द्वारका ...

भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील एक टोकाचे शहर द्वारका ................

उपलब्ध ऐतिहासिक माहिती नुसार भगवान श्रीकृष्णाने सुमारे 7000 वर्षापूर्वी सुवर्णमयी द्वारकानगरीची स्थापना आपल्या राज्याची राजधानी म्हणून केली . महाभारताच्या शेवटच्या काळात ते शहर समुद्राने गिळंकृत केले . त्यानंतर 7 वेळा पुन्हा द्वारका शहर वसविण्यात आले . व ते आणखी 7 वेळा बुडाले. सध्या अस्तीत्वात असलेले द्वारका शहर हे आठव्यांदा वसवलेले आहे .

काही वर्षापूर्वी भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे या द्वारका आणि बेट द्वारका (ओखा) परिसरात पाणबुड्या द्वारे अत्याधुनिक संशोधन सामुग्री वापरुन समुद्रतळाचा शोध घेण्यात आला .व त्यात सापडलेल्या अवशेषांचा सखोल अभ्यास oxford university येथे करण्यात आला . त्यानुसार समुद्रतळाशी सुमारे इ .स.पूर्व 5000 ते इ.स.पूर्व 2000 काळातील पक्क्या मजबूत शहराचे अवशेष,भिंती , बोटींचे नांगर व अन्य अवशेष सापडले ,ज्यावरून हे सिद्ध होवू शकते की खरोखर भगवान श्रीकृष्ण व त्याची संपन्न द्वारका अस्तीत्वात होती. तसेच फार पूर्वीच्या काळापासून पाश्चात्य देशांशी व्यापारीक संबंध होते.................!

जय श्रीकृष्ण !!!

http://www.hindu.com/2007/02/23/stories/2007022301242200.htm

लेखनविषय: दुवे:

Comments

शहर मिळाले हे खरे

समुद्राच्या उदरात गडप झालेले शहर मिळाले हे खरे, तेथे समुद्रव्यापार चालत असे हे देखील खरे, बहुधा ते द्वारका शहर असावे आणि एखाद्या नैसर्गिक आपत्तीत गुडूप झाले असावे हे ही खरे परंतु याचा अर्थ महाभारतात वर्णन केलेले सर्व खरे असा नाही आणि ही श्रीकृष्णाचीच द्वारका असेही नाही.

कथा कादंबर्‍यांत एखादे पात्र असले उदा. फुरसुंगीचा फास्टर फेणे हे फुरसुंगी हे गाव अस्तित्त्वात असली म्हणून फास्टर फेणेही होता असे म्हणता येत नाही.

याचा अर्थ श्रीकृष्ण नव्हता असेही नाही आणि श्रीकृष्णाच्या अस्तित्त्वासाठी द्वारका हवी असेही नाही. मथुरा, वृंदावन आहेतच की. हं! द्वारका आणखी एक पुरावा म्हणून ठीक आहे पण ती श्रीकृष्णाचीच द्वारका हे सिद्ध करण्यास पुरेसे पुरावे नाहीत.

-----

बायदवे, उपक्रमवर हे असे विषय चावून चोथा झालेले आहेत. जरा बरे काही येऊ दे.

उपक्रमाचा अपमान

आमच्यासारखे वाचकमात्र सदस्य सर्वसाधारणपणे दुर्लक्ष करतात पण आता हा धागा म्हणजे हद्द झाली. एक तर शेंडा बुडखा नसलेली विधाने ती पण एका खोट्या लिंकचा पुरावा म्हणून धडधडीतपणे वापर करून सत्य म्हणून मांडायला काही कसे वाटत नाही ?
द्वारका असेल.. अयोध्या मग ती रामाची असो, हर्षवर्धनाने वसवलेली असो अथवा त्या तिकडे थायलंड मधली असो (ते लोक राम तिथला आहे असेच्च मानतात म्हणे ..) त्यांचा कालसंदर्भ अथवा ऐतिहासिक स्थान वगैरे बद्दल इथे बोलताना तरी थोडा अभ्यास करावा की राव.. कमीत कमी ती लिंक तरी तपासून बघावी की नाही..?

ते देव धर्म इत्यादी आम्ही मानतो न मानतो ते बाजूला.. पण आधी असले निर्बुद्ध लिहायचे, आणि मग 'भावना दुखावल्या, तुम्हाला मेली आपल्या जाज्वल्य इतिहासाची मुळी कदरच नाही' असले रडगाणे गायचे.. कशाला हो कशाला, कशाला ?

कृष्ण असेल की तेव्हा, नाही म्हणत नाही हो, आमची तर इच्छा आहे तसे ठाम पुरावे मिळावेत, नवीन उत्खनन तंत्रज्ञानाचा वापर होवून अजून माहिती उपलब्ध व्हावी . आत्ता पुरावे पण नाही मागत, पण मग सापडतील तेव्हा सापडतील. तेव्हा काय ते ७००० की आणखी किती वर्षे असेल ते बघू की..

आता कशाला परत परत हात दाखवून अवलक्षण करायचे ? ते पण खोट्या लिंका टाकून ?
उपक्रमावर हे असले खोट्या पुराव्याचे आणि बिन-बुडाचे धागे म्हणजे उपक्रमाचा अपमान वाटतात.

[ता. क. तरी प्रियाली ताईंचा संयमित प्रतिसाद धाग्यापेक्षा तरी बरा वाटला हे नमूद करतो .. ]

आण्णा, अहो द्वारका नगरीचे अवशेष मिळले तर द्वारका नगरी होती हे सिद्ध होईल.. कृष्ण होता हे सिद्ध होत नाही.

उद्या बगदाद शहराचा नव्याने शोध लागला, तर त्यावरुन अल्लाउदीन आणि जादुचा राक्षस होता, हे सिद्ध होत नाही.

महाभारताच्या शेवटच्या काळात ते शहर समुद्राने गिळंकृत केले .

हे तर अजुनच भाकड मत आहे.... समुद्राने गिळंकृत केले म्हणजे एक तर तिथे सुनामी आली असेल, पण सुनामी गेली की समुद्रपातळी पूर्ववत होते... म्हणजे शहरात वाळू, पाणी साचेल, पण शहर बुडणार नाही.

पूर्ण शहर एकदम बुडायला समुद्राची पाण्याचीच पातळी एकदम वाढावी लागेल, नै का? मग तसे जर झाले असते, तर त्या विशिष्ट वेळेला जगातील अजुन पाचपन्नास शहरं - बेटं बुडतील नै का?

विकिपीडिया पण खोटा?

वरील लिंक विकिपीडिया वरुन घेतली आहे, आता विकिपीडिया पण खोटा मानावा का?

मग खरे काय मानायचे?

आणि चावून चोथा झाला म्हणून विषय काढू नये असे काही नाही,दर वेळी नवीन माहिती हाती लागतेच की .....................

मराठी संस्थळा वर हिंदू धर्म ,संस्कृती आणि इतिहास खोटा ठरवून खिल्ली उडवणार्‍यांची फौजच निर्माण झाली आहे !

बरोबर

मराठी संस्थळा वर हिंदू धर्म ,संस्कृती आणि इतिहास खोटा ठरवून खिल्ली उडवणार्‍यांची फौजच निर्माण झाली आहे !

अगदी अगदी! मराठी संकेतस्थळांवर त्याही पेक्षा हिंदू संस्कृतीच्या नावाने मनाला येईल ते बरळणारे आणि खोटेनाटे खपवणारे जास्त आहेत.

वरील लिंक विकिपीडिया वरुन घेतली आहे, आता विकिपीडिया पण खोटा मानावा का?

वरील लिंक कुठूनही घ्या. त्याचा श्रीकृष्ण होता हे सिद्ध करण्याशी फारसा संबंध नाही. तो संबंध जोडायचा झाल्यास हे शहर कधी नष्ट झाले, कोणत्या आपत्तीत नष्ट झाले, श्रीकृष्णाचा काळ कोणता, तेथे राहणार्‍या लोकांचा देव कोणता, आचार पद्धती कोणती, उत्खननात सापडलेले पुरावे वगैरे गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

अनेकांनी तुम्हाला प्रतिसादांतून हेच सांगितले आहे जर लक्षात येत नसेल तर ठीक आहे पण चावून चोथा झालेले विषय मांडताना पुरेसा अभ्यास वगैरे करून तरी लिहावे.अन्यथा, वरली लिंक हिंदू.नेटवर आहे आणि विकिपिडीयावर आहे हे आम्हाला देखील ठाऊक आहे.

विकिपीडिया बरोबर असतोच असेही नाही.

आता विकिपीडिया पण खोटा मानावा का?>> अहो विकिपीडिया बरोबर असतोच असेही नाही. तिथे कोणीही उठते आणि काहीही लिहू शकते. ज्याला जे बरोबर वाटेल तो ते लिहितो. त्यामुळे विकिपीडिया कुठल्याही संशोधनात्मक कार्यासाठी उपयोगाचा मानीत नाहीत. उलट जर का आपल्या शोध निबंधात विकिपीडिया अशी लिंक दिसली तर चांगल्या संस्थांमधून अश्या शोधनिबंधाना केराची टोपली दाखवली जाते.

उदाहरणार्थ अंतराळात पहिली स्त्री कोण होती. ह्यावर विकिपीडिया म्हणतो १९८० साली अमेरिकन गेली. खरे म्हणजे रशियाने १९६३ का ६७ साली पहिली स्त्री पाठवली होती.

आता ह्या द्रराकेबद्दल थोडेसे. माझ्या माहिती प्रमाणे ब्रिटीश पेट्रोलियमने गैसच्या शोध घेता घेता त्यांना काही सापडले आणि मग पुढे बाकीच्या लोकांनी बरीच शोधाशोध केली. यूटूब वर त्याची डॉक्युमेंटरी आहे. पण त्याच्यामधून अजून पूर्ण निष्कर्ष काढता आले नाहीये. असो.

पण जरी द्वारका कृष्णाची असली आणि अगदी आपला हिंदू धर्म सगळ्यात जुना असला तरी आपण इतके रसातळाला का आलो ह्याचे काही उत्तर मिळत नाही. आपले मन फक्त खूष होते पण त्याचा फारसा काही उपयोग नाही बघा.

विकिपेडइया खरा मानावयचा......

उद्या म्हणाल नथुराम गोडसेवर लिहिलेले नाटक हेही संदर्भग्रंथ माना म्हणून.

संदर्भ

प्रस्तुत लेखात लेखकाने केलेल्या काही विधानांचे संदर्भ लेखक देऊ शकतील काय?

उपलब्ध ऐतिहासिक माहिती नुसार भगवान श्रीकृष्णाने सुमारे 7000 वर्षापूर्वी सुवर्णमयी द्वारकानगरीची स्थापना आपल्या राज्याची राजधानी म्हणून केली .

"उपलब्ध ऐतिहासिक माहिती कोठे" उपलब्ध आहे? कृपया संदर्भ द्यावा.

महाभारताच्या शेवटच्या काळात ते शहर समुद्राने गिळंकृत केले

महाभारताचा शेवटचा काळ म्हणजे नक्की कोणता काळ? इ.स.पूर्व किती शतके किंवा सहस्त्रके ?

समुद्रतळाशी सुमारे इ .स.पूर्व 5000 ते इ.स.पूर्व 2000 काळातील पक्क्या मजबूत शहराचे अवशेष,भिंती , बोटींचे नांगर व अन्य अवशेष सापडले

अवशेषांचे डेटिंग कोणी कधी व कसे केले? संदर्भ मिळू शकतील काय? माझ्या माहितीप्रमाणे या अवशेषांचे डेटिंग अजून कोणी करू शकलेले नाही.
सिंधू--सरस्वती संस्कृती मधील द्वारका हे महत्वाचे बंदर होते. त्यामुळे इ.स.पूर्व 3200 ते इ.स.पूर्व 1600 या काळातील अवशेष येथे सापडणे साहजिकच आहे. यापैकी कोणता काळ श्रीकृष्णाचा असावा असे लेखकाला वाटते आहे हे कळले तर लेखकाला काय सांगायचे आहे ते जास्त नीट समजू शकेल. काहीच संदर्भ दिलेले नसल्याने सध्यातरी प्रस्तुत लेख भाकडकथांवर आधारित आहे असेच म्हणावे लागते.

लेख?

चंद्रशेखर यांच्या प्रतिसादाशी सहमत आहेच पण

काहीच संदर्भ दिलेले नसल्याने सध्यातरी प्रस्तुत लेख भाकडकथांवर आधारित आहे असेच म्हणावे लागते.

याला लेख म्हणू नये प्लीज. हे जे काही आहे तो एकप्रकारचा प्रपोगंडा आणि प्रचार आहे इतकेच. :-)

ऐका

अहो साहेब तुम्हाला हे माहीत हवे की, ईथे हिँदु धर्मावर काही लेख लिहु शकत नाही
सर्वच लोकांनी धडाधड विरुद्ध प्रतिसाद दिले.अहो ठिक आहे द्या प्रतिसाद पण लेखकाने चर्चा करायला सांगितली विरोध नाही
का म्हणुन हिँदु धर्माची सर्वाँना एवडी चिड वाटते परमेश्वरच जाणे

?

>>हिँदु धर्माची सर्वाँना एवडी चिड वाटते परमेश्वरच जाणे

हिंदू धर्माची चीड वाटते असे इथे फार कोणी नसावेत.

गेले ते दिन, जुना काळ म्हणजे सुवर्णकाळ, जगात जे काही चांगले आहे ते हिंदूंचे आहे किंवा हिंदूंनी (शेकडो/हजारो/लाखो वर्षे) पूर्वीच करून ठेवलेले आहे असे मानणार्‍या मनोवृत्तीची चीड आहे.

दुगाण्या झाडण्याचा आनंद.

हिंदू धर्म, चालीरीती आणि लोक ह्यांच्यावर टीका करून फायदे उपटायचे हे आता जुने झाले. ते कुमार केतकर कधीपासून बाशिंग बांधून बसले आहेत. अजून त्यांनाच काही मिळाले नाही तर उपक्रम च्या ह्या सदस्यांना काय मिळेल?
उगाच वैयक्तिक टीका आणि ओढून ताणून हिंदू कसे वाईट हेच उगाळणे म्हणजे उपक्रम असा गैरसमज काही जनतेचा झालेला आहे.

१००%

उपक्रमावरचे ९९.९९९ % सदस्य हे ९९.९९९% हिंदू आहेत. हिंदू असल्यामुळे काही मिळते किंवा काही मिळवण्यासाठी हिंदू असावे लागते हे माहीत नव्हते. ह्या सर्व हिंदूंचा उपक्रम म्हणजे काय या विषयी कोणताही गैरसमज झालेला नाही. टीकेमुळे देखील कोणते फायदे उपटता येतात याचे जरा मार्गदर्शन करावे.

वाचनातील गफलत?

- हिंदू असल्यामुळे काही मिळते किंवा काही मिळवण्यासाठी हिंदू असावे लागते हे माहीत नव्हते.
हे कुणालाच माहित नाही.

- हिंदू धर्म, चालीरीती आणि लोक ह्यांच्यावर टीका करून फायदे उपटायचे हे आता जुने झाले.
असे मी लिहिले होते. बहुधा नीट लक्षात आले नसावे.
हे फायदे कसे उपटायचे हे जाणून घ्याचे असल्यास महेश भट्ट, जावेद अख्तर, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, राहुल बोस, कुलदीप नय्यर आणि इतर अनेक मान्यवर आपल्याला समजावतील.

जुने झाले ना?

हिंदू धर्म, चालीरीती आणि लोक ह्यांच्यावर टीका करून फायदे उपटायचे हे आता जुने झाले.
म्हणजे आता तसे करून काही फायदा नाही असेच ना? तरीही काही हिंदूच लोक टीका करतात ते निस्स्वार्थी निरपेक्ष वृत्तीने करतात, कळकळ वाटते म्हणून करतात असे मानावे का? बरे, असे टीका करणारे हिंदू लोक बहुसंख्य आहेत असे मानले तर बहुसंख्यांच्या मताचा आदर करायला नको का? आणि जर असे लोक मूठभर आहेत आणि ते उगीचच अर्थहीन टिवटिव करत असतात तर १) अशा लोकांचा कसलाच प्रभाव 'इतर' सुज्ञजनांवर पडणार नाही हे जाणून न्यूसन्स वॅल्यू शून्य असलेल्या या लोकांना इतके महत्त्व द्यायची काय गरज? त्यांच्याकडे दुर्लक्षच करणे योग्य नाही का? २) जर 'इतर' लोकांवर या मूठभर लोकांचा प्रभाव पडून त्यांची मते बदलत असतील, तर बहुसंख्य लोकांना त्यांची मते का पटताहेत हे जाणून घ्यायला नको का? की 'इतर' लोक मूर्ख आहेत,त्यांना काहीही सांगितले तरी चालते, पटते असे आहे? तसे असेल तर या 'इतर' लोकांना टीकावाद्यांच्या विरुद्धची मतेही पटू शकतील. तसे होताना दिसते आहे का? तसे होत असेल तर भुई धोपटण्यात अर्थच रहात नाही.

गैरसमज नसावा.

उपक्रम वर लेखन करणाऱ्या लोकांमुळे कुणाचे मतपरिवर्तन होत नाही. गोड गैरसमज करून घेऊ नये.
पण मी दिलेल्या काही नावांचा खूपच प्रभाव आहे. दुर्दैवाने तो चांगल्यासाठी उपयोगात येत नाही. जसे एका थोर दिग्दर्शकाच्या मुलाने २६/११ च्या मुख्य सूत्रधाराला मुंबई फिरवून आणली होती. पण केवळ एक पत्र त्या दिग्दर्शकाने लिहिले आणि मुलगा बाहेर.
आता उपक्रम चेच उदाहरण घ्या कि. इथे भारताच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अतीरेक्याला फाशी दिल्याने किती लोक गळा काढत आहेत. त्यांनी अशी सहानुभूती हल्ल्यामध्ये ठार झालेल्या जवानांसाठी दाखवली असती तर?

विनोदी

आता उपक्रम चेच उदाहरण घ्या कि. इथे भारताच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अतीरेक्याला फाशी दिल्याने किती लोक गळा काढत आहेत. त्यांनी अशी सहानुभूती हल्ल्यामध्ये ठार झालेल्या जवानांसाठी दाखवली असती तर?

काहीही! हे कधी कुठे घडले त्याचे पुरावे आहेत का?

दुगाण्या

इथे दुगाण्या झाडणारे कोण आहेत हे सर्वांना माहित आहे तेव्हा पुरे करा!

प्रतिसाद संपादित

उपक्रमवर लिहिताना उपक्रमच्या धोरणांचे पालन करावे. सातत्याने सद्स्य आणि संकेतस्थळावर केलेली टिप्पणी संपादित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.

 
^ वर