अनुभव

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - शनिवारवाडा - अहमदनगर – घृष्णेश्वर - औरंगाबाद

या वर्षीच्या सुरवातीला ०३ जानेवारी ते २५ जानेवारी २०१२ रोजी सुमारे २५० जणांनी “ पुणे ते पानिपत ” असा दुचाकीवर सुमारे ६००० किमी चा प्रवास केला. प्रवासात उन, हाडं गोठवणारी थंडी, मुसळधार पाऊस या सर्वांचा सामना करत हि मोहीम मावळ्यांनी यशस्वी केली. या मोहिमेचं सगळं श्रेय जातं ते आयोजक डॉ. संदीप महिंद यांना.

अजि म्यां ब्रह्म ऐकिले........

पृष्ठप्रांगण अर्थात ब्याकग्रौंड :

शुक्रवारी अर्थात २४ आगष्टास संध्याकाळी ६ वाजता केसरीवाड्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली ध्वनिफीत ऐकायला मिळणार आहे अशी बातमी ईईई सकाळात बुधवारी वाचली. मग म्हटले प्रत्यक्ष लोकमान्यांचा आवाज ऐकायला गेलेचि पाहिजे. गेलो मग केसरीवाड्यात.

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.

त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'. आणि बहुतेक सगळ्या धरणांच्या बाबतीत होतं तसं इथेही पुनर्वसनाच्या नावाने बोंब आहे. मात्र मागच्या आठवड्यात मेल आलं की आता तिथे सत्याग्रह चालू होतोय. सत्याग्रह म्हणजे, आपल्या हक्काच्या जमिनीवर पेरणी करणं, तिथे ठाम उभं राहणं. पाणी चढलं तरी हरकत नाही. पाहिजे तर बुडून मरू पण हक्क सोडायचा नाही. नर्मदेतले अशा पद्धतीचे फोटो बघितलेच असतील बहुतेकांनी. इथेही तसंच काहीसं.

सिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल

स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वदूर पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.

एका साम्राज्याच्या शोधात; कार्ले गुंफा -भाग १

भारताच्या पश्चिम समुद्रकिनार्‍यालगतच असलेल्या सह्याद्री पर्वतराजीच्या एका कानाकोपर्‍यात असलेल्या नाणेघाटाच्या माथ्यावर असलेल्या गुंफेला मी दिलेल्या भेटीला आता जवळजवळ एक वर्ष होऊन गेले आहे.

ध्यान (मेडीटेशन) आणि त्याचे फायदे.....१

निरनिराळ्या व्यवसायातील व्यक्तींच्या दिनक्रमाचा विचार केल्यास असे आढळते कि त्यांच्या कामाचे स्वरूप जरी वेगळे असले, काम करण्याची क्षमता जरी वेगळी असली तरीही निद्रा अथवा झोप हि सर्वाना सारखीच आवश्यक असते.

नशीबात नसलेली पुस्तके

महाराष्ट्र टाईम्सच्या आजच्या अंकातला हृषिकेश गुप्ते यांचा हा लेख दोन कारणांनी वाचण्यासारखा आहे.

गॉड्स ऍडव्होकेट

...त्यापुरताच तो प्रप्रतिसाद मर्यादित आहे.

माझ्या वाक्यातून 'मग फायनल सोल्यूशनच्या बाता करा' हे काढून टाकता येत नाही. पण असो. मी स्वतः नास्तिक असूनही इथे 'गॉड्स ऍडव्होकेट' बनून बघतो.

त्या मोरयाची कृपा

कांही वर्षांपूर्वीची गोष्ट.त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा.साठे आमचे विभाग प्रमुख होते.ते समयदक्ष होते. वेळापत्रकानुसार असलेले आपले सर्व तास ते नियमितपणे घेत.त्यामुळे ते विद्यार्थिप्रिय होते.

 
^ वर