मराठी पुस्तक प्रकाशक

मराठी पुस्तक प्रकाशक

मराठी भाषेमध्ये साहित्य प्रकाशित करणार्‍या काही प्रकाशनांची यादी खाली देत आहे.
मराठी पुस्तके हवी असणार्‍यांनी संपर्क साधून हवी ती पुस्तके मागवता येतील असे वाटून हा खटाटोप करतो आहे.

राजहंस प्रकाशन
आंतरजाल दुवा- स्वतः:ची वेबसाईट नाही. (परदेशात विक्री कशी करणार ते परमेश्वराला ठाऊक!)
पुणे: १०२५, सदाशिव पेठ, नागनाथ पाराजळ, पुणे ३०. फोनः २४४६५०६३/२४४७३४५९
नाशिकः पंकज क्षेमकल्याणी: ९४२२२५२२०८ (पंकज यांना डिमांड ड्राफ्ट पाठवल्यास हे पोस्टाने परदेशातही पुस्तके पाठवण्याची सोय करतात.)

मॅजेस्टिक प्रकाशन
आंतरजाल दुवा- http://majesticprakashan.com/ मात्र सर्वसाधारणपणे नावाशिवाय काहीही दिसत नाही! (पविककतेपठा!)
ठाणे: न्यु इंग्लिश स्कूल समोर, राम मारूती रोड ठाणे ४००६०२ फोनः२५३७६८६५

मेहता पब्लिशिंग हाऊस
आंतरजाल दुवा- http://www.mehtapublishinghouse.com/ उत्तम वेबसाईट! महाराष्ट्रात सर्वत्र पुस्तके पाठवतात. टपाल खर्च नाममात्र आहे. (मात्र कधी कधी शॉपींग कार्ट चे पान दिसतच नाही हा भाग आहे. )
१९४१, सदाशिव पेठ, टेलिफोन भवना समोर, माडिवाली कॉलनी पुणे - ४११०३०

पॉप्युलर प्रकाशन
आंतरजाल दुवा- http://www.popularprakashan.com/ दुर्दैवाने यांच्या वेबसाईटला मराठीतही आपलीच पुस्तके प्रकाशित होतात याची कल्पनाच नाहीये. फक्त इंग्रजी भाषेतली पुस्तकेच येथे मिळतात!
पत्ता: मिळाला नाही!

मौज प्रकाशन गृह
गोरेगावकर लेन, मुंबई ४००००४

ग्रंथायन

आंतरजाल दुवा- http://granthayan.com (वेबसाईट आहे पण काहीतरी एरर येते आहे. दिसत नाही)
४१६, हिरेन इंडस्ट्रियल इस्टेट, मोगल लेन माहीम, मुंबई ४०००१६ फोनः ६७२८०९९९

वरदा बुक्स
३९७/१ सेनापती बापट मार्ग , वेताळबाबा चौक पुणे ४११०१६ दुरध्वनी ०२०-२५६५५६५४ (यांना डिमांड ड्राफ्ट पाठवल्यास हे पोस्टाने परदेशातही पुस्तके पाठवण्याची सोय करतात. पुस्तक मागणी लेखी करणे आवश्यक)

प्रगती अभियान प्रकाशन
द्वारा राजीव साने, स्नेह क्लासिक, एरंडवणे, पुणे-४.

उत्कर्ष प्रकाशन
डेक्कन जिमखाना, पुणे.

अजून प्रकाशने तुम्हाला माहिती असल्यास येथे द्या

शिवाय अजून काही सूचनांचेही स्वागत आहेच!

आपला
गुंडोपंत

Comments

आमची "प्रणाली"

१.एन् आर् ई अकाउंट् मधे पैसे आहेत का पहाणे.
२. पुरेसे नसल्यास पाठवणे.
३. नवीन , चांगल्या पुस्तकांची यादी जवळच्या मित्र-नातेवाईकाला देणे. बर्‍याचदा हा/ही मित्र/मैत्रीण/नातेवाईकच ही यादी बनविण्यास/वाढविण्यास उत्तम मदत करतो/करते.
४. मित्र/नातेवाईकाने पुस्तके विकत घेणे, आमच्या पत्त्यावर पाठवणे.
५. उपकारकर्त्याला सर्व खर्चाचा चेक आम्ही पाठविणे.
(प्रणाली समाप्त)
(ह. घ्या !)

प्रकाशन विश्व

प्रकाशन विश्व
संकलक - मोहन वसंत वैद्य
सी-१२ हर्षदा गार्डन महागणेश कॉलनी, पौडरोड
पुणे ४११०३८
फोन ०२० २५४५६२१३
यात सबकुछ प्रकाशना बाबत माहिती आहे. हे वार्षिक असून यात दर वर्षी माहिती अपडेट होते.
साहित्यिक, प्रकाशक,चित्रकार, अनुवादक, मुद्रितशोधक, ग्रंथविक्रेते, ग्रंथालये, छपाईविषयक, वक्ते, व्याख्यानमाला, नियतकालिके, याबाबत सर्व माहिती आहे. २००८ चे नुकतेच प्रकाशित होउ घातले आहे. फोनवरुन खात्री केली आहे.
मुल्य १००/- आहे. पृष्ठे ५५० (२००५ ची माहिती)
प्रकाश घाटपांडे

प्रकाशन विश्व

मुल्य १००/- असून पृष्ठे ५५० म्हणजे स्वस्त वाटते.
यांचे काम विश्वजालावर नाही का?
आंतरजालिय दुवा असल्यास अतिशय उपयुक्त राहील यात शंका नाही.

-निनाद

प्रकाशन विश्व

जालावरील विश्वात यांचे अस्तित्व नाही. मुद्दा पुन्हा अर्थकारणाशी व पारंपारिक मानसिकतेशी, व्यावहारिकतेशी निगडीत आहे.
प्रकाश घाटपांडे

एकुणच

एकुणच मराठी प्रकाशन विश्व आंतरजालशी संबंधीत नाहीच असे जाणवते आहे.
हे अतिशय दुर्दैवी आहे.
बदलत्या काळाची पावले ओळखून नव्या तंत्रज्ञानाशी सहकार्य केले नाही तर ते उद्योग व त्यांचे सम्राटही लयाला जायला वेळ लागत नाही.

ऑफसेट चे तंत्र छपाई मध्ये आल्यावर जुन्या लोकांचे काय झाले हे ही जर आजच्या प्रकाशकांना आठवत नसेल तर ते त्यांचे दुर्दैव आहे.
नव्या पीढीला ज्या माध्यमात रस आहे त्या माध्यमाचा आधार घेणे महत्वाचे. म्हणजे सर्वस्वी त्यावरच अवलंबून नसावे. त्यामुळे व्यवसाय वाढीवरच बंधने येतील. पण त्या नवनवीन तंत्राचा मागोवा घेत राहिलेच पाहिजे. त्याचा आधार घेवून व्यवसाय वाढवला पाहिजे असे वाटते.

जे रसिक आणि खरेदी मायबोली करू शकते आहे, ते एकाही जुन्या प्रकाशकाला सूचू, जमू नये?

मग काळाची पावलेच ओळखू न शकणारी ही प्रकाशकांची जमात नक्की कोणते साहित्य प्रकाशित करते आहे हेच तपासून पाहण्याची वेळ आली आहे की काय?

ज्यांना नवीन तंत्रज्ञान स्वत:साठीच, अगदी स्वार्थासाठीही वापरता येत नाहीये, ते काय मराठी माणसाला नवीन काही वाचायला देणार आहेत?

आपला
अस्वस्थ
गुंडोपंत

माझा प्रयत्न

मी पुस्तके खरेदी करण्यासाठी मी रेमिट टू इंडिया डॉट कॉम मार्फत पैसे प्रकाशकांना डिमांड ड्राफ्टने पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. पुर्वीही मी या साईट मार्फत पैसे पाठवले आहेत. ते वेळेवर पोहोचले, पण ते फक्त नातेवाईकांनाच होते. थर्डपार्टी साठी पहिल्यांदाच पाठवत आहे.
आता पुस्तक खरेदी साठी पहिला प्रयत्न वरदा बुक्स सोबत चालला आहे. प्रकल्प कसा पुर्ण होतो हे पुस्तके आली की कळवीनच.

मात्र अनेक प्रकाशकांचे आंतरजालीय दुवे नसल्याने पुस्तके कशी मागवावीत हा प्रश्न असतोच. (मेहता पब्लिशिंग हा अपवाद वगळता) मित्रांना/नातेवाईकांना कितीवेळा त्रास द्यायचा हा प्रश्न आहेच.

मात्र वर उल्लेखलेल्या पंकज क्षेमकल्याणींचा अनुभव मलाही चांगला आहे.
(या वेळी तर मी त्यांच्या मार्फत वाढ-दिवसाला भेटी म्हणून पुस्तकेच पाठवतो आहे. ते गिफ्ट रॅपची ही सुवीधा देतात!)

-निनाद

मायबोलीचा खरेदी विभाग

मी मायबोलीच्या खरेदी विभागातून् पुस्तके मागवली आहेत
http://kharedi.maayboli.com
माझा अनुभव चांगला आहे. पूर्णपणे क्रेडीट कार्डने खरेदी केली. सिक्युअर् वेबसाईट आहे. आता पर्यत मराठीशी निगडीत कुठल्याही वेबसाईटपेक्षा तांत्रिकदृष्ट्या मला सर्वात् उत्तम वाटलेली वेबसाईट् आहे.
१. त्यान्च्याकडे वेबसाईटवर् नसलेले पुस्तकही ते मागवून् देतात.
२. पुस्तके भारतात असलेल्या किमतीलाच (सममूल्य परकीय चलनात) विक्रीला आहेत.
३.त्यामुळे कधिकधी पुस्तकाच्या किमतीपेक्षा पोस्टाचा खर्च जास्त् दिसतो. माझ्या एका मित्राला विचारले आणि खात्री करून् घेतली की त्याला पाठवायला जितका खर्च आला असता तितकाच मायबोलीने लावला आहे.
४. क्रेडीट् कार्ड मुळे कुठल्याही परकीय् चलनात् विकत् घेता येते.
५. काही प्रकाशकांनी आणि लेखकानी मायबोलीशी थेट करार करून पुस्तके विकायला ठेवली आहे. मी अमेरिकेतल्याच एका लेखिकेचे पुस्तक थेट मायबोलीवरून् खरेदी केले. अशा छोट्या प्रकाशकांची पुस्तके पुण्यामुंबईत मिळायला अवघड आहेत.
६. वेबसाईटवर् असलेली Customer testimonials खरी आहेत् याची मी खात्री करून् घेतली. त्यातला एक जण माझा मित्र आहे त्यामुळे खात्री पटवणे सोपे झाले.

मित्राना /नातेवाईकाना किति त्रास द्यायचा हा प्रश्न मलाही होता तो मायबोलीने सोडवला आहे.

काही न आवडलेल्या गोष्टी
१. मायबोलीचे सभासद असलात् तरी खरेदीसाठी वेगळे सभासदत्व लागते. तेच् चालत् नाही.
(यावर उपाय म्हणून् सभासद्त्व न घेताही खरेदी करता येते असा नवीन् शोध लागलाय. आधी माहिती नव्हते.)
२. त्या साईटवर् शोध (सर्च्) नेहमीच योग्य असतो असे नाही. मला न सापडलेली एक वस्तू नंतर् गुगलवर् शोध् घेतल्यावर मायबोलीवर आहे असे दिसले आणि विकतही मिळाली.
३. भारतातून् विकत् घेता येत् नाही. फक्त् परदेशातून् खरेदी करता येते.
४. त्याना फोनवर मेसेज ठेवला होता त्याचे उत्तर् यायला अपेक्षेपेक्षा वेळ लागला.
(पण २४ तासात फोन वरून् उत्तर् आले. इथे अमेरिकेत् काहि तासात् उत्तर् यायची सवय् झाली आहे.)

माहिती

प्रतिसाद आवडला,
अतिशय माहितीपूर्ण आहे.
मायबोली खरेदी च्या साईट विषयी विसरूनच गेलो होतो.

तसेच www.rasik.com रसिक डॉट कॉम ही पण एक साईट आहेच.
पण येथे पुस्तके डॉलरच्या भावात मिळतात! मला तरी किंमती पाहून र्‍ह्दय विकाराचा झटकाच बसला. अजून सावरतोच आहेत् त्यातून... ;))
पण गरजूंना मराठी पुस्तके जगात कुठेही उपलब्ध आहेत हे काय कमी आहे?

आपला
मराठी पुस्तके जगात सर्वत्र मिळावीत/असावीत अशी इच्छा असणारा
गुंडोपंत

काही ई-खरेदीचे सुंदर अनुभव

ई-रसिक.कॉम

मेहता पब्लिशिंग
यांचा अनुभव अतिशय चांगला आहे
भारतात कोठेही पुस्तके पाठवतात.

मीमराठी.नेट या संकेतस्थळावर नव्याने सुरु झालेला ई-खरेदी विभागही चांगला आहे, प्रत्यक्ष खरेदीचा अनुभवही सुंदर् आहे.
http://www.mimarathi.net/shopping

अजून

प्रकाशक

रोहन प्रकाशन
आंतरजाल दुवा: अस्तित्वात नाही
पत्ता: धवलगीरी, ४३०, शनिवार पेठ, पुणे ४११०३०
फोनः २४४८०६८६

ब्लू बर्ड इंडिया लिमिटेड
आंतरजाल दुवा: http://www.bluebirdpune.com/index.asp (मराठी पुस्तके लगेच दिसली नाहीत, मात्र या प्रकाशनाने जी. ए. कुलकर्णीं यांची २ पुस्तके प्रकाशित केली आहेत)
७५९/७४, प्रभात रोड, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४
फोनः २५६७६१६३

पेन्ग्वीन बुक्स
आंतरजालीय दुवा: www.penguinbooksindia.com
अतिशय दर्जेदार मराठी पुस्तके हे प्रसिद्ध करीत असत. दुर्दैवाने हल्ली यांची नवीन् मराठी पुस्तके दिसत नाहीत!
पत्ता: १११ कम्युनिटी सेंटर, पंचशील पार्क, नवी दिल्ली ११००१७
फोनः (११) २६४९४४०१/०२/०५/०७
फॅक्सः (११) २६४९४४०३/०४

ढवळे प्रकाशन
आंतरजाल दुवा: नाही
पत्ता: मिळाला नाही
(यांनी अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके प्रकाशित केली आहेत.)

काँटिनेंटल प्रकाशन
आंतरजाल दुवा: नाही
पत्ता: मिळाला नाही

ढवळे व काँटिनेंटल ची कुणी माहिती देईल काय?

आपला
गुंडोपंत

चांगला उपक्रम/ ढवळे प्रकाशन

चांगला उपक्रम आहे. महत्त्वाची माहिती मिळाली.

जालावर शोधले असता ढवळे प्रकाशनाचा पत्ता मिळाला. दुवा.
Shree Samarth Sadan
1st Bhatwadi Lane
Girgaon
Mumbai - 400004
Landmark: Behind Portuguese Church
Phone: 022-23854853

धन्यवाद!

धन्यवाद.
अजूनही काही प्रकाशक मिळाल्यास येथे द्यालच.

आपला
गुंडोपंत

हे कुणी शोधून देईल काय?

यांचे पत्ते, संपर्क द्याल का?

  • उत्कर्ष प्रकाशन
  • अनुबंध प्रकाशन
  • नवनीत प्रकाशन
  • श्रीविद्या प्रकाशन
  • देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.
  • परचुरे प्रकाशन
  • महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ

आपला
गुंडोपंत

पत्ते

उत्कर्ष प्रकाशन - डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४, फोन नं. ०२० २५५३७९५८ / २५५३२४७९

अनुबंध प्रकाशन - अनिल गं कुलकर्णी ; २०२ बालाजी कॉम्प्लेक्स बालाजी नगर धनकवडी पुणे ४११०४३
फोन नं ०२० २४३७२८७१

नवनीत प्रकाशन - अनिल डी गाला नवनीत भवन, शारदाश्रमाजवळ, भवानीशंकर रोड, दादर (प) मुंबई ४००२८ फोन नं ०२२ ५६६२६४०० ई मेल npil@navneet.com

श्रीविद्या प्रकाशन -
२५० क /१६ शनिवार पेठ अष्टभुजा देवी रस्ता, पुणे ४११०३० फोन नं ०२० २४४५८४५५ / २४४५९९९५
देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. 'सावली ' ४७३ सदाशिव पेठ टिळक रोड पुणे ४११०३० फोन नं ०२० २४४७८४२८ २४४७६८४१

परचुरे प्रकाशन मंदिर- २०३ / ४ मेहता भवन, ३११ राजाराममोहन रॉय मार्ग गिरगाव मुंबई. ४००००४
फोन नं ०२२ २३८५४४६५ / २३८५४६९१ ई मेल ppm@vsnl.com

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ
बालभारती, सेनापती बापट मार्ग पुणे ४११००४ फोन नं ०२० २५६५९४६५

(प्रकाशन विश्व २००५ मधुन उधृत)
प्रकाश घाटपांडे

प्रकाशक

नचिकेत प्रकाशन , २४, योग़क्शेम लेआउट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर्,४४००१५
Visit:nachiketprakashan.wordpress.com
माहितीपर,नवनवीन विषयांवरील पुस्तके जाणीवपूर्वक प्रकाशित करतात.

ही माहिती असू द्यावी.

अनिल सांबरे

अजून काही

अजून् काही साप्ताहिक सकाळ मध्ये सापडले.
पण यांचे पत्ते नाही मिळाले, कुणाला मिळाल्यास नक्की द्या!

लोकवाङमय गृह - मुंबई
मुक्ता पब्लिशिंग हाऊस - कोल्हापुर
साकेत प्रकाशन - औरंगाबाद (सरांना माहिती असणार असे वाटले)
उन्मेष प्रकाशन - पुणे
स्नेहवर्धन प्रकाशन - पुणे
मधुश्री प्रकाशन - पुणे
यांनी आद्य शंकराचार्यांची निवडक स्तोत्रे प्रसिद्ध केली आहेत. किंमत रु.१०० मात्र.
नक्की कशावर आधारीत निवड आहे हे कळले नाही, सध्याच येथे शंकराचार्यांवर चर्चा घडत असल्याने हे पुस्तक इंटरेस्टींग वाटले.

आपला
गुंडोपंत

अजुन काही पत्ते

लोकवाङमय गृह - मुंबई
मुक्ता पब्लिशिंग हाऊस - कोल्हापुर?
मेहता पब्लिशिंग हाउस - सुनिल मेहता; १९४१ सदाशिव पेठ माडीवाले कॉलनी बाजीराव रोड टेलीफोन भवनासमोर, पुणे ४११०३० फोन नं ०२० २४४७६९२४ फॅक्स ०२० २४४७५४६२
ई मेल mehpubl@vsnl.com वेबसाईट http://mehtapublishinghouse.com
साकेत प्रकाशन - बाब भांड; ११५ म. गांधी नगर फायर ब्रिगेड मागे स्टेशन रोड ; औरंगाबाद ४३१००५ फोन नं ०२४० २३३२६९२ / २३२८४३०
उन्मेष प्रकाशन - मेधा राजहंस; चंद्रनील अपार्टमेंट 'सी' विंग कॉसमस बँकेसमोर विठ्ठलवाडी रस्ता पुणे ४११०३० फोन नं ०२० २४३३६२१९
स्नेहवर्धन प्रकाशन - डॉ स्नेहल तावरे ८६३ सदाशिव पेठ ,महात्मा फुले सभागृहामागे पुणे ४११०३० फोन नं ०२० २४४७२५४९
मधुश्री प्रकाशन - रघुनाथ लोणकर ; १४ 'जीवनप्रकाश ' ४७/२ तावरे कॉलनी सुरभी कार्यालयासमोर, अरण्येश्वर पुणे ४११००९ फोन नं ०२० २४२२७७२६

( प्रकाशन विश्व २००५ मधुन )
प्रकाश घाटपांडे

गजानन प्रकाशन/गजानन बुक डेपो

गौरी देशपांडे यांनी अनुवादित केलेले अरेबियन नाईट्स व इतर अनेक धार्मिक पुस्तके प्रकाशित करणारे मुंबईचे गजानन प्रकाशन.

श्री गजानन बुक डेपो
कबुतरखाना, दादर
मुंबई ४४००२८.
फोनः
०२२ २४२२७५८४
०२२ २५११८००९
०२२ २४२११७०१

श्री गजानन बुक डेपो
१३१४, सदाशिव पेठ
पुणे ४११०३०
फोन:
०२०२४४७३३०४
०२०२५४३८९१६

जोशी ब्रदर्स
अप्पा बळवंत चौक
पुणे ४११००२
फोनः २०२४४५९४२४

संकेतस्थळाचा दुवा


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विकि

येथील माहिती मराठी विकिच्या पानावरही वरही अपडेट करत आहे.
आशा आहे सदस्यांना असे करणे चालेल...
:-)

विकि चा मराठी पुस्तक प्रकाशने हा दुवा.

-निनाद

उत्तम माहिती

उपक्रमरावांना विनंती :
या माहितीपूर्ण सूचीचा दुवा मुख्य पानावर देता येईल का? नाहीतर तो पाठीमागे जात राहील, आणि हरवून जाईल.

अरे वा

ही उत्तम कल्पना आहे.
वा धनंजया! चांगले सुचले बरं का.

तसं आता विकिवरपण पान आहे म्हणजे सर्च केले तर सापडावेत असे वाटते आहे.
पण इथे असले तर उत्तम, शिवाय अजून सापडतील तशी भर घालता येईलच.

आपला
गुंडोपंत

उपयुक्त माहिती

खूप उपयुक्त.

असेच

पंत,
उपयुक्त माहिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

द्या ना

सर,
तुमच्या कडे पुस्तकांचा इतका मोठा साठा आहे,
शिवाय हाताशी कॉलेजचे वाचनालय!

त्यातली द्या ना प्रकाशकांची माहिती इथे.

हवं तर एखाद्या विद्यार्थ्याला बसवा टंकन करायला...
काय म्हणता?

आपला
आपल्या माणसांना हक्काने मागणारा
गुंडोपंत

त्रिदल प्रकाशन

अध्यात्मिक पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेले-
त्रिदल प्रकाशन
रामकृष्ण बुक डेपो,
प्रार्थना समाजजवळ,
गिरगाव, मुंबई- ४०० ००४

जालावर शोध घेता येथे (http://www.geocities.com/tridal_prakashan/) काही पुस्तकांची मुखपृष्ठ दिसली आणि त्यांचा संपर्क क्रमांक, विरोप पत्ता दिसला

PH : 091 - 022 - 238501 92 (OFFICE)

EMAIL - tridal_prakashan@yahoo.co.in

तसेच येथे (http://www.geocities.com/tridal_prakashan/English_List.htm) पुस्तकांची सूची किंमतीसहित आहे.

कळावे.
(त्रिदलच्या पुस्तकांची छपाई मला फार आवडते :)
--लिखाळ.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरण्यावाचून इलाज नव्हता. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरण्यावाचून इलाज नव्हता. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरण्यावाचून इलाज नव्हता. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरण्यावाचून इलाज नव्हता. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरण्यावाचून इलाज नव्हता.

मराठी पुस्तक प्रकाशक आणि आंतर जालीय दुवे

राम राम् मंडळी,

मला वाटते हा संवाद तसा जुना आहे. पण माझ्या तो आत्ताच लक्षात आला. कारण अगदी सरळच आहे. तुमच्यासारखेच मलाही पुस्तकांची खरेदी करायची होती. गंमत म्हणजे मी भारतातच मुंबईमध्येच आहे. आजच मला एक पुस्तक घ्यायचे होते पुण्यातून, पण सहज मिळेना. चेकने पैसे पाठवले तर त्याचे ७० रुपये बेंक चार्जेस म्हणून जातात म्हणून ते चेक घ्यायला तयार नाहीत. त्यांची अडचण बरोबर आहे २०० रुपयाच्या पुस्तकावर ७० रुपये बेंक चार्जेस आणि ३० रुपये पाठवण्याचा खर्च. हा आतबबट्ट्याचा व्यवहार होतोय. तसेच एक पुस्तक् घेण्यासाठी गिरगावात् किंवा दादरला जाणे त्रासाचे वाटते. कमित कमी ४ तास आणि गर्दी. (मान्य आहे मी आळशी आहे) आणि हे मुंबईतच होते आहे. म्हणून हा शोध घेतेला आणि हा संवाद आढळला.

ऑनलाईन पैसे ते घेउ शकत नाही कारण त्याची बेंक ती सुविधा देत नाही. पण समजा ही व्यवस्था झाली तरी पोस्टाचा मात्र खर्च आहे. माझ्या मते तो ३५ रुपयां पासून ७० रुपये प्रती २०० ग्रामला महाराष्ट्रात आणि ३५० रुपयांपासून ५५० रुपये भारता बाहेर आहे. दादरला जाण्याच्या ४ तासाच्या खटपटीपेक्षा मला तो परवडतो. जर जास्त पुस्तके घेतेली तर मात्र हा खर्च प्रती ग्राम कमी वाटतो.

तुम्ही पैसे क्रेडिट कार्डाने, आनलाईन ट्रान्स्फर, एसएमएस ने किंवा आयसीआयसीआय ड्रोप बॉक्स् मधे चेक टाकुन देउ शकता. अर्थात चेकसाठी जादा खर्च येणारच.

सर्व प्रकाशकांची बरीचशी मराठी पुस्तके एके ठिकाणी मिळणारे एकही ठिकाण आंतरजालावर आढळले नाही. असे जर एखादे ठिकाण उपलव्ध् झाले तर तुमचे मत काय असेल? मला निश्चित समजून घ्यायला आवडेल.मी वरती दिलेल्या व ईतरही मराठी साईट् बघीतल्या पण त्या फारशा अपडेटेड नाहीत व त्यात नवीन जुनी प्रकाशने जवळ जवळ नाहीतच.

आपली मोकळी मते मला खूप आवडतील.

हरीभाऊ

काकूआ

एकच घाव
खोल,पूर्ण शक्तीनीशी,
सकारात्मक परीणामासा.....
अन्तीम उपाय`म्हणूनच........
मला एकच् सान्गाय्चे आहे,
प्रकाशक,पोस्त् खर्चा च्या नावावर लुत्न्यात् क्ष्प् आह

 
^ वर