इतिहास
रामचंद्र पंत अमात्य कृत आज्ञापत्र
आज्ञापत्रामागील प्रेरणा पंचतंत्र आहे असा उल्लेख मी अंतर्जालावर एका लेखात वाचला होता पण आता तो संदर्भ उपलब्ध नाही. १४व्या शतकातील एका नीती ग्रंथात पंचतंत्रावर आधारित राज्यकारभार कसा चालवावा आणि राज्यव्यवस्था कशी ठेवावी याचे विवेचन होते आणि तो ग्रंथ रामचंद्र पंताना उपलब्ध होता अशी माहिती त्या लेखात होती. या विषयावर कोणास अधिक माहिती असेल तर कृपया ती येथे द्यावी हि विनंती.
द्वारका ...
भारताच्या पश्चिम किनार्यावरील एक टोकाचे शहर द्वारका ................
उपलब्ध ऐतिहासिक माहिती नुसार भगवान श्रीकृष्णाने सुमारे 7000 वर्षापूर्वी सुवर्णमयी द्वारकानगरीची स्थापना आपल्या राज्याची राजधानी म्हणून केली . महाभारताच्या शेवटच्या काळात ते शहर समुद्राने गिळंकृत केले . त्यानंतर 7 वेळा पुन्हा द्वारका शहर वसविण्यात आले . व ते आणखी 7 वेळा बुडाले. सध्या अस्तीत्वात असलेले द्वारका शहर हे आठव्यांदा वसवलेले आहे .
समाज रचनेला अर्थ आहे.
सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,
नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.
धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }
वैदिक गणित ?
वैदिक गणित म्हणजे नेमके काय आहे हे बहुतेकांना माहीत नसते. या वर बाजारात पुस्तके आहेत पण ती आणून वाचण्याच्या फंदात फार कोणी पडत नाही, व वाचले तरी त्यावर विचार तर फारच कमी लोक करतात. त्यातून आपली मानसिकता अशी आहे कि कोणतीही गोष्ट वेद पुराणातून आहे असे म्हंटले कि आपला त्यावर चटकन विश्वास बसतो एवढेच नव्हे तर ते आधुनिक विज्ञाना पेक्षा श्रेष्ठच असणार असा पण आपला समज असतो. या मानसिकते मुळे वैदिक गणित म्हणजे गणिताची काही तरी श्रेष्ठतम पद्धती आहे असा एक भ्रम पसरलेला आहे.
जगन्मातेची प्रतिमा
नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. सोशल नेटवर्किंग साइटवरल्या एका ग्रुपमध्ये एक प्रसंग त्या निमित्ताने घडला. तेथे अनेक उपक्रमी असल्याने त्यांनी या चर्चेत भाग घेतलाच पण इतर उपक्रमींचे मत यावर जाणून घेणे महत्त्वाचे वाटले म्हणून चर्चा प्रपंच. लज्जागौरीचे चित्र टाकून त्या जग्नमातेला नमस्कार करणार्या एका गुणी इतिहास तज्ञाच्या पोस्टवर अनेक लोकांच्या भावना आईला/ मातेला अशा स्वरूपात दाखवल्याने दुखावल्या.
लज्जागौरीचे चित्र येथे देत आहे. ते उपक्रमींना नवे नसावे. हा मातृकेचा प्राचीन फॉर्म आहे.
शून्य ते अनंतापर्यंत......
प्राचीन भारतीय गणितज्ञांनी जगाला शून्य ही संख्या दिल्यामुळे गणितविश्वाला कलाटणी मिळाली हे कुणीही नाकारू शकत नाही. प्राचीन काळातील बॅबिलोनियन, ग्रीक, सुमेरियन, इजिप्त इत्यादींच्या संस्कृतीत वापरात असलेले अंक व गणितीय पद्धती कळण्यास फारच क्लिष्ट होत्या व सामान्यांच्या आकलनाच्या पलिकडच्या होत्या. भारतातून अरबांच्याद्वारे इतर देशात शून्य ही संकल्पना पोचल्यानंतरच तेथील तज्ञांना शून्याचे महत्व कळू लागले. शून्य ही 1, 2, 3 ... सारखी फक्त संख्या नव्हती. तर दशमान पद्धतीची सुरुवातच या संख्येने झाली. व काही शतकानंतर शून्याला पर्याय नाही हे जगाला कळून चुकले.
सांगली जिल्ह्यातील ’देवराष्ट्रे’ गावाबाबत काही...
’देवराष्ट्रे’ हे सांगली जिल्ह्यातल्या छोटया गावाचे नाव तसे परिचित होते. यशवंतराव चव्हाणांचे तसेच रमाबाई रानडे ह्यांचे हे जन्मगाव. गावाच्या नावाबाबत जरा कुतूहल होते कारण इतके जवळजवळ संस्कृत भाषेतील वाटावे असे नाव महाराष्ट्रात तरी दुर्मिळ वाटते. ह्या गावच्या जुनेपणाविषयीहि कोठे काही ऐकलेले वा वाचलेले नव्हते.
कालपरवा असे ध्यानात आले की अलाहाबाद किल्ल्यामध्ये असलेल्या स्तंभावर जो समुद्रगुप्ताचा म्हणून दीर्घ कोरीव लेख आहे त्यात ’देवराष्ट्र’ नावाच्या नगराचा आणि तेथील ’कुबेर’नामक राजाचा उल्लेख आहे. लेखाच्या १९व्या आणि २०व्या ओळीत समुद्रगुप्ताच्या दक्षिणेतील मांडलिक राजांची नावे आहेत.
कौषीतकी उपनिषद आणि काही प्रश्न
माझ्या मुलीला इतिहासाच्या अभ्यासासाठी कौषीतकी उपनिषद आहे. असे लक्षात आले की मुलांना त्याचा संदर्भ आणि थोडाफार अर्थ कळला तरी अधिकाराने त्यावर भाष्य करणे किंवा त्यावर आधारित उत्तरे देणे जमलेले नाही. मला उपनिषदे, अध्यात्म वगैरे गोष्टींमध्ये अजिबात गती नाही. कौषीतकी हा शब्द देखील मी व्यवस्थित लिहिला आहे की नाही याची कल्पना नाही. थोडेफार समजवून दिल्यावर पुढे मला अधिकारवाणीने समजावता येत नाही.
हे कुठून आले?
१. इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा प्रारंभीचा काळ :-- "शक सत्रपांनी पश्चिम भारतात राज्ये स्थापन केली. त्याचा भारतीयांना त्रास होइ. त्यांचा सडकून पराभव गौतमीपुत्राने केला."
२. इसवीसनाच्या पहिल्या शतकाच्या शेवटी :- कुषाण तर थेट आख्ख्या उत्तर भारतात पसरले. फार मोथे साम्राज्य त्यांनी स्थापले विम- कुजुल कॅडफिसस च्या नेतृत्वाखाली . त्यांचा वारसदार कनिष्क तर पामीर पठार ओलांडून जाणारा पहिलाच भारतीय सत्तेचा प्रमुख ठरला. मथुरेपासून उत्तर्-पश्चिमेकडे त्याचा मजबूत अंमल होता. काश्मीर पार करून त्याने मध्य आशियायी भागातही धाडक मारत थेट चीनच्या राजाला हैर्राण केले.
अजि म्यां ब्रह्म ऐकिले........
पृष्ठप्रांगण अर्थात ब्याकग्रौंड :
शुक्रवारी अर्थात २४ आगष्टास संध्याकाळी ६ वाजता केसरीवाड्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली ध्वनिफीत ऐकायला मिळणार आहे अशी बातमी ईईई सकाळात बुधवारी वाचली. मग म्हटले प्रत्यक्ष लोकमान्यांचा आवाज ऐकायला गेलेचि पाहिजे. गेलो मग केसरीवाड्यात.