गॉड्स ऍडव्होकेट

...त्यापुरताच तो प्रप्रतिसाद मर्यादित आहे.

माझ्या वाक्यातून 'मग फायनल सोल्यूशनच्या बाता करा' हे काढून टाकता येत नाही. पण असो. मी स्वतः नास्तिक असूनही इथे 'गॉड्स ऍडव्होकेट' बनून बघतो.

नास्तिकांची बाजू इतकी भक्कम आहे का? सैद्धांतिक पातळीवर अनेक आक्षेप घेता येतात.

*एखादी गोष्ट अस्तित्वात नाहीच असे सिद्ध करता येईलच असे नाही(बर्टरॅण्ड रसेल यांची किटली)
*असल्याचा पुरावा नसणे हा नसल्याचा पुरावा असतो. (आब्सेन्स ऑफ् इव्हिडन्स इज इव्हिडन्स ऑफ् आबसेन्स)

मुळात इथे नल हायपोथेसिस काय आहे? अस्तित्व आणि नास्तित्व हे दोन केवळ मर्यादित अर्थाने विरुद्ध शब्द आहेत. क्ष चं अस्तित्व सिद्ध करणं आणि न-क्ष चं नास्तित्व सिद्ध करणं या एकच गोष्टी आहेत. चंद्राला ग्रहण लावणाऱ्या राहू-केतूचं नास्तित्व सिद्ध करण्यासाठी गुरुत्वाकर्षण, सूर्य-चंद्र-पृथ्वी यांच्या संबंधांचं अस्तित्व सिद्ध करावं लागलं. प्रस्थापित काय आहे त्यावरून काय सिद्ध करावं लागतं हे ठरतं. त्यावरून ते कोणाचं उत्तरदायित्व आहे हे ठरू शकतं. म्हणून अस्तित्वात नसलेल्या गोष्टी नाहीत हे सिद्ध करणं अशक्य असल्याची पळवाट नास्तिकांनी वापरता कामा नये. कारण नाहीतर ज्यांचं अस्तित्व सिद्ध करणं किंवा नास्तित्व असिद्ध करणं शक्य नाही अशा सर्वच कल्पनांची वासलात लावावी लागेल. मग ब्लॅक होल आहेत किंवा असतील यावर विश्वास ठेवून शोध घेणं वेडेपणाचं ठरलं असतं.

*वस्तुनिष्ठ पुराव्याने,सार्वत्रिक अनुभवाने,अथवा तर्कसंगत युक्तिवादाने जोवर देवाचे अस्तित्व सिद्ध होत नाही,तोवर देव अस्तित्वात नाही हे सिद्ध झाले आहे असे मानणे योग्य ठरते.सध्या अशी स्थिती आहे.(म्हणजे देव नाही हे सिद्ध झाले आहे.)

प्रश्न असा आहे, की देव नाही हे सिद्ध झालेलं आहे का? देवाचे साधारणपणे सृष्टीनिर्माता, व भाग्यविधाता हे दोन गुणधर्म आहेत. पैकी पृथ्वी कशी तयार झाली या बाबतीत शास्त्रज्ञांचं मानलं, अगदी तुमच्या डार्विनचं मान्य करून सजीवसृष्टी नैसर्गिकरीत्या कशी निर्माण झाली हे समजावून घेतलं तरी मूलभूत सृष्टीनिर्माणाची व्याख्या थोडीशीची बदललेली आहे. हे जगड्व्याळ विश्व कोणी निर्माण केलं हा प्रश्न रहातोच.

आता भाग्यविधाता बाबतीत किती विदा आहे? कल्पना करा की प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक गोष्ट घडण्याचं काहीतरी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्यूशन आहे. या डिस्ट्रिब्यूशनवर चिंतन केलं तर ते त्या व्यक्तीच्या बाबतीत थोडंसं बदलतं. आणि मग साठ्यांसारखे त्या डिस्ट्रिब्यूशनला (किंवा मोरयाला) मानणारे अनेक लोक दगडाच्या जवळपास आपटतात. हजारात शंभर वाचायच्या ऐवजी हजारात एकशेआठ वाचतात. आता यातला फरक तुम्ही कसा सांगणार? मूलभूत प्रश्न असा आहे की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्यूशनच्या चिंतनाने ते बदलतं या विश्वासामुळे जर खरोखरच ते बदलत असेल तर कार्यकारणभावच गोत्यात येत नाही का? मग विदा गोळा करून तपासून कसं बघणार? कारण त्यासाठी हा विश्वास मोजण्याचे काहीतरी बिश्वासार्ह मानदंड हवेत. म्हणजे मग पुन्हा तुम्हाला लॅक ऑफ एव्हिडन्स वगैरेसारखी सरकमस्टान्शियल पुराव्यांवर केस उभी करावी लागते.

व्हेअर इज द स्मोकिंग गन?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

त्या मोरयाची कृपा या चर्चेतील वरील प्रतिसादाचा विषय आणि आलेले उपप्रतिसाद बघता स्वतंत्र चर्चा होऊ शकेल असे वाटल्याने स्वतंत्र धागा प्रकाशित करण्यात आला आहे. - संपादक मंडळ

लेखनविषय: दुवे:

Comments

विदा दाखवा नाहीतर श्रद्धेला किमान हिणवू नका

वैज्ञानिक हायपोथेसिसच्या सहाय्याने तपासून पाहता येतील अशी भाकिते (प्रेडिक्शन्स दॅट कॅन बी फॉल्सिफाईड थ्रू एक्स्परिमेंटल ऑब्झर्वेशन) करता यायला हवीत. ती भाकिते तपासून मग हा हायपोथेसिस पुराव्याने टिकतो का ते तपासता येईल.

हे बरोबर नाही. साठेंच्या विश्वासाचं साधारणीकरण केलं तर तो 'मी मोरयाची भक्ती केल्यामुळे माझं भलं होतं' असा आहे. तद्वतच, 'जे लोक मोरया (किंवा तत्सम एंटिटीची) भक्ती करतात (किंवा श्रद्धा ठेवतात) त्यांचं एकंदरीत आयुष्यात भलं होतं' हा तपासून पहाण्याजोगा हायपोथेसिस आहे. भलं होणं म्हणजे काय यावर चर्चा होऊ शकते. पण साधारण निकष - अधिक आयुष्य, अधिक मानसिक स्वास्थ्य हे लावता येतील. यासाठी प्राथमिक निरीक्षणं अब्जावधींनी आहेत. (९५% लोक आस्तिक असतात असा विदा यनावालांनीच दिलेला होता). पण ती व्यक्तिनिष्ठ असल्याने ग्राह्य धरणं योग्य नाही. मात्र इतका मोठा प्राथमिक विदा असताना या विषयावर जर अभ्यासच झाला नसेल तर त्याला विज्ञानवाद्यांचं घोर दुर्लक्ष का म्हणू नये? जर झाला असेल, तर कुठे आहे विदा? लेखात म्हटल्याप्रमाणे, व्हेअर इझ द स्मोकिंग गन?

मी माझ्या कुठल्याच युक्तिवादात मेल्यानंतर स्वर्गात जाणे वगैरेचा दावा केलेला नाही. या भौतिक विश्वात श्रद्धेला स्थान आहे की नाही यावर चर्चा चालू आहे. ती तेवढ्यापुरतीच मर्यादित रहावी.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

विश्वनिर्मात्याचा हस्तक्षेप?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अपघातात दोन वाहनांची टक्कर(इंपॅक्ट) घडली.तेव्हा साठे यांचे वाहन आणि देह यांवर जी बलें कार्यरत झालीं त्यांच्या परिणामाने ते (साठे) ठराविक दिशेने,ठराविक ठिकाणी ठराविक गतीने जाऊन पडले.हे सर्व निसर्गनियमांनुसार घडले.(न्यूटनचे गतिविषयक नियम लागू).या निसर्गनियमांत ढवळाढवळ करणारी कोणतीही दैवी शक्ती अस्तित्वात नाही.असती तर अनेक दुर्दैवी घटना टळल्या असत्या.डब्ल्यू.टी.सी.ला धडकण्यासाठी जाणार्‍या विमानाची दिशा मोरयाने कांही अंशांनी वर केली असती तर टॉवरला न धडकता विमान वर गेले असते.हजारो निरपराध,निष्पाप जीव वाचले असते.
ज्या जगड्व्याळ विश्वात महाप्रचंड खगोलीय घटना सतत घडत असतात, अनेक उल्का प्रत्यही तुटत असतात्,ज्या विश्वाच्या संदर्भात आपली सूर्यमाला नगण्य आहे,त्यातील कस्पटासमान पृथ्वीवरील मुंबई-पुणे मार्गावर झालेल्या अपघातात फेकली गेलेली व्यक्ती मोरयाभक्त आहे म्हणून ती उजवीकडे न पडता एक वीत डावीकडे पडावी असे त्या जगड्व्याळ विश्वाचा निर्माता ठरवतो हे खरे मानणे हास्यास्पद आहे.मोरयाभक्त दर्शनाला गेले नसते तर अपघातग्रस्त झाले नसते हा तर्क योग्य आहे.
ईश्वरसमर्थकाच्या भूमिकेतून रा़जेश यांनी आपली बाजू मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.पण पाया डळमळित त्याला ते काय करणार.

नाही.

ही घटना साठेंच्या बाबतच का घडली ह्याची साठेंच्यामते कारणमिमांसा "मोरया" आहे, तुम्ही लेखात दिलेली कारणमिमांसा 'यदृच्छा' आहे, दोन्ही गोष्टी तर्क उपलब्ध नसल्याचे द्योतक आहेत, तुम्ही यदृच्छेला हार घालत नसलात तरी यदृच्छेच्या थांब्यालाच उतरता, ह्यात काहीच फरक नाही.

डब्ल्यू.टी.सी.ला धडकण्यासाठी जाणार्‍या विमानाची दिशा मोरयाने कांही अंशांनी वर केली असती तर टॉवरला न धडकता विमान वर गेले असते.हजारो निरपराध,निष्पाप जीव वाचले असते.

वादासाठी - केली नसेलच कशावरुन? खालच्या मजल्यावर धडकल्याने अजुन हजारो मेले असते ते वाचले असतिल कि? दिशा बदलली हे खरेच मान्य केलेत तर ती किती आणि का ह्यावर चर्चा होउ शकेल. राँग नंबर कधीही बिझी येत नाही अशा आशयाचे हे उदाहरण वाटते. ;)

आतला आवाज

हे खरे मानणे हास्यास्पद आहे.

हास्यास्पद म्हणजे नक्की काय? त्याचा अर्थ मी असा घेतो की 'माझा आतला आवाज सांगतो की हे होणं शक्य नाही. त्यासाठी माझ्याकडे काही विदा नाही, पण ही कल्पना इतकी न पटण्यासारखी वाटते की ती चुकीचीच असली पाहिजे'. या प्रकारचा युक्तिवाद खूपच धोकादायक असतो. अनेक वैज्ञानिक कल्पना एके काळी असेच भरभक्कम युक्तिवाद देऊन झिडकारल्या गेल्या होत्या.

उदाहरणार्थ पृथ्वी फिरते ही कल्पना. 'पृथ्वीसारखी एवढी प्रचंड वस्तू अवकाशात एवढ्या वेगाने फिरते ही कल्पनाच वेडेपणाची वाटते. त्यापेक्षा तारे व ग्रह हे अत्यंत हलक्या पदार्थाचे बनलेले असल्यामुळे व त्यांची गोल फिरणे हीच नैसर्गिक स्थिती असल्याने ते फिरतात हेच विश्वासार्ह वाटतं.' (टायको ब्राही)

डॉकिन्स म्हणतो की जेव्हा एखाद्या बाबतीत व्यक्तिगत अविश्वासाचे युक्तिवाद (arguments from personal incredulity) येतात तेव्हा तिथे काहीतरी पाणी मुरत असतं. तुमचा युक्तिवादही काही विद्याशिवाय तसाच आहे. भावनिक पातळीवर आवाहन करणारा आहे. तर्काच्या क्षेत्रात भावनेने लुडबुड करता कामा नये. विदा दाखवा. कुठाय ती धूर काढणारी पिस्तूल?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पिस्तूल

मिसळपाव.कॉम वरील धनगरी औषधाविषयीच्या चर्चेत घासकडवींनी असे विधान केले होते
ज्या पदार्थाच्या गुणाविषयी काहीही सर्वमान्य अनुभव नाही त्याला औषध म्हणू नये असं माझं मत आहे.

हे म्हणजे ऍबसेन्स ऑफ एविडन्स इज एविडन्स ऑफ ऍबसेन्स मानणेच झाले नाही का? धनगराचे औषध उपयुक्त नाही (किंवा ते औषधच नाही) ह्याचा कोणता विदा तुम्ही दिला आहे? त्याशिवाय तुम्ही त्याला औषध नाही असे म्हणून रिजेक्ट कसे काय केले? धूर काढणारी पिस्तूल इथेही दिसली नाही.

बिलिवर्स रिप्रेझेन्टेटिव

घासकडवी हे बहुधा या चर्चेत बिलिवर्स रिप्रेझेन्टेटिव (किंवा गॉडस् ऍडव्होकेट) म्हणून काम बघत असावे. ;-) त्यांनी मागे काय म्हटले हे बहुधा या चर्चेत ग्राह्य धरता येऊ नये. :-( तेव्हा यापेक्षा वेगळ्या मुद्द्यावर प्रतिवाद वाचायला आवडेल.

बाकी, आखाड्याबाहेर राहून टाळ्या मारते आहे. ब्राव्हो! चालू द्या!

प्रति: बिलिवर्स रिप्रेझेन्टेटिव

त्यांनी गॉड्स ऍडवोकेट अशी भूमिका घेतली असली तरी त्यातुन मांडलेले विचार त्यांच्या मूळच्या विचारांपासून वेगळे नाहीत. 'मला लाल रंग आवडतो' पण चर्चेसाठी 'मला लाल रंग आवडत नाही' असे धरुन लिहितो असे त्यांच्या भूमिकेचे स्वरुप नाही. म्हणून त्यांनी इतरत्र मांडलेली मते इथे चर्चेत घेण्यास मला गैर वाटत नाही.

*त्यांनी स्वत:च्याच विचारांशी विरोधी भूमिका घेतली असल्यास, त्याच भूमिकेतून तिकडच्या चर्चेतील राजेश घासकडवी चूक आहेत हे मान्य करावे.

प्रति:गोषवारा

कोणताही प्रयोग (सायंटिफिक इन्क्वीरी) करण्याआधी तो का केला पहिजे ह्याविषयीचा संशय निर्माण झाल्याचा तर्क द्यावा लागतो. तरंच प्रयोग करण्याची उपयुक्तता मानली जाते. गॅलेलीओ किंवा इतर शास्त्रज्ञांनी पृथ्वी गोल आहे हे हायपोथेसिस मांडताना तसा संशय व्यक्त करणारा विदा दिला होता (क्षितीजावरचे जहाज, ग्रहणाची सावली इ.). त्यानंतर आणखी निरिक्षणे आणि प्रयोग करुन योग्य निष्कर्ष काढण्यात आला. 'पृथ्वी गोल आहे' कारण 'ती तशी नाही असे सांगणारा विदा नाही' किंवा 'बहुतेक लोकांना तसा विश्वास वाटतो' ह्या कारणावर त्यांचा प्रयोग आधारलेला नव्हता.

घासकडवी म्हणतात, मोरयाच्या भक्तिने अपघात टळू शकतात हे प्रयोगने सिद्ध झालेले नाही. आणि तसा प्रयोग केला पाहिजे असे त्यांचे मत दिसते. 'अनेक लोक ह्यावर विश्वास ठेवतात' हे प्रयोग करण्यासाठी आवश्यक असलेला संशय निर्माण होण्यास पुरेसे कारण आहे असे त्यांचे मत आहे.

माझ्या मते 'अनेक लोक विश्वास ठेवातात' हा तर्क संशय उत्पन्न होण्यास पुरेसा नाही. ह्याच तर्काने मग, 'देवतेला बळी चढवणे, सती जाणे, गुढग्यावर बसुन १००० प्रदक्षिणा घालणे, पुण्यप्राप्तीसाठी घरातील लहान मुलांना उपाशी ठेवणे' इ.इ. अनेक निरुपद्रवी ते प्रचंड हानीकारण अशा (अंध)श्रद्धा आणि त्याची उपयुक्तता ह्याचा शास्त्रिय प्रयोग मांडून अभ्यास करावा लागेल. तसे प्रयोग करुन पाहण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते का?

अतार्किक!

परग्रहवासियांचा शोध घेताना 'ते अस्तित्वात नाहीत' ह्या गृहितकावर विश्वास ठेवून कसं चालेल? ''परग्रहवासी नाहीत' ह्या गृहितकावर आधारीत आपले सर्व व्यवहार ठेवल्यास' परग्रहवासीयांचा शोध घेण्याचे कष्ट घेण्याचे व्यवहारही बंद होणार.

कृपया मूळ वाक्य पुन्हा वाचावे..

पण त्यांचे अस्तित्व जोपर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत आपले इतर सर्व व्यवहार 'ते अस्तित्वात नाहीत' ह्या गृहितकावर चालावेत.

पुन्हा सांगतो

माझ्या त्या विधानाचा तुम्ही गैर अर्थ घेतलेला आहे. तिथे कृष्णविवरांच्या अदृश्यतेचा काडीमात्र संबंध नाही. आइन्स्टाइनने साधारण सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला १९१५ साली. त्याच वेळी त्याच्या थिअरीमध्ये ग्रॅव्हिटिक लेन्सिंग व कृष्णविवरं अंतर्भूत होती. त्या थियरीत आहेत म्हणून एखाद्या खगोलशास्त्रज्ञाने ती शोधण्याचा प्रयत्न करणं हे साहजिकच वाटतं.

ठीक आहे, सध्या उपलब्ध पुराव्याविषयी तुमचा युक्तिवाद नसून कोणताही अभ्युपगम मांडला जातो तेव्हाच्या परिस्थितीविषयी तुमचा युक्तिवाद आहे असे दिसते.
किंचित दुरुस्ती: ब्लॅक होल आईनस्टाईनच्या १९१५ सालीच्या लेखनात नव्हते. श्वार्जरचाईल्ड यांनी १९१५ मध्ये सुरुवात केली आणि चंद्रशेखर यांनी १९३१ मध्ये त्या थिअरीतून तसा अर्थ काढला.

त्या थियरीत आहेत म्हणून एखाद्या खगोलशास्त्रज्ञाने ती शोधण्याचा प्रयत्न करणं हे साहजिकच वाटतं. "कारण नाहीतर ज्यांचं अस्तित्व सिद्ध करणं किंवा नास्तित्व असिद्ध करणं शक्य नाही अशा सर्वच कल्पनांची वासलात लावावी लागेल." या वाक्यानंतर ते बिधान येतं - म्हणजे जी गोष्ट आहे याची खात्री देता येत नाही ती आहे यावर विश्वास ठेवून शोध घेणं निरर्थक ठरेल.

अभ्युपगम सिद्ध करण्यासाठी शोध घेतला जात नाही, त्यावर विश्वास ठेवून शोध घेतला जातो. फॉल्सिफाएबिलिटी ही संकल्पना कृपया नीट समजावून घ्या.

असाच नसलेल्या, पण असू शकेल अशा गोष्टींचा शोध घेण्याचं उदाहरण म्हणजे SETI. आत्तापर्यंत कोणीही न पाहिलेल्या परग्रहवासियांचा शोध शास्त्रज्ञ म्हणवणारे घेताना दिसतात. याला काय म्हणावं? श्रद्धा? यनावालांच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत परग्रहवासीय आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ते अस्तित्वात नाहीत हे सिद्ध होतं. ते अस्तित्वात नाहीत, त्यामुळे त्यांचा शोध घेणं मूर्खपणाचं आहे.

वरील खुलाश्याच्या धर्तीवरच, "परग्रहवासीय नाहीत" या सिद्धांताला असिद्ध करण्यासाठी त्यांचा शोध घेतला जातो कारण, (यनावालांच्या नियमाप्रमाणे) जोपर्यंत परग्रहवासीय आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ते अस्तित्वात नाहीत हे सिद्ध झालेले आहेच. सिद्ध/असिद्ध झाले तरी पुन्हापुन्हा शोध घेतला जातोच. देव या संकल्पनेची व्याख्या सांगितलीत तर तिचा शोध घेण्याच्या प्रयोगांची चर्चा शक्य आहे.

विश्व कोणी निर्माण केले?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.राजेश स्वतः निरीश्वरवादी असूनही चर्चेसाठी ईश्वरसमर्थक बनतात हे प्रशंसनीय आहे.त्यांनी आपल्या युक्तिवादाची मांडणी व्यवस्थित केली आहे.त्यांनी सुचविलेले सृष्टिनिर्माता (विश्वनिर्माता) आणि भाग्यविधाता हे ईश्वराचे गुणधर्म गृहीत धरू.
"

हे जगड्व्याळ विश्व कोणी निर्माण केलं हा प्रश्न रहातोच. "

असे ते म्हणतात.
विश्व म्हणजे काय? ...ज्या क्षणी जे असित्वात असते ते यच्चयावत्सर्व त्या क्षणाचे विश्व.विश्वाच्या बाहेर काही असू शकत नाही.असले तर ते धरून सर्व विश्व म्हटले पाहिजे.
प्रश्न....हे जगड्व्याळ विश्व कोणी निर्माण केले? उत्तर....परमेश्वराने
इथे विश्वनिर्मितीच्या आधी परमेश्वर अस्तित्वात होता, म्हणजे विश्वनिर्मितीच्या आधी विश्व अस्तित्वात होते असा अर्थ निघतो.हा विरोधाभास आहे.म्हणून विश्व कोणी निर्माण केले हा प्रश्न चुकीचा ठरतो. त्यामुळे विश्व कोणी निर्माण केले नाही. ते शून्यातून निर्माण झाले असे म्हणणे क्रमप्राप्त ठरते.कुणी म्हणेल,;"म्हणजे विश्वापूर्वी शून्य अस्तित्वात होते तर ! तर शून्य अस्तित्वात असणे म्हणजेच काही अस्तित्वात नसणे.
"माझ्या बँक खात्यात शून्य शिल्लक आहे." "माझ्या बँकखात्यात काही शिल्लक नाही" ही दोन्ही विधाने समानार्थी आहेत.
... देवाचा दुसरा गुणधर्म "भाग्यविधाता" याचा अर्थ भक्तांसाठी भाग्यविधाता असा घ्यायचा की सर्वांसाठी? भक्तांसाठी म्हटले तर केवळ आस्तिक्य पुरेसे नाही. देवाविषयी अनन्यभाव हवा. "या माणसाला देवाने अपघातातून वाचवले नाही कारण तो खरा देवभक्त नव्हता" असे कुणाच्याही बाबतीत म्हणता येईल.

विनंती

संपादकांना विनंती: इथे प्रतिसादांचा माग ठेवणे अवघड होते आहे. राजेश घासकडवी ह्यांचा प्रतिसाद त्यावर चाललेली उपचर्चा वेगळ्याच धाग्यात स्वतंत्र केल्यास चर्चा पुढे चालू ठेवायला सोपे जाईल.

अतिव्यापक व्याख्या

विश्व म्हणजे काय? ...ज्या क्षणी जे असित्वात असते ते यच्चयावत्सर्व त्या क्षणाचे विश्व.विश्वाच्या बाहेर काही असू शकत नाही.असले तर ते धरून सर्व विश्व म्हटले पाहिजे.

इथेच घोडं पेंड खातं. नास्तिक नेहमीच ही गल्लत करतात. विश्वाची व्याख्या 'सेट ऑफ एव्हरीथिंग' केली की प्रश्न कृत्रिमरीत्या सोपा (ट्रिव्हियल) होतो. जेव्हा विश्व हा शब्द वापरला जातो, तेव्हा खरं तर ज्ञात विश्व म्हणायचं असतं. वैज्ञानिक नेहमीच आपली विधानं ज्ञातापुरती मर्यादित ठेवतात. त्यामुळे ज्ञात विश्वाविषयी बोलत रहात, जसजसा आपला ज्ञाताचा आवाका वाढत जाईल तसतसा देवाचा हायपोथिसिस लागू होतो की नाही हे तपासून पहावा लागेल. म्हणजे आपण लहान असतो तेव्हा प्रथम शहराचा भूगोल शिकतो. नंतर राज्याचा, देशाचा, जगाचा क्रमाक्रमाने शिकतो. आपलं ज्ञात विश्व विस्तारत जातं. तिसरीत असतानाच सर्व (ज्ञात) विश्वाचं ज्ञान कसं होईल?

उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही आम्ही सगळे एका बादलीमधल्या पाण्यातले बॅक्टेरिया आहोत. आपण विचार केला (इसापनीतीतले बॅक्टेरिया आहोत असं समजू) की हे पाणी कसं काय बरं आलं इथे? तर त्याबाबतची एक थिअरी 'कोणी तरी या बादलीत ओतलं' अशी असू शकते. कोणी जर हट्ट केला की या बादलीतल्या बादलीतच कसं निर्माण झालं याचं उत्तर मिळालं पाहिजे, तर काय म्हणायचं? बरं, हा जो कोणी ओतणारा आहे तो आपण व बादली यांपेक्षा इतका क्लिष्ट आहे की तो असणं शक्यच नाही असं नाही. कदाचित तोही शून्यातून निपजला असू शकेल. हा बॅक्टेरिया-बादली-मनुष्य प्रश्न समांतरपणे मनुष्य-ज्ञात विश्व- देव व त्यालाही समांतर देव - त्याचा परिसर - सुपरदेव असा मांडता येऊ शकेल. ही साखळी अनंतापर्यंत जातच असेल असं नाही. बॅक्टेरिया ज्या प्रक्रियेने झाले त्याच प्रक्रियेने माणूसही तयार होतो हे आपण मानतोच. आणि जर अनंतापर्यंत जात असेल तर तो त्या साखळीचा प्रॉब्लेम नाही.

"या माणसाला देवाने अपघातातून वाचवले नाही कारण तो खरा देवभक्त नव्हता" असे कुणाच्याही बाबतीत म्हणता येईल.

पण हा देवावरचा विश्वास किंवा श्रद्धा आपल्याला मोजताच येत नाही म्हणून ती मोजायचीच नाही, किंवा तिच्यावर काहीच अवलंबून असणार नाही असं म्हणणं योग्य नाही. ही श्रद्धेची मर्यादा नाही. मोजमापाच्या साधनांची मर्यादा आहे. पुढे कधी काळी अशी साधनं निघतीलही. 'श्रद्धा निरुपयोगी आहे याची आम्हाला इतकी खात्री आहे, की ती व तिचे परिणाम आम्ही मोजण्याच्याच भानगडीत पडणार नाही' हा विज्ञानवाद नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

प्रति

ज्ञात विश्व म्हणजे काय? विश्व हा शब्द युनिवर्स ह्या अर्थाने वापरला आहे असे गृहित धरतो. ज्ञात विश्व म्हणजे तुम्हाला ऑब्जर्वेबल युनिवर्स असे म्हणायचे आहे का? हे स्पष्ट झाल्याशिवाय बाकीच्या लिखाणावर प्रकाश पडणे कठिण आहे.

पण हा देवावरचा विश्वास किंवा श्रद्धा आपल्याला मोजताच येत नाही म्हणून ती मोजायचीच नाही, किंवा तिच्यावर काहीच अवलंबून असणार नाही असं म्हणणं योग्य नाही.

देवावर गाढ श्रद्धा असणे आणि अपघात होणे ह्यांचा परस्पर संबंध असू शकतो, आपल्याला अजून पुरेसे माहित नाही. असे तुम्हाला सुचवायचे आहे का? (तुम्हाला खरंच अशी शंका मनात असल्यास तुम्ही स्वत:ला नास्तिक कसे काय बनवलेत हे समजुन घ्यायला आवडेल.)

भूमिकेशी सुसंगत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वैद्य म्हणतातः

देवावर गाढ श्रद्धा असणे आणि अपघात होणे ह्यांचा परस्पर संबंध असू शकतो, आपल्याला अजून पुरेसे माहित नाही. असे तुम्हाला सुचवायचे आहे का? (तुम्हाला खरंच अशी शंका मनात असल्यास तुम्ही स्वत:ला नास्तिक कसे काय बनवलेत हे समजुन घ्यायला आवडेल.)

श्री.राजेश मुळात निरीश्वरवादी असले तरी या चर्चेसाठी देवसमर्थक बनले आहेत.म्हणून त्यांनी जे लिहिले आहे ते त्यांच्या या मानीव भूमिकेशी सुसंगत आहे, असे म्हणायला हवे.

श्री राजेश यांची भूमीका

श्री.राजेश मुळात निरीश्वरवादी असले तरी या चर्चेसाठी देवसमर्थक बनले आहेत.म्हणून त्यांनी जे लिहिले आहे ते त्यांच्या या मानीव भूमिकेशी सुसंगत आहे, असे म्हणायला हवे.

श्री राजेश यांनी यावर भाष्य करावे अशी विनंती. ते मुळात निरीश्वरवादी आहेत, तर चर्चेसाठी देवसमर्थक व्हायची आवश्यकता त्यांना का वाटली असावी? यामागे मंडण-खंडण परंपरा जपण्याची उदार भूमीका आहे, की देव मानणारे कसे तोकडे पडतात हे आपणच त्यांच्याच बाजूने बोलून दाखवण्याचा उद्देश आहे की कसे हे त्यांनी स्पष्ट करावे.

दुसरे म्हणजे, आपण स्वत: निरीश्वरवादी आहोत असा डिस्क्लेमर त्यांना का द्यावासा वाटला? चर्चा स्वतःचे मत काहीही असले तरी ऍकॅडेमिक होऊ शकतेच. त्यांचा डिस्क्लेमर हा निरुद्देश आहे, की कसे तेही त्यांनी स्पष्ट करावे ही विनंती.

हरकत नसावी

टाईमपास म्हणून श्री. राजेश यांना चर्चा करण्यासाठी असे प्रिटेंशन करावेसे वाटले असावे हा एक कयास आहे.

कयास

कशाचातरी तुलनात्मक अभ्यास करावयाचा त्यांचा उद्देश असू शकेल.

वैचारिक व्यायाम

यामागे मंडण-खंडण परंपरा जपण्याची उदार भूमीका आहे, की देव मानणारे कसे तोकडे पडतात हे आपणच त्यांच्याच बाजूने बोलून दाखवण्याचा उद्देश आहे की कसे हे त्यांनी स्पष्ट करावे.

या लेखनात अंशमात्रही तिरकसपणा नाही. मी उपक्रमवर पूर्वी एक लेख लिहिला होता - 'विचारा वेळ द्या जरा'. त्यात सर्वांनीच आपला कंफर्ट झोन सोडून थोडा वेगळा विचार करून पहावा असं म्हटलं होतं. तोच इथे प्रयत्न आहे. आपला वैचारिक कणा हलणार नाही इतका कठीण, कडक झाला आहे का? हा विचार प्रत्येकाने करायला हवा. शरीराच्या लवचिकतेसाठी आपण व्यायाम करतो, तसा वैचारिक लवचिकतेसाठीही करायला हवा. हे लेखन म्हणजे तसा व्यायाम आहे. यात अर्थातच मी खोटं काही लिहिलेलं नाही, कारण माझ्या वैचारिक प्रकृतीनुसार कणा न मोडता किती कुठच्या दिशेला वाकता येतं याला मर्यादा आहेतच.

दुसरे म्हणजे, आपण स्वत: निरीश्वरवादी आहोत असा डिस्क्लेमर त्यांना का द्यावासा वाटला?

डिस्क्लेमर देण्याचं कारण हेतूबद्दल गैरसमज होऊ नयेत इतकंच होतं. वैचारिक नाझीझमला विरोध केल्याबद्दल लगेच क्लोजेट विज्ञानशत्रू वगैरे म्हणायला लोकं धजावतात. त्यामुळे भूमिका स्पष्ट केली इतकंच.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

भूमिका

राजेश हे स्वतः निरीश्वरवादी असुनही त्यांनी घेतलेली भूमिका प्रशंसनीय आहे. पण निरीश्वरवादी असले तरी त्यातले काही कच्चे दुवे दाखवण्यासाठी किंवा त्यांना असलेला संशय व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे असा माझा समज आहे. निरीश्ववरवादी असले तरी ते त्यांच्या इथल्या मतांशी प्रामाणिक आहेत ह्या गृहितकातुन माझा प्रतिसाद दिला आहे.

असहमत

जसजसा आपला ज्ञाताचा आवाका वाढत जाईल तसतसा देवाचा हायपोथिसिस लागू होतो की नाही हे तपासून पहावा लागेल.

हात्तेच्या! म्हणजे, देव, धर्म, इ. संकल्पना प्रयोगशाळेतील उंदरांसाठी आहेत? (थिअरी ऑफ एवरीथिंग नव्हे?)

आपण विचार केला (इसापनीतीतले बॅक्टेरिया आहोत असं समजू) की हे पाणी कसं काय बरं आलं इथे? तर त्याबाबतची एक थिअरी 'कोणी तरी या बादलीत ओतलं' अशी असू शकते.

मुळीच नाही!
"कसं?" या प्रश्नाचे उत्तर देताना मेकॅनिजम (यंत्रणा) सांगावी लागते. दुसर्‍या बादलीत स्वतः पाणी ओतणे प्रश्नकर्त्याला शक्य झाले पाहिजे. "मला माहिती नाही"/"पाणी कोणीतरी ओतले" ही न-उत्तरे आहेत, उत्तरे नव्हेत. त्यांपेक्षा "पाणी ऑपॉप बनले"/"पाणी आधीपासूनच होते" हे अभ्युपगम अधिक स्वस्त आहेत. देव या विषयावर मी उपक्रमवर दिलेल्या माहितीत तुम्हाला हे प्रतियुक्तिवाद सापडतील. कृपया उगीच घिसेपिटे युक्तिवाद देऊन बोर करू नका.

कोणी जर हट्ट केला की या बादलीतल्या बादलीतच कसं निर्माण झालं याचं उत्तर मिळालं पाहिजे, तर काय म्हणायचं?

"Before you say something is out of this world, first make sure it is not in this world." - मायकेल शर्मर

हा बॅक्टेरिया-बादली-मनुष्य प्रश्न समांतरपणे मनुष्य-ज्ञात विश्व- देव व त्यालाही समांतर देव - त्याचा परिसर - सुपरदेव असा मांडता येऊ शकेल. ही साखळी अनंतापर्यंत जातच असेल असं नाही. बॅक्टेरिया ज्या प्रक्रियेने झाले त्याच प्रक्रियेने माणूसही तयार होतो हे आपण मानतोच.

साखळी सुपरदेव पायरीवर का थांबते?

पण हा देवावरचा विश्वास किंवा श्रद्धा आपल्याला मोजताच येत नाही म्हणून ती मोजायचीच नाही, किंवा तिच्यावर काहीच अवलंबून असणार नाही असं म्हणणं योग्य नाही

तिच्यावर काय अवलंबून आहे ते कृपया सांगा.

'श्रद्धा निरुपयोगी आहे याची आम्हाला इतकी खात्री आहे, की ती व तिचे परिणाम आम्ही मोजण्याच्याच भानगडीत पडणार नाही' हा विज्ञानवाद नाही.

परिणाम कोणते ते तर आधी कृपया नमूद करा ना! मग मोजण्या/न मोजण्याची चर्चा शक्य आहे.

मोठी लोकसंख्या

पण हा देवावरचा विश्वास किंवा श्रद्धा आपल्याला मोजताच येत नाही म्हणून ती मोजायचीच नाही, किंवा तिच्यावर काहीच अवलंबून असणार नाही असं म्हणणं योग्य नाही

तिच्यावर काय अवलंबून आहे ते कृपया सांगा.

मोठी लोकसंख्या न-एहिक जीवनासाठी श्रध्देवर अवलंबुन असल्यानेच नास्तिकांना बरेच काम असल्याचे दिसते.

न - ऐहिक नव्हे ऐहिक

चूक दुरुस्ती- ऐहिक जीवनासाठी लोक श्रद्धेवर अवलंबून असतात असे वाटते, न-ऐहिक जीवनात सुख मिळाले तर ते बाय वन गेट वन फ्री सारखे!

असो.

अमान्य

चूक दुरुस्ती- ऐहिक जीवनासाठी लोक श्रद्धेवर अवलंबून असतात असे वाटते

मला अपेक्षित श्रध्दाळू न-ऐहिक जीवनासाठी श्रध्दा बाळगणारेच आहेत, उदा.- वारीला जाणारे काही लोक, किंवा कर्मसिध्दांत मानणारे काही लोक.

तुम्हाला चर्चा करायची नसल्यास ठीक आहे, असल्यास उत्तम, खरडदेखिल चालेल. तुमचा निर्णय.

फार चर्चा करून वेळ घालवायचा नाही.

पण माझ्या पाहण्यात वारीला जाणारे लोक पुढचा जन्म उत्तम यावा म्हणून करतात असे नाही. मित्र भेटतात, नशा असते, ऐहिक जीवनातल्या कटकटींवर उतारा म्हणून किंवा पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. कर्मसिद्धांत मानणारे लोक श्रद्धा न-ऐहिक जीवनासाठी ठेवतात हे असू शकते. पण तुमचे विधान पूर्ण खरे नाही, साफ चूक नाही, पण मला बहुतांशी अमान्य आहे. (माझ्या अनुभवावरून)

सहमती

...तुमचे विधान पूर्ण खरे नाही, साफ चूक नाही,...

सहमत आहे. देवाला मानण्याची आणि त्याच्या दर्शनाला जाण्याची अनेक कारणे असू शकतात. सगळ्याच कारणांना अंधश्रद्धांमध्ये गणता येणार नाही.

+१

सगळ्याच कारणांना अंधश्रद्धांमध्ये गणता येणार नाही.

उदा., खिसे कापणे?

बरोबर

खिसे कापणे, भीक मागणे, राजकारण करणे, दुकान टाकणे, आपण यादी बनवू शकतो. पण ते अवांतर होईल. मुद्दा मांडून झालेला आहे.

मुद्दा

त्यासाठी देव मानण्याची आवश्यकता नाही, देवळात जाणे पर्याप्त ठरेल. मानणे हीसुद्धा अंध:श्रद्धा नसल्याचे काही उदाहरण आहे काय?

तुमचाच मुद्दा

त्यासाठी देव मानण्याची आवश्यकता नाही

पहिले खिसे कापण्याचे उदाहरण तुम्हीच दिलेत. त्याला अनुसरुन मी बाकीची यादी बनवली. तेंव्हा तुम्हीच सांगा, खिसे कापण्यासाठी देव मानण्याची काय आवश्यकता आहे?

हाहा

काहीच आवश्यकता नाही.
अंधश्रद्धा नसताना देवळात जाण्याची उदाहरणे मला माहिती आहेत, म्हणून त्यांतले एक दिले. देव मानणे परंतु अंधश्रद्ध नसणे हा वदतोव्याघात आहे (असे माझे प्रतिपादन आहे) त्यामुळे त्याचे काहीच उदाहरण देणे मला शक्य नाही. ते उदाहरण मला तुमच्याकडून अपेक्षित आहे.

कपिल देव?

देव मानणे परंतु अंधश्रद्ध नसणे हा वदतोव्याघात आहे

आळश्यांचा_राजा आता कपिल देवचे उदाहरण देतील.

(आळश्यांचा_महाराजा) सदस्य

नाही.

देव मानणे परंतु अंधश्रद्ध नसणे हा वदतोव्याघात आहे (असे माझे प्रतिपादन आहे)

हाहा! नाही, वदतोव्याघातामधे शक्यता शुन्य असते हे सिध्द झालेले असते, इथे देवाची व्याख्याच नाही तर सिध्द काय होणार, त्यामुळे वदतोव्याघात नाही.

आहे

मोरयाची व्याख्या आहे. घासकडवींच्या देवाची व्याख्या उपलब्ध नाही.

ठीक

पण माझ्या पाहण्यात वारीला जाणारे लोक पुढचा जन्म उत्तम यावा म्हणून करतात असे नाही. मित्र भेटतात, नशा असते, ऐहिक जीवनातल्या कटकटींवर उतारा म्हणून किंवा पांडुरंगाच्या दर्शनाला जातात.

:) म्हणूनच "काही लोक" असे मी नमुद केले, आपल्याला ह्या जीवन-मरणाच्या चक्रातुन बाहेर पडायचे आहे म्हणून वारी करतो असे सांगणारे देखिल आहेत. बाकी हौशी, नवशे, गवशे तर विज्ञान-जत्रेत पण असतात.

बाकी खरडीत मत सांगतो, तुमचा वेळ इथे खात नाही.

ज्ञात विश्व

देवाचा वकील असे म्हणल्यासारख वाटतो की ज्ञात विश्वात देव नाही, अज्ञात विश्वात देव आहे. नुसता देवच नाही तर चॉकलेटचे डोंगर, हॅरी पॉटर, मिकी माऊस असे अनेक अज्ञात विश्वात आहेत. वकीली बाण्यात एवढेच म्हणायचे असेल तर माझी या युक्तिवादाला फारशी हरकत नाही.

प्रमोद

मस्त

हा हा हा मस्त प्रतिसाद.

जास्त व्यापक

अज्ञात विश्वात सगळंच काही आहे असं म्हणण्याचा माझा प्रयत्न नाही. माझा युक्तिवाद अधिक व्यापक आहे, तो तुम्ही मुळापासून समजावून घ्यावा ही विनंती.

थोडक्यात: नवीन काही सापडलं तरच जुनी थियरी बदलली जाते. पण जुन्या थियरीला घट्ट धरून बसलं तर सुरूवातीला थियरीत न बसणाऱ्या गोष्टींकडे अपवाद, चुकीची निरीक्षणं वगैरे म्हणून झिडकारलं जातं. त्यामुळे अज्ञात विश्वात काहीतरी आहे याबाबत खात्री असणं हे खरं तर ज्ञानाच्या मर्यादा वाढण्यासाठी उपकारक असतं. म्हणून देवाच्या अस्तित्वाच्या शक्यतेच्या बाबतीत नास्तिकांनी इतकं ताठर असू नये.

मोरयाची कृपा मधल्या साठेंप्रमाणे अनेक असतात. त्यांच्या श्रद्धेच्या प्रमाणाचं आणि त्यांच्या यशाचं कोणी कोरिलेशन काढलेलं आहे का? जे मोजलेलंच नाही त्याबाबत सिद्धतेची ठाम विधानं करू नयेत.

बाकी चॉकलेटचे डोंगर आणि देव यांना अज्ञात विश्वात समान स्थान अर्थातच नाही. अज्ञात विश्वात कुठेतरी देव आहे असं जगभरातले सुमारे ९५% लोक मानतात. लक्षावधी लोक त्या कल्पनेसाठी जीव द्यायला तयार असतात. तेव्हा इतक्या सहज ही कल्पना झिडकारून टाकता येत नाही.
राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

खुले मन विरुद्ध बुद्धिप्रामाण्य

नवीन काही सापडलं तरच जुनी थियरी बदलली जाते. पण जुन्या थियरीला घट्ट धरून बसलं तर सुरूवातीला थियरीत न बसणाऱ्या गोष्टींकडे अपवाद, चुकीची निरीक्षणं वगैरे म्हणून झिडकारलं जातं. त्यामुळे अज्ञात विश्वात काहीतरी आहे याबाबत खात्री असणं हे खरं तर ज्ञानाच्या मर्यादा वाढण्यासाठी उपकारक असतं. म्हणून देवाच्या अस्तित्वाच्या शक्यतेच्या बाबतीत नास्तिकांनी इतकं ताठर असू नये.

नवीन अभ्युपगम सिद्ध झाल्यास हिणवायला या.

मोरयाची कृपा मधल्या साठेंप्रमाणे अनेक असतात. त्यांच्या श्रद्धेच्या प्रमाणाचं आणि त्यांच्या यशाचं कोणी कोरिलेशन काढलेलं आहे का? जे मोजलेलंच नाही त्याबाबत सिद्धतेची ठाम विधानं करू नयेत.

त्याची डीफॉल्ट किंमत शून्य मानावी लागते, आम्हाला कोरिलेशन दाखविण्यासाठी अभ्युपगमाच्या विक्रेत्यांनी कष्ट घ्यावेत.
http://www.templeton.org/newsroom/press_releases/060407step.html

बाकी चॉकलेटचे डोंगर आणि देव यांना अज्ञात विश्वात समान स्थान अर्थातच नाही. अज्ञात विश्वात कुठेतरी देव आहे असं जगभरातले सुमारे ९५% लोक मानतात. लक्षावधी लोक त्या कल्पनेसाठी जीव द्यायला तयार असतात. तेव्हा इतक्या सहज ही कल्पना झिडकारून टाकता येत नाही.

ब्रूनो, गॅलेलिओ, इ.ना हे समजलेच नाही.

अज्ञात विश्वात काय आहे?

युक्तिवाद जेवढा समजला त्याप्रमाणे प्रतिक्रिया लिहितो आहे.
देवावर ९५ टक्के लोक विश्वास ठेवतात ही आकडेवारी विश्वासार्ह नाही.
कुठल्याही एका प्रकारच्या देवावरची विश्वासार्हता ही बहुधा अल्पसंख्येत जाईल. तेंव्हा जनमताचा रेटा फारसा उपयोगी नसावा.
माझ्या मते लक्षावधी लोक जीव द्यायला तयार आहेत हे देखील चुकीचे आहे. (जीव घ्यायला तयार असणार्‍यांची संख्या कदाचित लाखात जाईल.)
आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम देवकार्यास देणार्‍यांची संख्या मामुली असेल.

त्यामुळे अज्ञात विश्वात काहीतरी आहे याबाबत खात्री असणं हे खरं तर ज्ञानाच्या मर्यादा वाढण्यासाठी उपकारक असतं.

यावरून आठवण झाली.
एके काळी लोखंडापासून (पार्‍यापासूनही) सोने तयार करण्याचे अथक प्रयत्न झाले आणि अपयशी ठरले. त्यावरून मूलद्रव्यांची संकल्पना पुढे आली.

अशिलाच्या मदतीशिवाय वकीली करण्याविषयी शुभेच्छा.

प्रमोद

उत्तम चर्चा

छान चर्चा चालली आहे. राजेशजींच्या प्रतिवादाची वाट बघतो आहे. ते सर्वांना उत्तरे देतीलच. नुसताच पो टाकुन पळ काढायला ते काही ट्रोल नाहीत.

शंका

नुसताच पो टाकुन पळ काढायला ते काही ट्रोल नाहीत.

१. पो टाकणे म्हणजे काय?
२. नुसताच पो टाकून पळ काढणार्‍याला ट्रोल म्हणतात काय? शब्दकोशात तसा अर्थ आहे काय? नुसताच पो न टाकता शिवाय त्यासोबत इतर शिट इत्यादि तत्सम त्याज्य पदार्थ टाकून पळ काढल्यास ट्रोल म्हणवता येते काय?
३. याचा या चर्चेशी काय संबंध?

 
^ वर