इंग्लंड वस्तव्यातले अनुभव

२००९ ते २०१२ असे तीन वर्ष इंग्लंड देशी वास्तव्य करण्याचा योग आला. एकंदरीत ३ शहरांमध्ये राहिलो. सर्व प्रथम आलो तेंव्हा साहेबाच्या देशात आपला कसा काय टिकाव लागायचा ह्याची चिंता होती. आपले विंग्रजी एकदम मराठोत्भाव त्यामुळे जरा धाक्धुकच होती. सुरवातीला जाम वैताग आला. ह्या गोऱ्या लोकांचे इंग्रजी पण आपल्या मराठी सारखेच कुस बदलते. म्हणजे वेल्श आणि स्कॉटिश लोकांचे इंग्रजी हे लंडन आणि सावुथ मधल्यांपेक्षा फारच वेगळे आहे. कंपनीच्या कामासाठी पहिल्यांदा जेंव्हा ग्लासगोचे विमान पकडले तेंव्हा आपण कुठल्या तरी वेगळ्याच प्रदेशात जात आहोत ह्याची जाणीव झाली. ते लोक काय बोलत होते तेच काही कळत नव्हते. जेंव्हा ग्लास्गोव मध्ये पोहोचलो तेंव्हा लक्षात आले की ते इतके भरभर बोलत होते आणि इंग्रजीवर तिथल्या प्रादेशिक भाषेचा प्रचंड प्रभाव होता. किंवा बोलण्यातला हेल म्हणा. तोच अनुभव आयरिश आणि वेल्श लोकांशी बोलताना आला. त्यांच्या पेक्षा आपले बरे म्हणायची वेळ आली. ग्लास्गोव मधल्या क्लायंटला सांगितले बाबा रे तू काय म्हणतोयस ते पन्नास हजार फुटावरून जात आहे. तेंव्हा मग तो हळू हळू बोलायला लागला. एक एक वाक्य तूटक बोलल्यावर ७०% कळले. म्हणजे फाईलला फील म्हणायचे, फाईनला फिन म्हणायचे. असले एक एक उच्चार.

पहिल्यांदा आल्यावर इथली स्वच्छता आणि हिरवळ ह्याचे मोठे अप्रूप वाटले. अर्थात हे सगळ्यांचे होते म्हणा. पण जवळून बघता मला असे वाटते की मुळातच लोकसंख्या कमी असल्याने हे सगळे जमत असावे. अर्थात सर्वाजीनिक ठिकाणी कचरा टाकू नये हे लहानपणा पासून शिकवले जाते पण बस मध्ये वा बागेत सतत कोणी ना कोणीतरी कचरा उचलत असतात. शिवाय जवळपास अगदी १०० मीटर अंतरावर पण कचरापेटी असते. ह्याने बहुदा फरक पडत असावा. पटकन कचरा टाकायला काहीतरी सोय आहे. चेल्सीच्या फुटबॉल स्टेडियमवर एक सामना बघायला गेलो होतो. तिथल्या सार्वजनिक मुतारीची अवस्था आणि आपल्याकडच्या कुठल्याही मुतारीची अवस्था सारखीच होती. बस मध्ये पण हाच अनुभव आला. लंडनच्या जवळ एका थीम पार्क जवळ माझे ऑफिस होते. जशी उन्हाळ्याची सुटी लागेल तसे लहान मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे जथ्थेच्या जथ्थे येत असत. सकाळी स्वच्छ असलेली बस संध्याकाळी बरेचदा दारूच्या, कोकाकोला वा तत्सम पेयांच्या कॅनने भरलेली असे. वेफर्स खावून टाकलेली पाकिटे आणि केळाची साले आणि चुईन्गम खावून सीटच्या खाली जिकडे तिकडे उरलेली चिकटवलेले असे. म्हणजे लोक सगळीकडे सारखेच असतात. परंतू बसचा ड्रायव्हर शेवटच्या थांब्याला सगळ्या बस मध्ये हिंडून राहिलेले सामान वा कचरा उचलताना पहिला. एक दोन वेळा माझा कोट मी विसरलो आणि तो चक्क बसच्या आगारातून परत मिळाला. अगदी छत्री पण मिळाली. ह्या अनुभवाने काय बाबा छान साहेबाचा देश. लोक कसे प्रामाणिक असे मत झाले. पण लगेच २ महिन्यात आमचे विमान जमिनीवर आले. मित्राचा मोबाईल रस्त्यात पडला तो काही मिळाला नाही. मग थोड्याच दिवसांनी त्याच्या घरात ३ वेळेला चोरी झाली. त्याच्या किचनचे काम करायला आलेल्याने मास्टर चावी ची नक्कल करून सगळ्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी लांबवल्या. एकाही गोष्टी परत मिळाली नाही परंतू एका वर्षात पोलिसांनी छडा लावून अटक केली.

सार्वजनिक मात्र वाखाणण्याजोगी आहे. कुठल्या गावापासून कुठल्या गावापर्यंत सार्वजनिक सेवा आहे. क्लायंटकडे काम करत होतो त्याचा २०वा वर्धापन दिन कुठल्या तरी एकदम सरे जिल्ह्यातल्या अडजागेत केला. तिकडे जायला २ बस एका रेल्वे असे करून अगदी रात्री उशिरा पर्यंत जायला मिळाले. बीआरटी कशी असावी ह्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. सर्व बसेस रस्त्याच्या डावीकडून जातात. एकाही कार बीआरटीच्या मार्गात आलेली पहिली नाहीये. नियम कडकपणे सगळे पाळत होते. जागोजागी सीसीटीव्ही कामेरे. कुठेही चुकलात की लगेच घरी नोटीस. जगाच्या जागी तुमच्या लायसन्स वर पाईनट कापले जातात. असे १२ झाले की लाय्संस्न कान्सेल. ह्यातून कोणीही सुटत नाही. जागोजागी पार्किंगची उत्तम सोये आणि त्यातलं चांगले २-१० पौंड तिकीट. आपल्याकडे फारच स्वस्तात सुटतो हो. लंडनमध्ये बस सेवा अगदी दर८-१२ मिनिटांनी. म्हणजे तुम्ही १-२ बस जावून थांबलात तरी फार काही वाटत नाही. हाच अनुभव बाकीच्या ठिकाणी पण. प्रत्येक बस थांब्यावर बसचे वेळापत्रक. आणि बऱ्याच प्रमाणात ते पाळले पण जाताना पहिले. ( हा म्हणजे फारच धक्का आहे बुवा. आह्मी पीएमटीने पिंपरीला जायचो तेंव्हा मनपाला बसले तर बस मिळेल ह्याची खात्री नाहीतर राम भरोसे. येताना ए.च च्या समोर कधी १२१-१२२ लवकर थांबणार नाही. अगदी बस रिकामी असली तरीही. त्यासाठी फुकट पिंपरी पर्यंत चालत जायचे. अर्थात हा अनुभव १० वर्षांपूर्वीचा आहे. सध्याचा काय माहिती नाही. ). पण कलमाडी बाबा नक्कीच लंडनला आला असेल त्याला बीआरटी बस अशी रस्त्याच्या मध्ये कुठे दिसली काय माहिती बुवा. पुण्यात त्या सातारा रस्त्यावर काय करून ठेवले आहे ते पाहिल्यावर म्हणजे हा अनुभव भलताच होता. एकंदरीत आपल्या लोकांचे इमप्लीमेंटेशन चुकले असे म्हटले पाहिजेल. कल्पना योग्य रीतीने राबवली असती तर बीआरटीला इतका नक्की विरोध झाला नसता. असो.

दुसरा अनुभव ऑफिसच्या सहकाऱ्यांचा. मी एकटाच काळा माणूस बाकी सगळे अस्सल गोरे. म्हणजे तसा हा क्लायंट पहिलाच पहिला. सगळीकडे एक तरी भरतोय भेटतोच. पण हा क्लायंट म्हणजे एकदम जातिवंत इंग्रज म्हणायला पाहिजेल. कंपनीची एक शाखा सेंट्रल युरोपात पण होती. तिकडे पण कोणीच भारतीय नाही. तसा मी बराच धास्तावालोच होतो. पण एकदम उत्तम अनुभव. कोणीही कधीही माझ्या विग्रजीला हसले नाही की माझ्या अस्सल भारतीय वेशाला पण नावे ठेवली नाहीत. हा अनुभव वेगळा होता. आधीच्या ठिकाणी बाकीच्या भरतोय सहकार्यांनीच इतकी भीती घातली होती की कुठल्या तुरुंगात आलो असे वाटायचे. इकडे एकदम निवांत. काम झाले की बस बाकी काहीही कर. सगळे लोक एकदम सडपातळ आणि भरपूर व्यायाम करणारे. कोणी आठवड्याला १००-१५० मैल सायकल चालवेल. तर कोणी २-२ तास रोज पोहेल. एक जण रोज २० किलोमीटर पोहायचा. कितीही थंडी असो वा पावूस पडो ह्यांच्या व्यायामात आणि दिनचर्येत काहीच फरक नाही. सगळे सकाळी ८ च्या ठोक्याला हजर. हे पाहून मला म्हणजे माझी फारच लाज वाटली. कोणे एके काळी मी भरपूर व्यायाम करत असे. अगदी दिवसाला २००-३०० जोर आणि पोहणे वगैरे. पण आताशा काहीच करत नाही. पुण्यात तर चालणे म्हणजे पापाच. आणि इथे जनता नुसती ताड ताड चालते काय. पोट पुढे असलेले तर फारच कमी दिसले.
सकाळी कामाच्या वेळेच्या आधी १० मिनिटे तरी येणार. च्यायला आपल्याला फार कमी वेळेला जमले बुवा. हे शिकले पाहिजेल असे वाटले काही वेळेला पाळले पण पुन्हा पुण्यात आल्यावर ये रे माझ्या मागल्या. :)

आधीच्या क्लायंटकडे २ भरतोय आयटी कंपन्या होत्या. आमच्या दोन्ही कंपन्यांमध्ये कोन स्वस्तात काम करतो ह्याची चढाओढ. त्यातुने क्लायंटने १ दिवस जरी थांबायला सांगितले तरी लोक थांबायची. हा प्रकार अजब होता. म्हणजे इतक्या पातळीला जावून क्लायंटपुढे लोटांगण घालायचे की कधी कधी वैताग यायचा. बाकीच्या वेळी प्रोजेक्ट मध्ये क्लायंट एकदम फ्लेक्सझीबल त्याला एखादी गोष्ट आत्ता होणार नाही हे सांगितलेले चालायचे पण आपले लोकच भ्यायचे. बाकीचे गोरे लोक जे आपल्यासारखेच होते ते निवांत. बिनधास्त मालाला आणि आपले सगळे एकदम गुढगे टेकून काय वाटेल त्या मागण्या मान्य करायचे. शिवाय इतके होवून गोऱ्यांना जास्त भाव आणि आपल्या कंपन्या कमालीच्या थीन मर्जीन वर काम करायच्या. हा प्रकार अजबच होता. अर्थात हे ३ क्लायंटकडच्या अनुभांवर आहे. कदाचित बाकीच्यांना वेगळा पण असू शकेल. पण जीताक्यांना भेटलो ते सगळे हाच प्रकार सांगतात.

असो बाकी १-२ गोष्टी लिहावयाच्या आहेत त्या नंतर लिहितो. आत्ता इतके लिहून थांबतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

शुद्धलेखन

शुद्धलेखनासाठी थोडा वेळ खर्च करा.
बस आणि मुतारीची अवस्था इंग्लंडात पण अशीच आहे होय! मग आपल्या भारतीयांना लाज वाटण्याचे काही कारण नाही.

लाज

तिथल्या मुतार्‍या आणि आपल्याला लाज याचा संबंध काय? हि मानसिकता झेपली नाही बुवा. चीनमध्ये आपल्या इतकीच लोकंसंख्या असुन रस्त्यावरच्या मुतार्‍या स्वच्छ असतात. मग लाज वाटावी कि नको? तुमची मानसिकता काय सांगते येथे?

माझा मुद्दा

बहुदा घाटपांडे उपरोधाने म्हणाले असावेत असे माझे मत आहे. काय थापा मारतो बे!!! असो. माझा मुद्दा नीट मला मांडता आला नसावा. वरवर आपल्याला सगळे स्वच्छ, छान दिसते. परंतू त्यासाठी लागणारी यंत्रणा आणि अंमलबजावणीची चोख व्यवस्था ह्यावर आपल्याकडे फारसे लिहिल्याचे अथवा वाचल्याचे दिसत नाही. उदाहरणार्थ सामान्य लोकांचा पगार फार तर महिना २००० ते २४०० पौंड आहे. इथले खर्च बघता हा पगार कमीच आहे. दर महिन्याला साधारणपणे ९५-२०० च्या आसपास महापालिकेचा कर असतो. सर्व शहर ए ते फ मध्ये विभागले आहे. ए ला सगळ्यात खालचा कर असतो पण हा भाग तसा बाकीच्यांच्या मानाने बाकाल असतो. बरेचदा गरीब आणि शासनाकडून आलेल्या पैशांवर लोक राहतात. मी साधारणपणे क ते ड विभागात राहिलो तिथे १२० ते १६७ पौंड पर्यंत शहरांप्रमाणे कर भरला आहे. म्हणजे लंडनला १६७ तर रेडीनग्ला १२०. म्हणजे पगाराच्या प्रमाणात कर जबरदस्त आहे. मग त्यातून जर क सुविधा निर्माण केल्या तर त्या नक्कीच चांगल्या असतील असे माझे मत आहे.
दुसरा फरक म्हणजे जवळपास सगळ्यांना सारखाच कर आहे. म्हणजे आमच्या पुण्याच्या घराला तुलनेने कमी घरपट्टी आहे कारण घर १९७० सालात घेतले आहे आणि नवीन घराला जोरदार आहे. हा फरक मी इथे पहिला नाही. स्कॉटलंडचे माहिती नाही. पण स्कॉटलंड आणि वेल्श मध्ये इंग्लंडपेक्षा कमी कर आहेत असे आईकून आहे. आणि इंग्लंडमधले लोक त्यांना शिव्या घालतात की आह्मी ह्यांना पोसतो म्हणून.
तिसरा फरक साक्षरतेचा. मुळातच सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बरी आहे. त्यामुळे किमान शिक्षण मिळून शाळेमध्येच स्वच्छतेचे चांगले संस्कार होतात. आपल्याकडे सुलभ शौचालय मध्ये सगळ्याच प्रकारचे लोक जातात मग त्यांच्याकडून एकदम चांगले वागण्याची अपेक्षा कशी काय आपण करतो.

त्यातून ह्या सगळ्या आमदार, खासदार, नगरसेवकांची मुले इथेच शिकतात. पन्नासदा शैक्षणिक सहली काढतात मग हे लोक काय शिकतात इथे येवून?

मला नाही वाटत

नक्की काय ते घाटपांडेच सांगू शकतील. मला वाटत की स्वच्छता घरापासून सुरु होते. कदाचित आपल्याकडच्या अस्वच्छतेचे मूळ कारण घरातच आहे. ते ही खास करुन स्वच्छता स्त्रियांनी ठेवायची पुरुषांनी नाही या मानसिकतेमधुन. असे करणे अनेक पुरुषांचा जन्म सिद्ध हक्कच आहे हे अनेकदा बायकांनी पटवून घतल्याचे सुद्धा अगदी जवळच्या नात्यांमध्ये सुद्धा पाहिले आहे. चक्क व्यसने पुरुषांनी नाहितर मग कुणी असा संवाद मी जवळच्या नात्यातच ऐकला आहे. जर असे विचार असतील तर तु कर रे घाण मी करेन साफ असे म्हणणे काहीच अवघड नाही. जसे असे संस्कार घरात असतील आणि अशा घरांचा समाज असेल तर स्वच्छतेची अपेक्षा ठेवायची का? असेच एक उदाहरण घरात संडास असण्यावरुन सुद्धा ऐकले आहे. अनेक घरांमध्ये कॉमन संडास वापरायची सवय असलेल्या एका स्नेह्यांना जेंव्हा फ्लॅट संस्कृतीची ओळख झाली तेंव्हा घरातल्या घरात संडासला जाणे त्यांना अवघडल्यासारखे वाटे. असो, ही काही उदाहरणे. मुळात आपले काम झाल्या झाल्या कामाचा परिसर नीटनेटका आहे का? अशी सवय असल्यास त्याचा फायदा सर्वत्र होतो असा माझा अनुभव आहे. भारतीयांमध्ये स्वच्छतेचे वावडे का आहे हा अत्यंत वाईट आणि अधी न उत्तर मिळणारा प्रश्न आहे. मुळात समाजा प्रती आपले काही कर्तव्य आहे ही भावनाच गायब आहे. आपल्या येथे समाज जातीपासून सुरु होतो आणि जातीतच संपतो. मग कर्तव्य राहिले दुरच आपल्या हक्कांसाठी दांडगटपणा करणे हा हक्क समजला जातोय.

थोडक्यात

थोडक्यात आपल्याकडच्या मुतार्‍या व बस या मधील अस्वच्छता पहाता तुलनेनी प्रगत असलेल्या इंग्लडात स्वच्छ असावे अशी अपेक्षा आहे. पण तिथेही तोच प्रकार असेल तर आपण अपराधगंड बाळगण्याचे कारण नाही. चीनचे उदाहरण घेण्यासारखेच आहे. तो भाग वेगळा

हेच तर

पण तिथेही तोच प्रकार असेल तर आपण अपराधगंड बाळगण्याचे कारण नाही.

हेच तर कळत नाहीये. तिथला प्रकार योग्य आणि इथला अयोग्य अशी भावना का आहे? जर असे मत असेल तर मग लग्ना आगोदर तिथे जे काही सर्रास चालते त्याला योग्य नाही म्हणत पण त्यावेळी इथे मात्र शील महत्वाचे का? माफ करा पण आपल्या भारतीयांचे हे गंड अत्यंत सोयिस्कर असतात हे आपण मान्य करायला हवे. भारतीयांच्या स्वच्छता, लैंगिकता, धार्मिकता आणि अशा अनेक संकल्पना खरच अनाकलनीय आहेत.

अपराधगंड

मुळात तुलना करताना समान गोष्टींची करावी. आपल्याकडे एक तर आपण लै भारी आणि आपली संस्कृती सगळ्यात चांगली नाहीतर आपण म्हणजे एकदम निर्बुद्ध आणि मागासलेले अशी भावना आहे.

माणूस सगळीकडे सारखाच आहे. कुठेही गेलात तरी मूळ स्वभावात काहीच फरक नाहीये. घरापासून सुरवात करा हे बरोबर आहे. पण घरातला कचरा कुठे टाकणार? ती कचराकुंडी रोजच्या रोज उचलली जाते का? मी राहत होतो तिथे कौन्सिल कडून दर महिन्याला ओला कचरा वेगळा करण्यासाठी एक वेगळी प्लास्टिक सारखी पण नैसर्गिक विघटन होणारी पिशवी मिळायची. दर महिन्याला ती पोस्ट मिळत होती. आपल्याकाडे ओल्या कचऱ्याला झालेला विरोध मला आठवतो आहे. मुळात समाजाला आपण काय करतो आहोत ह्याचे शिक्षण कोण देणार. पुन्हा राहून राहून मला वाटते की कायदा नीट राबवला गेला तर जरब बसते. शिक्षा होएईल ह्याची भीती बसली की माणूस आपोआप सरळ होतो. इथे कशाचीच भीती नाहीये. जरा शिक्षा व्हायला लागली की धर्म आणि जातीचे राजकारण. काहीच नसेल तर बडी धेंडे आपोआप सुटता.

लंडन मध्ये पण हेच पाहायला मिळाले. जिथे सीसीटीव्ही कामेरे नाहीयेत ह्याची ज्यांना माहिती होती ते बिनधास्त जोरात कार चालवताना मी स्वतः अनुभवलेले आहे. रस्त्यात वा बस मध्ये कचऱ्याचे म्हणाल तर ५०% लोक स्वताहून कचरा उचलताना पहिली पण तितकीच लोक कचरा आणि बाकी घाण जिथे तिथे टाकताना पहिली. परंतू फरक हा आहे की कचरा टाकायला फुटाफुटावर कचरापेटी आहे. नाहीतर सतत कोणी ना कोणी तरी कचरा उचलताना दिसते. त्यांच्याकडे अत्यंत सुयोग्य अशी वाहने आणि हत्यारे होती. सगळ्यांकडे हातात घालायला हातमोजे होते. म्हणजे हा पसारा आपल्याकडे मला काही पाहायला मिळाला नाही. जोपर्यंत ह्या बाकीच्या सोयी सुद्धा होत नाहीत तोपर्यंत आहे हे असेच चालणार.

आपल्याकडे

त्यांच्याकडे अत्यंत सुयोग्य अशी वाहने आणि हत्यारे होती.

आपल्याकडे सुद्धा असतात. पण ती फक्त कागदावर. कारण त्या शिवाय राजकारणी आणि नोकरशहा यांची पोटे कशी भरणार?
प्रत्येक चांगली गोष्ट जी तिथे आहे ति येथे जशीच्या तशी हवी हा हट्ट मला पटत नाही. आपल्या गरजा वेगळ्या आहेत. पण त्या वेगळ्या आहेत हे मान्यच होत नाही. तिकडे जसे आहे तसे इथे हवे हा हट्ट असतो. का? तर जसेच्य तसे करण्याच्या योजना राबवून मधल्या मध्ये मलिदा खाता येतो.

शांघायमध्ये लुजिआझुईला असलेला रिंगरोडचा चौक हा स्वारगेट सारखाच आहे. ५-६ रस्ते एकत्र, बस स्टँड तिथेच आणि पर्ल टॉवर पण तिथेच. तिथे ज्या प्रकार रस्ता आणि पर्यायी चालण्याची व्यवस्था केली आहे ती पाहून स्वारगेटचा प्रश्न सुटेल असे वाटते. पण नाही. तिथे बीआरटीचा बट्ट्याबोळ करुन अवस्था आणखी वाईट करुन टाकली आहे. लोकांचा कराचा पैसा वाया घालवला आहे.

उपरोध का खरच?

शुद्धलेखनासाठी जरूर प्रयत्न करीन. मला जरा टाईप करायला भलताच जास्त वेळ लागतो आहे. आणि काही वेळेला शब्द फारच विचित्र होतात त्यामुळे मी आपले गूगल मराठी वापरतो आहे. ते जरा वापरायला सोपे आहे.

बाकी बस आणि मुतारी बद्दल आपण खरच म्हणता का आपली उपरोधाने एक कोपरखळी मारलीत? बाकी प्रत्येक फेरी नंतर बस ड्रायव्हर मात्र इमाने इतबारे सगळी बस फिरून जे काही हाताला लागेल ते उचलताना सहा महिने बघितले आहे. हा फरक नक्कीच आहे.

लोकसंख्या नाही घनता महत्वाची

UK ची लोकसंख्या जरी भारता पेक्षा कमी असली तरी घनता ( Population Density ) भारता पेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रत्येज माणसा मागे जमीन कमी उपलब्ध आहे. तशीच जपान ची घनता सुद्धा खुप जास्त आहे.

घनता

मला असे वाटते की हे सगळे शब्दखेळ आहेत. माझ्या डोळयांना हे दिसते की रांगेत १० लोक आहेत की १०० मग त्याच्या घनतेशी संबंध असो वा लोक्संखेशी. चेल्सी स्टेडियमवर होणारी गर्दी प्रमाणाबाहेर गेल्यावर आपल्याकडे जे होते तेच तिथे पहिले. दुसरे उदाहरण २०१० मध्ये ३१ डिसेंबरला रात्री लंडन वाटरलूच्या जवळ रात्री फटके पाहण्यासाठी गेलो होतो. तिथे २ बाजूला २ पूल आहेत. रात्री त्या पुलांवरून फटके पाहण्यासाठी तोबा गर्दी होती. पण फरक असा की त्या पुलावर की लोक जातील हे पोलीस मोजत होते. म्हणजे बरीकेड मधून जाताना पोलिसांच्या हातात एक छोटे खटका असलेले काहीतरी यंत्र होते. प्रत्येक माणसागणिक तो पोलीस खटका दाबत होता. आणि एक ठराविक लोक झाल्यावर त्यांनी चक्क पुलावर जायला बंदी केली. त्याच पुलाच्या बाजूला लोकांसाठी तात्पुरती मुतारी उभारली होती. ३ तास मी मुलासोबत पुलावर होतो . २ वेळेला तिथे गेलो. पहिल्यांदा एकदम स्वच्छ असलेली मुतारी दुसर्यान्न्दा अगदी जाववेना इतकी घाण झाली . म्हणजे जितकी जास्त लोक तितके ते स्वच्छ ठेवणे कठीण गेले.

जुन्या घरांना कमी कर हे ईन्ग्लंड मधे पण आहे

जुन्या घरांना कमी कर हे UK मधे पण आहे. माझ्या २००५ च्या घराला १९८५ च्या पेक्षा बराच counsil tax जास्त होता.
तिथे कर जास्त आहे आणि त्याचा वापर हि ९०% होतो, भारतात ९०% कर खाल्ला जातो भ्रष्टाचारात

हे माहिती नव्हते

धन्यवाद. हे माहिती नव्हते. किंवा पाह्यला मिळाले नाही. ३-४ मित्र बाकीच्या ठिकाणी राहायाचे पण त्यांचा पण कर साधारणपणे तसाच होता.

रोचक

परदेशात नव्याने गेलेल्यांच्या नजरेत भरणार्‍या गोष्टी त्याच असल्या तरी प्रत्येकजण त्या कशा मांडतो हे पाहणे रोचक वाटते. त्यामुळे हा लेखही आवडला. पुढला भाग असल्यास लवकर टाका.

आधीच्या क्लायंटकडे २ भरतोय आयटी कंपन्या होत्या. आमच्या दोन्ही कंपन्यांमध्ये कोन स्वस्तात काम करतो ह्याची चढाओढ.

खरं रे बाबा!

फारसे रुचले नाही.

इथे स्वानुभवकथन.. अर्थाच चक्क ललित!?
असो. त्या दृष्टीनेही फारसे रुचले नाही.

अनुभव

आपले म्हणणे बरोबर आहे. पण मला असे वाटले की अनुभव जरूर सांगावा. आपल्याकडे फारच तुटपुंज्या आणि ऐकीव माहितीवर आपण मते बनवतो आणि प्रत्यक्षात परिस्थिती फारच वेगळी असते. १०-१२ दिवसात लोक फिरायला येतात आणि तेवढ्यावर वर्णने करतात पण जेंव्हा आपण बरेच दिवस राहतो तेंव्हा बाकी माहिती पण कळते. पण हे स्वानुभव इथे लिहिणे योग्य नसेल तर जरूर सांगावे. मी अजून एक टाकायचा विचार करत होतो. तिथल्या रेल्वे आणि पेन्शन पद्धतीवर.

अवश्य लिहा

प्रवास वर्णने, स्वानुभव आणि त्यातून आलेली निरीक्षणे यावर उपक्रमावर या पूर्वीही लेखन झालेले आहे. लेखाचा दर्जा बघून असे* लेखन नेहमीच येथे ठेवण्यात आले आहे. तेव्हा अवश्य लिहा.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

* यनांचे लेख, सुधीर काळेंचे सिगरेट मुक्तीचे लेख, चंद्रशेखर यांचा ध्वनी प्रदूषणाचा स्वानुभव, आनंद घारेन्चा आजारपणावरील लेख असे ललित भासणारे पण उपक्रमांच्या धोरणात बसणारे अनेक लेख येथे आहेत.

वाचायला आवडेलच.. मात्र..

मला वैयक्तीकरीत्या वाचायला आवडेलच.
मात्र यास ललित म्हणावे किंवा कसे याबद्द्ल उपक्रमपंत खुलासा करतीलच

योग्य सदर

बहुदा माझे सदर चुकले की काय असे वाटले. असो. बाकी आत्ताच अजून एक लेख टाकल आहे. तो पण पुन्हा अंतरराष्ट्रीय आणि अनुभव ह्याच खाली टाकला संपादकांनी हे ठिकाण योग्य नसेल तर जरूर सांगावे. म्हणजे योग्य सदराखाली लेख हलवता येईल.

योग्य आहे

योग्य आहे. काळजी नसावी.

खोडे घालणार्‍यांकडे दुर्लक्ष केले की ते गप्प बसतात. अन्यथा, त्यांची खबर उपक्रमपंत घेतीलच. तुम्ही लेखन करा.

ललित

संपादक, हे काय आहे? ललित की माहिती? जर स्वानुभव कथन ललित असेल तर चंद्रशेखर यांचे लेख पण ललित सदरात पकडावेत काय?

जाऊ द्या ना

जाऊ दे की. काय कसे आहे ते माहित्ये ना सर्वाना. :-)

नाही जरा

नाही जरा गोंधळ उडाला. एका संकेतस्थळाचा संपादक विचारतो आहे म्हटल्यावर विचार केला. मी आपला सामान्य सदस्य. मग प्रश्न पडतातच. शेवटी त्यांनी पण अनुभव कथनच केले ना?

चंद्रशेखरांचे माहितीपूर्ण लेखनच

माझ्या मते त्या लेखनात नैसर्गिक लालित्य असले तरवाचकांच्यामाहिती नीरस होऊ नये इतपत आहे असे वाटते. त्या लेखांत 'अनुभवकथन' नसून त्या स्थळाची ऐतिहासीक+स्थापत्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.

अर्थात हे वैयक्तिक मत झाले. उपक्रमपंत किंवा संपादक मंड़ळाने लेखन अजून ठेवले आहे त्याअर्थी यास ललित म्हणणे चुकीचेही असेल

धन्यवाद

अर्थात हे वैयक्तिक मत झाले. उपक्रमपंत किंवा संपादक मंड़ळाने लेखन अजून ठेवले आहे त्याअर्थी यास ललित म्हणणे चुकीचेही असेल

धन्यवाद हे जर लक्षात आले असेल तर कृपा करून लेखाचा आस्वाद घ्या.

आजी आजोबांच्या गोष्टी

(तुमचीच)"आजी आजोबांच्या गोष्टी" ही उपक्रमावरची हिट्ट मालिका मलाही प्रचंड आवडली होती.
आम्ही उतरवून संगणकावरच ठेउन निवांत वाचली होती.
तीही ललित अंगानेच जाणारी.
पण लालित्य हा दोष नसून अलंकार समजावा असे वाटते. निदान असाध्य रोग तरी समजू नये.
हा "लेख माहितीपर नाही" ही तक्रार करणे शक्य आहे. "लेख ललित आहे" ही दखलपात्र तक्रार नसावी.

सहमत

सहमत आहेच. उपक्रमावर ललित अंगाने जाणारे माहितीपर लेखन बरेच आहे याची कल्पना आहेच. वर प्रियाली यांनीही काहि उदाहरणे दिली आहेतच.
फक्त हे लेखन 'तशा' लेखनात बसत नाही असा माझा अंदाज/समज होता/आहे. आता इतक्या जणांना हे लेखन माहितीपूर्ण वाटत असल्याने माझा समज बहुमतात नाही असे दिसते आहे. असो.

श्री पुणेकर, माझ्या प्रतिसादामुळे या धाग्यावर अवांतर चर्चा झाली त्याबद्दल क्षमस्व!

माझ्याकडून या धाग्यावर इत्यलम्

मला तरी माहिती मिळाली

मी इंग्लंडात कधी गेलो नाही. जाण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. हे लेखन मला माहितीपूर्ण वाटले.प्रतिसादांमधून झालेला जगातील विविध ठिकाणच्या मुताऱ्यांचा उहापोहही उद्भोधक वाटला.

त्या दृष्टीनेही?

ललित किंवा स्वानुभवकथन वगळता इतर कोणत्या दृष्टीने रुचले नाही? तुम्ही 'ही' वापरले आहे म्हणून विचारले.

 
^ वर