मराठे शाहीतील मद्यपान विषयक धोरण आणि शासन व्यवस्था

संपुर्ण भारतात महाराष्ट्र हे सर्वच बाबतित पुढारलेले राज्य समजले जाते. मग मद्य प्राशनाबाबत देखील ते मागे कसे राहू शकेल. दर किलोमिटरच्या परिसरात देशी विदेशी मद्याची दुकाने व बार हे संपुर्ण भारतात आपल्या राज्यात सर्वाधिक असावेत. पण पेशवाईत मात्र असे नव्हते. डॉ.खोबरेकर यांचे महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग २ हे पुस्तक माझ्या वाचनात आले त्यात वरिल विषयावर दिलेली माहिति सदस्यांना उदबोधक वाटेल या हेतुने देत आहे.

" मराठी राज्यात जे दारु करुन विकत असत, त्यांना कलाल म्हणत. खाटीक किंवा तत्सम लोक दारुच्या भट्ट्या लावीत , दारु बनवीत व कलाल तिची विक्री करीत. हे दारु विक्रीचे काम सरकारी परवान्यानेच होत असे.

शिवकालात द्राक्षांची किंवा मोहाची दारु पीत असत. पण दारुची दुकाने तुरळक होती व त्याजवर कोतवालाची व इतर सरकारी अधिकार्‍यांची करडी नजर असे. गावात अगर चार गावाकरिता एक असे गावाबाहेर कलालाचे दुकान असे. कोणी व्यक्ती दारु पिऊन धुंद झालेली रस्त्यात किंवा वाड्यात दृषीस पडल्यास त्यास सरकार मोठे शासन करीत असे.

शिवकालात बहुतेक अष्टप्रधान विद्वान ब्राम्हण असत. त्यांनी मराठी राज्यात दारु पिण्यापासुन लोकांना पराव्रुत्त करण्यासाठी, पिणार्‍यांना जबर दंडाची व फटक्याची कडक शिक्षा करण्यासाठी राजाकडून हुकूम काढविले होते. सैनिकांवर शराबी पिण्याची बंदी होती.

थोरले माधवराव पेशवे यांनी न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्या सांगण्यावरुन दारुविषयी तपशीलवार नियम करुन ठेविले होते. पेशव्यांचे सरदार व जहागीरदार यांनी आपल्या अंकित प्रदेशातील शहरात दारु विकू नये, अशी अट सरंजाम देतांना घालण्यात येई. शिंदे, होळकर, पवार, गायकवाड या मराठे सरदार-जहारगीरदारांनीसुध्दा ही अट आपापल्या अखत्यारीत कसोशीने घातलेली दिसते. पेशवेकाली दारुचे प्राबल्य होऊ न देण्याचे एकूण धोरण होते.

दारुच्या फुलाची भट्टी लावुन फुल सरकारी कारखान्याचे कामास नेण्यास व दारुची भटटी जेजुरीस चालविण्यास छाट व खाटकास सरकारकडून इ.स्. १७७८ त परवाना दिलेला आढळतो. सरकारात या दारुभट्टीची रक्कम जमा झालेली दिसते.

दारु पिण्याचा गुन्हा करणारे सापडल्यावर सरकारने दारुच्या भट्ट्या मना करण्यासाठी व कलालांना म्हणजे दारुविक्री करणार्‍या दुकानदारास दारु विक्री बंद करण्याचे हुकुम काढले.(पे.द.४३ ले.३६). ह्या हुकुमाची अंमलबजावणीही त्वरीत करणंयात आली. त्यावेळेपासुन सरकारच्या भीतीमुळे मराठी राज्यात दारु पिणे व त्यापासुन उत्पन्न मिळविणे या बाबी बंद झाल्या. लोकहितवादी लिहितात की त्यावेळी समाजात दारु उत्पन्न करणार्‍यास नीच मानीत आणि कोणी आपली झाडे त्यास दारु करण्यास दिली तर त्यास बहिष्क्रुत करित आणि कोकणात अशी चाल होती की, दारु करणारा हातात दारु घेऊन जर अंगावरुन गेला, तर दर्शन दोषास्तव स्नान करीत. दारु प्यालेला ब्राम्हण आढळला, तर त्यास निंद्य मानून जातीत घेत नसत. त्याचा सर्वांकडून धिक्कार होत असे.

पण पैसा मिळविण्याच्या लालसेने चोरुन दारुचा साठा करुन विकणे चालत असे. असे साठे व चोरटी दुकान हुडकून काढण्यासाठी नाना फडणिसाने फिरस्ते प्यादे ठेविले होते. अशा एका पथकास इ.स्. १७७६ त नारायण पेठेतील म्हातारी द्रविडी ब्राम्हण हिच्या घरी दारुने भरलेले वीस-पंचवीस शिसे व त्याजबरोबर खाण्यासाठी शिजविलेले मांस सापडले. ते जप्त करुन तिला शासन करण्यात आले. (पे.द्.४३, ले. १४४)

मद्यपानाविरुध्द पेशवे सरकारचा कटाक्ष होता.

मद्यपानाविषयी खालील नमुनेदार तक्रार विशेष उल्लेखनीय आहे. सई देशमुखीण चिकोडीकर हिने मद्यपान करुन बाळाजी हरी जोगळेकर यासी बदकर्म केले. उभयतास अटक करण्यात आली.

पेशव्यांच्या कारकीर्दीत ब्राम्हणांनी दारु पिऊ नये, असा शासनाचा दंडक होता. दारु पिणार्‍या ब्राम्हणास कैद करुन किल्ल्यावर पाठवीत असत . नाशिक येथील ब्राम्हणव्रुंद मद्यपान करतात; त्यात त्यांचा धर्माधिकारीही सामील आहे; हे व्रुत्त सवाई माधवराव पेशव्यांच्या कानी येताच, त्यांनी सर्वोत्तम शंकर नावाच्या खास अधिकार्‍यास नाशिकला याची चौकशी करण्यास पाठविले आणि आज्ञा दिली की, धर्माधिकारी यात सापडले त्यांचे धर्माधिकारीपण (वतन) जप्त करावे व सरसुभ्याचे हिशेबी जमा करावे. तसेच गुन्हेगार ब्राम्हणास अटक करुन त्यांना पक्क्या बंदोबस्ताने घोडप, पटा व मुल्हेर या किल्ल्यावर अटकेत ठेवण्यास पाठविणे.

पेशवाईत अधिकारी-पाटील-कुलकर्णी यांनीसुध्दा दारु पिऊ नये, असा दंडक होता. कस्बे खेड्चे पाटील विठोजी सुलतानजी सतकर हे दारु प्यालेले सापडले असता त्याजपासून दहा हजार रुपये गुन्हेगारी घ्यावी, असा हुकूम पेशवे सरकारातुन झाला. त्यावर बाळाजी पलांडे यांनी रदबदली करुन अन्याय माफ करण्यास विनंती केली. तेव्हा माफ करुन पुन्हा प्यालेला सापडल्यास त्याजकडुन दहा हजार रुपये घेतले जातील, असा इशारा देऊन सोडून देण्यात आले.असे असता तो १७८७ च्या ऑगस्ट मासात दारु प्यालेल्या स्थितीत कोतवालास सापडला. तेव्हा त्यास दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला पण त्याजवळ पैसे नसल्यामुळे व त्यास कोणी साक्षी रहाण्यास तयार होईना म्हणून त्याची निम्मी पाटीलकी वतनसंबंधे इनाम व हकदक, मानपान व इनाम जमीन एक चाहूर याची जप्ती केली. राघो नारायण ब्राम्हण दारु पिऊन मावंद जेवणाच्या पंगतीत बसल्याचे सापडल्यावर त्यास सर्व ब्राम्हाण समुदायाने प्रायश्चीत्त् घेण्यास सांगितले.

पेशव्यांचे राज्य इ.स्. १८१८ त खालसा झाले, तरी पेशवाईतील मद्यपान-विषयक गुन्हे नोंदण्याची व शिक्षा करण्याची चाल पुढे ४/५ वर्षे चालूच राहिली. इ.स्. १८२१-२२ त मद्यपानविषयक गुन्हा नोंदला गेला तो असा: परीट जातीची सासू दारु प्याली व सुनांस मारु लागली . एक सून तळ्यात जीव देण्यास गेली, ते महालच्या शिपायाने पाहिले. सासर्‍यास सासुस(बायकोस) आवरावे ते केले नाही. तेव्हा महालातून परीट सासर्‍यास आठ आणे दंड करण्यात आला.

यावरुन असे दिसते की, तत्कालीन सरकार रयतेच्या भल्यासाठी दारुबंदी सारखे कायदे करुन ते मोडणार्‍यास कठोर शिक्षा करीत असे.

लेखनविषय: दुवे:

Comments

हात

ह्म्म्म्. पेशवाई बुडवण्यात कोणाकोणाचा हात असू शकेल?

नितिन थत्ते

रोचक

मराठेकालीन मद्यपान विरोधी कायदे आणि शिक्षा यांच्याबद्दल माहिती रोचक आहे. कलाल या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. कलाल हा शब्द यापूर्वी मी जंजिरा किल्ल्यावर एक प्रचंड तोफ आहे; तिचे नाव कलालबंगडी तेवढेच ऐकले होते. हे नाव कशामुळे पडले असावे असा विचार करते आहे.

दारूबंदीचे कायदे केले म्हणून जनता दारू पिण्याचे थांबवते असे वाटत नाही. अर्थात, मद्यधुंद अवस्थेत तमाशा करणार्‍या किंवा गुन्हे करणार्‍यांना कडक शासन हवे. बाकी, जनतेला शासन झाले तरी खुद्द मराठेशाही, पेशव्यांत किंवा त्यांच्या सरकारात मद्यपान कितपत चाले हे कळले नाही.

अवांतरः

नुकतेच सौदीतील एका राजकन्येचे (नाव गुप्त) आत्मवृत्त वाचनात आले. त्यात लोकांची नावे बदलली आहेत परंतु ती आपल्या नेमक्या कोणत्या पिताश्रींबद्दल बोलते आहे ते कळून येते. :-) त्यात तिने चोरून आपल्या पिताश्रींच्या महालात गेल्याचे आणि तेथे जे नजरेस पडले त्याचे वर्णन केले आहे. त्यात दारूच्या उंची बाटल्या आणि चषकांचे वर्णन आहे. कडक इस्लामी कायद्यांमुळे ज्या सौदीत दारूबंदी आहे आणि तिथले सामान्य अरब दारू पिण्यासाठी आणि वेश्यांना भेटण्यासाठी बाहरिनला* पोहोचतात असे सांगितले जाते त्या देशात राजाला आणि राजपुत्रांना दारू मिळते आणि सप्ताहाखेरीस पॅरिसवरून वेश्या पुरवल्या जातात.

* बाहरिनबद्दल पुस्तकात लिहिलेले नाही पण गल्फमध्ये हे प्रसिद्ध आहे, बहारिनला गल्फचे ऍमस्टरडॅम म्हटले जाते.

आजचे सरकार

यावरुन असे दिसते की, तत्कालीन सरकार रयतेच्या भल्यासाठी दारुबंदी सारखे कायदे करुन ते मोडणार्‍यास कठोर शिक्षा करीत असे.
आजचे सरकार असे करत नाही याबद्दल या सरकारचे ऋण मी कधीच विसरणार नाही.

सहमत..

आजचे सरकार असे करत नाही याबद्दल या सरकारचे ऋण मी कधीच विसरणार नाही.

सहमत आहे..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

छान

रोचक माहिती.

आता कदाचित अविश्वसनीय वाटेल पण अमेरिकेनेदेखिल १९२० ते १९३३ ह्या काळात दारुबंदीचा प्रयोग करून पाहिला होता. त्याची कशी वासलात लागली ते वाचणे मनोरंजक ठरावे - दुवा.

असो, वेश्यागमन आणि मद्यप्राशन हे प्राचिन काळापासून चालत आलेले उद्योग आहेत. त्यावर संपूर्ण बंदी घालणे कुणालाही शक्य झालेले नाही. नियंत्रण हवे हे मान्य, पण सरसकट बंदी फसण्याचीच शक्यता अधिक.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

खट्टा मिठा

खट्टा मिठा वर असेच काही वाचल्याचे आठवले. त्या निमित्ताने तेथील इतर लेखही चाळले गेले. कदाचित आपल्यालाही ते रोचक वाटतील.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

शंका

अभक्ष भक्षण व अपेय पान यांचे अद्वैत नाते मानतात. या दोन्ही प्रकारात एक विवक्षित वास / दर्प येत असल्याने त्याची उत्पत्तीस्थाने त्याचा मागोवा घेत सापडत असावीत. ज्या लोकांना अशा वासाने मळमळते त्यांची नियुक्ति शोधपथकात करीत असले पाहिजे असा आमचा तर्क आहे. नेमकी उलट संवेदना होणारे लोक शोधपथकात असतील तर त्यांची तोंडे बंद करण्यासाठी त्यातील काही वाटा त्यांना दिला जात असावा हा देखिल तर्क संभवतो.
बाकी सुनील यांच्या मताशी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

लेखन माहितीपूर्ण

शिवकालात बहुतेक अष्टप्रधान विद्वान ब्राम्हण असत. त्यांनी मराठी राज्यात दारु पिण्यापासुन लोकांना पराव्रुत्त करण्यासाठी, पिणार्‍यांना जबर दंडाची व फटक्याची कडक शिक्षा करण्यासाठी राजाकडून हुकूम काढविले होते. सैनिकांवर शराबी पिण्याची बंदी होती.

ब्राह्मण जर दारु पिणारे असते तर असे दंड झाले नसते असे मला वाटले. बाकी, लेखन माहितीपूर्ण आहे. धन्यु.....!

-दिलीप बिरुटे

:)

कॉलिंग विनायक ...

विद्वत्ता आणि अपेयपान?

शिवकालात बहुतेक अष्टप्रधान विद्वान ब्राम्हण असत. त्यांनी मराठी राज्यात दारु पिण्यापासुन लोकांना पराव्रुत्त करण्यासाठी, पिणार्‍यांना जबर दंडाची व फटक्याची कडक शिक्षा करण्यासाठी राजाकडून हुकूम काढविले होते.

ब्राह्मण जर दारु पिणारे असते तर असे दंड झाले नसते असे मला वाटले.

मूळ लेखनातला विद्वान असण्याचा आणि दारू न पिण्याचा संदर्भ कळला नाही. (म्हणूनच कदाचित) प्रा.डॉ.यांचा प्रतिसादही कळला नाही. अपेयपान ही विद्वान नसणार्‍यांची मक्तेदारी नसावी आणि विद्वज्जनांनी अपेयपान करण्याची परंपरा प्राचीन असावी. ब्राह्मण दारू पिणारे होते (आणि तरीही ते विद्वान असू शकत होते!) याविषयी पुण्यात तरी फारसा संदेह आढळू नये. :-)
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

किंचित पूर्वग्रहावरुन...

विद्वान ब्राह्मण असे मी म्हणालो नव्हतो केवळ ब्राह्मण असे म्हणालो होतो. पण आता असे वाटते की,तसे म्हणालो असतो तरी हरकत नव्हती.म.फुल्यांनी असे म्ह्टले होते की,'' मुकुंदराज,ज्ञानेश्वर,रामदास वगैरे अनेक पायलीचे पंधरा आणि अधोलीचे सोळा ब्राह्मण ग्रंथकार होऊन गेले. परंतु एकानेही दास्यत्त्वाच्या पट्ट्याला बोटसुद्धा लावले नाही''

आपण म्हणतो ते कितीही चुकीचे असले तरी त्याला चूक म्हणायचे नाही. विद्वान असूनही अन्यायकारक चुकीच्या प्रथा राबविणारे ब्राह्मणच होते. सोयीचे असेल तितके आपले मानायचे असा धूर्तपणा गतकाळातल्या ब्राह्मणांचा होता. अधिकारी माणसाने शिस्त लावतांना एकाला एक नियम आणि दुस-याला दुसरा नियम असा प्रकार इतिहासात आहेत त्यामुळे तसे वाटले. ब्राह्मण दारु पिणारे होते. पण शिक्षा कोणा-कोणाला झाल्या ते पाहिले पाहिजे. तसेच दारु पिणे हे हलके कर्म असल्यामुळे त्याचा द्वेष करत असावेत अशीही शंका वाटते. दारु जर दैवी असती तर मग त्याचे सेवन करणार्‍यांना दंड झाला नसता. असो, उगाच आता तशा चर्चा करुन आत्ताच्या ब्राह्मण मित्रांना दुखवायचे कशाला नाही का ? :)

-दिलीप बिरुटे

किंचित???

>>'विद्वान असूनही अन्यायकारक चुकीच्या प्रथा राबविणारे ब्राह्मणच होते'

ह्याचे अर्थ असे निघू शकतात -
१. विद्वान माणसाने अन्यायकारक, चुकीच्या प्रथा राबवू नये. तसे पाहता विद्वत्ता आणि विवेक ह्याचा संबंध जोडला जाऊ नये असे (रक्त-रंजित) इतिहास सांगतो.
2. ब्राह्मणच चुकीच्या प्रथा राबवत होते, सो जोपर्यंत ब्राह्मणाचे राज्य होते, तोपर्यंतच सर्व चुकीच्या प्रथा निर्माण झाल्या, बाकी सर्व काळी निर्बुद्ध अशा लोकांनी चुकीच्या प्रथा राबविल्या किंवा विद्वान ब्राम्हणेतर लोकांनी न्यायाकारक प्रथा राबविल्या.

>>दारु जर दैवी असती तर मग त्याचे सेवन करणार्‍यांना दंड झाला नसता.

तसे असते तर दंड व्हावा असे आपले मत आहे काय?

>>उगाच आता तशा चर्चा करुन आत्ताच्या ब्राह्मण मित्रांना दुखवायचे कशाला नाही का ?

अर्धविराम किवा प्रश्नचीन्हाने वाक्याचा अर्थ बदलू शकतो, आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे?

ब्राम्हण जर दारु पिणारे असते तर दारूबंदी लागली नसती

हं पहीला बाजीराव, राघोबा यांना दारूचे शौक होते. लेखात दिले आहे नाशिकचे ब्राम्हणव्रुंद मद्यपान करतात; त्यात त्यांचा धर्माधिकारीही सामील आहे असे सवाई माधवरावांच्या कानी पडले इ.इ.............

पहिले बाजीराव

मग बाजीराव पेशवे यन्नाच का बरे मद्यप्राशनाचि मुभा होति?

मुभा

कारण ते बाजीराव पेशवे होते.

-डॉन कोर्लिओनी

 
^ वर