गॉड्स ऍडव्होकेट
...त्यापुरताच तो प्रप्रतिसाद मर्यादित आहे.
माझ्या वाक्यातून 'मग फायनल सोल्यूशनच्या बाता करा' हे काढून टाकता येत नाही. पण असो. मी स्वतः नास्तिक असूनही इथे 'गॉड्स ऍडव्होकेट' बनून बघतो.
नास्तिकांची बाजू इतकी भक्कम आहे का? सैद्धांतिक पातळीवर अनेक आक्षेप घेता येतात.
*एखादी गोष्ट अस्तित्वात नाहीच असे सिद्ध करता येईलच असे नाही(बर्टरॅण्ड रसेल यांची किटली)
*असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो. (आब्सेन्स ऑफ् इव्हिडन्स इज इव्हिडन्स ऑफ् आबसेन्स)
मुळात इथे नल हायपोथेसिस काय आहे? अस्तित्व आणि नास्तित्व हे दोन केवळ मर्यादित अर्थाने विरुद्ध शब्द आहेत. क्ष चं अस्तित्व सिद्ध करणं आणि न-क्ष चं नास्तित्व सिद्ध करणं या एकच गोष्टी आहेत. चंद्राला ग्रहण लावणाऱ्या राहू-केतूचं नास्तित्व सिद्ध करण्यासाठी गुरुत्वाकर्षण, सूर्य-चंद्र-पृथ्वी यांच्या संबंधांचं अस्तित्व सिद्ध करावं लागलं. प्रस्थापित काय आहे त्यावरून काय सिद्ध करावं लागतं हे ठरतं. त्यावरून ते कोणाचं उत्तरदायित्व आहे हे ठरू शकतं. म्हणून अस्तित्वात नसलेल्या गोष्टी नाहीत हे सिद्ध करणं अशक्य असल्याची पळवाट नास्तिकांनी वापरता कामा नये. कारण नाहीतर ज्यांचं अस्तित्व सिद्ध करणं किंवा नास्तित्व असिद्ध करणं शक्य नाही अशा सर्वच कल्पनांची वासलात लावावी लागेल. मग ब्लॅक होल आहेत किंवा असतील यावर विश्वास ठेवून शोध घेणं वेडेपणाचं ठरलं असतं.
*वस्तुनिष्ठ पुराव्याने,सार्वत्रिक अनुभवाने,अथवा तर्कसंगत युक्तिवादाने जोवर देवाचे अस्तित्व सिद्ध होत नाही,तोवर देव अस्तित्वात नाही हे सिद्ध झाले आहे असे मानणे योग्य ठरते.सध्या अशी स्थिती आहे.(म्हणजे देव नाही हे सिद्ध झाले आहे.)
प्रश्न असा आहे, की देव नाही हे सिद्ध झालेलं आहे का? देवाचे साधारणपणे सृष्टीनिर्माता, व भाग्यविधाता हे दोन गुणधर्म आहेत. पैकी पृथ्वी कशी तयार झाली या बाबतीत शास्त्रज्ञांचं मानलं, अगदी तुमच्या डार्विनचं मान्य करून सजीवसृष्टी नैसर्गिकरीत्या कशी निर्माण झाली हे समजावून घेतलं तरी मूलभूत सृष्टीनिर्माणाची व्याख्या थोडीशीची बदललेली आहे. हे जगड्व्याळ विश्व कोणी निर्माण केलं हा प्रश्न रहातोच.
आता भाग्यविधाता बाबतीत किती विदा आहे? कल्पना करा की प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक गोष्ट घडण्याचं काहीतरी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्यूशन आहे. या डिस्ट्रिब्यूशनवर चिंतन केलं तर ते त्या व्यक्तीच्या बाबतीत थोडंसं बदलतं. आणि मग साठ्यांसारखे त्या डिस्ट्रिब्यूशनला (किंवा मोरयाला) मानणारे अनेक लोक दगडाच्या जवळपास आपटतात. हजारात शंभर वाचायच्या ऐवजी हजारात एकशेआठ वाचतात. आता यातला फरक तुम्ही कसा सांगणार? मूलभूत प्रश्न असा आहे की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्यूशनच्या चिंतनाने ते बदलतं या विश्वासामुळे जर खरोखरच ते बदलत असेल तर कार्यकारणभावच गोत्यात येत नाही का? मग विदा गोळा करून तपासून कसं बघणार? कारण त्यासाठी हा विश्वास मोजण्याचे काहीतरी बिश्वासार्ह मानदंड हवेत. म्हणजे मग पुन्हा तुम्हाला लॅक ऑफ एव्हिडन्स वगैरेसारखी सरकमस्टान्शियल पुराव्यांवर केस उभी करावी लागते.
व्हेअर इज द स्मोकिंग गन?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
त्या मोरयाची कृपा या चर्चेतील वरील प्रतिसादाचा विषय आणि आलेले उपप्रतिसाद बघता स्वतंत्र चर्चा होऊ शकेल असे वाटल्याने स्वतंत्र धागा प्रकाशित करण्यात आला आहे. - संपादक मंडळ
Comments
गुणधर्म
हे दोन गुणधर्म कुठे, कसे, कुणी शोधून काढले आहेत? प्रयोगशाळा, शास्त्रज्ञ आणि उपलब्ध शास्त्रीय विदा इत्यादीबाबतची माहिती द्यावी ही विनंती.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
माफ करा
माफ करा, पण आपल्या भूमिकेची पूर्वपीठिका न मांडता केवळ एकोळी, दोनोळी प्रश्न विचारून खुसपटं काढणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देण्याची आत्ता तरी इच्छा नाही. यनावालांच्या सविस्तर लेखापुढे मी व्यवस्थित मांडणी केलेली आहे. आता त्यांच्या प्रत्युत्तराची वाट बघतो आहे. त्यांची व माझी चर्चा चालू द्यावी ही विनंती. त्यातून तुमच्या प्रश्नांचं समाधान झालं तर उत्तमच.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
बरे
अस्मादिकांना शेकडो शब्दांचा पो टाकता येत नाही हे खरेच. पण विचारलेले दोनोळींचे प्रश्न अतिशय साधे आहेत. त्यांची उत्तरे तुमच्याकडे नसल्यास तसे सांगा. उगाच भूमिका आणि भूमिकेची पूर्वपीठिका वगैरे कशाला बरे. असो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
चर्चा
मूख्य पटलावर असा आग्रह धरणे योग्य वाटत नाही. यनावालांनी हा विषय मूख्य पटलावर मांडल्याने सर्वांनाच प्रतिसाद/उपप्रतिसाद ह्याद्वारे चर्चेत सहभागी होण्याची मुभा आहे. त्यामुळे 'फक्त विशिष्ठ सदस्याशीच चर्चा करायची आहे' हा आग्रह थोडा अनाठायी वाटतो. खरडवही हे ठिकाण त्यासाठी अधिक योग्य वाटते.
अस्पष्ट
हे कृपया पूर्ण इंग्रजीतुन देऊ शकाल का? तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे हे स्पष्ट झाले नाही. उदा. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनवर चिंतन म्हणजे काय?
विज्ञानवाद्यांची फॉल्सिफायेबिलिटी, विदा
मी व्हेअर इज द स्मोकिंग गन? असा प्रश्न विचारला होता. देव नाही हे सिद्ध करणारा विदा कुठे आहे? त्यावर एकंदरीत म्हणणं असं पडलं की प्रत्येक गोष्टीबाबत विदा गोळा करणं शक्य नसतं. त्यामुळे असा काही ठोस विदा नाही. (विदा नसताना एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं याला सर्वसाधारणपणे श्रद्धा म्हटलं जातं. पण असो.)
माझ्या भूमिकेविषयी थोडंसं. माझी अर्थातच ऍडव्होकेटची भूमिका आहे. त्यामुळे मी मांडलेल्या प्रत्येक युक्तिवादावर माझा ठाम विश्वास असण्याची माझ्यावर जबाबदारी नाही. मात्र मी इतपत काळजी घेतलेली आहे की यातला प्रत्येक युक्तिवाद माझ्यासमोर, एका निरीश्वरवादी व्यक्तीसमोर मांडला तर मी तो किमान गंभीरपणे घेईन. तसंच यनावालांच्या लेखातले साठे हे माझं अशील नव्हे. ही क्लास ऍक्शन सूट आहे. मोरया किंवा तत्सम एंटिटीवर ठाम विश्वास ठेवण्याने प्रत्येक अपघात वाचतो, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळी उत्तम फळ मिळतं असं नाही. 'धुम्रपानामुळे कर्करोग होतो' या विधानातून प्रत्येक सिगरेटमुळे कर्करोग झाला की नाही हे विचारणं चुकीचं ठरतं.
'धुम्रपानामुळे कर्करोग होतो' हे विधान जसं वैज्ञानिक चाचण्यांनी सिद्ध झालेलं आहे तसं 'मोरया (किंवा तत्सम एंटिटीवर) विश्वास ठेवल्यामुळे आयुर्मान वाढतं' किंवा 'मोरया (किंवा तत्सम एंटिटीवर) विश्वास ठेवल्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढतं' ही विधानं सिद्ध करण्यासाठी कुठच्या प्रकारचा विदा मी द्यावा? विज्ञानवाद्यांकडे पुरावा मागितल्यावर थोडक्यात 'पुरावा नाही' असं सांगितलं. आता मी पुरावा देणार असेन, तर तो मान्य होण्यासाठी निकष काय? थोडक्यात, नास्तिकांची विधानं फॉल्सिफायेबल आहेत का? तशी नसतील तर विदा वगैरे देऊन ही चर्चा पुढे नेण्यात अर्थ नाही. फॉल्सिफायेबल असतील तर काय प्रकारचा विदा वरील विधानं सिद्ध करण्यास (नास्तिकांची भूमिका असिद्ध करण्यास) पुरेसा ठरेल?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
प्रति
तुम्हीच एखादा प्रयोग सुचवून पहा ना! नाहीतर आम्ही उत्तर देऊच.
----
'आयुर्मान वाढते' म्हणजे नेमके काय? शंभर फूट उंच इमारतीवरून जमिनीवर पडल्यास मृत्यू येत नाही? की, रेबीजचे विषाणू मज्जारज्जूत टोचले तरी? रास्त शक्यता अशी आहे की तुमचे उत्तर असे असेल की निरीश्वरवाद्यांपैकी जितक्यांना हृद्रोग, अर्धांगवायू, मधुमेह, इ. रोग जडतात त्यापेक्षा कमी टक्केवारीत मोरयाच्या भक्तांना (भक्त=भक्तीची कृती करणारी व्यक्ती - फूल चढविणे, चिंचवडला जाणे, आरती करणे, इ. चे मापन सध्या शक्य आहे - नार्को टेस्ट/लाय डिटेक्टरने 'विश्वास' मोजणे सध्या शक्य/अचूक नाही) ते रोग जडतात आणि भक्तांचे सरासरी आयुर्मान अधिक असते.
समाजातील व्यक्तींचे जर असे गट केले की पहिल्या गटातील व्यक्तींचे सरासरी आयुर्मान ५० आहे आणि दुसर्या गटातील व्यक्तींचे आयुर्मान ७० आहे, तर पहिल्या गटात निरीश्वरवादी अधिक असतात काय?
चाचण्या
असे प्रयोग सुचवले ती त्याच्या चाचण्या घेऊन विदा गोळा करण्याचे आणि विद्याचे विश्लेषण करण्याचे काम श्रद्धाळू लोक करणार नाहीत. कारण त्यात त्यांचा काही फायदा नाही आणि तसा विदा उपलब्ध झाल्याने त्यांच्या श्रद्धेत फरक पडेलच असे नाही. तेव्हा हे काम विज्ञानवाद्यांनाच करावे लागेल.
____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान
मागच्या पानावरील प्रतिसाद पुन्हा एकदा
कोणताही प्रयोग (सायंटिफिक इन्क्वीरी) करण्याआधी तो का केला पहिजे ह्याविषयीचा संशय निर्माण झाल्याचा तर्क द्यावा लागतो. तरंच प्रयोग करण्याची उपयुक्तता मानली जाते. गॅलेलीओ किंवा इतर शास्त्रज्ञांनी पृथ्वी गोल आहे हे हायपोथेसिस मांडताना तसा संशय व्यक्त करणारा विदा दिला होता (क्षितीजावरचे जहाज, ग्रहणाची सावली इ.). त्यानंतर आणखी निरिक्षणे आणि प्रयोग करुन योग्य निष्कर्ष काढण्यात आला. 'पृथ्वी गोल आहे' कारण 'ती तशी नाही असे सांगणारा विदा नाही' किंवा 'बहुतेक लोकांना तसा विश्वास वाटतो' ह्या कारणावर त्यांचा प्रयोग आधारलेला नव्हता.
घासकडवी म्हणतात, मोरयाच्या भक्तिने अपघात टळू शकतात हे प्रयोगने सिद्ध झालेले नाही. आणि तसा प्रयोग केला पाहिजे असे त्यांचे मत दिसते. 'अनेक लोक ह्यावर विश्वास ठेवतात' हे प्रयोग करण्यासाठी आवश्यक असलेला संशय निर्माण होण्यास पुरेसे कारण आहे असे त्यांचे मत आहे.
माझ्या मते 'अनेक लोक विश्वास ठेवातात' हा तर्क संशय उत्पन्न होण्यास पुरेसा नाही. ह्याच तर्काने मग, 'देवतेला बळी चढवणे, सती जाणे, गुढग्यावर बसुन १००० प्रदक्षिणा घालणे, पुण्यप्राप्तीसाठी घरातील लहान मुलांना उपाशी ठेवणे' इ.इ. अनेक निरुपद्रवी ते प्रचंड हानीकारण अशा (अंध)श्रद्धा आणि त्याची उपयुक्तता ह्याचा शास्त्रिय प्रयोग मांडून अभ्यास करावा लागेल. तसे प्रयोग करुन पाहण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते का?
वाघिणीचे दूध प्याया वाघ बच्चे फाकडे, मग भ्रांत तुम्हा का पडे?
हे बरोबरच. पण मी वर विचारलेला प्रश्न वेगळा आहे. तर्क एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच जाऊ शकतो. शेवटी विदा हवा. त्यामुळे नास्तिकांची विधानं फॉल्सिफायेबिल आहेत का? असल्यास कुठचा विदा दिल्यास ती फॉल्स ठरतील? असा प्रश्न विचारला आहे. त्याला 'अमुकअमुक प्रकारचा विदा मिळाला तर नास्तिक आपलं विधान असत्य आहे हे मान्य करतील' अशा प्रकारचं उत्तर हवं होतं
पुन्हा एकदा, मी तुम्ही प्रयोग करा असं म्हणत नाहीये. जर मी किंवा इतर कोणी प्रयोग करून विदा दिला तर तो काय प्रकारचा हवा असा प्रश्न आहे.
विज्ञानवादाचा आधार घेत, फॉल्सिफायेबिलिटी वगैरे शब्द वापरणारे नास्तिक, त्यांच्या विधानांचे फॉल्सिफायेबिलिटीचे निकष सांगायला का कचरतात? वाघिणीचे दूध प्याया वाघ बच्चेच घाबरायला लागलं तर काय म्हणावं?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
टर्टल्स ऑल द वे डाउन
डाऊन सिंड्रोमची ९९% शक्यता असेल तरीही (बाळ निरोगी असण्याची तब्बल १% शक्यता असतानाही) गर्भपाताचाच सल्ला दिला जातो. बाजू १००% भक्कम नसतानाही, फाशीची शिक्षा दिली जाते - रीझनेबल डाउट* नसला की पुरते.
विश्वास ठेवून शोध घेतला जात नाही, उपलब्ध सिद्धांतात न बसणारी निरीक्षणे सापडल्यावर पर्यायी सिद्धांत बनवावे लागतात. नेपच्यूनचा शोध हे पाठ्यपुस्तकी उदाहरण तुम्हाला माहिती असेलच.
शोध घेण्याचा उद्देश "अस्तित्व नसल्याचे सिद्ध करणे आणि त्याद्वारे पर्यायी सिद्धांत नाकारणे", फॉल्सिफाएबिलिटी, इ. असतो.
सृष्टिनिर्माता, स्वर्गरचयेता ...
भाग्यविधाता
कृपया मुद्दा अधिक सविस्तर समजावून सांगा.
कार्यकारणभाव नसेल तर विज्ञान तरी शक्य आहे काय? तपासून बघणे, स्वतःचे मत इतरांना पटविणे, इ. भानगडीच उरणार नाहीत. किंबहुना, 'जर-तर', 'मुळे', इ. शब्दही निरर्थक ठरतील.
* "आपण सारे स्वप्नात जगत असून खुनी व्यक्तीने मृत व्यक्तीला जागे करून उपकृत केले आहे" या विधानाला सत्य मानणार्यांना मूर्ख ठरविण्याविरुद्ध सैद्धांतिक पातळीवर अनेक आक्षेप घेता येतात.
तीन ओळखीची चित्रं
ही तीन (माझ्या) ओळखीची चित्रं इथे का डकवली आहेत ते मला समजलं नाही. विशेषतः त्यातल्या पहिल्या (आणि दुसर्याही) चित्राचा फॉल्सिफाएबिलिटीशी किंवा इतर कशाशी असणारा संबंध समजला नाही.
खुलासा
"व्याख्येनुसारच अदृष्य कृष्णविवराचे अस्तित्व तरी का मानतात आणि त्याचा शोध का घेतात" अशा आशयाचा प्रश्न घासकडवी यांनी विचारला आहे.
"गुरुत्व भिंग, क्ष किरणझोत, आणि, न्यूटनच्या पहिल्या नियमाचा भंग (उगीचच लंबवर्तुळात फिरणारा तारा) या तीन निरीक्षणांचा अर्थ कृष्णविवरांमुळे सोपा लागतो म्हणून कृष्णविवराचे अस्तित्व मानले जाते, विनाकारण नव्हे" हे मी दिलेले उत्तर आहे.
माझा अजूनही गोंधळ आहे.
१. गुरूत्त्वीय भिंगाचं जे चित्र तुम्ही डकवलं आहेत तशा दीर्घिकांच्या पातळीवरच्या भिंगांचा शोध घ्यायला कोणी बाहेर पडलं नव्हतं. त्याचा शोध योगायोगाने लागला. हे अवांतर वगळता या निरीक्षणाचा संपूर्ण अर्थ फक्त कृष्णविवरामुळे लागत नाही. डार्क मॅटर* अथवा कृष्ण पदार्थाशिवाय याचा अर्थ संपूर्णपणे लावता येत नाही. आता पुन्हा, डार्क मॅटर* अथवा कृष्ण पदार्थ म्हणजे काय हे कोणालाही माहित नाही. कृष्ण विवरातही पदार्थाची अवस्था काय असते हे कोणालाही ठाfunction map() {
[native code]
}पणे माहित नाही.
गुरूत्वीय भिंग आधी कागदावर मांडलं गेलं, त्यानंतर पाच वर्षांनी प्रचंड एरर असणार्या १९२० सालच्या सूर्यग्रहणाच्या निरीक्षणांतून हा सिद्धांत शाबीत झाला. १९७८ साली दीर्घिकांच्या पातळीवर दिसणारं पहिलं गुरूत्वीय भिंग बघितल्याचं सिद्ध केलं गेलं तोपर्यंत असं काही होण्याची आणि ते आपल्याला दिसण्याची शक्यता खूपच कमी आहे असा सार्वत्रिक समज होता.
२. फक्त क्ष अथवा रेडीओ जेट्स तयार होण्यासाठी कृष्णविवरच असावं असा नियम नाही. न्यूट्रॉन तारे आणि पल्सार्समधूनही असे झोत येऊ शकतात.
३. दीर्घवर्तुळाकृती कक्षांमुळे न्यूटनच्या पहिल्या नियमाचा भंग कसा होतो हे समजलं नाही.
"उगीचच लंबवर्तुळात फिरणारा तारा" अशा शब्दरचनेमुळे यात काही कार्यकारणभाव आणि कोणी कर्ता आहे का असा संशय येतो आहे.
*डार्क मॅटर हा पदार्थ दशावतारी अर्थात स्वरूप, रंग, रूप बदलणारा असू शकतो. उपक्रमावरच्या आयडीचा याच्याशी संबंध असल्यास त्यात माझा काही संबंध नाही.
आता हे function map ... वगैरे काय पो वा शिट वा आणखी काही आहे हे मला विचारू नये. "ठाम पणे" ही अक्षरशृंखला एकत्र लिहीताना झालेला तर्कावर आधारित, वैज्ञानिक चमत्कार आहे तो! ;-) तंत्रकुशल लोकांच्या अधिक माहितीसाठी: सध्या कुबुंटू ११.१० आणि फायरफॉक्स ८.० वापरत आहे. "पर म प्रिय" ही अक्षरशृंखला एकत्र लिहीतानाही हाच चमत्कार खरडवहीत दिसला आहे. अक्षरांमधली पांढरी जागा बॅकस्पेसने कमी केल्यास हा चमत्कार दिसत नाही.
रोचक अवांतर
निखिल जोशी आणि ३_१४ अदिती यांच्यातील ही वैज्ञानिक चर्चा रोचक असली तरी मूळ मुद्द्याला बाजूला ठेवते आहे असे वाटते. ती चित्रे तिथे का आहेत हा प्रश्न मलाही पडलेला आहे, आणि त्याचा समाधानकारक खुलासा झालेला नाही.
प्रति
शोध घेतल्यामुळेच शोध लागला असे माझे प्रतिपादन नाही.
घासकडवींनी कृष्णविवराचा मुद्दा का लिहिला ते तुम्हाला समजलेले नाही, कृपया त्यांच्याकडून माहिती करून घ्या. अन्यथा तुम्ही अवांतर तपशीलाच्या चर्चेने फुटेज खात बसाल.
"व्याख्येनुसारच अदृष्य कृष्णविवराचे अस्तित्व तरी का मानतात आणि त्याचा शोध का घेतात" अशा आशयाचा प्रश्न घासकडवी यांनी विचारला आहे. कृष्णविवर, डार्क मॅटर, इ. वस्तू दिसत नाहीत, "ऍबसेन्स ऑफ एविडन्स ..." नियमाच्या प्रेमींनी कृष्णविवर, डार्क मॅटर, इ. वस्तूंचे अस्तित्व नाकारावे अशी त्यांची औपरोधिक मागणी आहे. म्हणून मी नमूद केले आहे की कृष्णविवर, डार्क मॅटर, इ. वस्तूंच्या प्रेझेन्सचा एविडन्स उपलब्ध आहे.
तर?
बरं बरं.
M87 इतके?
Sagittarius A-star दिसत नाही, अदृष्य वस्तूभोवती तारे फिरतात आणि तेथे मोठ्या आकाराच्या वस्तूला जागा नाही. म्हणजे, तेथे कृष्णविवर असावे असा तो अदृष्य गोष्टीचा एविडन्स आहे.
माझ्या प्रतिसादांवर घासकडवींचे प्रप्रतिसाद (किंवा पोचपावत्याही) नाहीत. श्रद्धाळू लोक कनिष्ठ असल्याचा मुद्दा त्यांना पटलेला आहे किंवा कसे ते कृपया विचारून कळवावे.
काहीही!
फूटेज खाण्याची काळजी आपण कशाला करावी? हा धागाच मुळात एका धाग्याचं अवांतर सुरू झाल्यामुळे वेगळा काढलेला आहे.
घासकडवींनी कृष्णविवरांचा उल्लेख का केला हे त्यांना लिहू देत. तुम्ही ही चित्रं इथे का डकवलीत याच कार्यकारणभाव न समजल्यामुळे मी किंचित 'लाऊड थिंकीग' करत होते एवढंच. "कृष्णविवर, डार्क मॅटर, इ. वस्तू दिसत नाहीत", त्याप्रमाणेच क्ष-किरणसुद्धा दिसत नाहीत. घासकडवींची मागणी (मागणी!!!!!!) काय असावी याचा प्रश्न नाही; तर्काच्या आधारे विधानं सिद्ध करता वा खोडता येतात का याचा प्रश्न आहे. त्यात तुमचा तर्क मला समजला नाही म्हणून तुम्हाला प्रश्न विचारते आहे/चर्चा सुरू केली. तर M87, गुरूत्वीय आर्क यांचा काय संबंध आहे हे मला अजूनही कळलेलं नाही.
अर्थातच नाही. आणि M87 सारख्या असंख्य दीर्घिका आहेत ज्यांच्यात अशी जेट्स दिसतात. पण आपल्या दीर्घिकेतच तार्यांच्या केंद्राभोवती मायक्रोक्वेझार्स दिसतात. त्यांच्यातही अगदी अश्शीच क्ष आणि रेडीओ जेट्स असतात.
तपशीलात आणखी एक चूक आहे, Sagittarius A हा तारा नसून दीर्घिका आहे, आणि तुम्हाला (बहुदा) जे म्हणायचं आहे त्याला साधारणतः Sagittarius A* किंवा आकाशगंगेचे केंद्र असे म्हणतात.
दीर्घवर्तुळाकृती कक्षांमुळे न्यूटनचा पहिला (काय कोणताही) नियम मोडत नाही. या दीर्घवर्तुळांचा periapsis (दीर्घवर्तुळातला नाभीच्या सर्वात जवळचा बिंदू) सरकतो आणि कक्षा अशा सरकणं न्यूटनच्या नियमांच्या आधारावर स्पष्ट करता येत नाही. विधानाचं खंडन करण्यासाठी तपशील चुकीचा मांडत आहात.
प्रतिसादाचा व्यक्तीगत, उडलेला, उडवलेला आणि टिकलेला भावनावेगात लिहीलेला आणि तर्कहीन भाग वाचला असला तरी तुम्हाला उत्तर देण्याएवढा महत्त्वाचा वाटत नाही.
अवांतर नाही
ही उपचर्चा मूळ चर्चेला धरुनच होती पण तिकडे आलेल्या अनेक प्रतिसादांमुळे (आणि ड्रुपलच्या मर्यादेमुळे) होणारी गिचमीड टाळावी ह्या उद्देशाने मी विनंती केली होती. तो माझा प्रतिसाद अजूनही आहे. केवळ सोयीसाठी संपादकांनी ह्याचा वेगळा धागा काढला असावा.
माय बॅड
होय.
एकूणच माहितीपूर्ण आणि वेळप्रसंगी अवांतर चर्चा उपक्रमावर होतात, संपादक त्यांच्या सवडीप्रमाणे त्या अवांतर चर्चांचे नवीन धागे बनवतात आणि त्याही चर्चा व्यवस्थित चालतात. त्यामुळे इथे अवांतर होतंय याची काळजी करण्याची गरज नसावी असा मुद्दा होता, आहे.
नीट वाचा
घासकडवींच्या खुलाशानंतर असे स्पष्ट होते की त्यांचा युक्तिवाद २०१२ साली उपलब्ध पुराव्यांविषयी नसून १९१५ साली उपलब्ध निरीक्षणांविषयी आहे. त्यामुळे, या चित्रांचा त्यांच्या युक्तिवादांसाठी उपयोग नाही असे दिसते.
चूक तुमच्या वाचनात आहे. * या चिन्हाला asterisk म्हणतात. स्टार हा शब्द aster या शब्दापासून बनलेला आहे. मीही Sagittarius A-star असाच शब्दप्रयोग केलेला आहे.
वर्तुळ विरुद्द लंबवर्तुळ असा युक्तिवाद नाही, सरळ रेषा विरुद्ध लंबवर्तुळ असा युक्तिवाद आहे. Sagittarius A* येथे काहीच नसतानाही त्याभोवती तारे फिरतात त्याअर्थी तेथे काहीतरी गुरुत्व असावे, अन्यथा ते तारे सरळ रेषेत गेले असते.
Periapsis सरकण्यासाठी अनेक फेर्या बघाव्या लागतात, S२ ची एकच फेरी झालेली आहे. परंतु तो मुद्दाच नाही.
मग नक्की काय?
Sagittarius A* याचा उच्चार खगोलशास्त्राचा पोटापाण्यासाठी अभ्यास करणारे, ज्यांना व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञ असे म्हणतात, ते सॅजिटेरियस ए स्टार असा करतात. तुम्हाला Sagittarius A म्हणायचं नाही आणि Sagittarius A* किंवा आकाशगंगेचे केंद्र हे ही म्हणायचं नाही तर नक्की कोणत्या वस्तूबद्दल तुम्ही बोलत आहात हा आणखी एक प्रश्न पडला आहे.
पृथ्वी कृष्णविवराभोवती दीर्घवर्तुळात फिरत नाही. खगोलीय वस्तूंच्या कक्षा दीर्घवर्तुळाकारच असतात. काहीतरी गुरूत्त्व असण्यासाठी कृष्णविवराची आवश्यकता नाही. दीर्घिकेच्या केंद्राजवळ एवढ्या प्रचंड प्रमाणात धूळ आहे की तिथलं काहीही 'बघणं' कठीणच आहे. दिसत नाही म्हणून तिथे कृष्णविवर आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. निष्कर्ष योग्य आहे, पण दीर्घवर्तुळाकार कक्षा हा त्याचा पुरावा नाही.
सरळ हा शब्द खगोलशास्त्रात साधारणतः युक्लिडीयन भूमितीतला वळलेला असा घ्यावा लागतो, हया ट्रीव्हीयाकडे दुर्लक्ष केलं आहे.
नीट वाचा
पुन्हा नीट वाचा, Sagittarius A* किंवा आकाशगंगेचे केंद्र हेच म्हणावयाचे आहे आणि Sagittarius A-star असाच उल्लेख मी केला आहे.
मी तसे प्रतिपादन केलेलेच नाही.
'कक्षा' दीर्घवर्तुळ असतात परंतु 'कक्षा' बनण्यासाठी मुळात गुरुत्व लागते. गुरुत्व नसेल तर युक्लिडीय भूमिती बनते आणि वस्तू सरळ जाते. गुरुत्व असेल तर अयुक्लिडीय भूमिती बनते आणि वस्तू कक्षेत फिरते (किंवा पॅराबोलिक जाते).
'सरळ जाण्याऐवजी कक्षा' हा केवळ गुरुत्वाचा पुरावा आहे, "तेथे इतकी कमी जागा आहे की तितके गुरुत्व देणारी इतर काही वस्तू तेथे मावणारच नाही" हा कृष्णविवराचा पुरावा आहे.
सहमत
निट वाचा :
दुसर्यांचे प्रतिसाद
आपले प्रतिसाद
अभ्यासाची पुस्तके
त्याशिवाय चर्चेला मजा नाही.
अशुद्धलेखन.
Sagittarius-A* असे नीट, शुद्ध लिहिता विधान किंचित सुस्पष्ट होते.
शुद्ध
म्हणजे आता गोष्टी शुद्धलेखनावर आल्या का? बाकिचे आक्षेप संपले असे आम्ही मानायचे का?
गुड लक.
अशुद्धलेखनामुळे लेखनाचा बोर्या वाजतो हा आणि बाकीचेही आक्षेप तुम्हाला समजत नसतील तर माझा नाईलाज आहे. अभ्यास सुरू ठेवा. तुम्हाला आक्षेप समजले की आपण पुन्हा चर्चा करूच. गुड लक.
आक्षेप
जोश्यांची पद्धत वेगळी वाटली, अशुद्ध नाही. त्यावेगळेपणाला तुम्ही गंडलात. मला आक्षेप समजत नसले तरी तुमच्या कडून काहीच उत्तर आले नाही इतके समजले.
तेच ते!
मग इंग्रजीतला sheet हा शब्द वेगळ्या पद्धतीने shit असा लिहत जा ...
जोशांच्या आणि माझ्या संवादाच्या मुख्य विषयाचा अजून थोडा अभ्यास केलात तर हे ही लक्षात येईल की शास्त्रात The Galaxy आणि The galaxy यांचेही अर्थ वेगवेगळे लागतात; आणि जगातला कोणीही अभ्यासक शब्द असे 'वेगळ्या' पद्धतीने लिहीत नाहीत. तुम्ही अभ्यास सुरू ठेवा.
शास्त्रीय शब्दवापर
मी स्वतःला खगोलशास्त्रज्ञ म्हणवत नाही. मी Sagittarius A* चा उल्लेख Sagittarius A-star असा वाचला आहे, Sagittarius A-star हा बोलीभाषेतील शब्द असून Sagittarius A* हाच लेखीभाषेतील प्रमाण शब्द आहे हे ज्ञान मला नव्हते.
परंतु, Sagittarius A ही दीर्घिका नाही, आपल्या आकाशगंगेच्या केंद्रातील एका परिसराचे ते नाव आहे. ती दीर्घिका असल्याचे तुमचे विधान चूक आहे.
दीर्घिका
ती दीर्घिका तुमच्या आमच्यासाठी नसेल 'व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञ' म्हणत असतील तसे.
कृष्णविवरं, परग्रहवासीय इ.
माझ्या त्या विधानाचा तुम्ही गैर अर्थ घेतलेला आहे. तिथे कृष्णविवरांच्या अदृश्यतेचा काडीमात्र संबंध नाही. आइन्स्टाइनने साधारण सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला १९१५ साली. त्याच वेळी त्याच्या थिअरीमध्ये ग्रॅव्हिटिक लेन्सिंग व कृष्णविवरं अंतर्भूत होती. त्या थियरीत आहेत म्हणून एखाद्या खगोलशास्त्रज्ञाने ती शोधण्याचा प्रयत्न करणं हे साहजिकच वाटतं. "कारण नाहीतर ज्यांचं अस्तित्व सिद्ध करणं किंवा नास्तित्व असिद्ध करणं शक्य नाही अशा सर्वच कल्पनांची वासलात लावावी लागेल." या वाक्यानंतर ते बिधान येतं - म्हणजे जी गोष्ट आहे याची खात्री देता येत नाही ती आहे यावर विश्वास ठेवून शोध घेणं निरर्थक ठरेल.
असाच नसलेल्या, पण असू शकेल अशा गोष्टींचा शोध घेण्याचं उदाहरण म्हणजे SETI. आत्तापर्यंत कोणीही न पाहिलेल्या परग्रहवासियांचा शोध शास्त्रज्ञ म्हणवणारे घेताना दिसतात. याला काय म्हणावं? श्रद्धा? यनावालांच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत परग्रहवासीय आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ते अस्तित्वात नाहीत हे सिद्ध होतं. ते अस्तित्वात नाहीत, त्यामुळे त्यांचा शोध घेणं मूर्खपणाचं आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
अस्तित्व
परग्रहवासियांचा शोध जरूर घ्यावा. पण त्यांचे अस्तित्व जोपर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत आपले इतर सर्व व्यवहार 'ते अस्तित्वात नाहीत' ह्या गृहितकावर चालावेत. कदाचित ते अस्तित्वात असले तर अमुक एक प्रकारे असतील आणि त्यानुसार आपण तयारीत राहावे हे निरर्थक आहे. यनावाला ह्यांनाही 'अस्तित्वात नाहीत' मधून हेच सुचवायचे असावे. निरिश्वरवादाचीही डॉकिन्स प्रमाणित व्याख्या मला आठवते त्याप्रमाणे,' देव असल्याची शक्यता इतकी कमी ठेवणे की 'देव नाही' ह्या गृहितकावर आधारीत आपले सर्व व्यवहार ठेवणे'. अशी काहीशी आहे. देव अस्तित्वातच नाही अशी व्याख्या नाही.
ग्रे एरियात स्वागत...
पण यनावालांच्या म्हणण्याप्रमाणे जे आहे हे सिद्ध झालं नाही, ते नाही हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ते आहे किंवा असू शकेल असा विश्वास ठेवणं चुकीचं आहे. शोध घेण्याच्या प्रक्रियेत अस्तित्वाच्या शक्यतेवरची ही श्रद्धा अंतर्भूत आहे. तेव्हा त्यांच्या मते शोध घेऊ नये, असंच म्हणणं भाग पडतं. परग्रहवासियांच्या अस्तित्वावरच्या विश्वासाला एक न्याय आणि देवाच्या अस्तित्वावरच्या विश्वासाला दुसरा न्याय लावून कसं चालेल?
म्हणूनच मला यनावालांशी चर्चा करायची होती. त्यांना अमुक म्हणायचं असावं असं तिसऱ्याने सांगणं याला काय अर्थ आहे? कारण तुम्ही अस्तित्वाची शक्यता कमी जास्त असण्याविषयी बोलत आहात, यनावाला अस्तित्व शक्य आहे किंवा नाही अशा काळ्यापांढऱ्यात बोलत आहेत. या काळ्यापांढऱ्यावरून ग्रे एरियाकडे पोचलो की माझं निम्मं काम झालं.
द्या टाळी. नाउ वुई कॅन हॅगल अबाउट द प्राईस!
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
स्वागत?
सर्वप्रथम प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
तुम्ही स्वागत कशाचे केले समजले नाही? मी ज्या एरीयात होतो त्याच एरिया मधे आहे. त्याला तुम्ही ग्रे म्हणा किंवा ब्लॅक.
त्यामुळे स्वागत कशाचे समजले नाही.
यनावाला चर्चेत सहभागी आहेतच त्यांच्याशी तुमची चर्चा चालू आहेच. पण मुख्य पटलावर इतरही भाग घेऊ शकतात. जेव्हा मुख्यपटलावर एखादे लिखाण येते त्यावर सर्व प्रकारच्या सदस्यांचे साद-प्रतिसाद येण्याची तयारी लेखकाने ठेवली पाहिजे. यनावालांच्या लेखनाचे माझे इंटरप्रिटेशन दिले आहे ते चूक असल्यास ते बरोबर करतीलच. पण म्हणून तसे इंटरप्रिटेशन देणे ह्यात काही चूक नसावी.
देवाच्या अस्तित्वाला वेगळा न्याय नाही. मी आधी म्हंटल्याप्रमाणे देव ही फ्लुइड संकल्पना आहे. मोरयामुळे अपघातात प्राण वाचला ह्यातला जो देव आहे तो आइन्स्टाइनला अपेक्षीत असलेला देव नाही. परग्रहवासीयांच्या अस्तित्वाला जो न्याय तो आइन्सटाइनच्या देवाला लागू होऊ शकतो पण तोच न्याय मोरयाला (सदर उदाहरणातील) लागू होऊ शकत नाही.
अर्थ
यात असे सांगणार्याचा निरागस भाव दिसत असून त्याकडे श्री राजेश यांनी दुर्लक्ष करुन आपली चर्चा चालू ठेवावी ही विनंती.
सध्याची स्थिती
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मी लिहिले आहे
.
कंसातील वाक्य हे मागच्या वाक्यातील "अशी स्थिती" चे स्पष्टीकरण आहे.म्हणजे देव नाही हे सध्या सिद्ध आहे.मला काय म्हणायचे आहे ते वरील उद्धृतावरून स्पष्ट आहे. देवाचा शोध थांबवावा असा निष्कर्ष यावरून निघत नाही.
सिद्ध म्हणजे काय?
मला वाटतं सिद्ध होणं याचा अर्थ तुम्ही वेगळा लावलेला आहे. माझ्या मते अंकगणिताच्या क्षेत्रात २ + २ = ४ हे सिद्ध आहे. तेव्हा ती बेरीज ५ होईल का, किंवा ६ होईल का याची शक्यता शून्य आहे. त्यामुळे तसा शोध घेणंही चूक आहे. तुम्ही त्या अर्थाने सिद्ध हा शब्द वापरत नाही हे आता लक्षात येतंय.
माझा आक्षेप 'ऍबसेन्स ऑफ एव्हिडन्स इज एव्हिडन्स ऑफ ऍबसेन्स' या विधानाच्या मर्यादेबाबत होता. त्या मर्यादा तुम्हालाही मान्य दिसतात. देव असण्याची शक्यता तुम्ही नाकारत नाही. आइन्स्टाईनच्या थिअरीनुसार कृष्णविवरं शक्य होती, पण ती सापडली नाहीत म्हणजे ती अस्तित्वात नव्हती का?
मग आता प्रश्न रहातात ही शक्यता कमी आहे की जास्त आहे? पुरेशी कमी म्हणजे किती कमी? मुळात ती मोजायची कशी? निखिल जोशींनी कुठेतरी ही शक्यता अगदी कमी असल्याचं गणिताने सिद्ध झालं आहे असं म्हटलं आहे. हे गणित कसं काय केलं हे तपासून पहायला मला निश्चितच आवडेल.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
व्याख्या
विज्ञानात त्या अर्थाने तो शब्द वापरला जात नाही.
देव म्हणजे प्रचलित अर्थाने देव की अतिप्रगत मर्त्य? अतिप्रगत परग्रहवासीय अस्तित्वात असण्याची शक्यता आम्ही नाकारत नाही.
ती सापडली नाहीत तरीही, तिचे भाकित करणारी मूळ थिअरी उपलब्ध निरीक्षणांची चांगली सोय लावणारी अशी विश्वासार्ह थिअरी होती. त्यामुळे, त्या थिअरीची असिद्ध भाकिते शक्य असण्याची थोडी शक्यता ऑपॉपच होती.
आकाशगंगेतील प्रगत संस्कृतींच्या संख्येचा अंदाज ड्रेक समीकरणाने मिळतो. देवाची नेमकी व्याख्या दिलीत तर देवाची शक्यताही मोजता येईल.
अभ्यास वाढवा...
विश्वास? ये किस चीडिया का नाम है? वो श्रद्धा नाम की चीडिया थी उसकीच बहीण वगैरे तो नही ना?
अरे वा, शक्य असण्याची थोडी शक्यता हा गमतीदार शब्दप्रयोग आहे. तो मी पुन्हा वापरणं शक्य असण्याची थोडी शक्यता आहे असं मी म्हणू शकतो.
अरे देवा... तुमचा ड्रेक समीकरणावरून उत्तरं मिळतात यावर विश्वास आहे तर. अहो, ते देवावर विश्वास ठेवण्यापेक्षाही वाईट. ड्रेक समीकरणातून आपल्याला नक्की कुठचे फॅक्टर्स माहीत नाहीत हे कळतं. किंवा अंदाजपंचे त्यात हवे ते आकडे घातले की हवी ती उत्तरं मिळतात. जरा अभ्यास वाढवा.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
प्रति
तुम्हाला विश्वास आणि श्रद्धेतील फरकही माहिती नाही?
धन्यवाद. दुरुस्ती: कृपया, सत्य असण्याची थोडी शक्यता, असे वाचावे.
नॉट माय प्रॉब्लेम!
सिद्धान्तः गणिताचे आणि विज्ञानाचे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गणिती सिद्धान्त आणि वैज्ञानिक सिद्धान्त यांत भेद आहे.विज्ञानाचे सिद्धान्त हे संभाव्य(प्रॉबेबल) असतात.एक निरीक्षण जरी त्या सिद्धान्ताच्या विरुद्ध निघाले तरी तो मोडीत काढावा लागतो.विज्ञानाचा सिद्धान्त म्हणजे खरेतर गृहीतकच(हायपोथिसिस) म्हणायचे.
..आजवर कुणालाही कुठे सशृंग ससा दिसला नाही म्हणून सशाला शिंगे नसतात असे म्हणायचे.सशृंग सशाचा शोध ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी अवश्य घ्यावा.आफ्रिकेच्या जंगलात कुठे तशी प्रजाती सापडली तर सशाला शिंगे नसतात हे खोटे ठरेल.
.
क्षणात वेगळे रूप धारण करणारा,क्षणात अदृश्य होणारा, असा मायावी राक्षस कधीही अस्तित्वात नव्हता हे आपल्याला कॉमनसेन्सने कळते. पण तसे सिद्ध करता येत नाही.तसेच जगनिर्माता,जगन्नियंता,सर्वज्ञ,सर्वसमर्थ;प्रार्थना-पूजा-अर्चा-नवस यांनी प्रसन्न होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करणारा असा कोणी अलौकिक ईश्वर अस्तित्वात आहे असे जगातील बहुसंख्य लोक मानतात तो अस्तित्वात नाही हे सिद्ध करता येत नसले तरी तसे कॉमनसेन्सने समजते. अशा ईश्वराचा शोध घेणे व्यर्थ होय असे माझे ठाम मत आहे
प्रति
देवच कशाला सैतान, स्वर्ग, नर्क, पुनर्जन्म, पूर्वसंचित ह्यापैकी काहीही असण्याची शक्यता तुम्ही पूर्णपणे नाकारू शकत नाही. पण म्हणून प्रत्येकाच्या अस्तित्वाचा शोध घेतला पाहिजे का? दुसरे म्हणजे अश्या अस्तित्वाचा शोध चालू असे पर्यंत ह्या कल्पना 'अस्तित्वात नाहीत' असे धरुन तुम्ही तुमचे व्यवहार ठेवणार की 'अस्तित्वात आहेत' असे धरुन? 'अस्तित्वात नाही' असे गृहितक ठेवणे मला तर्कसंगत वाटते. तुम्हाला वाटत नसल्यास त्यावरही कुणाची हरकत नसावी. माझा आक्षेप तुमच्या 'वैचारीक नाझीजम' वगैरे शब्दांना आहे. इतका गंभीर शब्द तुम्ही फारंच कॅज्युअली वापरला आहे. इथल्या चर्चेत तुम्हाला कुठे नाझीझम दिसला हे दाखवुन दिल्यास आभारी राहीन.
एखाद्याला मोठे झाल्यावरही खेळण्यांशी खेळायला आवडते, मला त्यावर काहीच आक्षेप नाही. पण मी अशा वागण्यास बालिश म्हंटल्यास तो वैचारीक नाझीझम नाही.
सहमत
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वैद्य यांनी मांडलेल्या विचारांशी सहमत आहे.
बिनतोड
प्रतिसाद फार आवडला.
सहमत. हा इंटलेक्च्य़ुअल वॅक्युअसनेस अनपेक्षित होता. असो. 'वैचारिक नाझिझम'वरून 'गुंतागुंतीचा समाज' झाला नाही म्हणजे मिळवले.
एकंदर प्रतिसाद फार आवडला.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
वैचारिक नाझीझम
हा शब्दप्रयोग आधल्या चर्चेतल्या निखिल जोशी यांच्या मतांना उद्देशून वापरला होता, तुम्हाला नाही. तिथे त्यांनी आक्षेप न घेता कोणीतरी दखल घेतल्याबद्दल सुटकेचा निश्वास टाकला होत. या चर्चेत केवळ त्या देवाणघेवाणीचा उल्लेख आहे.
बाकी सविस्तर प्रतिसाद काँप्युटरवर टाईप करण्याची संधी मिळेल तेव्हा.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
गोषवारा, काही उत्तरं इत्यादी
आत्तापर्यंतची संपूर्ण चर्चा परत वाचल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांचा गोषवारा, आणि काही प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यांना उत्तरं एकत्र देतो.
१. देव नाही हे सिद्ध झालेलं नाही. विज्ञानात जसे इतर कमी अधिक पुरावे असलेले हायपोथेसिस असतात तसाच हाही एक. पण ती सिद्धता देव आहे म्हणणाऱ्यांनी द्यावी असा एक सूर दिसतो. माझा मुद्दा असा आहे की 'मोरया मला तारेल असा विश्वास असण्याने मनुष्य तारला जातो' हे असिद्ध झालेलं नाही. त्यासाठीची आवश्यक मोजमापं झालेली नाहीत. साठेंना यनावालांच्या निवेदकाने काही इतर शक्यता सांगितल्या. त्याच लागू आहेत, व साठे न मरण्यासाठी मोरया हे कारण नाही हेही सिद्ध झालेलं नाही. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ते तर्कच रहातात. वर वैद्य म्हणतात की 'पण म्हणून प्रत्येकाच्या अस्तित्वाचा शोध घेतला पाहिजे का?' त्याला उत्तर असं की शोध घेतलाच पाहिजे असं नाही. पण मग जो व्हेरिएबल शास्त्रीय पद्धतीने पुरेशा खात्रीलायकरीत्या बाद झालेला नाही, त्याबाबत माझंच बरोबर असं म्हणून दुसऱ्याला पटवून देण्याचा कुठच्या आधारावर प्रयत्न करायचा?
२. देवाशिवायचा अभ्युपगम स्वस्त असणे - हा नास्तिकांच्या आवडत्या ऑकॅमच्या वस्तऱ्याचा उल्लेख आला. या वस्तऱ्यावर लोक का विसंबून असतात कोण जाणे. त्याने तात्कालिक सत्य सापडायला मदत होते. सतराव्या शतकात न्यूटनने तीन नियम मांडले तेव्हाच जर आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद प्रसिद्ध झाला असता तर या वस्तऱ्याने तो छाटून टाकला असता. म्हणजे त्याकाळी सापेक्षतावाद लागू नव्हता असं म्हणायचं का?
३. 'अभ्युपगम सिद्ध करण्यासाठी शोध घेतला जात नाही, त्यावर अविश्वास ठेवून शोध घेतला जातो. फॉल्सिफाएबिलिटी ही संकल्पना कृपया नीट समजावून घ्या.' यावरून निखिल जोशींना विज्ञानातलं संशोधन कसं चालतं याची काडीमात्र कल्पना नाही हेच दिसून येतं. टॉप क्वार्क हे उत्तम उदाहरण आहे. १९७३ ते ७७ च्या काळात टॉप क्वार्क असणार याची शास्त्रज्ञांना खात्री पटायला लागली होती. स्टॅंडर्ड मॉडेलमध्ये त्याचा अंतर्भाव झाला होता. टॉप क्वार्क दिसलेला नसूनही तो सापडेल या आशेवर हे स्टॅंडर्ड मॉडेल वापरलं जात होतं. सर्न आणि फर्मिलॅब यांच्यात कोण आधी टॉप क्वार्क शोधतोय याची स्पर्धा लागली होती. त्यावेळी कोणीच टॉप क्वार्क नाही हे सिद्ध करायला निघालेला नव्हता. त्यावर कोणाचाच अविश्वास नव्हता. तेव्हा अभ्युपगम सिद्ध करण्यासाठी न सापडलेल्या एंटिटीचा शोध घेणं हे नवीन नाही. तेव्हा ' "परग्रहवासीय नाहीत" या सिद्धांताला असिद्ध करण्यासाठी त्यांचा शोध घेतला जातो' हे विधान भंपक आहे. ग्रांट प्रपोझल्स मध्ये परग्रहवासीय सापडले तर काय मज्जा येईल वगैरे म्हटलेलं असतं.
४. 'कार्यकारणभाव नसेल तर विज्ञान तरी शक्य आहे काय? तपासून बघणे, स्वतःचे मत इतरांना पटविणे, इ. भानगडीच उरणार नाहीत.' भाग्यविधाताच्या व्याख्येत मोरया प्रत्येक हालचाल ठरवतो असं म्हटलेलंच नाही. साठेंच्या मते तो थोडीशी मदत करतो. म्हणजे मोरया हे जगातल्या घटना ठरवणाऱ्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. ते विज्ञानबाह्य असेलच असंही नाही. त्या कारणाचं कार्य कसं चालतं हा अभ्यासयोग्य विषय आहे.
५. 'परिणाम कोणते ते तर आधी कृपया नमूद करा ना! मग मोजण्या/न मोजण्याची चर्चा शक्य आहे.' 'आधी देवाची व्याख्या सांगा' साठेंनी सांगितलेला मोरयाच्या कृपेने जीव वाचणे हा परिणाम घ्या. साठेंशी बोलताना यनावालांच्या निवेदकाने केवळ तर्काच्या आधारे तो कार्यकारणभाव खोडण्याचा प्रयत्न केला होता. कारण त्यांचा त्या तर्कावर ठाम विश्वास होता. पण साठेंचं अनुमान सत्य आहे की नाही हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. मोरया किंवा तत्सम शक्तीवर विश्वास असणे यामुळे लोकांचं आयुर्मान वाढतं का? हे तुम्ही शोधून काढू शकता. असा अभ्यास आधीच झालेला आहे का? हेही तपासून बघू शकता (हिंट - गूगल). यापैकी काहीही केलं नाही साठेंचं अनुमान खोडलं जात नाही, केवळ दुसरी थियरी मांडली जाते. आणि मुख्य म्हणजे अशा अभ्यासाशिवाय विधानं केली तर विज्ञानवाद्यांची उच्च नैतिक भूमिका निघून जाते. मग विज्ञानवादी व श्रद्धावंत यांत काय फरक राहिला?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
प्रति
देव म्हणजे काय? विविध व्याख्यांनुसार देव असण्याची शक्यता वेगवेगळी असली तरी ती काही व्याख्यांसाठी शून्य आहे तर बाकीच्या व्याख्यांसाठी धन परंतु नगण्य आहे.
देव अभ्युपगमाच्या समर्थनार्थ असलेले पुरावे इंटेलिजंट डिझाईन अभ्युपगमाच्या पुराव्यांपेक्षा कमी खात्रीचे आहेत की अधिक?
सूर? त्याशिवाय चर्चाच शक्य नाही.
'मोरया मला तारेल' असा विश्वास असण्यारी एकही व्यक्ती बुडाली तरी ते गृहीतक डळमळते, त्याला कॅवियाटचे टेकू द्या.
होयच मुळी!
हाहा. तुमचे पुढील वाक्यच तुमच्या युक्तिवादाच्या विरोधी आहे: "१९७३ ते ७७ च्या काळात टॉप क्वार्क असणार याची शास्त्रज्ञांना खात्री पटायला लागली होती."
ही खात्री म्हणजे त्यांना काय श्रद्धेच्या विषाणूने झपाटले होते की काय? की त्यांना स्पिनोझाच्या देवाचा साक्षात्कार झाला होता? बाकीच्या अनेक कोड्यांची उत्तरे देणारी थिअरी (हायपोथेसिस नव्हे) जर इतरही काही भाकिते करीत असेल तर तिचा आदर करून त्या भाकितांची सत्यता तपासणे योग्यच आहे. माझ्या प्रतिसादात "तिचे भाकित करणारी मूळ थिअरी उपलब्ध निरीक्षणांची चांगली सोय लावणारी अशी विश्वासार्ह थिअरी होती. त्यामुळे, त्या थिअरीची असिद्ध भाकिते शक्य असण्याची थोडी शक्यता ऑपॉपच होती." असे स्पष्टीकरण मी दिलेले होते, ते तुम्ही दुर्लक्षिलेले दिसते.
"कार्यकारणभावच गोत्यात येत नाही का?" असा प्रश्न तुम्ही विचारला आहे. तुमचा युक्तिवाद कार्यकारणभाव नाकारतो की नाही?
हात्तेच्या! "मोरयाची भक्ती केली की आयुष्य वाढते" या साध्या कोरिलेशनइतकाच मोरया उरला आहे काय? ठीक आहे, तसा मोरया आम्ही ठामपणे नाकारलेला नाही. परंतु, उपलब्ध निरीक्षणांनुसार, तो असण्याची शक्यता नगण्य आहे.
http://mr.upakram.org/node/3604?page=1#comment-62260 येथे मी http://www.templeton.org/newsroom/press_releases/060407step.html हा दुवा दिलेला आहे.
ऑकॅमच्या वस्तर्याची धार तुम्ही नाकारता आहात काय? देव अभ्युपगमाच्या समर्थनार्थ असलेले पुरावे इंटेलिजंट डिझाईन अभ्युपगमाच्या पुराव्यांपेक्षा कमी खात्रीचे आहेत की अधिक?
शेवटची स्ट्रॉ...
एखाद्या ओळीपेक्षा अधिक लिहिण्याचे कष्ट घ्या. एकतर बऱ्याच वेळा तुम्हाला मी काय म्हणतो ते समजत नाही. त्यात तुम्ही असं क्रिप्टिक लिहिता त्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं ते समजत नाही. मग अशी चर्चा पुढे चालवण्यात काही अर्थ रहात नाही.
तुमचा दुवा तुम्ही का दिला होता ते कळलं नाही. त्यात अज्ञात व्यक्तीने दुसऱ्या अज्ञात व्यक्तीबद्दल केलेल्या प्रार्थनेचा अभ्यास आहे. साठ्यांची कथा वेगळी आहे. स्वतःच्या मोरयावरच्या विश्वासाने किती फरक पडतो हा प्रश्न आहे. त्याविषयी काही तुमचा किंवा इतर कोणाचा अभ्यास असेल तर सांगा. माहीत नसल्यास शोधून पहा.
आणि १७०० साली सापेक्षतावाद लागू नव्हता किंवा पाच हजार वर्षांपूर्वी क्वांटम मेकॅनिक्स लागू नव्हतं असं काहीतरी बरळण्याआधी विचार करावा जरा माणसाने. संशोधनाने सत्य बदलतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
फक्त वैद्य व यनावाला हे तर्कसंगत विचार मांडत आहेत. निखिल जोशी हे उपक्रमावरच्या नास्तिकांचे प्रवक्ते आहेत असं वैद्य व यनावालांनी मान्य केलं तरच मी जोशींचा यापुढे प्रतिवाद करेन. जोशींच्या शक्य तितक्या मुद्द्यांना मी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, पण एकंदरीत त्रोटक, असंबद्ध आणि फारशी विचार न करता केलेली विधानं या पलिकडे त्यांच्या प्रतिसादांत काही दिसत नाही.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
ठीक आहे
खुलासा: त्या काळी सापेक्षतावादाविना विश्वाचे कार्य चालत असे असे माझे प्रतिपादन नाही. त्याकाळी सापेक्षतावादावर विश्वास ठेवून त्यानुसार दैनंदिन व्यवहार करणार्या व्यक्तीला हिणविणे मात्र योग्य ठरले असते.
नाही बुवा! साठे आडनावाच्या व्यक्तींना स्कूटर अपघातात मृत्यू येण्याची शक्यता श्रद्धेनुसार बदलते की नाही त्याविषयी काहीच विदा नाही. थोडे सामान्यीकरण: धरणे आणि कारखाने यांची गायडेड टूर घेण्यास जाणार्या व्यक्तींपैकी किती वाहन अपघातात मरतात त्याच्या बातम्यांची तुलना धार्मिक यात्रेला जाणार्यांच्या अपघाती मृत्यूच्या बातम्यांशी केल्यास चालेल काय?
ठीक आहे, शोध घेईन. परंतु, तोवर, निरीश्वरवादी लोकसंख्या अधिक असलेल्या देशांमध्ये सरासरी जीवनमान अधिक असण्यासाठी तुमच्याकडे काही स्पष्टीकरण असेल तर द्या.
हायपोथेसिस
>>विज्ञानात जसे इतर कमी अधिक पुरावे असलेले हायपोथेसिस असतात तसाच हाही एक. पण ती सिद्धता देव आहे म्हणणाऱ्यांनी द्यावी असा एक सूर दिसतो.
देव आहे हा वैज्ञानिक अभ्युपगम (हायपोथेसिस नाही). वैज्ञानिक हायपोथेसिसच्या सहाय्याने तपासून पाहता येतील अशी भाकिते (प्रेडिक्शन्स दॅट कॅन बी फॉल्सिफाईड थ्रू एक्स्परिमेंटल ऑब्झर्वेशन) करता यायला हवीत. ती भाकिते तपासून मग हा हायपोथेसिस पुराव्याने टिकतो का ते तपासता येईल.
परंतु देव असण्याचा हायपोथेसिस कसलीच फॉल्सिफाएबल भाकिते करत नाही. म्हणून तो इतर वैज्ञानिक हायपोथेसिससारखा हायपोथेसिस नाही.
देव आहे असे म्हणणार्यांनी ते सिद्ध करायचे असे नसून त्या हायपोथेसिसमधून तपासता येतील* अशी निश्चित भाकिते करायची आहेत. त्यातली जेवढी तपासता येतात तेवढी तपासून पहायची आहेत.
*तपासता येणे आजच शक्य असेल असे नाही. उदा अमूक देवाची पूजा केली असता पटकीचा रोग बरा होतो हे तपासता येण्यासारखे आहे पण अमूक देवाची पूजा केली तर मनुष्य मृत्यूनंतर स्वर्गात जातो असे भाकीत आज (किंवा कदाचित कधीच) तपासता येण्यासारखे नाही.
अवांतर : उपक्रमावरच्या जुन्या लेखात आधुनिक विज्ञानात असलेल्या फ्लॉजिस्टॉन सिद्धांताबाबत एक लेख आहे. अधिक ज्ञान झाल्यावर हा फ्लॉजिस्टॉन सिद्धांत टाकून देण्यात आला. तसाच प्रकार ईथर या माध्यमाबाबतही घडला. असे प्लेसहोल्डर्स विज्ञानातही वापरले गेले आहेत. ते प्लेसहोल्डर चुकीचे असावेत असे त्याहीवेळी वैज्ञानिकांना वाटत असावे. देव हा असाच प्लेसहोल्डर आहे असे समजायला हरकत नाही.
नितिन थत्ते