पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

नमस्कार,

सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व मराठी रसिकांना कळविण्यास आनंद होतो की, मराठी नववर्षारंभाच्या मुहुर्तावर पुस्तकविश्व ह्या प्रकल्पाची (www.pustakvishwa.com) जी घोषणा करण्यात आली होती तो प्रकल्प आज १ मे २०१० रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधुन पुर्णत्वास आला आहे.

आजपासुन पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात येत आहे.

पुस्तकविश्व.कॉम येथे आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहु शकता. मराठी माणसाला चर्चा करणे फार आवडीचे! म्हणुनच केवळ पुस्तकाचा परिचय/परीक्षण लिहुन थांबणे नाही, तर आपण इतरांनी लिहिलेल्या परिचयांवर चर्चा करण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच.

पुस्तकविश्वच्या सुविधा इथेच संपत नाहीत, तर

आपण वाचलेली पुस्तके,
आपल्या संग्रही असलेली पुस्तके
ह्यांचा एक छानसा विदाच आपल्या खातेपानावर बाळगु शकता. ह्यातुन आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचक आपण जाणुन घेऊ शकता, त्यांच्याशी केवळ परिचय/परीक्षणांच्या धाग्यांवरच नव्हे तर वैयक्तिक चर्चाही करु शकता, (शक्य असल्यास) आवडीच्या पुस्तकांची देवघेवही करु शकता.

थोडक्यात, पुस्तक परिचय / परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा असे या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.

पुस्तकविश्व.कॉम येथे नवनविन सुविधा देण्याच्या प्रयत्नात टीम लोकविकास नेहमीच वचनबध्द राहील.

तर रसिकहो,

www.pustakvishwa.com येथे आजपासुन नोंदणी खुली करण्यात येत आहे. या, पहा, लिहा, वाचा.....पुस्तकवेड्यांनो, पुस्तकविश्वात रममाण होऊन जा.

- आनंदयात्री.

(टीम लोकविकास साठी.)

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे वा !

चांगला उपक्रम...! नवीन संकेतस्थळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा....!

-दिलीप बिरुटे

+१

चांगला उपक्रम...! नवीन संकेतस्थळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा....!
असेच म्हणतो.

अभिनंदन

नोंदणी केली आहे. सावकाश बघते.

पुस्तकांचे वर्गीकरण केलेले आहे का? पुस्तके, परीक्षणे शोधायला सोपा मार्ग हवा.

होय

>>पुस्तकांचे वर्गीकरण केलेले आहे का? पुस्तके, परीक्षणे शोधायला सोपा मार्ग हवा.

होय् शक्य तितके वर्गीकरण केले आहे. पुढे सदस्यांच्या मदतीने एक् प्रकल्प चालवुन योग्य वर्गवारी तयार करण्याचा मानस आहे. तशी वर्गवारी झाल्यावर विकीसारखे सदस्य सहभागाने सर्व पुस्तकांची वर्गवारी अद्ययावत करवुन घेता येईल.

सध्या पुस्तके शोधायला डाव्यावाजुच्या मेन्युमधे दुसरा पर्याय 'पुस्तके' हा वापरता येईल. शोध हेच सध्या मोठे काम बाकी आहे. जसाजसा अधिक विदा जमा होत जाईल तसे तसे ते अधिकच महत्वाचे होईल. त्यावर काम सुरु आहे.

काही सुचना असल्यास अवश्य कळवावी. धन्यवाद्.

नोंदणी केली आहे.

महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************

चांगला उपक्रम...! नवीन संकेतस्थळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.नोंदणी केली आहे.

शैलु

शुभेच्छा

उत्तम प्रकल्प.
प्रकल्पासाठी शुभेच्छा.

प्रमोद

शुद्धलेखनाला फाट्यावर मारू नका

तेवढे शुद्धलेखनाला फाट्यावर मारू नका. लक्ष द्या. पुस्तकांचे संकेतस्थळ आहे म्हणून म्हटले. प्रकल्पासाठी शुभेच्छा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शुद्धलेखन चिकित्स्तक

>>>तेवढे शुद्धलेखनाला फाट्यावर मारू नका. लक्ष द्या. पुस्तकांचे संकेतस्थळ आहे म्हणून म्हटले. प्रकल्पासाठी शुभेच्छा.

सहमत आहे...!
[संपादित] शुद्धलेखन चिकित्सक चिटकवून घ्या. थोडेफार तरी शब्द ते बरोबर दाखवेल..! :)

-दिलीप बिरुटे

प्रा. डॉ. तुमचे चालू द्या.

शुद्धलेखन चिकित्सक चिटकवून घ्या. थोडेफार तरी शब्द ते बरोबर दाखवेल..! :)
हं. बाकी व.वाडीवरची शिकलीसवरली मुलं चांगलं काम करताहेत ह्याचा आनंदच वाटतो. बाकी प्रा. डॉ. तुमचे चालू द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मजकूर संपादित.

मदत हा भाग आहे का ?

महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************

नोंद झाली.छान प्रकल्प आहे. मदत हा भाग आहे का ? मला चित्र बदलायचे होते जमले नाही.

शैलु

परवलीचा शब्द

मला परवलीच़ा शब्द बदलता आला नाही; तशी सोय कुठे ठेवली असेल तिथून सापडली नाही. संकेतस्थळ उघडावयास फार वेळ लागतो आहे असे कारण देऊन फ़ायर फ़ॉक्सने ’पुन्हा सावकाशीने प्रयत्‍न करावा’ असा सल्ला अनेकदा दिला. त्यामुळे संकेतस्थळावर कायकाय आहे ते नीट बघता आले नाही.
धम्मकलाडूंनी वर लिहिल्याप्रमाणे स्थळावर शुद्धलेखनाच्या नावाने बोंब आहे, एवढेमात्र एका नज़रेत समज़ले.
आत्ता पुन: प्रयत्‍न करून पाहिला, परत तेच उत्तर : The server at www.pustakvishwa.com is taking too long to respond. Try after sometime. : ..--वाचक्‍नवी

बोंब झाली, आता बंबाळपणा

पहिल्या पानावरचा मजकूर आता बऱ्यापैकी 'शुद्ध' झाला आहे. (अनादिअंत सोडल्यास) आता फक्त त्याचा शब्दबंबाळपणा कमी करायला हवा.

आम्ही "साहित्यदेवते"चे आख्यान "पुस्तकविश्वा"च्या रसात गातोय,
तुम्ही पहायला, वाचायला आणि लिहायला या, या, अवघे अवघे या ...

होहो. नक्की येऊ बरं का.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शुभेच्छा

नवीन प्रकल्पाला शुभेच्छा!
नैधृव कश्यप

भाग्यवान सदस्य

ज्यांना पुस्तकविश्व उघडता आले ते खरोखर भाग्यवान. मला मात्र "द कनेक्शन हॅज़ टाइम्ड आउट. द सर्व्हर at डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू पुस्तकविश्व डॉट कॉम इज़ टेकिंग टू लॉंङ्‌ग टु रिस्पॉन्ड" हेच उत्तर मिळते आहे.--वाचक्‍नवी

आपण

आपण कोणती आंतरजाल जोडणी वापरता ?
संस्थळ इतर संस्थळापेक्षा जास्त वेळ नक्कीच घेते, कारण ते तेवढे भारित आहे. इतर काही अडचण असल्यास नक्की कळवावी.
शुद्धलेखनाबद्दलची सूचना रास्त आहे, त्यावर काम सुरु आहे.

आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

शुद्धलेखनासाठीही शुभेच्छा

तुम्ही शुद्धलेखनाचेही मनावर घेत आहात किंवा घेणार आहे, हे बघून बरे वाटले. प्रमाणलेखनासाठीही/शुद्धलेखनासाठीही शुभेच्छा.

जाता-जाता
इतर काही अडचण असल्यास नक्की कळवावी.
काही म्हणजे एकापेक्षा अधिक. त्यामुळे 'काही अडचणी' हवे.
'सुरु' नको. 'सुरू' हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काही म्हणजे एकापेक्षा अधिक?

काही म्हणजे एकापेक्षा अधिक. त्यामुळे 'काही अडचणी' हवे.

हे काही पटले नाही ब्वॉ. 'काही' या शब्दामधून काही सांख्यिक निर्देश होतो असे वाटत नाही.

उदा. 'मला आज काही काम आहे.' हे वाक्य मला पुरेसे बरोबर वाटते. मला आज एक आणि एकच विशिष्ट कार्य पार पाडायचे आहे व त्याबाबत समोरच्याला संदिग्ध माहिती द्यायची असल्यास 'मला आज काही काम आहे' हे चालून जावे असे वाटते.

त्याचप्रमाणे एखाद्याला पुस्तकविश्व या संकेतस्थळावर एक आणि एकच अडचण आली (ज्याची शक्यता संकेतस्थळाचे सध्याचे स्वरुप पाहता कमी वाटते) तर त्याचा उल्लेख 'काही अडचण' असा करता येणे शक्य आहे .


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

इतर काही जाणकार आहे. त्याला विचारतो!

हे काही पटले नाही ब्वॉ. 'काही' या शब्दामधून काही सांख्यिक निर्देश होतो असे वाटत नाही.
ब्वॉ, 'काही' ह्या शब्दातून काही ठिकाणी सांख्यिक निर्देशदेखील होतो. चर्चेतल्या उदाहरणात 'इतर' हा शब्द काहीच्या आधी आल्याने हे स्पष्ट होते आहे, असे माझे मत आहे.

१. "इथे तुमच्याशिवाय इतर काही जाणकार आहे. त्याला विचारतो"
२. "इथे तुमच्याशिवायही इतर काही जाणकार आहेत. त्यांना विचारायला हवे"

वरील दोन वाक्यांपैकी पहिले वाक्य कानांना खटकत नाही काय? चूभूद्याघ्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उत्तम

नोंदणी करतो आहे. विविध विषयांवर आधारीत संकेतस्थळे निघत आहेत हे पाहून आनंद झाला. आता हा उपक्रम नेटाने करा, त्या लोकायत सारखे नको.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

नवं काय देनार

आता हा उपक्रम नेटाने करा, त्या लोकायत सारखे नको.
सौ सुनारीकी एक लव्हार की :-)

मराठी बूकायची वळख करुन देणार्‍या प्रकाशकाच्या एवढ्या
सायटी असतांना पुस्तकविश्व काय नवं देनार ?

संकेतस्थळ काढाचं तंत्रज्ञान हाय म्हून सायटी काढत फिरल्यासारखं वाटलं
तरीबी पोरं तरी काय तरी करुन राह्यले ना. म्हून मह्याबी शुभेच्छा.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

शुभेच्छा

सभासदत्व घेतले आहे. नव्या संकेतस्थळाला शुभेच्छा.

शुभेच्छा!

टीम 'लोकविकास' हा काय प्रकार आहे? उपक्रमी विकास (शाखा नसलेले) ह्यांनी प्रकल्पांना प्रायोजीत केल्याने असे नाव घेतले आहे का?
विकास ह्यांच्या स्वाक्षरीत त्याविषयी काही खुलासा न आढळल्याने कुतुहल चाळवले.

पुस्तकविश्वाला शुभेच्छा!

(शुभेच्छुक) बेसनलाडू

लोकविकास

>>टीम 'लोकविकास' हा काय प्रकार आहे?

हा प्रकार नाही.
लोकायत या प्रकल्पानंतर पुस्तकविश्व हा आम्हा मित्रांचा दुसरा प्रकल्प. लोकविकास या नावाखाली हे प्रकल्प चालवायचा विचार आहे, एवढेच.

>>उपक्रमी विकास (शाखा नसलेले) ह्यांनी प्रकल्पांना प्रायोजीत केल्याने असे नाव घेतले आहे का?

हे म्हणजे 'तुम्ही फक्त लाडु खाउन जगता म्हणुन बेसनलाडु हे नाव घेतले आहे' असे म्हणण्यासारखे आहे. :)

अभिनंदन

उत्कृष्ट दिवाळी अंकाबद्दल पुस्तकविश्वचे हार्दिक अभिनंदन.
हा धागा पाहिला नव्हता. बराच रोचक आहे.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

 
^ वर