पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०

नमस्कार,

धनत्रयोदशी, अश्विन कृष्ण १२ शके १९३२ रोजी 'पुस्तकविश्व'चा पहिलावहिला दिवाळी अंक प्रसिद्ध् झाला. हा अंक ऑनलाईन तसेच पीडीएफ स्वरुपात एकाच वेळी प्रसिद्ध झाला आहे .

अनुभव, पुस्तकपरिचय, लेखकांचे परिचय, मुलाखत आणि कवितासंग्रहाचे परिचय असे विविधरंगी लेखन आपणास या अंकात वाचायला मिळेल. पुस्तकविश्वचा अंक म्हणजे पुस्तक/लेखकांबद्दल असे जरी असले तरी लेखांच्या विषयात वैविध्य राखायचा प्रयत्न केला आहे.

या दिवाळी अंकाचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांची दिलखुलास मुलाखत. 'भिन्न' आणि 'ब्र' या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांबद्दल त्यां भरभरुन त्या भरभरुन बोलत आहेत, या पुस्तकांसाठी काम करतांना त्यांना आलेले अनुभव सांगत आहेत तसेच त्यांच्या इतर प्रकल्पांची माहिती देत आहेत. छापील पुस्तकांची पुढची पिढी म्हणजे डिव्हीडीवरचे पुस्तके येउ घातलीत, त्यांच्याबद्दल मत-प्रदर्शन करत आहेत.

'पुस्तकविश्व'ची सुरुवात होऊन अजून उणेपुरे वर्षही झाले नाही. या एवढ्याश्या कालखंडात त्याने छान बाळसे धरले आहे. तुम्हां सर्व पुस्तकवेड्या रसिक वाचकांमुळेच हा पल्ला आपण गाठला आहे, ही जाणीव मनी ठेवून मी आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा अंक आपणास आवडेल अशी आशा करतो.

पुस्तकविश्व दिवाळी अंक २०१०

ऑनलाईन वाचा.
डाउनलोड करा.

-
आनंदयात्री

Comments

अभिनंदन

उत्कृष्ट दिवाळी अंकाबद्दल पुस्तकविश्वचे हार्दिक अभिनंदन.
जुन्या धाग्यावर लिहील्यानंतर हा धागा आला. असो.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

धन्यवाद्

धन्यवाद आरागॉर्न :)

अभिनंदन

पहिला अंक असूनही अतिशय वाचनीय वाटतो. (वाचलेला नाही. :-( चाळलेला आहे. सवडीने वाचेन - हा मूलमंत्र सध्या सर्वत्र आळवावा लागत आहे.)

छान..

अंक अतिशय उत्तम आहे. संकल्पना, मांडणी, लेख सगळेच !
'डाऊन द मेमेरी लेन' हा लेख अतिशय आवडला.

धन्यवाद, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

चांगला अंक

अंक अतिशय चांगला आहे. चिंतातूर जंतू, अदिती आणि नंदन यांचे लेख विशेष आवडले. इतर लेखही चांगलेच असतील असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मुखपृष्ठावरील चित्र

मिलिंद मुळीक ह्यांचे मुखपृष्ठावरील चित्र फार आवडले. जंतू ह्यांनी केलेला अनुवादही. नंदन आणि टण्या ह्यांचे लेख वाचायचे आहेत. कविताबाईंचा आजकाल भलताच कंटाळा आला आहे. कारण बहुधा ओवरेक्सपोज़र असावे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर