अनुभव
एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय
एकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत. साखरेपासून कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या शारीरिक गतीस अशा परिस्थितीत वेग लाभतो.
दुसरा वसाहतवाद
ब्रिटीश पारतंत्र्याच्या काळात, राज्यकर्ते आपल्याकडून कमी भावात कापूस मिळवून आपल्या इंग्लंडातील गिरण्यांमध्ये घेऊन जात. तेथे त्याचे कापड बनवित आणि परत हिंदुस्तानात आणून चढ्या भावाने आपल्याला ते घेण्यास भाग पाडत.
आंतरिक शक्तीचा शोध-१
७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला.
कोकण सहलीच्या निमित्ताने
डिसेंबर २०१० च्या ११, १२ आणि १३ तारखांना आम्हा सगळ्यांना वेळ होता. कोकणात सहल करण्याची इच्छा होती. हवामान स्वच्छ होते. म्हणून, (चालकाव्यतिरिक्त) १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी करून आम्ही नऊ जण मजेत कोकण फिरून आलो.
देव कोणी निर्माण केला? का केला?
मला वाटते देवाची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी देव निर्माण केला. मानवाचा जन्म झाल्यानंतर अनेक वर्षे मानव उत्क्रांती अवस्थेतून जात असतांना कधीतरी त्या जंगली टोळ्यांना प्रगत (वेगळा) विचार देण्याची गरज निर्माण झाली असावी.
मराठे शाहीतील मद्यपान विषयक धोरण आणि शासन व्यवस्था
संपुर्ण भारतात महाराष्ट्र हे सर्वच बाबतित पुढारलेले राज्य समजले जाते. मग मद्य प्राशनाबाबत देखील ते मागे कसे राहू शकेल.
बाहुल्यांच्या अनोख्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद
''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या क
पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०
नमस्कार,
धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण १२ शके १९३२ रोजी 'पुस्तकविश्व'चा पहिलावहिला दिवाळी अंक प्रसिद्ध् झाला. हा अंक ऑनलाईन तसेच पीडीएफ स्वरुपात एकाच वेळी प्रसिद्ध झाला आहे .