे याची पक्की खबर लागते.

सहमत

तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगत असला तरी कीस काढून तुम्हाला कसे खोटे पाडता येईल यात तर अगदी आनंद मानला जातो.>> १३ वर्षांच्या आयटी अनुभवाने खेदाने असे म्हणावेसे वाटते की आपण म्हणजे ओझी वाहाणारे बैल व गाढवं आहोत. कुलीच म्हटले पाहिजेल. इतके कौतुक आपल्या आयटी वाल्यांचे एक चांगले प्रोडक्ट आपल्याला करता आले नाही. सगळे बाहेरच होते. लाज वाटली पाहिजेल. पण सगळे नुसते मिळणारा पैसाच बघतात. काहीतरी चांगले करावे असे वातावरणाच नाहीये. माझ्या पहिल्या आयटी कंपनीमध्ये ४ क्लायंट होते. प्रत्येकडे तीच एम.आर.पी. सिस्टीम कंपनीने थोड्याफार फरकाने इम्प्लीमेंट केली होती. म्हणजे इथपर्यंत डोके होते पण ह्याचे प्रोडक्ट करून विकावे असे का वाटले नाही ह्याचे मला कोडेच वाटते. अश्या अनेक छोट्या कंपन्या आहेत आपल्याकडे पण प्रोडक्ट का होत नाही हेच मला कळत नाही.
त्या चीनने निदान प्रचंड लोकांना सामावून घेणारे कारखाने उघडले. जरी मला स्वतःला आयटीमुळेच भार्पुत फायदा झाला तरी असे म्हणावेसे वाटते की आपल्याकडे आयटीचे फुकट कौतुक चालले आहे असे माझे मत आहे बुवा.

कौतुक

जग भारताकडे डोके असलेले स्वस्त कामगार जे कोडींगसाठी लागतात आणि चीनकडे स्वस्त कामगार जे उत्पादनासाठी कारखान्यात लागतात असेच पाहते. चीनने त्याचा फायदा करुन घेतला पण आपण नाही.

एक मनोवृत्ती

गेल्या महिन्यात एक इंटरव्यू घेताना एक अनुभव आला. एक भारतीय मुलाखतीसाठी आला होता. अतिशय स्मार्ट होता आणि हुशारही... बोलता बोलता असं कळलं की माझ्या बॉसने आणि त्याने (एकत्र नव्हे) पूर्वी एका कंपनीत काम केले होते. बॉसने जुनी चौकशी सुरू केली की तिथे तो हा आहे का, तो आहे का अजून वगैरे.... मग बोलताना पवन नावाच्या आणखी एका भारतीयाचा विषय निघाला. माझ्या बॉसचे या पवनबद्दल मत अतिशय चांगले होते असे वाटते कारण मुलाखतीला आलेला ही व्यक्ती म्हणाली की "पवनने गेल्या आठवड्यातच रिझाइन केलं, तो इतरत्र जातो आहे."

आता आमचे बॉस पडले अघळपघळ. ते म्हणाले "अरेच्चा! मला माहित असतं तर त्याला इथेच बोलावलं असतं." आणि त्या एका वाक्यानिशी या व्यक्तीचा सर्व मूड बदलला. या व्यक्तीने पवन कसा कामचोर होता, त्याचे टीमशी कसे पटत नव्हते, त्याला इंस्ट्रक्शन फॉलो करण्यात कसा इगो आडवा येत होता, त्याचे कम्युनिकेशन कसे खराब होते याचे कीस्से आम्हाला सांगितले.

सर्व इंटरव्यू चांगला होऊन केवळ या शेवटच्या किश्श्यांसाठी त्याला रिजेक्ट करण्यात आले.

 
^ वर