संदर्भ

क्लोंडायक गोल्ड रश - भाग २

रॉबर्ट हेंडरसन, कॅनडातील 'नोवा स्कॉशिया' परगण्यातला एक धाडसी युवक. सहा फुट उंच, निळ्या डोळ्यांचा, निधड्या छातीचा. त्याचे वडील बिग आयलंडवरील दिपगृहाच्या देखभालीचं काम करीत. वडीलांच्या कामात काडीचाही रस नसलेल्या हेंडरसनला नेहमीच भूमिगत सोनं दडल्याची स्वप्न पडत असत, नव्हे तशी स्वप्न तो रंगवत बसलेला असायचा. तसा तो पोटापाण्यासाठी फुटकळ उद्योग करायचा पण मनात नेहमीच हे भूमिगत सोनं धुंडाळून काढायची सुप्त इच्छा दडलेली होती. शेवटी वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने रहातं घर सोडलं आणि सोन्याच्या शोधार्थ न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे अनेक प्रांत पालथे घातले.

क्लोंडायक गोल्ड रश - भाग १

इसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज करून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्‍यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.

रामचंद्र पंत अमात्य कृत आज्ञापत्र

आज्ञापत्रामागील प्रेरणा पंचतंत्र आहे असा उल्लेख मी अंतर्जालावर एका लेखात वाचला होता पण आता तो संदर्भ उपलब्ध नाही. १४व्या शतकातील एका नीती ग्रंथात पंचतंत्रावर आधारित राज्यकारभार कसा चालवावा आणि राज्यव्यवस्था कशी ठेवावी याचे विवेचन होते आणि तो ग्रंथ रामचंद्र पंताना उपलब्ध होता अशी माहिती त्या लेखात होती. या विषयावर कोणास अधिक माहिती असेल तर कृपया ती येथे द्यावी हि विनंती.

लेखनविषय: दुवे:

महाराष्ट्राचे वैभवः हेमाडपंती मंदिरे

sangameshwarप्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खजुराहो, कोणार्क, हम्पी आणि चालुक्यांची बदामी येथील मंदिरे त्यांच्या स्थापत्य आणि शिल्पकामांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि पर्यटनस्थळेही गणली जातात।

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.

त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.

सिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल

स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वदूर पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.

महाराष्ट्र-शब्दकोश

मराठीभाषाप्रेमींसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन महाजालावर उपलब्ध झालेलं आहे. य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे ह्यांनी आठ खंडांत संपादलेला महाराष्ट्र-शब्दकोश आता खालील दुव्यावर उपलब्ध झाला आहे. श्री. खापरे ह्यांचे मनःपूर्वक आभार !!!

प्रश्न मनाचे

ग्रंथ परिचय- प्रश्न मनाचे

ज्ञान आणि Knowledge (एक पूर्श्चात्य योग)

ज्ञान आणि Knowledge
(एक पूर्श्चात्य योग)

-- सत्त्वशीला सामंत


गुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते?

नमस्कार वाचकांनो,

आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नन्दननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.
गुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 
^ वर