देव कोणी निर्माण केला? का केला?

मला वाटते देवाची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी देव निर्माण केला. मानवाचा जन्म झाल्यानंतर अनेक वर्षे मानव उत्क्रांती अवस्थेतून जात असतांना कधीतरी त्या जंगली टोळ्यांना प्रगत (वेगळा) विचार देण्याची गरज निर्माण झाली असावी. ही गरज का निर्माण झाली असावी ह्याची काही कारणे आपण अंदाजू शकतो; उदा- ह्या टोळ्यांमधील युद्धे व मानवीसंहार, ई. काही हुशार लोकांना असे वाटणे साहजिक आहे की, ह्या युद्धापेक्षा अधिक समंजस भुमिका घ्यायची असेल तर काही प्रोटोकॉल असणे आवश्यक आहे. हेच वेद / धर्म तर नव्हेत?- जगण्याचे / वागायचे नियम?

अर्थातच वरील विचार हा एक फार त्रोटक अंदाज आहे, त्यामुळेच खालील प्रश्न पडतात-

देव कोणी निर्माण केला? का केला?- त्यांना काय साधायचे होते?
ज्यांच्या पर्यंत वरील प्रोटोकॉल पोहोचले नाही ते लक्षावधी वर्षांपासुन तसेच "आदीवासी" राहीले- त्यांच्यात देवाची भुमिका कशी असते?

हे जर स्पष्ट झाले तर उपक्रमावरील सद्य चर्चा "देवाची व्याख्या" अधिक धारदार होईल असे वाटले म्हणून हा (उप)धागा.

Comments

देव

देव कोणी निर्माण केला?

१. देवाशप्पथ सांगतो, मी नाही केला. :)

२. अजून देव म्हणजे काय हेच दोन धागे काढूनही ठरलेच नाही. देव म्हणजे काय हेच माहिती नसल्याने तो कोणी निर्माणकेला हे सांगता/शोधता येणार नाही.

>>ह्या युद्धापेक्षा अधिक समंजस भुमिका घ्यायची असेल तर काही प्रोटोकॉल असणे आवश्यक आहे. हेच वेद / धर्म तर नव्हेत?- जगण्याचे / वागायचे नियम?
जगण्याचे वागण्याचे नियम ठीक आहे पण त्याचा देवाशी काय संबंध?

नितिन थत्ते

अरेरे!

-- देवाशप्पथ सांगतो, मी नाही केला. :)--- मला सुरुवातीपासुन तसेच वाटत होते.
--अजून देव म्हणजे काय हेच दोन धागे काढूनही ठरलेच नाही.-- अरेरे, फार वेळ वाया गेलाय का
--जगण्याचे वागण्याचे नियम ठीक आहे पण त्याचा देवाशी काय संबंध?-- माहीती नाही, अंदाज केला.

हे जास्त योग्य.

मी असं पण ऐकला आहे -
it took 6 days for god to create man and man returned the favor on 7th day.

कोणी निर्माण केला ?

कोणी ?
माणसानेच निर्माण केला ! (त्याचं नाव - गुरमुशकाय-तेन्जी (नावात 'काय' आहे तसही !) )

कधी ?
माझी पणजी देवाचं नाव घ्यायची व मला सांगायची की तिची पणजी नास्तीक होती. :)
माझ्या द्न्यानानुसार २०० वर्षाच्या आधीपासुन देव आहे म्हणजे.

का ?
माझ्या पणजीनुसार देव म्हणजे :
जो जन्म घालतो तो.

माझे आजोबा : -
जो तुमचं नशीब ठरवतो तो.

माझी आई :
तुमच्या प्रयत्नांना यश देतो तो.

मी :
जो उपक्रमावरचे लेख (देवाबद्द्लचे तरी !) नियमीतपणे वाचतो आणि सगळ्यांना त्यानुसार फळ/शिक्शा देतो तो.
(बघा ना - ठठपा गायब झाले की - काय गम्मतच आहे ना ! )

(रिटे , जरा जपुन हं. पासवर्ड वगैरे हारवायचा नाहीतर ! देव बघतो आहे बर्का ! :) )

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

आभारी आहे.

अनावश्यक प्रतिसाद काढून टाकल्याब्द्दल प्रशाननाचा मी आभारी आहे.

देव कोणी तयार केला

अजुनही अनाकलनीय* असलेल्या काही घटनांद्वारे, काही गोष्टींनी मानवाची व्युत्पत्ती, विकास होण्यास मदत केली; कालांतराने माणसाने त्या गोष्टींना आपला निर्माता म्हणून घेत त्या गोष्टींना "देव" नाव देऊन त्यांची वेद, उपनिषदे, धर्मग्रंथे आदींद्वारे निर्मीती केली. मिस्र संस्कृतीमध्ये, हिंदू या धर्मामध्ये (इतरांचे मला माहित नाही) तरी सुर्य, जल, पवन, इत्यादींना "देव" म्हणले जाते, कारण या गोष्टींनीदेखील मानवाची निर्मिती व विकास होण्यास बरीच मदत केली नि अजुनही करताहेत.

* ~ माझा डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर म्हणावा तितका विश्वास नाही, शिवाय मानव पृथ्वीवरचाच कशावरुन?

आधी देव की आधी माणूस?

अनाकलनीय गोष्टींनी मानवाच्या विकासाला हातभार लावला, व मग मानवानेच त्यांची निर्मिती केली हे कसं? आधी देव की आधी माणूस?

शिवाय मानव पृथ्वीवरचाच कशावरुन?

याचाही अर्थ नक्की कळला नाही. अर्थात ही काहीशी अवांतर टिप्पणी होती, त्यामुळे उत्तर अवांतर होईल असं वाटलं तर दिलं नाही तरी चालेल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

:)

ओहऽ, ते वाक्य मला असे म्हणावयाचे होते,

अजुनही अनाकलनीय* असलेल्या काही घटनांद्वारे—काही गोष्टींनी मानवाची व्युत्पत्ती, विकास होण्यास मदत केली; कालांतराने स्वजातीच्या व्युत्पत्ती संदर्भात संशोधन करुन काहीच सबळ पुरावे हाती न लागल्याने बोध न होणार्‍या व शक्यतो डोळ्यांनी वा इतर अवयवांनी न जाणवणार्‍या अशा गोष्टींना माणसाने त्या गोष्टींना आपला निर्माता म्हणून घेत त्या गोष्टींना चमत्कारिक/दैवी शक्ती मानून त्यांची वेद, उपनिषदे, धर्मग्रंथे आदींद्वारे "देव" या नावाने निर्मीती केली.

खिल्ली

"देवा" स्सारख्या महत्वाच्या विषयाची व्याख्या करतांना विचारांच्या व्यापकतेची, समतोलतेची बैठक लागते असे म्हणले तर वावगे ठरु नये. ह्या धाग्यातील विचारांची खिल्ली उपक्रमावर आणखी एक असाच धागा "खुर्ची" विषय घेऊन चर्चीला गेला, हे सखेदपणे नमुद करावेसे वाटले; आणि तो प्रकार संकुचितपणा वाटला.

संकुचितपणा

संकुचितपणा लाइज इन द आय ऑफ द बिहोल्डर. अनेक प्रतिसादकर्त्यांना त्या लेखाची गंमत व वैचारिक गांभीर्य लक्षात आलेलं आहे.

ते विडंबन लिहिताना खालील गृहितकांची/विचारांची उलटतपासणी करायची होती.

- देवाचा कोणीतरी शोध लावला. म्हणजे कोणीतरी एक दिवस बसून म्हटलं की चला, देवाची गरज आहे, काहीतरी निर्माण करू.
- जर असं खरोखरच झालं असेल तर त्यांना प्रत्यक्ष विचारून व्याख्या तयार करता येईल.
- मुळात देवासारख्या क्लिष्ट संकल्पनेची व्याख्या सहज तयार करता येते किंवा मुळात देता येते. (अहो, साध्या खुर्चीची व्याख्या देता येत नाही, तर देवाची काय देणार असा प्रश्न खुर्चीचा लेख विचारतो.)

देव ही संकल्पना खुर्ची या संकल्पनेपेक्षा अधिक क्लिष्ट आहे की नाही ते सांगा, असल्यास खुर्चीच्या बाबतीत वरच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा मग त्याच पद्धतीने देवाच्या बाबतीत उत्तरं शोधता येतील.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

संकुचितपणा नाही - सहमत

खुर्चीचा धागा हा संकुचीतपणा नसुन एका छोट्या उदाहरणावरुन देवाच्या व्याख्येची परततपास्णी होय.

>>अहो, साध्या खुर्चीची व्याख्या देता येत नाही, तर देवाची काय देणार असा प्रश्न खुर्चीचा लेख विचारतो.
हे मी मान्य करत नाही. खुर्चीची व्याख्या देउ करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि तो फार कमी (किंवा नाहीच) आक्षेपाहार्य आहे.
देवाची व्याख्या ह्यापेक्शा कीतीतरी जास्त आक्षेपाहार्य आहे.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

सहमत

सहमत आहे! विडंबनात काहीच संकुचितपणा नव्हता.

महत्वाच्या का?

>> "देवा" स्सारख्या महत्वाच्या विषयाची...

धार्मीक भावना आहेत म्हणुन महत्वाचा काय ?

>>ह्या धाग्यातील विचारांची खिल्ली ...
कुठल्याही प्रकारची खिल्ली उडवली गेली नाही आहे. आपल्याला असे का वाटावे ह्याचे स्पष्टीकरण द्यावे.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

नक्कल-नक्कल

--धार्मीक भावना आहेत म्हणुन महत्वाचा काय ?- धार्मिक भावनांपेक्षा असे म्हणू की, शेकडो वर्षांपासुन मान्य केली गेलेली, विश्वास ठेवली गेलेली एक शक्ति (म्हणू हवे तर) आहे, त्यामुळे महत्वाची आहे. असे करणे हे बरोबर की चूक हा वेगळा विषय आहे. आपण पहातो की, आपले म्हणणे दुस-याला "पटवून" सांगणे किती अवघड असते; येथे शेकडो वर्षांपासुन शेकडो लोक हे मानतात की, देव आहे. हे फलित कशाचे?- भोळ्याभाबड्या लोकांच्या मनोवृत्तीचे की, सांगणा-याच्या कौशल्याचे?

तरीही, "देव" हा विषय महत्वाचा आहे असे तुम्ही मान्य करावेत असे मला मुळीच वाटत नाही.

--कुठल्याही प्रकारची खिल्ली उडवली गेली नाही आहे. आपल्याला असे का वाटावे ह्याचे स्पष्टीकरण द्यावे.-- तुम्ही लहानपणी नक्कल-नक्कल खेळला आहात का?

विडंबनाचा दर्जा

डार्क म्याटर ह्यांचा प्रतिसाद बोलका आहे. त्यांनी कथित धाग्याला विडंबनाचा दर्जा दिला आहे.

एक छोटी सत्यकथा

हा एक प्रथितयश इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर. अत्यंत कुशाग्र बुद्धी. ह्याची बायको गेले १५ वर्षांपासुन डायलिसिस करत होती. बालपणीचा एक मित्र, मदतीला धावुन आला. त्याने चक्क त्याची किडनी दान केली, एकही नवा पैसा न घेता. शस्त्रक्रिया १००% यशस्वी झाली. दुस-याच दिवसापासुन डायलिसीस बंद!

ज्याने किडनी दिली, त्यास भेटलो. एकदम ओक्के! हिंडतोय, फिरतोय, काहीच टेन्शन नाही. त्याच्या घरच्यांचीही भीती गेली आहे. सगळे मजेत आणि वेगळ्याच वलयात!

हा मला एका लग्नात भेटला मागील महिन्यातच. कडकडून मिठी मारली आणि भावुक होऊन सगळे सांगितले. शेवटी म्हणाला, तू ... येथे गेला आहेस का? जा! मला आता पटलंय... देव आहे.

शंका

सकाळी हा प्रतिसाद एक स्वतंत्र धागा म्हणून दिसत होता.

थोड्या वेळापुर्वी हा प्रतिसाद या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद होता.

आत्ता हा प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद दिसतोय.

हे काय चाललेय? कोणी प्रकाश टाकू शकेल काय?
_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

कृतघ्न!

मानवी केसांचा विग मिळालेल्यांनीही देव मानण्यास सुरुवात करावी काय?
'हा' ला नेमका आनंद कशाचा झाला? पैसे न घेतल्याचा की किडनी मिळाल्याचा?
देव आहे तर मुळात किडनी फेल झालीच का? संचितामुळे? संचित किडनीपेशींचे की बायकोचे? 'हा' चे काय पाप की त्याला अशीच बायको मिळावी?
'हा' कडे किती पैसे होते? अमरसिंगप्रमाणे सिंगापूरला प्रयत्न केला काय?
मी केवळ बालपणीच्या मित्रासाठी दिलीच नसती, जवळच्या कोणाला दिली असती तरी असे काही ऐकल्यावर म्हणालोच असतो की "***, देवाने किडनी दिली का रे? मग दे माझी किडनी परत!"
--
तो संवाद असा काहीसा झाला असावा:
उमेशः अरे रमेश! कित्ती वर्षांनी भेटतो आहोत आपण! कसा आहेस, वगैरे..
रमेशः अरे उमेश! कित्ती वर्षांनी भेटतो आहोत आपण! मी मजेत आहे. तू कसा आहेस, वगैरे..
उ: चालू आहे म्हणायचे! भगवान का दिया सब कुछ है| दौलत है, इज्जत है, शोहोरत है, पण ... ते जाऊ दे, तू इथे कसा?
रः अरे डॉक्टरला भेटायला आलो होतो, माझी दुनियादारी कुंथताना कधीकधी बाहेर येते. तू इथे कसा?
उ: अरे काय सांगू! गेली पंधरा वर्षे नेहेमी यावे लागते आहे. आत्ता वर बायकोला डायलिसिस चालू आहे. डॉक्टर लालची आहे आणि नर्स खडूस आहे. मग मी टापायला खाली येतो, हल्ली रिसेप्शनिस्टशी ओळख वाढवायचा प्रयत्न करतो आहे.
रः अरेरे! पण मग किडनी बसवायचा प्रयत्न केला नाही का?
उ: अशा वेळी कोण कुणाचा असतो? ज्यांनी तयारी दाखविली त्यांचीही चाचणी मॅच झाली नाही, त्या चाचणीसाठीही त्यांनी पैसे घेतले!
रः अरेरे! चल अनायसे आलोच आहे तर माझीही चाचणी घेऊन टाकू.
उ: अरे कशाला? तुला उगीचच त्रास! शिवाय तू हो म्हणालास तरी तुझा घरचे मला आता ओळखतही नसतील, त्यांना उगीच घोर...
रः काही होत नाही रे! देवावर भरवसा ठेव.
उ: चल तर मग. देव आहे म्हणूनच आपली भेट घडली (पर्याय१: हे वाक्य येथे हवे की पुढे?).
डॉ: अभिनंदन! ३६ पैकी ३६ गुण जुळले आहेत. उद्याच चांगला मुहूर्त आहे. करून टाकू. जरा इथे सह्या करा.
उ: देव आहे म्हणूनच आपली भेट घडली (पर्याय२: हे वाक्य येथे हवे काय?). अरे हे पाकिट ठेव.
रः अरे नाही, मी हे पैशासाठी केलेले नाही. राहू दे.
उ: तरीही घे रे! नाहीतरी काही लोक संशय घेतीलच.
रः मला पर्वा नाही. मीही प्रतिथयश इंजिनियरच आहे, मला पैशाची पर्वा नाही.
उ: बरे तर मग! देव आहे म्हणूनच आपली भेट घडली (पर्याय३: हे वाक्य येथे हवे की आधी?). तुझ्याकडे कोणावर काहीतरी प्रसंग येईल तेव्हा मला परतफेड करण्याची संधी मिळेल, वाट बघेन.
डॉ: ऑपरेशन सक्सेसफुल! किडनी १००% स्वीकारली गेली आहे. (उमेशला) आता तुम्हीही जरा समारंभ अटेंड करायला लागा, तिथे टापायला अधिक संधी मिळेल.
--
चांगुलपणावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्याने पैसे स्वीकारल्याची शक्यता मला अधिक वाटते.

ठीक, पण

या प्रसंगात "स्वार्थ" ही सबब स्वीकारण्याजोगी असली तरी मला येथे "श्रद्धा वा विश्वास" यांपैकीच किंवा दोहोंचे पारडे जड असल्याचे भासते आहे. हं बरेचदा (देवावरील अन्यथा इतर गोष्टींवरील) श्रद्धा एखाद्याची नसली तरी आत्यंतिक प्रेम, जिव्हाळा, माणुसकीच्या भावनेने दाटून येणारी करुणा, ऋणाची परतफेड* या गोष्टींच्या पायी जीव देण्यासही काहीजण तयार होतात, वरील प्रसंगातून जरी तसे व्यतीत होत नसले वा भासत नसले तरी शब्दांच्या आधारे ह्या गोष्टींना मांडणे एवढे सहज शक्य नसावे.

* ~ ज्याला मदत करायची आहे, त्याने पूर्वी कधीतरी आपल्यालादेखील मदत केली होती, या जाणीवेतून ऋणाची परतफेड करण्याची इच्छा/वृत्ती

 
^ वर